वैखरी एक प्रेमकथा भाग५

A Love Story Of A Girl

कथेचे नाव- वैखरी एक प्रेमकथा भाग-५
कॅटेगरी - राज्यस्तरिय करंडक कथामालिका
सब कॅटेगरी - प्रेमकथा
टीम - अमरावती



             " आटोपलं बाबा एकदाचं सेमीस्टर .
चल लवकर बॅग भर . उदया सकाळीच निघूया .
मला आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येत आहे . छान ! भेंडीची भाजी करायला सांगतो आईला उदया .
तुझ्या आवडीचं काय सांगू ", सुहित

"नको असं खास नाही . मला सर्वच भाज्या

आवडतात . घरचं जेवण मिळतं हेच खूप
आहे ," वसंत .


          वसंत व सुहित दोघं नाही…ss .. नाही …तिघं वैखरी असतेच की वसंत सोबत . घरी जायला
निघतात .

        रस्त्यानी सुहित वसंतला चिडवतो . . "वैखरी बसली ना रे वसंत गाडीत नाहीतर राहून जायची कॉलेजमध्येच " .


         वसंत व सुहित घरी येणार म्हणून आज पुरण पोळीचा बेत असतो पुरणपोळी वैखरीला फार आवडते म्हणून स्वरानी तिलाही बोलवून
घेतलंलं असं सुहित वसंतला सांगतो .

    आज उनसे दुसरी मुलाकात होंगी….
असं गाणं म्हणत सुहित वसंतला चिडवतो .

     वसंत सुहितकडे दुर्लक्ष करतो . वसंतला वैखरीची भेट होणार याचा खरं तर आनंदच झाला होता . तरिही मनात एक भिती होती .
मनातलं चेहर्‍यावर कुठं वागणूकीत दिसणार तर नाही ना .

       वैखरी माझ्यासाठी खूप स्पेशल व्यक्ती आहे हे चेहऱ्यावर कुठेही दिसणार नाही याची दक्षता घ्यायचं वसंत मनाशी ठरवतो .

        सुहित व वसंत घरी पोहचतात . स्वरा व आईबाबा दोघांच्याही वाटेकडे डोळे लावून असतात . सर्वाच्या चेहर्‍यावर आनंदाची लकेर दिसते . घरी पोहचताच सुहितची आई दोघांनाही सरबत देते . प्रवासात त्रास झाला नाही ना . भूक लागली असेल असे काळजीने विचारते . लगेच वसंतचे डोळे पाणावतात . त्याच्या मनात विचार येतो . माझी जन्मदाती आई अशीच असेल का ? कुठे असेल ती ?
भेटेल का कधी ? लगेच कुणाचे लक्ष नाही असं बघून डोळे टिपतो . सुहितच्या आईच्या नजरेतून वसंतचं भावूक होणं सुटलेलं नसतं .

        " वसंत बेटा ठिक आहेस ना बाळा ", वसंतची आई विचारते.

       "हो काकू, मी एकदम ठीक आहे ", वसंत

उत्तरतो .


       "वसंत तु मला आई म्हटलं तरी चालेल ".

"पण..ss काकू ?"


" पण वगैरे काही नाही . तू मला आजपासून आई म्हणायचं ".

" \"आई \" " म्हणत, वसंत सुहितच्या आईला नमस्कार करतो ."

        "सुखी राहा बाळा", सुहितची आई वसंतला प्रेमानी आशीर्वाद देते .

" \"आई \"शब्दांत किती सुख आहे. केवळ उच्चारला तरी सुख लाभतं आईच्या कुशीत किती सुख मिळत

असेल ", वसंत मनात विचार करत असतो.


" वसंत …ssss ये वसंत. कसला विचार करतोस ", सुहित

       " काही नाही रे सुहित, काकूंचं प्रेमळ वागणं पाहून वाटलं . आई म्हणजे खरचं मायेची मूर्ती . किती माया करतात काकू आपल्यावर. मलाही त्यांच्या मायेची उब जाणवते . आई म्हणजे साक्षात ईश्वरच ! नाही का सुहित ", वसंत

      " हो . आई म्हणजे साक्षात सरस्वती . लेकरांची बुद्धी जे जे ग्रहण करते आईच त्याला शब्दरूप देते.चालणे, बोलणे, वागणे ,ज्ञान देवून संस्कारही मनी रुजविते . गोंजारून आपले भावविश्व फुलवते . यशस्वी जीवनाचे बाळकडू आईकडून मिळत असते . शंभर गुरुहूनही आई श्रेष्ठ असते , म्हणूनच म्हणतात ना साक्षात सरस्वतीचे रुप असते आई ", सुहित .

       " खरंच पृथ्वीतलावर सरस्वती मातेच्या रुपात सजीवाच्या जीवनात आई असते यात दुमत नसावे . मग ती जन्मदाती आई असो वा पालनकर्ती . आमच्या अनाथालयाच्या माईंनी अनाथालयात एवढे मुले असुनही सर्वांना आईचे प्रेम दिले . वागणे, बोलणे शिकविले . आई शिक्षित असो वा अशिक्षित . जन्मदाती असो वा पालनकर्ती . ती आपल्या लेकरांना भाषा शिकविते म्हणूनच तर मातृभाषा असा शब्द रूढ झाला .आईचा महिमा वेगळाच असतो ना रे
सुहित ," वसंत .


       " हो . म्हणून तर आईच्या पाया पडलो की ईश्वराचे आशीर्वाद मिळाल्यासारखे असते .असे माझे आजोबा सांगायचे ", सुहित .

        " माझी जन्मदाती आई कशी असेल रे
सुहित . का ? तिनी मला असं वाऱ्यावर सोडले

असेल ? माझ्या मनात सतत हा प्रश्न घोळत असतो . कशी दिसत असेल रे ती ?
तू  तुझ्या आईसारखा दिसतोस म्हणून मीही माझ्या आईसारखा दिसत असेल ह्या कल्पनेतून तिचं चित्र रेखाटण्याचा बराच प्रयत्न करत असतो . लांब नाक . नाकावर काळा तिळ . उजव्या गालावर खळी . जुळलेल्या भुवया . टपोरे काळेशार डोळे . कुरळे काळे केश . असेल का ती हुबेहुब माझ्यासारखी ", वसंत .


" असू शकते ", सुहित

     "मी जिथे जातो तिथे माझी नजर मी रेखाटलेला तो आईचा चेहरा शोधत असते . कधीतरी, कुठेतरी मला अचानक भेटेल का रे माझी
आई ," वसंत .

         " वसंत, तु लहानपणी काढलेलं ते चित्र आठवतं मला . किती रागावला होतास माझ्यावर . चित्राला हात लावला म्हणून ."

             माझं ते चित्रच माझं जग .माझी आई . मी जीवापाड जपतो तिला . हरवायला नको ना म्हणून.. वसंताचे डोळे बोलता बोलता भरून येतात .

      " सुहित वसंतच्या खादयांवर हात ठेवतो, वसंत शांत हो . सांभाळ स्वतःला . तुला तुझ्या आईविषयी असलेल्या अपार प्रेमापोटी ईश्वर भेट घडून आणेल मायलेकांची",

     " खोटी आशा तर नाही दाखवत ना तू
सुहित . अचानक चमत्कार व्हावा अन् माझी आई समोर दिसावी असं काहीसं व्हावं ", वसंत

          "वसंत . मी तुझी भावना समजू
शकतो . होईल काहीतरी चांगलं . देव बरोबर करतो .जास्त विचार नको करू . चल लवकर फ्रेश हो . आई जेवायला कधीही आवाज देवू शकते.. आणि हो वैखरी पण येणार आहे विसरू नकोस ", सुहित

        सुहित व वसंत फ्रेश होवून येतात . तेवढ्यात डोअर बेल वाजते .

        वसंत, जा जा उघड दार.
      जिसका तुझे था इंतजार ओ घड़ी आ गयी..
       आ गयी…
        सुहित वसंतची मजा घेत असतो तेवढ्यात
आई किचन मधून बाहेर येते….

         काय रे पोरांनो, किती गप्पा करता . बेलसुद्धा ऐकू येईना तुम्हाला .

          आई दार उघडते, वसंतला वैखरीला बघण्याची उत्सुकता असतेच . त्याचे डोळ दाराकडेच लागलेले असतात. सुहितचं लक्ष मात्र वसंतकडे असते .

अबोली कलरचा कुर्ता……
आकाशी रंगाची जीन्स…..
काळाभोर घनदाट केशसंभार……..
टपोरे ते डोळे तजेलदार……..
गुलाबी गोबरे गाल……..
गोड चेहरा चंद्राकार….
गुलाबी पाकळीसारखे ओठ……
त्यावर हलकं गोडं स्मीत…
वसंत एकटक वैखरीला बघत उभा राहिला… खुणावून त्याला खाली बसवतं सुहित म्हणाला,
" कट्रोल… आई आहे इथे" .
तसाच वसंत भानावर आला…


वैखरी सुहितच्या आईला नमस्कार करून स्वराच्या रुमकडे निघून गेली.


क्रमशः

वसंतच्या हावभावावरून वैखरीला वसंतच्या मनातलं कळेल का ? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा .
वैखरी एक प्रेमकथा- भाग-६

भाग-५ कसा वाटला कमेंन्ट करून जरूर कळवा . हो! कथा आवडल्यास लाईक करायला विसरू नका.
न आवडल्यास माफ करा .

धन्यवाद !?

©®✍️ ऍड. नीता प्रफुल्ल कचवे .
टीम - अमरावती .




🎭 Series Post

View all