वैखरी एक प्रेमकथा भाग ४

A Love Story Of A Girl

कथेचे नाव- वैखरी एक प्रेम कथा- भाग ४
कॅटेगरी - राज्यस्तरिककरंडक कथामालिका
सब कॅटेगरी- प्रेमकथा



झालेली चूक सुधारू कसा मी
सांग जरा तू या मनाला…….sss

तुझ्या नजरेला नजर मिळाली
विसरू कसा मी त्या भेटीला
पाहताच तुला वेडा झालो
विसरून गेलो मी स्वतःला… । १ ।

झालेली चूक सुधारू कसा मी,
सांग जरा तू या मनाला…..ssss

प्रेमाच्या गावी जायचे नाही
सांगितले होते मी स्वतःला
विचारही कधी केला नव्हता
हरवावं लागेल असं हदयाला….. I २ I

झालेली चूक सुधारू कसा मी,
सांग जरा तू या मनाला…..ssss

काळ्या टपोर्‍या डोळ्यांची किमया
बेचैन केलं माझ्या दिलाला
पुस्तकातही आता मन लागेना
येतेस सारखी स्वप्नी भेटायला…. I ३ ।

झालेली चूक सुधारू कसा मी,
सांग जरा तू या मनाला…..ssss

वैखरी, ये थांब न . नको न जाऊस…

अच्छा बच्चू ," झालेली चूक सुधारू कसा…
स्वप्नात वैखरीसोबत प्रेमगीत गात होतास तर ."

"सुहित केव्हा आलास ? . दे ती डायरी इकडे ".

"अरे वाचू दे नं गीत . सुंदर झाली रचना .
अगदी मनातलं लिहीलेस . चाल लावतो मी या रचनेला ", सुहित .

बरं वसंत मी काय म्हणतो, तू वैखरीला असं स्वप्नात भेटल्यापेक्षा प्रत्यक्ष भेटायची संधी मिळाली तर…..

"तर काय ?", वसंत .

"असं काय विचारतोस ?, इच्छा नाही का तुला तिला प्रत्यक्ष भेटण्याची ?", सुहित

"नाही ", वसंत

"काय ? मनातून बोलतोस ?," सुहित .

"हो . अगदी मनापासून इच्छा नाही मला वैखरीला भेटायची ", वसंत .

     "सेमीस्टरचा एकच पेपर बाकी आहे . तो झाला की, सुट्या . सुट्यांमधे वैखरीची एकदा नव्हे वारंवार भेट होणार बघ ", सुहित

" सुहित अभ्यास कर. सोड तो विषय " , वसंत

       " वैखरीचा विषय काढला की, चल अभ्यास कर म्हणतोस . तसा चोविस तास वैखरीचे स्वप्न बघतोस . काही कळत नाही तुझे . फार कॉम्लीकेटेट केस आहेस तू ", सुहित .

       " सुहित तू समजतोस तशी काही क्लिष्टता नाही माझ्या वागण्यात . मी काय विचार करतोय ते तू नाही समजू शकणार मित्रा " , वसंत .

"मित्र म्हणतोस आणि समजू शकणार नाही म्हणतोस ही क्लिष्टता नाही तर काय आहे ?", सुहित .

        सुहित ऐक, मी जरा स्पष्टच बोलतो . मी एक अनाथ मुलगा आहे . हे विसरून कसं चालेल . तुझ्या बाबांनी आमच्या सारख्या अनाथांसाठी अनाथालय काढलं एवढेच नव्हे तर आमच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून आमच्यासाठी अनाथालयाला लागून शाळाही काढली .

          तू एका मोठ्या उद्योगपतींचा मुलगा . पैशापेक्षा माणूसकी महत्त्वाची हे मूल्य तुझ्यात रुजावे . समाजसेवेचे बाळकडू तुला देता यावे म्हणून तुझ्या बाबांनी इयत्ता पाचवी पासून तुला आमच्यासोबत अनाथांसाठी असलेल्या शाळेत टाकले म्हणून आपली दोस्ती झाली . तू सुद्धा मोठ्यामनाने माझ्याशी खरी मैत्री निभवतोस . माझ्या सारख्या अनाथाला आपलं मानून माझ्यावर प्रेम करतोस . माझे भाग्य मला तुझ्यासारखा सच्चा मित्र मिळाला . मी तुझा मित्र या नात्याने तुझी व तुझ्या बाबांची माझ्यावर जास्तच कृपादृष्टी .
खूप ऋण आहेत रे तुझ्या बाबांचे व तुझे माझ्यावर . आज मी जो काही आहे तो केवळ तुमच्यामुळेच.

          "पुरे झाले उपकार पुराण ", माझा मित्र म्हणून बाबांनी तुला मदत केली नाही तर तुझ्या तल्लख बुद्धीमतेमुळे, तुझे गुण पाहून बाबांनी खरं तरं तुझ्या हुशारीची किंमत केली ", सुहित

        अठरा वर्षाचा झाल्यावर तुझे बाबां मला तुझ्याघरी राहायला घेवून आले . आयआयटी सारख्या ठिकाणी मला शिक्षण घेण्याची संधी दिली . मी माझं मूळ विसरुन कसं चालेल ? आपल्या पायरीने राहलेले चांगले असते सुहित .

       " मला जे माहिती आहे ते, हे सर्व आज का बोलतोस . याचा इथे काय
संबंध ?", सुहित .

      " संबंध आहे सुहित. वैखरी ही श्रीमंत घरची मुलगी वाटते . माझ्यासारख्या अनाथ मुलानी वैखरीवर स्वप्नापुरतं प्रेम करणचं
योग्य ", वसंत .

         " वसंत अरे, प्रेम प्रेम असतं . ते श्रीमंत गरीब बघत नसतं . तू तर तुझ्या कथांमधून ह्या गोष्टी लिहीतोस . प्रमे म्हणजे काय वगैरे वगैरे…
स्वतः प्रेमात पडल्यावर तुझ्यासाठी प्रेमाच्या व्याख्या बदलल्या ", सुहित .

        " हो सुहित, तसं समज हवं तर . कथांमधले जीवन व वास्तविक जीवन यात बरच अंतर असतं . काही गोष्टी पुस्तकातल्या पुस्तकातच शोभून दिसतात प्रत्येक्षात तसं जगतांना माणसांचा कस लागतो ", वसंत


         " हो, मान्य आहे . वैखरी तसी श्रीमंत गरीब भेद करणारी मुलगी नाही . ती श्रीमंताची मुलगी असली तरी फार साधी आहे. खूप तत्ववादी आहे. लोकधार्जिण आहे .श्रीमंतीचा तिला जराही गर्व नाही . स्वरा घरात नेहमी वैखरीचं गुणगानं करत असते . हो वैखरीकडे जरा वातावरण कडक आहे. मुलांशी मैत्री वगैरे तिच्या घरी चालत नाही . असं स्वरा सांगते", सुहित .

        तिच्याबद्ल मला काहीच माहिती नसतांना, न कळत एकाच भेटीत वैखरीणी माझ्या मनाचा ताबा घेतला . सतत ती माझी सोबत करते .
माझ्या कवितेत….गीतांत …..कथांत …..तसेच माझ्या कुंचल्यातही….. तीच असते .

       तिच्यासोबत असं जगतांना मला कुठलीही अडचण नाही . हो सुरुवातीला काहीदिवस मी बेचैन झालो होतो .

         आता माझी मनस्थिती स्थीर आहे. ती माझ्या सोबत असतेच . माझ्या मनात….. . मी माझा अभ्यासही नीट करतो मध्येच जागेपणीही तिनं स्वप्न बघून तिची भेट घेतो . मी माझा सुखी आहे. ही पूर्णपणे माझी भावना आहे. तिला प्रत्यक्ष भेटून मनातलं सांगावं याची मला गरज वाटत नाही .

        आपण ज्या व्यक्तींवर प्रेम करतो त्या व्यक्तीनेही आपल्यावर प्रेम करावं असं काही जरूरी नसतं .

           मी करतो वैखरीवर प्रेम…
ते तिला सांगणं मला जरुरी वाटत नाही . तसेच
तिनीही माझ्यावर प्रेम करावं ही माझ्या मनाचिही गरज नाही . जर केलंही तिनी प्रेम माझ्यावर तरी मी माझ्या प्रेमाची कबूली देणार
नाही …..

           माझ्यासारख्या अनाथासोबत ती सुखी होणार आहे का ? राहू दे तिला सुखात . माझं करंटं नशिब तिच्या चांगल्या नशिबाशी जोडण्याची माझीच इच्छा नाही .

          " काय रे वसंता, मगापासनं बघतोय सारखा स्वतःला अनाथ म्हणतोस . तू आता आमच्या कुटुंबाचा भाग आहेस हे विसरतोस ," सुहित.


         " हो रे , तुम्हा लोकांची साथ आहे मला .
स्वरासारखी बहिण व तुझ्यासारखा मित्राच्या रुपात भाऊ मिळाला म्हणून माझं मूळ बदलणार आहे का ?," वसंत .


      " वसंत, फारच वेगळा विचार करतोस बाबा तू . तू एवढा देखणा, हुशार , कॉलेज टॉपर . कॉलेजच्या सर्वच मुली मरतात तुझ्यावर ".

         "  वैखरीला तर तू नक्कीच आवडशील . खात्री आहे मला . श्रीमंतीचं घेवून बसलात . उदया तुला लठठ् पगाराची नोकरी लागणारच आहे. पुढे तुही होशीलच की उद्योगपती एक नाही तर दहा कंपन्यांचा मालक .तेवढी क्षमता आहे तुझ्यात . तुलाही ठाऊक आहे."

        " उद्योगपती होईल तेव्हा होईल . ती झाली आर्थिक बाब . माझ्या कौटुंबिक स्टेटसचं
काय ?", वसंत .

       " फारच वेगळा विचार करतोस बाबा ",
सुहित .

          करायलाच हवा. प्रेम करतो नं मी
  वैखरीवर . अगदी जीवापाड…….ग मी तिच्या सुखाचा विचार करायलाच हवा .

            आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो. तिच्या जीवनात सर्वकाही चांगलं असावं असं वाटतं ना माणसाला ? तसंच मला वाटतं . वैखरीला तिच्या आयुष्यात सर्व गोष्टी चांगल्या मिळाव्या . श्रीमंत सभ्य मुलगा जीवनसाथी म्हणून मिळावा. त्यानबरोबर सामाजिक प्रतिष्ठा असणारं एक छानसं कुटुंब

मिळावं . जे तिला मी नाही देवू शकणार ," वसंत .



            बरं चल, थोडं बाहेर चक्कर मारून येवू .
वैखरीला तुझ्या मनातलं सांगावं की नाही हे काळच ठरवेल .


क्रमशः


          तुमच्या मते, वसंतची प्रेमाची व्याख्या चुक की बरोबर कमेंन्ट करून कळवा .वसंत वैखरीला सांगेल का त्याच्या मनातलं .
हे जाणून घेण्यासाठी..

" वैखरी एक प्रेमकथा- भाग-५" वाचायला विसरू नका .

         कथा आवडल्यास लाईक ,कमेन्ट जरूर करा. शेअर करायची असल्यास लेखिकेच्या नावासह करा .
कथा न आवडल्यास माफ करा .

धन्यवाद!?

©®✍️ ऍड. नीता प्रफुल्ल कचवे
टिम - अमरावती .











🎭 Series Post

View all