वैखरी एक प्रेमकथा भाग ३

A Love Story Of A Girl


वैखरी एक प्रेम कथा -भाग 3

कॅटेगरी- राज्यस्तरीय करंडक कथा मालिका
सब कॅटेगरी- प्रेम कथा
टीम - अमरावती


       वसंत कॉलेज कॅम्पस मध्ये झाडाखाली बसून, वहीत स्केच काढत होता . सुहित चोरपावलांनी पाठीमागून येवून वसंतचे डोळे झाकतो .

      " सुहित ! तुझी बालपणीची सवय गेली नाही अजून . पाठीमागून यायचं आणि डोळे

झाकायचे .काय मजा वाटते रे यात तुला ? तुझी चाहूलही मी ओळखतो हे तू जाणतोस . तरी हा वेडेपणा ", वसंत


      " हे डोळे ss..s ओळखीचे वाटतात
मला .कुणाचे रे हे डोळे?", सुहित

      " माहित नाही . मी सहज डोळ्याचं स्केच काढत होतं .", वसंत

       "जाऊ दे काय डोळ्यांच घेऊन बसलास ", वसंत

     विषयांतर करून वसंत सुहित सोबत गप्पा मारतो . सुहित मात्र हे डोळे कुणाचे ? कुठे बघितले ? आठवत असतो .


        ये, चल जेवणाची वेळ झाली .वसंत सुमितच्या खांद्यावर हात ठेवून त्याला मेसकडे घेऊन

जातो .सुहितचं मात्र ते डोळे कोणाचे हे आठवण्यासाठी बुद्धीला ताण देणं सुरूच
असतं . हे डोळे मी कुठे बघितले ? हा प्रश्न त्याच्या डोक्यात गुंजी घालत असतो . अचानक त्याला आठवतं .
सुहित ओरडतो,


"वैखरीssss…हो वैखरी !"

"सुमित काय झालं ओरडायला ?", वसंत

"वैखरी म्हणजे काय ? हे काय
बडबडतोस ?," वसंत

"अरे ,वसंत तू काढलेले डोळे … वैखरीचे
आहेत ", सुहित

"काय? वैखरी !", वसंत

" दाखव एकदा ते स्केच.
डेफिनेटली हे डोळे वैखरीचेच आहेत", सुहित

"किती सुंदर नाव गं तुझं वैखरी !", वसंत मनाशीच बोलतो .

" काय बोललास ?", सुहित


"काही नाही . सुंदर नाव आहे असं
बोललो .अगदी युनिक . अर्थपूर्ण,
अर्थगर्भ," वसंत


" कोण रे ही ? ओळखतोस तिला ?," वसंत

  वसंतला वैखरी विषयी आणखी जाणून घ्यायचं होतं म्हणून त्यांनी सुहितला प्रश्न केला .

   "हो .स्वराची मैत्रीणआहे वैखरी .
नेहमी येते घरी . स्वराची खास फ्रेंड आहे .
इंजीनियरिंगला गेल्यावर भेटली स्वराला . ती आणि स्वरा दोघींची छान गट्टी जमली ", सुहित .

" आपण मागच्या संडेला घरी
गेलेलो .त्यावेळी सुद्धा ती आली होती आपल्या घरी ," सुहित .

  " बरं बरं ! थांब जरा .तू का तिची माहिती घेतोस ? वैखरीच्या डोळ्यांच्या प्रेमात पडला
की काय ? ", सुहित

"काही पण, मी नाही ओळखत
वैखरीला ," वसंत .


" तिच्या डोळ्यांना ओळखतोस ना ?",सुहित


आँखो ही आँखो मे इशारा हो गया…
बैठे बैठे जीने का सहारा हो गया !

" काय वसंत खरं आहे ना?", सुहित .

"हे बघ सुहित, उगीच चिडवू नकोस.

"तू समजतोस तसं काही नाही," वसंत .

" मग कसं ? सांग ना वसंत ", सुहित

वसंत सुहितचे बोलणे ऐकल्या न ऐकल्या सारखे करून पुढे जातो . होस्टेलला आल्यावर सुहित वसंतला पुन्हा चिडवतो .

ये काली काली आँखे…
ये गोरे गोरे गाल….
देखा जो तुझे जानम …
हुआ है बुरा हाल…!

"बास्स झालं सुहित .
काहीही गैरसमज करून घेऊ नकोस ", वसंत .

"गैरसमज ? गैरसमज तर आज पर्यंत होता . तो आज दूर झाला ", सुहित

"तुझा बुरा हाल त्या काळ्या काळ्या टपोऱ्या डोळ्यांनी केला . हे आज समजलं अन् माझा जीव भांड्यात पडला .
माझ्या मित्राला काय झाल ? ह्या चिंतेत मी
होतो .तुझ्या बेचैनीचे कारण शोधायला बालपण ते तारुण्य असा लांब फ्लॅशबैक मध्ये जाऊन आलो . प्रश्नाचे उत्तर मात्र ह्या स्केचनी दिलं ", सुहित .

"ये वसंत आवडते का रे तुला ती वैखरी ?", सुहित

"मला तिचं नावही माहीत नव्हतं ", वसंत .

"आता झालं ना माहित ? तो बोल मेरे दोस्त माजरा क्या है ?," सुहित .

"काही नाही रे बाबा . हात पाय नसलेली स्टोरी बनवू नकोस ", वसंत .

"बर मग ते काय होतं ?," सुहित .

काय ?, वसंत.

इब्तीदा इश्क मे हम सारी रात जागे….

"सुहित, आता जरा जास्तच होतंय," वसंत .

अल्ला जाने क्या होगा आगे..
मौला जाने क्या होगा आगे…

गुणगुणत सुहित वसंतला चिडवत अभ्यासाला लागतो.

"सुहित थांबशील का तू जरा ?," वसंत .

"गाणं गायलासुद्धा मनाई आहे का ?", सुहित

"गात बस . झोपतोय मी .अशा आवाजात अभ्यास होणार आहे का ?," वसंत

"म्हणजे ? माझा आवाज चांगला नाही म्हणायचं का तुला ? ", सुहित

"उगीच विषय वाढवू नकोस ? आवाजाबद्‌दल बोलत नाही मी .अभ्यासासाठी शांती हवी ती तू भंग

करतोस ," वसंत .


" लेक्चर देऊ नकोस , झोप ", सुहित .
सपने मे मिलती है…..
म्हणत सुहित वसंतला आणखीणच चिडवतो .


वसंत सुहितकडे लक्ष न देता डोळे मिटून शांत पडून राहतो .डोळ्यासमोर सारखा तोच तो चेहरा दिसतो . ते टपोरे काळे डोळे त्याला वारंवार दिसतात . त्या डोळ्यांची ओढ त्याला लागते . तो चेहराही

खूप आपलासा वाटते . जीचं नावही माहित नव्हतं तिची ओढ का ? हा विचार वसंत करत असतो .


" तेवढ्यात वसंत किती झोपशील ? उठ आता झालं असेल भेटून वैखरीला , " सुहित .

"माझा मित्र प्रेमात पडला . ही कल्पना माझ्यासाठी अगदीच आगळी . वसंत अन् प्रेमात ? वसंत मित्रा गंमत नाही करत . खरंच सांग खूप आवडते का रे वैखरी तुला ?,"सुहित

" वारंवार तोच प्रश्न ? . सुहित माहित नाही . म्हणजे खरंच मला काहीच कळत नाही .ओळखीची नसलेली ती मुलगी इतकी आपलीशी का वाटते ? प्रेम वगैरे मला कळत नाही .तिची ओढ मात्र मला वाटते . ती परकी वाटत नाही . ती नजर मला ओळखीची जन्मोजन्मीचं नातं असल्यासारखी भासते . सतत तिचा चेहरा डोळ्यासमोर येतो . असं का होते हा माझ्या पुढेही एक यक्ष प्रश्न आहे .एकदाच क्षणभर बघितली मी तिला ", वसंत

" ही क्षणभऱ्याची भेट केव्हा झाली, मला तर माहीतच नाही. सांग ना जरा त्या भेटीविषयी ", सुहित

मागच्या आठवड्यात आपण दोघे तुझ्या घरी गेलो . ये तुझ्या घरी नाही, आपल्या घरी. बरं बाबा सॉरी . आपल्या घरी गेलो त्यावेळी . तू आई-बाबांशी गप्पा करत होतास …. स्वरा तिचा अभ्यास करत होती ….. तेवढ्यात दारावरची बेल वाजली….. . तसा मी उठून दार उघडायला गेलो …

तोच क्षण ! आमची नजरा नजर झाली …. क्षणात तिच्या डोळ्यात मी हरवून गेलो ….
माझं अख्ख जग तिच्या डोळ्यात असल्याचा विचित्र भास मला झाला….
तिच्या चेहऱ्यावर मात्र कुठलेच भाव
नव्हते .तिला माहितीही नसेल त्या एका क्षणांनी माझं जीवन बदलून गेलं. एक आगळीच हुरहूर मनाला लागली .याला काय म्हणावं मीच संभ्रमात आहे .

एवढे मात्र निश्चित . हे आकर्षण नसून ही एक ओढ आहे . असं कसं न बोलता ही कुणी आपलं वाटतं . नाही का हे कोडं . असं काहीसं घडल्यावर कोणीही विचलित होणार .तसंच माझ्यासोबत झालं ..

" वसंत ,पहिली नजर का प्यार है यारा और
क्या ! कसलं कोडं कसली वेगळी बात . ये उमर मे होता है ये सब कुछ ", सुहित .

"हलक्यात घेऊ नकोस . प्यार व्यार ह्या गोष्टी माझ्याजवळ बोलू नकोस . मला हे त्या पलीकडचं वाटतं," वसंत

उनसे मिली नजर तू मेरे होश उड गये….

"सुहित तुला गंमत वाटते . तू समजतो तसलं काही नाही . कितीदा सांगू तेच ते . मला तसल्या गोष्टीत गुंतायची इच्छा पण नाही .मला माझं करिअर

आहे .जीवनात काहीतरी बनायचं आहे . माझ्यासोबत जे घडत आहे माझ्या नियंत्रणा बाहेरचं आहे . हे मी तुला वारंवार सांगतोय .तू मला समजून घेण्याऐवजी मला चिडवतोस . मजा घेतोस . मला यातून बाहेर पडायचं आहे ",वसंत


"तसं नाही रे वसंत, कळतयं मला . तुला काय वाटतंय ते .मला नाही कळणार तर कुणाला कळणार ? मी तुझा जिगरी दोस्त ना ?", सुहित

" बरं तू कधीपासून ओळखतोस
तिला ? ", वसंत .

तिला कोणाला ? वैखरीला ? नाव घ्यायला
लाजतोस की काय तू ? ", सुहित .

"तू नाही सुधारणार .", वसंत

" मागील महिन्यात मी घरी गेलो होतो तेव्हा तिला पहिल्यांदा भेटलो ," सुहित .

"अच्छा ! कुठे राहते वैखरी ?", वसंत

"ओहो ! भेटायला जाणार की काय ?", सुहित

"काही काय बोलतोस ? मी कशाला जाणार वैखरी ला भेटायला ?", वसंत .

"नको जाऊस . मी जाईल तिला
भेटायला ", सुहित .
"आगाऊ कुठला ", वसंत .

" सांगतो, सांगतो वैखरी नवी मुंबईला राहते.
स्वराला विचारून पत्ता सांगू का तुला?", सुहित

"तू जा बर इथून . काहीच नको सांगू . मला आता राग येतोय ", वसंत .

तुमसे मिलने को दिल करता है रे बाबा…
तुमसे मिलने को दिल करता है… गात
सुहित रूमच्या बाहेर जातो .

वसंता पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा प्रयत्न करतो ; पण त्याच्या डोक्यात वैखरीचे विचार पिंगा घालतात ….

क्रमश:


वैखरी वसंतची पुन्हा भेट होते का ? भेटीनंतर काय घडतं .हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा .
वैखरी एक प्रेमकथा - भाग ४

कथा आवडल्यास लाईक कमेंट व शेअर जरूर करा न आवडल्यास माफ करा

धन्यवाद!

©®✍️नीता प्रफुल्ल कचवे .
टीम- अमरावती .







🎭 Series Post

View all