कथेचं नाव - वैखरी एक प्रेम कथा भाग 2
कॅटेगरी - राज्यस्तरीय कथा मालिका
सबकॅटेगरी- प्रेमकथा
टीम - अमरावती
सुहितला वसंतमध्ये अचानक झालेल्या बदलाचं कारण शोधायचं होतं ; म्हणून तो डिटेक्टिव बनून त्याच्या वागण्यावर लक्ष ठेवून होता . तसंच या दोन दिवसात काय विशेष घडलं ; की त्याचा परिणाम वसंतच्या वागण्यावर झाला . वसंत असा चावराबावरा, विचलित का झाला ? याचा शोध घेण्यासाठी गेल्या दिवसाचे पूनर्विलोकन करत होता . त्यात काही सापडतं का ? चाचपळत होता .
दिवसभर वसंत बेचैन होता . तसेच रात्रभर कुस बदलवत होता . त्याचं हे वागणं पाहून सुहितला खात्री पटली होती ; की वसंतच्या बेचैनीचे कारण , त्याचं कवी मन किंवा एखादी कथा डोक्यात रंगाळणे वगैरे काही नाही , तर निश्चितच दुसरंच काही कारण आहे .
पाचव्या वर्गापासून दोघे सोबत
राहायचे .वसंतचा स्वभाव, मुळातच हळवा व संवेदनशील. दहावी - अकरावीत असेल तेव्हापासून वसंत कविता करायचा. चित्र तर पाचव्या वर्गापासूनच काढताना सुहितने त्याला बघितलेलं . अकरावीनंतर हळूहळू अवतीभवतीचे प्रसंग सुंदर शब्दात डायरीत उतरवायचा . एखादा मनाला भिडलेला प्रसंग लेखणीतून कागदावर उतरवला ; की वसंत रिलॅक्स व्हायचा ; परंतु वसंतला असं विचलित झालेलं आजवर सुहितनी बघितलं नव्हतं .
होतं . हुबेहूब त्याच्यासारखेच नाक, त्याच्यासारखेच टपोरे डोळे , त्याच्या सारखीच उजव्या गालावर खळी, कुरळे दाट काळे केस .फक्त फरक इतकाच की ते एका तरुण स्त्रीचे चित्र होते .
" वाव ! किती सुंदर चित्र काढले ! कोण आहेत ह्या ? तुझी आई का ? "
सुहितचे प्रश्न ऐकूण, शांत सुस्वभावी वसंतचे डोळे रागाने लालेलाल झाले होते . वसंतचा तो क्रोधित अवतार पाहून सुहित जाम घाबरला होता.
आज मात्र सुहितला प्रकर्षानं जाणवलं
की ; वसंतचे ते चित्र, कविता, कथा, स्केचेच त्याचं भावविश्व आहे. मी मित्र म्हणून वसंतच्या भावनिक विश्वाला समजून घेण्यात कुठेतरी कमी पडलो . त्याच्या भावनांचे कंगोरे, सोबत राहूनही मी समजू शकलो नाही. त्यामुळेच आज मला माझ्या प्रिय मित्रात हा अचानक बदल का झाला ? या प्रश्नाचे उत्तर शोधणे अवघड झाले असं सुहितला वाटलं .
वसंतनी आजकाल बोलणं कमी केलं होतं .तो स्वतःतच रममाण राहायचा .कॉलेज संपल्यावर रात्री डायरीत काहीतरी लिहीत राहायचा . त्यामुळे हाही उपाय निष्फळ ठरला .
आठवडा उलटून गेला तरी वसंतचं ना अभ्यासात , ना जेवणात कशातच नीट लक्ष नव्हतं . हे पाहून सुहितची चिंता वाढली .
"अरे वा ! प्राणायाम व ध्यान .मी पण करतो तुझ्यासोबत ".
वसंतला भावनांचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्यही अवगत आहे हे पाहून सुहितला नवल वाटले . वसंतकडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे . मन अस्वस्थ असेल तर त्यावर मात करण्यासाठी स्वभावनांचे व्यवस्थापन यायलाच हवे . असा विचार
सुहितनी मनात केला .
" मी , अस्वस्थ झालो तर , मला
आई ,बाबा तसेच वसंतचा आधार लागतो .वसंतचं तसं नाही . तो प्रत्येक बाबतीत आत्मनिर्भर आहे ".
वसंतच्या वागणूकीमागचे सूक्ष्म धागेदोरे उलगडेपर्यंत मला डिटेक्टिव बनून प्रवास करावाच लागेल .असं सुहितला वाटत होते .
क्रमश :
सुहितचा प्रवास संपेल का ?
हे जाणून घेण्यासाठी , वैखरी एक प्रेम कथा- भाग 3 वाचायला विसरू नका .
धन्यवाद !
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा