वहिनीचा मान भाग 4

Vahini Ani Tichya Nanandechi Gosht

"मनाला लावून घेऊ नको साधना. जसे अशूचे वागणे तुझ्यासाठी नवीन आहे तसेच आमच्यासाठी नवीनच आहे. बघ, तू आहेस तशी आम्हाला आवडतेस. आम्ही काही बोलतो का तुला? नाही ना? मग झालं तर. आकांक्षा लवकरच लग्न होऊन सासरी जाईल. या शुभ प्रसंगी उगीच नको त्या गोष्टीसाठी वाद-विवाद नकोत घरात." सासुबाई साधनाला म्हणाल्या.


"आई, पण मी तर काहीच बोलले नाही. पण मला हेच कळत नाही की, आकांक्षाच्या मनात माझ्याबद्दल इतका राग का?" साधना आपले डोळे पुसत म्हणाली.


"आई, तू अशूला समजवायचे सोडून साधनाला का समजावते आहेस? हिची काहीच चूक नाही यात." आदित्य आत येत म्हणाला.


"आदित्य, जो समजून घेतो त्यालाच लोक समजावतात. आत्ता या घडीला आकांक्षा समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही. आत्ता तिला काही सांगायला गेलं, तर ती त्याचा वेगळाच अर्थ काढेल. श्रीमंती थाटामाटाचे भलतेच चित्र तिच्या मनात घर करुन बसले आहे. लग्न होऊन जोपर्यंत खरा संसार सुरू होत नाही, तोपर्यंत ती याच भ्रमात राहणार. तरीही वातावरण जरा शांत झाले की नक्की तिला समजावण्याचा प्रयत्न करेन." आई म्हणाली तरी आदित्य धुसपुसत राहिला.


त्या दिवसापासून आकांक्षाने साधनाशी बोलणे सोडून दिले. अगदी वेळ पडली तरच ती साधनाशी बोले.


घरचे वातावरण थोडे शांत झाले तसे बाबा म्हणाले, "आदित्य आणि साधना तुम्ही दोघे कन्यादान करा. कन्यादानाचं पुण्य फार मोठं असतं. आम्ही झालो म्हातारे. आता तुम्ही पुढे होऊन सगळं करायचं."


हे ऐकून साधनाला खूप आनंद झाला. मात्र तिचा आनंद फार काळ टिकला नाही.

"बाबा, माझं कन्यादान तुम्ही आणि आईनेच करायचं. बाकी कोणी केलेलं मला चालणार नाही." हे ऐकून साधनाचा चेहरा पडला. 


"बाबा, आई, मुलगी आणि बाबा..हे भावनिक आणि मायेचं नातं. त्याची सर आम्हाला येणार नाही. तुम्हीच कन्यादान करा. तो मान तुमचा आहे आणि तेच योग्य होईल."


"तर...मान घेणारी ही कोण? तो मान माझ्या आई- बाबांचा आहे." आकांक्षाने पुन्हा साधना डिवचले. 


"अशू, पुरे झालं आता. मी शांत आहे याचा अर्थ असा नाही की सगळंच ऐकून घेईन. इथुन पुढे साधना विरुद्ध मी एकही शब्द ऐकून घेणार नाही समजलं?

आमच्या माघारी तुझं माहेरपण वहिनी आणि दादा करतील ना? की आम्ही आयुष्यभर पुरणार आहोत तुला? सासरी जाऊन असे काही बोललीस तर ती लोकं आमचा उद्धार करतील. जरा आपल्या तोंडावर ताबा ठेव आणि एक सांगतो, हे शेवटचं. इथुन पुढे मी अशा गोष्टी खपवून घेणार नाही." बाबा संतापाने म्हणाले.


आकांक्षा आपल्या बाबांचं ऐकेल की पुढे नक्की काय होईल? ते पुढच्या अंतिम भागात पाहू.



क्रमशः


🎭 Series Post

View all