वडील माझे गुरु

Marathi Katha


प्रत्येकाच्या आयुष्यात एक गुरु असतातच असे म्हणतात. "गुरुविना ज्ञान मिळणे कठीण" तसेच आपल्यालाही ज्याच्याकडून ज्ञान मिळते व योग्य रीतीने सल्ला मिळतो तो आपला गुरुच असतो .जसे की किरणच्या आयुष्यामध्ये तिचे वडीलच तिचे गुरु होते.

किरण लहानपणापासून वडिलांची अगदी लाडकी होती. आणि किरणचे सर्व लाड वडील पूर्वत होते .किरणला कधीच मोठ्या आवाजाने बोलले नाहीत. किंवा ओरडले देखील नाहीत.आणि किरणपण हुशार मुलगी होती. शाळेमध्ये नेहमी पहिला नंबर मिळवायची .त्यामुळे वडिलांची मान आनंदाने उंच होत होती

किरण अभ्यासातच फक्त हुशार होती असे नाही इतर घरकाम देखील अगदी उत्साहाने करत होती. वडिलांची सेवा तर खूप करत होती . हळूहळू किरण मोठी होत होती आता किरणचे लग्न होणार होते. वडिलांना खूप जीवावर आले होते. आपली मुलगी आता दुसऱ्याच्या घरी जाणार म्हणून वडिलांच्या डोळ्यातून सतत अश्रू येत होते .पण मुलगी आहे एक दिवस लग्न करावे लागणार .किरणला स्थळ बघायला चालू केले आणि योग्य रीतीने किरणचे लग्न ठरले .किरणचे लग्न झाले.

लग्न झाल्यानंतर घरी जाऊ दीर, सासू-सासरे नवरा आणि किरण असा परिवार होता. थोडे दिवस सुखाचे गेले नंतर हळूहळू किरणला जावेच्या वागण्याचा त्रास होत होता.एकत्र कुटुंबात थोडी फार कुरबूर असणार. किरण मनातल्या सर्वगोष्टी वडिलांना सांगत होती. वडील पण तिला योग्य रीतीने सल्ला देत असत .जाऊ तुझी किती केले तरी बहीणीसारखी आहे असे वडील नेहमी समजावून सांगत होते. आणि प्रत्येक वेळेला किरणला योग्य तो सल्ला देत होते. त्यामुळे किरणचा संसार अगदी योग्य रीतीने गुण्यागोविंदाने एकत्र कुटुंबात अजूनही वडिलांच्या सल्लानुसार किरणे योग्य पद्धतीने समजूतदारपणा दाखवत आनंदाने संसारात रमत होती.