Vacation Packing...My Body Is Shaking...

Packing
आपली पात्रे...IT Engineer तो, Homemaker ती,मुलगी कळी ३ वर्षांची आणि अंकुर ८ महिन्यांचा...

दिवाळी झाली आणि त्याचा ६ महिन्यांपासून परिश्रम केलेला प्रोजेक्ट ही release झाला.. leaves बऱ्याच balance होत्या. कळीचीही दिवाळी सुटी सुरू होती....
तो तिला म्हणाला..."चल मस्त चार पाच दिवस फिरून येऊ यात... Let's plan for a vacation and start the PACKING" आणि त्याने MMT ओपन केले.
आणि पुढच्या पाचच मिनिटात थेट GOA booking केलेही ५ दिवसांसाठी ...

तीही थकून गेलेली घरात बसून चिमुकल्यांचे करता करता..थोडेसे बाहेर जायला मिळेल म्हणून हरखली ...तेवढाच change...PACKING करायला सव्वा दिवस उरला होता आणि ते by car पुण्यावरून जाणार होते.म्हणजे साधारण पणे कमीत कमी ९ hrs चा तरी प्रवास...तसे ते दोघेच आधीही GOA ला चांगले दोन वेळेस गेलेले..पण फक्त दोघेच...यावेळेस मात्र २ चिमुकलेही होते.

पॅकिंग करताना सर्वात आधी तिला काय आठवले तर मुलांची सर्दी,ताप,खोकला यांची औषधे आणि nubulizer..., नाका कानाचे drops , mosquito क्रीम ,(expiry date check karun),goodknight, diapers ofcourse. आणि आजकाल तिलाही लागणारी crocin,omez,zandu bam...तोही एकटाच इतक्या वेळ गाडी चालवणार म्हणून ना जाणो लागले तर moov hi घेतले.

आता पाळी कपड्यांची ..तिच्या नाही मुलांच्या... priorities got changed u know..? आता पोरे बीचवर जाणार,मातीत खेळणार तर कपडे जास्तच घेतलेले बरे..त्यात कळीचा स्विमिंग costume,glares,cap... हे सगळं बघून तिची आई म्हंटली असती "काय बाई पण सध्याच्या पोरांची एकेक थेरी..." आणि हे कल्पून आपली ती मनाशीच हसली.
पोरांचे कपडे इस्त्री करून बंद...

वास्तविक goa मध्ये या कालावधीत थंडी तशी नसतेच पण कदाचित लागतील म्हणून पॅक केलेली बॅग परत उघडुन स्वेटर नी सॉक्सचे जोड कोंबले...तो तिच्याकडे मिश्किल नजरेने बघत..अगा रेनकोट विसरलीस की....तिने डोळे वटारून "very funny"... असे म्हटले...

नशिबाने त्याची बॅग तोच भरणार होता..तसेही पुरुषांची goa पॅकिंग म्हंजे पाच टीशर्ट ,३ बरमुडे,२ जीन्स,एखादा गॉगल... हाय काय अन् नाय काय...तसेही त्यांना मस्त आपल्या त्या beachside umbrella couch वर बसून मदिरापान करता करता समोर विदेशी मदमस्त अप्सरांची जलक्रीडा एक चार पाच घटका बघता आली की यांची GOA trip सुफळ संपूर्ण झालीच म्हणून समजा...

आता तिने आपला मोर्चा सकाळी लागणाऱ्या गोष्टींकडे वळवला...हॉटेल्स मध्ये complimentary म्हणून जरी टूथब्रश, सोप नी शाम्पू देत असले तरी baby specific गोष्टी तर घ्यावाच लागणार होत्या...ना जाणो ते हॉटेल वाले वापरून काही स्किन allergy झाली म्हणजे.. मग baby shampoo, soap,lotion,oil and toothbrush चा भरणा झाला.

आता एव्हाना रात्रीच्या जेवणाची वेळ झालेली...तिने भरभर स्वयंपाक केला ...तर इकडे कळी आणि अंकुर यांनी मज्जा म्हणून तिने बॅगेत भरलेले कपडे सगळे इकडे तिकडे भिरकावून दिले..आणि तो तर हे सगळे व्हिडिओ शूट करीत होता.तिचा जसा पारा चढला तसा माहोल चिडीचूप...परत त्या कपड्यांची रवानगी बॅगेत करून तिने ताटे करायला घेतली.
झोपताना अचानक तिच्या लक्षात आले की छोट्या ८ महिन्याच्या अंकुरचे तर baby food पण बरोबर घ्यावे लागेल.मग पाहिले तर नाचणी सत्व होते बऱ्यापैकी पण भरड थोडीच शिल्लक होती...सगळी झोपाझोपी झाल्यावर तिने आपले डाळ तांदूळ भिजवून पंख्याखाली सुकायला ठेवले आणि induction ही बॅगमध्ये टाकले...मग काय बाळाला कधीही भूक लागली तर असावे आपले...as usual उशिरा झोपी गेली...

आता एकच दिवस उरलेला...सकाळची रोजची आवराआवर,कळीची शाळा करता करता दुपारचे दोन वाजले.त्याचे आपले pendrive मध्ये गाणी टाकणे सुरू होते...आता तिने तिची बॅग भरायला घेतली...आणि मग तिच्या डोक्यात प्रकाश पडला की आपल्याकडे बाहेर जायचे असे कपडेच शिल्लक नाहीत... हाय रे कर्म माझं...त्याचे झाले असे की फर्स्ट pregnancy मध्येच तिचे वजन आभाळाला भिडलेले आणि कळी दीड वर्षांची झाली नाही तोवर अंकुरही रुजला..एकाला दुसरे लागतेच म्हणून तिनेही रुजू दिला..पण त्या काळात तिचे वजन आभाळ भेदून गेले...आणि तीन वर्षांपासून feeding gown शिवाय तिने कधी शॉपिंग अशी केलीच नाही... मुले लहान असल्याने आणि मध्ये corona दबा धरून बसल्याने बाहेर जायचे प्रसंग असे आलेच नाहीत...पण आता काय करू...पूर्वीचे बाहेर जायचे कपडे तर अंगात घुसायचे नावही घेईनात..तिने रागाने ते कपडे तसेच फेकले...तसे तिला वाटले की ते कपडे तिच्या वजनाकडे पाहून खुदू खुदू हसत आहेत...नाही म्हणायला एक जीन्स आणि दोन tshirts तेवढे बऱ्यापैकी बसणारे होते...पण तरीही थोडी नवी खरेदी केल्याशिवाय बाहेर जायचा फील येतच नाही... आता जाऊन खरेदी करावी तर पोरे कोण सांभाळणार ...आणि एकटीने खरेदी करायचा कॉन्फिडन्स तरी आहे का ..onlinee shopping आता केली तरी shipping लगेच थोडी ना होणार आहे...

बापरे काय करून बसलो हे आपण ...कालच का नाही लक्षात आले हे..आणि वजनाचेही का आपण मनावर नाही घेतले कधी...आईपण मिळवण्याच्या नादात बाईपण हरवून बसलो का...आता पुढे काय .. हा यक्षप्रश्न..

तो ही मोठ्या सुट्टीवर जाणार असल्याने hand over मध्ये गर्क...जरा दचकतच त्याच्याकडे गेली आणि वस्तुस्थिती सांगितली..आधी जवळजवळ ओरडलाच तो.."एकही म्हणजे एकही बाहेर जायचा ड्रेस नाही म्हणजे काय...आता कधी shopping ला जाशील...मी सांगून ठेवतो पोरे सांभाळणार नाही,मला कामं आहेत...उद्या पहाटे पाचला निघायचं आहे ,लक्षात ठेव"... नंतर "घरात बसून करतेस तरी काय एवढं" यावरून as usual lecture...

ती रडवेली झाली ...घरात बसून असते कारण तो पोरे सांभाळणार नसतो म्हणूनच तर कुठे जाता येत नाही स्वतःसाठी काही मनासारखं आणायला..पोरे addict होतील म्हणून तिनेच मोबाईल चा use अगदी मर्यादेत ठेवला...कॉल साधे घेणं होत नाही,ऑनलाईन शॉपिंग कसली...

तेवढ्यात तोच आला मागून आणि म्हणाला "येडा बाई, ठीक आहे जाऊदे..GOA ला जायला कशाला फार मोठी शॉपिंग पाहिजे.. मुले लहान आहेत आपली...आपण फक्त बीचवर जाणार आणि हॉटेलवर येऊन आराम करणार...तिथे भरपूर आउटलेट असतात...आपण तिथूनच घेऊयात...पण उद्या लवकर निघू मात्र ... उगीच उशीर नको"

बास या शब्दांनी काय जादू केली...तसा तोही समजूतदार होता...फक्त तो दाखवायला त्याच्याकडे फारसा वेळच नसे...
तिने फक्त रात्री लागतील म्हणून आपले feeding gown टाकले पॅक करून...स्वेटर आणि सॉक्सही घेतला...हो पेत्या बाळाच्या आईने जपावे लागते हो स्वतःला नाहीतर बाळ आजारी पडते ..मग थोडे फार गूळ शेंगदाण्याचे लाडू, गाडीत लागणारे snacks, फळे,ती कापायला सुरी,पाण्याचे ग्लास,स्पून,एखाद दुसरी प्लेट, पेपर,picnic mat,नुकतीच दळून आणलेली भरड ,carry bags यांचाही भरणा झाला...masks आणि SANTIZER ओघाने आलेच...

दिवेलागणीची वेळ होत आलेली..ही फ्रेश होऊन केसात अडकलेला कंगवा काढीत असताना GOA च्या मागच्या trip मध्ये विचारांचा कांगवा अडकला.
किती छान होते ते दिवस नाही...अशीच अचानक ट्रीप त्याने प्लॅन केली...आणि ती आणि तो office मधून half day घेऊन lunch बाहेरच करून डायरेक्ट सुटले की मस्त शॉपिंगला. तिने तर तिथेच spachi appointment घेतली.
बापरे "स्पा"...ती तंद्रितून बाहेर आली.आणि एक नजर तिच्या वाढलेल्या eyebrows वर पडली...my god
"PARLOUR"राहिलच की...काय झालंय आपल्याला नक्की... सगळं ऐनवेळीच कसे आठवते...ती दिवा लावून तशीच parlour मध्ये...कसेबसे BASIC च उरकले..facial करत बसली असते तर स्वयंपाक राहिला असता...धावतच घरी गेली.

रात्रीचे जेवण झाली. कळीला एव्हाना कळाले की कुठेतरी बाहेर जाऊन मज्जा करायची ...ती आनंदात नाचून झोपी गेली..अंकुरही आपल्या किलकिल्या डोळ्यांनी तिचे थिरखने पाहून झोपी गेला...तोही आपल्या पोरांची excitement पाहून मंद हसत लवकर झोपला...आता उरली ती...तिने आवडीने लावलेल्या झाडांना पाणी घातले.मोबाईल चार्ज करुन चार्जर बॅगमध्ये ठेवले.दूधवाला, पेपरवाला यांना सुटी whatsapp द्वारे सांगितली.खूप दिवसांपासून अर्धवटच वाचलेले पुस्तक या ट्रीप मध्ये वाचू म्हणून तेही बॅगमध्ये टाकले.
चला आता उद्यापासून पाच दिवस मस्त relaxed रहायचे आपण असे म्हणत गेला सव्वा दिवस पायाला भिंगरी लागलेल्या तिचा डोळा तिच्याच नकळत लागला.

सकाळी तिला कोणीतरी जोरजोरात हलवतय याचा भास झाला आणि ती जागी झाली...पाहते काय तर तो तिच्यासमोर घड्याळ नाचवून म्हणतोय "अगं उठ सात वाजून गेले..पाचला निघायचे होते..traffic वाढेल, ऊन लागेल पोरांना...चल आवर पटकन ..तुला किती वेळा म्हटले होते सकाळी लवकर निघू म्हणून"...मग ती भानावर आली ..कालच्या दिवसभराच्या दगदगीत रात्री अलार्म लावायचाच विसरून गेली होती ती...ohh no... गयी भैंस पाणीमें...

तेव्हापासून नुसता पॅकिंग हा शब्द जरी उच्चारला तरी तिला थरथरायला होते...??
VACATION Packing... My BODY is SHAKING...