वाटण्याचा आनंद

Sharing Joy With You All My Reader
लिखाणाचा प्रवास वर्षभरापुर्वी सुरू झाला. एका मैत्रिणीद्वारे इराशी जोडले गेले.ईराचा कव्हर पहिला आणि पाहतच बसले तिथे blogger of month म्हणून लेखिकेचा फोटो होता..ते पाहून मलाही लालच निर्माण झाली आणि विचार करू लागली माझा पण असाच फोटो आला तर?किती भारी ना ??मी मनातच तो विचार ठेवला..

अनेक लेख लिहीत राहिली.तुम्हा वाचकांचा प्रतिसाद खूप सुंदर होता.."पायगुण" ह्या कथेला तुम्ही भरभरून प्रतिदास दिला त्यासाठी मनापासुन धन्यवाद...एक दिवस योगिता मॅम चा मेसेज आला तुमचा छान फोटो पाठवा.. मला काय ते समजायचे समजले. सांध्याकाळी पाहते तर माझा फोटो इराच्या पेज वर.ते पाहून डोळ्यात पाणी आले..खूप आनंद झाला जो शब्दात नाही व्यक्त करू शकत...


तब्बल दीड महिन्याच्या वर माझा फोटो तिथे होता.पेज ओपन केल्यावर,खूप भारी फिंलिंग यायची .स्वप्न सत्यात उतरलं होतं माझं..ईरा व्यससपीठाला दोन वर्षे पूर्ण झाले म्हणून त्यांनी लेखकांचा छान विडिओ बनवला.प्रत्येक लेखकातील बारकावे टिपले.. प्रत्येकाचे फोटो ,प्रत्येकासाठी चार ओळी आणि बेकग्राऊंडला मस्त ऊर्जा देणारे संगीत खरंच अप्रतिम होते ते...त्यासाठी ईरा टीमला मनापासून धन्यवाद...


तुम्ही विचार कराल आज का हे मी लिहीत बसले आहे.तर आज मला ईराने पुन्हा खुश होण्याची संधी दिली..विचार केला तुम्हा सर्वांसोबत शेअर करावे.. मी खुश ह्यासाठी आहे की ईराने "चॅम्पियन्स"स्पर्धा आयोजित केली होती .त्या स्पर्धेत मला "उकृष्ट सांघिक कार्य म्हणजे remarkable performance आणि "उत्कृष्ट वक्ता" ह्यसाठी दोन ट्रॉफी आणि दोन प्रमाणपत्र मिळाले आहे. खास माझ्यासाठी अगदी नाशिकवरून कुरिअरने आले होते.. नवऱ्याला unboxing करताना video काढायला लावला...

जेव्हा हातात ट्रॉफी घेतल्या ना तेव्हा मन आणि डोळे भरून आले .खरंच तो आनंद शब्दात नाही सांगू शकत..

तुम्हा वाचकासोबत हा आनंद व्यक्त करावा वाटला कारण हा आनंद फक्त वाचकांमुळे मला मिळाला आहे..हे पारितोषिक फक्त माझे नसून त्यात तुमचाही हक्काचा वाटा आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही...खरंच तुम्हा वाचकांमुळे प्रत्येकवेळी खूप काही शिकले.. तुमचे कंमेंट्स प्रत्येकवेळी आत्मविश्वास वाढवतात..मी मोठी लेखिका नाही..जे सुचतं ते लिहिते..तुम्ही सर्व जण मन लावून लेख वाचता आणि तितक्याच प्रेमाने कंमेंट करतात....

हा आनंद तुम्हा सर्वांसोबत व्यक्त करून खूप खूप छान वाटले...


धन्यवाद..

©®अश्विनी पाखरे ओगले