वाट पाहून थकले

वाट पाहून थकले
वाट पाहून थकले...

कधी धूसर धूसर
एक वादळाची वाट
नेई वाळूचे इमले
एक सागराची लाट...

प्रीत माझी पवित्र
कस तूला समजावू
मन अधीर अधीर
सांग किती वाट पाहू...

कधी डूबते जहाज
पण तरू जाते होडी
वाट पाहते लक्ष्मी
कधी येईल नावाडी...

लेकराच तो स्पर्श
आहे बासुंदीहून गोड
कधी येशील तूघरा
जीवा लावी तूझी  ओढ...

मोत्या नाही मोल
बिना शंख नी शिंपले
आस लागे तुझी डोळा
वाट पाहून थकले...
वाट पाहून थकले...
वाट पाहून थकले...
✍?श्री