Feb 25, 2024
पुरुषवादी

वाट हळवी वेचताना... (भाग-१४)

Read Later
वाट हळवी वेचताना... (भाग-१४)

बराच वेळ दर्शन गप्पच होता म्हणून सावित्री मावशी पुढे बोलायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, " दर्शू बाळा, मुशक खूप चांगला मित्र आहे गणपती बाप्पाचा. शिवाय आपण त्याला एखादी इच्छा मागितली तर तो बाप्पाला सांगून पूर्ण करायला लावतो, असं म्हणतात! "


" ते काहीही असो... फक्त मला तू मुशक नाही म्हणायचंस! " दर्शन म्हणाला.


तो त्याच्या उत्तरावर ठाम राहिला अन् त्याचं ठाम उत्तर ऐकून आर्यन आणि सावित्री मावशीने त्याला एकच प्रश्न विचारला. ते म्हणाले, " अरे पण का? "


" कारण मला नाही आवडत उंदीर! ते फार त्रास देतात, ते काहीही कुरतडतात, त्यांचा आवाजही खूप इरिटेटिंग असतो आणखी बरंच काही म्हणून... म्हणूनच मला उंदीर आवडत नाही. शिवाय कुणीही मला मुशक ही कॉम्प्लिमेंट दिलेली आवडत नाही. " दर्शन वैतागून बोलला. 


" बरं बरं! यापुढे नाही म्हणणार हं मी तुला मुशक! " मावशी गालातल्या गालात हसल्या आणि दर्शनचे गालगुच्चे घेऊ लागल्या. 


" हो चालेल! " दर्शन बोलला. 


" बरं! आता तुम्ही दोघे आत जा आणि आवरून घ्या. फ्रेश व्हा नि डायनिंग रुममध्ये या! मटर पनीर आहे आज दुपारच्या जेवणात! छान पोटभर जेवून घ्या दोघंही! " सावित्री मावशी बोलल्या. 


" वाह मटर पनीर! टेस्टी! " दर्शन म्हणाला. 


" ह्म्म! म्हणूनच लवकर तुम्ही दोघं तुमचं आवरून घ्या! " मावशी म्हणाल्या. 


" हो, चल बाबा! " दर्शन म्हणाला. 


" ह्म्म चला, राजकुमार! " आर्यन दर्शनकडे पाहून हसून म्हणाला. त्यानंतर त्याला खांद्यावर बसवून तो त्याला घेऊन त्यांच्या खोलीत गेला. 


                खोलीत जाताच दर्शनने त्याचा युनिफॉर्म काढून ठेवला व त्याने लगेच टीशर्ट आणि पायजमा घातला. आर्यन फक्त फ्रेश झाला कारण त्याला जेवण आटोपून लगेच एका फॉरेन डेलिगेटला भेटायला जायचं होतं. ती एक खास मिटींग होती, ज्याचा फायदा भविष्यात नक्कीच त्याच्या कंपनीला होणार होता.


                साधारण पंधरा मिनिटात दोघेही फ्रेश झाले, त्यानंतर ते डायनिंग रुममध्ये गेले. सावित्री मावशीने आधीच ताट वाढले होते. म्हणून त्या दोघांनीही वेळ न दवडता लगेच जेवणावर ताव मारला. दोघेही पोटभर जेवले. त्यानंतर डेझर्ट मध्ये दोघांनीही एक वाटी आईस्क्रीम खाल्ली. त्यानंतर दोघांनीही हात धुतले. नंतर आर्यन खोलीत गेला आणि मिटींगसाठी नीटनेटका तयार झाला. त्याने कपाटातून एक फाईल देखील सोबत घेतली नंतर तो हॉलमध्ये आला. तिथे आर्यन निवांत सावित्री मावशीसोबत गप्पा मारत बसला होता. 


आर्यन हॉलमध्ये येताच दर्शन देखील उठून उभा राहिला आणि म्हणाला, " फायनली बाबा तू आलास! बापरे! किती वेळ घेतोस तू रेडी व्हायला! असो! चल आता पटपट! लेट होतोय आपल्याला! " 


त्याला पाहून आर्यन हलकेच गालातल्या गालात हसला आणि म्हणाला, " ओ महाशय, तुम्ही कुठे येत आहात? "


" कुठे काय कुठे? बाबा, डोन्ट टेल मी की तू आजच्या आपल्या प्लॅनबद्दल विसरलास? " दर्शन बारीक डोळे करून आर्यनला दम देत बोलला. 


" प्लॅन कसला प्लॅन? " आर्यन मुद्दाम त्याचं हसू आवरत बोलला. 


" बाबा? तू असं कसं करू शकतोस? जा कट्टी... मला नाही बोलायचं तुझ्याशी... तू ना नेहमीच असं करत असतोस. मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. तू मागेसुद्धा माझ्यासाठी एक डान्सिंग क्लास शोधणार होतास पण नाही शोधलास. शिवाय तू बोलला होतास की, तू मला डान्सिंग क्लास जॉईन करू देणार पण त्यासाठी तू आसपासच्या भागात साधी दखलही घेतली नाही डान्स क्लासेसबद्दल आणि आज मी डान्सिंग क्लासेसबद्दल सगळी माहिती काढली तरी तुला लक्षात नाही यार बाबा... तुला फक्त रजिस्ट्रेशन संदर्भातील फॉर्मॅलिटीज पार पाडायच्या आहेत बाबा त्यानंतर मला डान्स क्लासेस मध्ये लगेच ऍडमिशन मिळेल; पण तुझ्या हे सुद्धा लक्षात नाही. " दर्शन रडवेल्या आवाजात बोलला. 


" हे चॅम्प आता तू रडू नकोस ना! " आर्यन लगेच दर्शन पुढे गुडघ्यावर बसला. 


दर्शनचा चेहरा त्याच्या ओंजळीत घेत आर्यन बोलण्याचा प्रयत्न करत होता पण दर्शनने त्याचा हात लगेच झिडकारला. तरीही आर्यनने त्याचे प्रयत्न सुरू ठेवले. तो दर्शनला म्हणाला, " दर्शू, बाळा मी मस्करी करत होतो रे! मला माहीत आहे तू किती उत्सुक आहेस डान्स क्लासेस जॉईन करण्यासाठी... हे बघ, मी तुला प्रॉमिस केलंय आणि मी ते पूर्ण करणारंच! तू नक्की डान्स क्लासेस जॉईन करशील. "


" खोटं बोलतोयस तू... " दर्शन रुसून बोलला. 


" नाही रे माझ्या राजा! विश्वास ठेव माझा! " आर्यन म्हणाला. 


" खरंच? " दर्शनने विचारलं. त्यावर आर्यनने हुंकार भरताच दर्शनने लगेच त्याला मिठी मारली आणि म्हणाला, " आय लव्ह यू बाबा! आय लव्ह यू सो सो मच! "


आर्यनही हसला आणि दर्शन सभोवती त्याच्या मिठीचा विळखा घट्ट करत म्हणाला, " आय लव्ह यू टू बाळा! "


क्रमशः

................................................................ 


©®

सेजल पुंजे. 

१७/११/२०२२.ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//