Feb 25, 2024
पुरुषवादी

वाट हळवी वेचताना... (भाग-४४)

Read Later
वाट हळवी वेचताना... (भाग-४४)

                त्या रात्री दर्शन जेवण न करताच झोपी गेला. आर्यन दर्शनसाठी ताट वाढून घेऊन गेला पण दर्शन तोपर्यंत झोपला होता. दर्शन उपाशीपोटी झोपल्याने आर्यनने जेवण केले नाही व तो सुद्धा झोपून गेला. दुसऱ्या दिवशी शनिवार असल्याने शाळेला सुट्टी होती म्हणून दर्शन उशिरापर्यंत झोपून राहिला. त्यानंतर त्याने दुपारी सुद्धा नीट जेवण केले नाही; अगदी त्याच्याप्रमाणे आर्यनच्याही गळ्यातून एक घास खाली जाईना. तीन वाजल्यावर दर्शन डान्स क्लाससाठी रेडी झाला. आर्यनने त्याला क्लासमध्ये सोडले अन् तो घरी गेला. 


                तो घरी आल्यावर त्याचं ऑफिसवर्क करत होता पण डोक्यात दर्शनचाच विचार फिरत असल्याने त्याचं कामाकडे लक्षच नव्हतं. तो फार डिस्टर्ब होता म्हणून त्याने लॅपटॉप बंद केला व तो सोफ्यावर डोळे मिटून बसून राहिला. तेवढ्यात त्याला कॉल आला. त्याने मोबाईल पाहिला तर ज्ञानदाचा कॉल होता. त्याने कॉल रिसिव्ह केला पलीकडून ज्ञानदा जे शब्द बोलली, ते ऐकताच तो पुरता ब्लॅंक झाला. त्याने लगेच कॉल कट केला व तो कार घेऊन बाहेर पडला. तो फार वेगात कार चालवत होता. थोड्याच वेळात तो सिटी हॉस्पिटलजवळ येऊन पोहोचला. त्याने रिसेप्शनिस्टकडे चौकशी केली अन् नंतर तो जिथे दर्शन भरती होता त्या वार्डाकडे निघून गेला. 


तो पळतच आला तर त्याला ज्ञानदा दिसली. तो तिच्याकडे गेला. त्याने तिच्याकडे चौकशी केली. तो तिला विचारू लागला, " ज्ञानदा? दर्शनला काय झालं नेमकं? अशी कशी त्याला चक्कर आली? त्याला आणखी काही जखम झाली का? तो ठीक आहे ना? माझा दर्शन ठीक आहे ना ज्ञानदा? " 


" आर्यन सांभाळ स्वतःला! डॉक्टर त्याचं चेकअप करताहेत. आय होप, तो ठीक असेल पण तू आधी शांत हो! त्याला काहीच नाही होणार नाहीये. काळजी करू नकोस. " ज्ञानदा आर्यनला आधार देत बोलली. 


" काका, डोन्ट वरी! दर्शनला चक्कर आली तेव्हा मी तिथेच होते. त्याला इतर कोणतीही दुखापत झालेली नाहीये. तुम्ही काळजी नका करू! ट्रस्ट मी, ही विल बी फाईन! " शिवाक्षी हतबल झालेल्या आर्यनला आधार देत बोलली. 


तेवढ्यात डॉक्टर दर्शनचं चेकअप करून बाहेर आले. डॉक्टर येताच आर्यन त्यांच्याशी विचारपूस करू लागला. तो म्हणाला, " डॉक्टर, दर्शन ठीक आहे ना? काय झालंय त्याला? " 


" तुम्ही कोण? " डॉक्टरांनी आर्यनचे निरिक्षण करत विचारले. 


" मी आर्यन ताम्हणकर. दर्शन माझा मुलगा आहे. " आर्यनने परिचय दिला. 


" ओह! मिस्टर आर्यन तुमच्या मुलाला ताप आहे. त्याला चक्कर अशक्तपणामुळे आली होती. त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवतंय की, त्याच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. नक्की कशामुळे त्याने जेवण केलं नव्हतं तुम्ही सांगू शकाल का? " डॉक्टर बोलले. 


" ऍक्च्युअली, नेहमी असा तो करत नाही पण काही दिवसांपासून तो प्रॉपर जेवण करत नाहीये. " आर्यन बोलला. 


" काही खास कारण? " डॉक्टरांनी आणखी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. 


" अं... " आर्यन बोलायला कचरत होता. 


" हे बघा, मिस्टर आर्यन तुमचे तुमच्या मुलासोबत पटत नाही का? दर्शन आणि तुमच्यामध्ये काही मतभेद आहेत का? " डॉक्टर विचारपूस करत होते. 


" नाही डॉक्टर असं नाहीये. " आर्यन अडखळला.


" मग जे काही असेल ते क्षणिक रुसवेफुगवे दूर करा. केस हाताबाहेर जाण्याआधी... " डॉक्टर सुचक बोलले. 


" म्हणजे? " आर्यनने गोंधळून विचारले. 


" म्हणजे मी दर्शनचे चेकअप केले तेव्हा मला असे आढळले की, त्याच्या चिमुकल्या मनाला काही बाबी या पोखरून टाकत आहेत. तो कसल्याशा विचाराने चिंताग्रस्त आहे. तो त्याच्या डोक्यावर खूप जास्त ताण देतोय. " डॉक्टर बोलले. 


" काय? " आर्यनचे डोळे विस्फारले. ज्ञानदा आणि शिवाक्षी सुद्धा डोळे विस्फारून पाहू लागल्या. 


" हो, म्हणून तुमच्यात जे काही मतभेद असतील ते लगेच सोडवण्याचा प्रयत्न करा; कारण जर तो असाच विचारात बुडून राहिला तर दर्शन नैराश्यात जाऊ शकतो. " डॉक्टर बोलले. 


" डॉक्टर तुम्ही हे काय बोलत आहात? " आर्यनचा गोंधळच उडाला. 


" मिस्टर आर्यन, खरं बोलतोय मी! लहान मुलांचं मन फार नाजूक असतं. लहानलहान गोष्टी कधीकधी लहान मुलांना दुखावून जातात. म्हणून प्रयत्न करा की, तुमच्यात जे काही मतभेद असतील ते दूर करा नि लवकर सर्व पूर्ववत होऊ द्या. " डॉक्टर बोलले. 


डॉक्टरांचे शब्द ऐकून आर्यन पार कोलमडून गेला. त्याला काय बोलावे ते सुचेना. त्याला तसे हतबल अन् उदास पाहून डॉक्टर बोलले, " मिस्टर आर्यन, सध्या तो ठीक आहे. तुम्ही काळजी करू नका. त्याचा तापही लवकरच कमी होईल फक्त तुम्ही त्याची विशेष काळजी घ्या. त्याच्या आहाराची काळजी घ्या. त्याचबरोबर सर्व मतभेद अन् वादविवाद करणे टाळून त्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. बाकी, आता तुम्ही त्याला भेटू शकता. बरं, येतो मी! " एवढे बोलून डॉक्टर तेथून निघून गेले आणि नंतर आर्यनही दर्शनला पाहायला निघून गेला. 


क्रमशः

..................................................................... 

©®

सेजल पुंजे

२५/११/२०२२.ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//