Feb 25, 2024
पुरुषवादी

वाट हळवी वेचताना... (भाग-२०)

Read Later
वाट हळवी वेचताना... (भाग-२०)

आर्यनकडे पाहून शिवाक्षी फक्त ज्ञानदाला ऐकू जाईल, एवढ्याच हळू आवाजात बोलली, " मम्मा! डोन्ट टेल मी की, दर्शन मिस्टर आर्यनचा मुलगा आहे. त्या मिस्टर आर्यनचा ज्यांच्यावर तुझं प्रेम होतं. " 


" शिवा... सध्या गप्प बस! काहीच बोलू नकोस कारण खरा गोंधळ माझा उडाला आहे. " ज्ञानदा सुद्धा अगदी हळू आवाजात बोलली. 


" बरं! " शिवाक्षी म्हणाली आणि नंतर त्या दोघीही आर्यन आणि दर्शनकडे एकटक बघत स्तब्ध उभ्या राहिल्या.


दुसरीकडे आर्यन दर्शनपुढे गुडघ्यावर बसला आणि त्याला म्हणाला, " दर्शू आलास तू? आणि तू त्या मुलीची माफी मागितली ना? " 


" हो बाबा! मी म्हटलं सॉरी आणि जेव्हा त्या ताईने माझी मागितली तेव्हा मी मनात कोणताही राग न बाळगता तिला इट्स ओके सुद्धा म्हटलं. " दर्शन स्मित करत बोलला. 


" अच्छा! " आर्यन मंद हसून बोलला. 


" हो बाबा आणि तुला माहीत आहे, माझी त्या ताईशी मैत्री सुद्धा झाली. " दर्शन म्हणाला. 


" अरे व्वा! भारीच! " आर्यन म्हणाला. 


" हो बाबा! तुला भेटायला ती आलीये. तुलाही आवडेल ना तिला भेटायला? " दर्शनने विचारले. 


" हे ही काय विचारणं झालं का बाळा! आवडेल मला! बरं कुठे आहे तुझी ती मैत्रीण? " आर्यनने दर्शनला विचारले. 


" ही काय इथेच आहे! माझी मैत्रीण अर्थात शिवाक्षी ताई! " दर्शनने शिवाक्षीकडे बोट दाखवून ओळख करवून दिली.


                आर्यनने दर्शनने ज्या दिशेने इशारा केला तिकडे पाहिले तर त्याला दोन व्यक्ती उभे असल्याचे दिसले पण त्याची नजर पहिल्यांदा शिवाक्षीवर पडली अन् तिच्यावरच खिळून राहिली. त्याने नजर वर करून पाहिलेसुद्धा नाही अन् तो गालातल्या गालात मंद हसत शिवाक्षीजवळ गेला. 


तो शिवाक्षीला म्हणाला, " अच्छा तर तू आहेस माझ्या दर्शनची नवीन मैत्रीण! "


" अं! हो! " शिवाक्षी थोडी गोंधळली होती म्हणून तिचे शब्द अडखळत होते. 


आर्यन शिवाक्षीला म्हणाला, " बरं! बाळा शिवाक्षी, दर्शनने तुला आधीच सॉरी म्हटलंय तरीही त्याच्या वतीने मी परत एकदा तुझी माफी मागतो. सहसा तो ऍरोगन्टली वागत नाही; पण काही बाबतीत तो पझेसिव्ह आहे. म्हणून कदाचित शाळेत जेव्हा तू त्याच्या आवडत्या जागेवर बसली असणार तेव्हा तो हायपर झाला असेल; पण एरवी तो कधीच आतेताईपणा करत नाही. मनात रागही ठेवत नाही पण पठ्ठ्याने आज उगाच सूड घेण्याचा विचार मनात ठेवून तुझी खोटी तक्रार तुमच्या डान्स टिचरकडे अर्थात तुझ्या आईकडे नाटकी तक्रार केली असणार... खरंच मनाने तो साफ आहे. म्हणून मी परत तुझी माफी मागतो. तो परत असं कधीच काही करणार नाही; कारण मी त्याची नीट समजूत घातली आहे. सो, प्लीज त्याच्याबद्दल तू सुद्धा मनात कसलेच गैरसमज करून घेऊ नकोस. "


" अं... काका! तुम्ही माफी नका मागू. माझं आणि दर्शनचं बोलणं झालंय आधीच अन् आमच्यात आता ना कोणते मतभेद आहेत ना कोणते गैरसमज आहेत. शिवाय त्याच्याशी जेव्हा पर्सनली मी बोलली तेव्हा कळलं की, दर्शन खरंच किती शांत आणि सभ्य साधाभोळा आहे ते... पहिल्या भेटीत जरी आमचं भांडण झालं असेल तरी आता सगळंच सॉर्ट आऊट झालंय. " शिवाक्षी म्हणाली. 


" बरं झालं! " आर्यन मंद हसत बोलला. 


" हो बाबा! आता ही माझी शिवा ताई आहे आणि मी तिचा छोटा ब्रो! बरोबर ना शिवा ताई? " दर्शन म्हणाला. 


" हो! " शिवाक्षी बोलली. 


" भारीच! आता शाळा आणि डान्स क्लास या दोन्ही ठिकाणी तुमची एकमेकांना सोबत होईल. फायनली, दर्शन तुला एक जिवाभावाची मैत्रीण मिळाली. " आर्यन दर्शनकडे पाहत म्हणाला. 


" हो ना! बाबा, मला वाटतं या शिवा ताईला नक्कीच आईने पाठवलं असणार कारण मी नेहमी तिच्याकडे तक्रार करायचो ना माझ्याशी कुणी मैत्री करत नाही याची... म्हणूनच कदाचित आईने शिवा ताईला माझ्याशी मैत्री करायला पाठवलं असणार... " दर्शन औत्सुक्याने बोलला. 


दर्शनचे शब्द ऐकून आर्यन थोडा गोंधळलाच. त्यावेळी काय उत्तर द्यावे त्याला कळेना पण तोपर्यंत शिवाक्षीच दर्शनला म्हणाली, " हो भावा! मला तुझ्या आईनेच पाठवलंय तुझ्याशी मैत्री करण्यासाठी, तुझ्यासोबत मिळून मौजमजा करण्यासाठी आणि तुझी काळजी घेण्यासाठी... " 


" खरंच? म्हणजे तू माझ्या आईला बघितलंस? तू तिची भेट घेतलीस? मग मला सांग ना ती कशी आहे? तिला माझी आठवण येते ना? " दर्शन लागोपाठ प्रश्न करू लागला. 


" एवढ्याशा डोक्यात किती ते प्रश्न? " शिवाक्षी म्हणाली. 


" ताई सांग ना प्लीज! " दर्शनने हट्ट केला. 


" हो, मी भेटली! तुझी आई अगदी टवटवीत आहे. देवबाप्पाला भारी मात देतेय हं! दूर राहूनही तुझ्यावर ती जीव ओवाळून टाकते. " शिवाक्षी दर्शनच्या केसातून हात फिरवत बोलली अन् तिचे शब्द ऐकून आर्यन अवाक् झाला पण त्याचक्षणी दर्शन फार खूश झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरचं तेज त्याला झालेला अखंड आनंद व्यक्त करत होतं. 


क्रमशः

............................................................ 


©®

सेजल पुंजे

२१/११/२०२२.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//