काही वेळानंतर शाळेतला कार्यक्रम सुरू झाला अन् हळूहळू सगळ्या विद्यार्थ्यांचे डान्स परफॉर्मन्सही आटोपले. त्याच्यानंतर विजेत्यांची नावे घोषित केली गेली. त्यात दर्शन आणि ज्ञानदाचाही समावेश होता. कार्यक्रमाची सांगता होताच सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. ते चौघेही घरी आले. ज्ञानदा तिचं आवरायला तिच्या खोलीत निघून गेली. दर्शनही त्याच्या नि शिवाक्षीच्या खोलीत निघून गेला. आर्यन आणि शिवाक्षी हॉलमध्ये बसले होते.
शिवाक्षी आर्यनचं निरिक्षण करत होती. त्याला बेचैन बसलेलं पाहून शिवाक्षी त्याला म्हणाली, " डॅडा, काय झालंय? "
" काही नाही गं! " आर्यन गश्मीर आणि ज्ञानदाच्या नात्याचा विचार करत होता पण त्याला शिवाक्षीने प्रश्न विचारताच तो विषय टाळू लागला.
" डॅडा, माझ्याशी खोटं बोलू नकोस. मला माहीत आहे, तू काय विचार करतोय. " शिवाक्षी बोलली अन् तिच्या वाक्यावर आर्यनने डोळे विस्फारले.
ती पुढे म्हणाली, " असा काय बघतोयस? मला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय ते... तुला जी काकांना पाहून इनसिक्युअर फील होतंय ना? "
" तुला कसं कळलं? " आर्यनने एका दमात विचारले.
" आय कॅन फील इट डॅडा! " शिवाक्षी बोलली. त्यावर आर्यनने हलकाच उसासा घेत हुंकार भरला. त्यावर शिवाक्षी बोलली, " ह्म्म! काय करतोयस? असा इनसिक्युअर, पझेसिव्ह आणि जेलस फीलच करत बसणार आहेस का? "
" मी काय करू? " आर्यनने उदास स्वरात विचारले.
" प्रपोज! " शिवाक्षी सुचक बोलली. त्यावर आर्यनचे डोळे विस्फारले म्हणून शिवाक्षी त्याला म्हणाली, " असे डोळे मोठे करून नको बघू. मी सांगतेय ते कर अन्यथा तुमच्या दोघांच्या नात्यात गश्मीर काकांची एंट्री फिक्स होईल. "
" म्हणजे? " आर्यनने गोंधळून विचारले.
" तुला चांगलंच माहिती आहे की, मला काय म्हणायचंय म्हणून माझ्या मते, तू आता इनिशिएटिव्ह घ्यायला हवं. तू तुझ्या फिलिंग्ज मम्माला सांगायला पाहिजे. तुला तिला सांगावं लागेल की, तुला ती आवडू लागलीय. तुझं तिच्यावर प्रेम जडू लागलंय. " शिवाक्षी बोलली.
" खरंच? " आर्यनने गोंधळून विचारले.
" आणखी किती उशीर करणार आहेस? तू जेवढा तुझ्या फिलिंग्ज मम्मापासून लपवशील तेवढाच तुमच्यात दुरावा मेंटेन होईल. सो आय गेस, दिस इज द पर्फेक्ट टाईम टू कन्फेस. अभी नही तों कभी नही डॅडा! " शिवाक्षी सुचक बोलली.
शिवाक्षीचे शब्द ऐकताच आर्यनमध्ये जोश संचारला आणि म्हणाला, " शिवा, तू असं म्हणतेस! मग मी लवकरच एखादी संधी साधून तिच्यापुढे माझ्या भावना व्यक्त करतो. "
" डॅडा, संधीची वाट पाहू नकोस आणि जमेल तेवढ्या लवकर कन्फेस कर तुझ्या फिलिंग्ज! " शिवाक्षी सुचक बोलली. त्यावर आर्यनने हुंकार भरला आणि मनोमन निश्चय केला. शिवाक्षीने त्याला परत विचारले, " डॅडा, काय ठरलंय तुझं? "
" परवा! परवा मी ज्ञानदाला माझ्या भावनांची कबुली देणार. " आर्यन बोलला.
" परवा? " शिवाक्षीने आठ्या पाडून विचारले.
" हो, परवा! कारण परवा ज्ञानदाचा वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी मी तिच्यापुढे माझं प्रेम व्यक्त करणार आहे. हे आता ठरलंय माझं! " आर्यन बोलला आणि खोलीत निघून गेला.
तो खोलीत जाताच शिवाक्षी मनातल्या मनात बोलली, " सॉरी डॅडा! तुला मी गश्मीर काका आणि मम्माचं नातं निखळ मैत्रीचं आहे, हे सांगायला हवं होतं पण जर मी आज तुला पझेसिव्ह आणि इनसिक्युअर फील करून दिलं नसतं तर कदाचित तू तुझ्या भावना मम्मापुढे व्यक्त करण्याचं धाडस केलं नसतं, एवढं सर्व इनिशिएटिव्हली घेतलं नसतं. आय ऍम सॉरी! मम्मासाठी मला हे करावं लागलं. तिने खूप वाट पाहिलीय तुझी... म्हणून आता तू तिच्यापुढे व्यक्त व्हायलाच हवं. सॉरी, त्यासाठी मी स्वार्थी झाली असेल तर... "
शिवाक्षी मनातल्या मनात बोलली अन् तीसुद्धा तिच्या खोलीत निघून गेली. आर्यन फ्रेश होऊन बेडवर बसला होता तेव्हा ज्ञानदा त्याला उद्देशून बोलली, " आर्यन, जी बोलला की, त्याच्याकडे माझ्यासाठी स्पेशल सरप्राईज आहे. त्याने परवा त्याच्या घरी बोलावलंय आपण सर्व जाऊया! तुला काय वाटतं, काय सरप्राईज असेल? "
" अं... ज्ञानदा! अगं मी तुला सांगायला विसरलो. आपण उद्याच दोन दिवसांसाठी बाहेरगावी फिरायला जातोय. " आर्यन एका दमात बोलला.
" उद्याच? हा सडनली प्लॅन कसा काय बनला? निदान मला सांगायचं तरी... मी काहीच तयारी केलेली नाहीये. मी शॉपिंगही केलेली नाहीये. मग आता तिथे मी काय माझ्याकडे आहेत त्याच साड्या नेसायच्या का? " ज्ञानदा तक्रारीचा सूर ओढत बोलली.
" अगं एवढी चीडचीड कशाला करतेस. बनला सडनली प्लॅन! कारण दर्शू आणि शिवा फार दिवसापासून पिकनिकला जाऊया बोलत होते. मी कामात बिझी असल्याने मला जमलं नव्हतं. उद्या दोन दिवस मी फ्री आहे म्हणून आखला बेत! " आर्यन शिताफीने खोटं बोलला.
" अरे पण... मला थोडी तरी पूर्वसूचना द्यायची ना! आता मी खरंच काय करू? मी गेल्या पंधरा दिवसापासून थोडीसुद्धा शॉपिंग केली नाहीये. त्यामुळेच माझ्याकडे एक चांगली साडी नाहीये. " ज्ञानदा बोलली अन् तिच्या त्या वाक्यावर आर्यन हसला.
क्रमशः
.................................................................
©®
सेजल पुंजे
२५/११/२०२२.