तिचा वारसा

Varsa
घरात पूजा करायचे नियोजन ठरले होते. किती दिवसांनी घरात आनंद उल्हास चैतन्य येणार आणि पहिल्या सारखे घर पुन्हा हर्षात नाहून निघणार... सासू बाई उमाला सांगत होती " तुझी ती कधी येणार आहे... जर ती अवचित मध्येच टपकली तर उगाच तुझ्यामुळे विघ्न नको.. म्हणून आधी बघ तुझ्या तिच्या येण्याची वेळ कोणती आहे...

सासुबाई उमाला तुला येणारी पाळी कोणत्या तारखेला येते ते बघ ,जर मध्ये येणार असेल तर गोळ्या घेऊन ती लांबव असे सांगत होत्या, पण जणू एकदम पाळी म्हणजे काही तुच्छ असल्या सारखे बोलत होत्या..

उमा खूप काळजी घेत होती... मागच्या महिन्यातील आणि त्याच्या काही महिन्यातील  "तिच्या " येण्याचे असमतोल बिघडले होते... कधी तर अचानक येत ...नाहीतर दोन दोन महिने दांडी असत....

ती आली की उमाला खूप त्रास होत, तिला काही करण्याची हिंमत रहात नसत, त्यात ऑफिस ची पळापळ, ट्रेन पकडण्याची कसोटी... घरी येण्याची कसोटी... सगळे काम वेळेवर करणारे कोणी नव्हते... मग सगळे तिलाच करावे लागत ...त्या 4 दिवसात वेगळे बसने हा ही प्रकार नसत...

खरे तर तिचा नवरा ह्या जुन्या रूढी ही मानत नसत.. पण आता नवीन घर घेतले होते त्यात पूजा ,शांत ही केली नव्हती मग त्याची आईच म्हणाली आपण आता ह्या घराची मोठी पूजा करू..

रोहितला ही पूजा कर्म कांड ही मान्य नसत,तो पूर्ण नास्तिक होता पण आई बाबा समोर त्याचे काही एक चालत नसे..त्याला तर हे दिखाऊ वाटत ,तो तर म्हणत ग्रो गरीब यांना तृप्त मनाने जेवण देऊ म्हणजे खूप आशीर्वाद मिळतील, त्यात त्याचा आणि आईचा वाद झाला, मग मधला मार्ग काढायला बाबा नेहमीच हजर असतात, त्यांनी बायकोला ही हो म्हणायचे आणि मुलाची बाजू पटत होती म्हणून मुलाला ही हो म्हंटले...

बाबा म्हणाले की,आधी पूजा घालू आणि रोहित म्हणतो त्याप्रमाणे गोर गरीब लोकांना तृप्त मनाने जेवायला ही घालू...

त्यात रोहितला माहीत होते की उमाची पाळी कधी ही येऊ शकते, तेव्हा मात्र आईला समजवणे कठीण जाईल, इथे मार्ग कसा काढता येईल...आई असली म्हणजे... इथे हात नको लावू...तिथे नको शिवू...लांब बस.... आणि हे मला नाही पटणारे... माणसापेक्षा तिला कर्म कांड खूप महत्वाचे पण नेमके माझे तिच्या वागण्याविरुद्ध आहे..

तो असा नवरा होता की जो आपल्या बायकोच्या चेहऱ्यावर असणारे सगळे हाव भाव, तिचे दुःख चांगलेच जाणून होता, तिला कसला त्रास होत आहे, आणि तरी ती सांगत नाही हे त्याला लगेच कळत.. पण हाच एक गुण लोकांना त्याचा दोष वाटत, ते म्हणत तो एक नवलाचा नवरा झाला आहे, अरे आमच्या नाही का बायका,पण आम्ही इतक्या बारकाईने नाही त्यांच्या दुखण्या कडे, त्यांना अवेळी यरणाऱ्या पाळी कडे लक्ष देत... मग नेतात त्या निभावून त्यांचे त्यांचे नेहमीचे दुखणे, म्हणून काय त्याचा इतका मोठा बाऊ करायचा.... वहिनी ना सांगत तर थोडं सहन करू दे....

त्याला काही नवर्यांच्या ह्या मानसिकतेचा खूप राग येई,ते बायकोला फक्त एक शरीर मानतात, पण जसे आपले शरीर काही झाल्यावर आपल्यालाच नीट समजून उमजून त्यावर उपचार करावे लागतात मग कुठे ते आपली साथ देऊ शकते मग तसेच बायको चे ही असते ,ही छोटीशी गोष्ट का कळत नाही..

ह्या कॉरोनाच्या भयाण काळात खरे तर पूजा नकोच,पण तरी घालण्याचा घाट घातला.. जिथे माणसाचे मन आज कसल्या विचाराने वेढले आहे ह्याची आईला काही काळजी वाटत नाही,त्यात जर उमाला पाळी आलीच तर ,आणि आईने तिला एकट कोपऱ्यात बसवले तर मी नाही बघू शकणार.

उमाला पाळी येणार नाही ही काळजी घेऊन पूजेची तरखी ठरवली,पण त्या तारखेच्या दोन दिवस आधी नको तेच झाले... सगळ्यात जास्त tension उमाला आले होते...
आईला काही कळण्याआधी ती सगळ्या कासमातून माघार घेत होती... सासूला तिचे माघार घेणे कळले होते

त्यांना कळले की तिला "ती" आली होती ,मग काय कपाळला हाथ लावून बसल्या, मग उपाय म्हणून शिंदे काकू म्हणाल्या, तिला आमच्या घरी पूजा होइपर्यंत पाठवा, नको विघ्न उगाच...

सासुबाई लगेच तयार झाल्या, पण ह्या दोन दिवसाचे काय ,ह्या दोन दिवसात ही तिची सावली नको पडायला,म्हणून उमाला त्या त्या दोन दिवस गच्चीवर बसायला पाठवत...एक तर तिची आवस्था नाजूक त्यात तिने आपल्या घरात आराम करायचा सोडून गच्ची वर बसून रहायचे एकटीने.... तिला किती उदास होत असेल,आणि ती हे फक्त माझ्यामुळे सहन करते, नाहीतर ती ही ह्या गोष्टी मानत नाही...

सासरे ही हे सगळे होताना बघत होते, आणि रोहित ही,त्यांनी ठरवले, मधला मार्ग काढायचा, जिथे माणूस त्रासात असेल तिथे देव तरी कसा खुश राहील...

पूजा करण्याऱ्या ब्राम्हण बुवाला पूजा postond करायला सांगितली, ज्या घरची सूनच पूजेत सहभागी नसेल ती पूजा आम्हाला कोणाला ही मान्य नाही ,असे सगळ्यांनी सासूबाईला सांगितले.

शहरात घरे लहान असतात पण मन संकुचित नाहीत, आता तो तुझ्या सासुच काळ राहिलेला नाही,की आली पाळी की जाऊन बस ओसरीत, आणि इथे त्याचा स्त्रीला जेवण बनवावे लागते, तिलाच ,धावपळ करावी लागते, मग ह्यातून तिची सुटका नसते, ह्या नवीन युगाने तिला ह्या तिच्या तिच्या सकट स्वीकारले आहे... ती जर नाही तर वंश नाही...

मुलगा आईला सांगत होता, आई अग जसे पूजा पाठ केल्याने घराला ,नव चैतन्य येते ,उजळून निघते असे म्हणतेस ना, तर तसे स्त्री च्या जीवनात पाळी येण्याने होते.. ती नव चैतन्य च निर्माण करते तिच्या आयुष्यात, ती ही एक प्रकारे पुजाच असते... लक्ष्मी,विद्या ,सरस्वती  म्हणायचे आणि पाळी आली की तिलाच इतके तुच्छ समजायचे, हे मला कधीच पटले नाही..तुला जेव्हा असे काही व्हायचे तेव्हा आजी तुला लांब बसवत... पण का माहीत आहे का...कारण तुला त्या दिवसात आराम मिळावा ह्या साठी..

हो आता हा वारसा तुझ्यापर्यंत ठीक आहे,पण इथून पुढे हा वारसा कोणत्याच सुनेला लागू होऊ देणार नाही, सासरे बुवा आपल्या बायकोला म्हणाले....जर द्यायचा असेलच तर चांगला वारसा दे...ज्यामुळे तुझे नाव आणि संस्कार पुढे 10 पिढ्या लक्षात राहतील..