वांझोटी..

सामजिक कथा..हृदय स्पर्श
*वांझोटी*
काकांच्या मुलीचे लग्न होत. माझी व यांची फारशी इच्छा नसताना गेलो. काकांनी आमच नाव आवर्जून आमंत्रण पत्रिकेत टाकल होत. त्यामुळे तर जाण भागच होत.
हल्ली आम्ही दोघं लग्न, मुलांचे वाढदिवस,पूजा अश्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात जाण्याचे टाळतो.खासकरून मी तर टाळतेच.कारण गर्दीतून कधी कोण वांझोटी नावाचा शब्द बाण चालवेल याचा नेम नसे. खरतर आता याची सवयच झाली होती कारण एखाद्या कार्यक्रमात गेले की, काही बायका अजाणत्या पणे किंव्हा काही जाणूनबुजून काय ग! गोळ्या बिळ्या चालू आहेत का? अजुन दिवस गेले नाही? नवरा बरा आहे ना? त्याचा प्रॉब्लेम आहे की, तूझा? असे एक ना अनेक प्रश्न.. या सगळ्यांला कंटाळून आता कुठे जावसं वाटतच नाही. त्यांत त्यांची मुल पाहिली की, मन अजुन हेलावून जाते त्या मुळे कार्यक्रम संगितले की नकोच....
तसं मला मूलच होत नव्हते अस नाही तर आता पर्यत तीन मुलं झाली ती सगळी कमी महिन्याची त्यामुळे तिघंही गेली....आम्हा दोघांना मुलगा किंव्हा मुलगी काहीही झाल तरी आम्ही समाधान मानल असते.पण आमचे दुर्दैव काय करणार?..
लग्नात गेलो नेहमीप्रमाणे बायकांचे तेच तेच प्रश्न ...वांझ पणामुळे ठरलेला अपमान....हे सगळं आटपून आम्ही घरी आलो.....
दोन चार दिवसांनी मला मळमळ होऊ लागली.. पाळी चुकली होती त्यामुळे दिवस गेलेत हे समजायला फारसा वेळ लागला नाही... मला दिवस गेलेत ही बातमी यांना आणि मलाही आनंदा पेक्षा टेन्शन देणारी होती. कारण आमचे मागचे अनुभव.. फ़ार भोगले होत आम्ही.. परत तसंच झाल तर?..
मागचे अनुभव आणि बायकांचे वेगवेगळे सल्ले यामुळे या वेळेस जरा जास्तच काळजी घेतली. जस जास्त वजन न उचलणे, चालणे...हे खाऊ नये ते खाऊ नये.. वैगरे.. या वेळेस सगळं बऱ्या पैकी चालले होते.. आठ महिने पुर्ण होत आले.. आणि एक दिवस अचानक माझ्या पोटात दुखायला लागले...
यांनी मला गावातल्या एका खाजगी दवाखान्यात दाखल केले... रात्री जास्तच त्रास व्हायला लागला.. डॉक्टर ने सीझर करण्याचा निर्णय घेतला... रात्री बाराच्या आसपास डिलेवरी ( सीजर) झाले... त्या खोलीत मला आवाज ऐकू येत होते..शरीर मात्र बधीर होत.....
तेव्हा नंतर बाहेर नक्की काय झाले ते माहिती नाही.. सकाळी यांच्या कडुन समजले......
दरवाजा उघडला कापडात बाळाला घेऊन नर्स बाहेर निघाली काही वेळाने डॉक्टरही मी आतमध्येच बेशुद्ध आ अवस्थेत होते.. ...बाळ फ़ार कमजोर आहे.. त्याच वजन फक्त एक किलो पेक्षा थोड जास्त आहे.. तुम्हांला आताच्या आता बाळाला मुंबईला न्यावे लागेल.. डॉक्टर यांना म्हणाले... डॉक्टरांच्या देहबोलीतुन हे समजले बाळ जाणारच आहे.. फक्त बाळाचा मृत्यू येथे नको...म्हणुन डॉक्टर बोलत होते.. त्यांनीही नवीनच दवाखाना उघडला होता.. उगाचच नाव खराब नको अस वाटत असेल त्यांना कदाचित...
डॉक्टर अजुन काही पर्याय? यांनी विचारले.. तेव्हा तालुक्याच्या गावी खाजगीत घेऊन जा मी तेथील डॉक्टरला फोन करतो.. अस डॉक्टर म्हणाले.. यांनी एका खाजगी गाडीचा बंदोबस्त केला व आजी आणि दोन मित्रांसह तालुक्याच्या दवाखान्यात पोहचले... बाळ अजुन जिवंत होत.. तेथील नर्स ने छोटूस बाळ घेतल आणि उघडच वजन काटयावर ठेवल.. ते द्रुष्य पाहुन यांना त्यांच्या व्यावसायिकतेचा अंदाज आला.. थोड्या वेळाने डॉक्टर आले... त्यांनी बाळाला तपासले ( फक्त पाहिले) आणि त्यांवर येणारा खर्चाचा अंदाज सांगितला.. तो खर्च इतका मोठा होता की, आम्हांला झेपला नसता..परत बाळाची शाश्वती नाही.. आम्ही फक्त प्रयत्न करणार अस डॉक्टर म्हणाले... आणि बाळ जगणार नाही हे त्यांच्याही काही शब्दात स्पष्ट दिसत होते.. त्या दवाखान्यात नुसती वजन करायची अवा ची सवा फी भरून ते बाळाला घेऊन परत निघाले.. गावतील डॉक्टरने तर आधीच संगितले होते बाळाला येथे परत आणु नका येथे त्यावर काही उपचार होणार नाही... साधरण चार च्या सुमारास ते परत आले.
यांनी त्यांच्या मित्रांना आजी सोबत बाळाला घेऊन घरी जायला संगितले व हे माझ्या जवळ थांबले.... आता काय फक्त वाटच पहायची होती.. की बाळ कधी देवाघरी जाणार याची.. ..
सकाळी साधारणतःसात वाजता यांचे मोठे भाऊ यांनी फोन केला... फोन फक्त औपचारीक उचलायचा होता ..कारण फोन का केला आहे याची कल्पना होतीच की, बाळ गेल..... तु बायको बरोबर होतास म्हणून आम्हीच सगळं उरकले याशिवाय दुसर ते काय ऐकायला मिळणार?...... यांनी फोन उचलला... हा!.. दादा काय?... तिकडून आवाज.. काय नाही... अरे! जरा डॉक्टरला विचार बाळाला दुध प्यायला आणु काय? फोन वरच ते वाक्य ऐकून यांना सुखद धक्काच बसला... बाळ होते.... यांनी नर्सला
सांगुन डॉक्टरांना बोलवले ...डॉक्टर बाळाला दुध पाजायला आणु का?.... त्यांवर डॉक्टरांनी आश्चर्याने यांच्या कडे पाहिले.... दुध घोटले तर ठीक नाहीतर तुम्हांला त्याला बाहेर हलवायला लागेल!..डॉक्टर म्हणाले... ठीक आहे डॉक्टर!यांनी बाळाला आणयला संगितले... मी आता पुर्ण शुद्धीवर आले होते... बाळाला बाहेर नेले होती याची कल्पना होती मला... आणि पुढे काय घडले असेल याची देखिल......
पण सकाळी जेव्हा बाळ आणले तेव्हा मला समजले.. त्याला पाहुन माझे अश्रू आवरत नव्हते.... बाळाला मी हातात घेतले व छातीशी लावले.. हे, नर्स तसेच डॉक्टर तेथे होतेच... आणि काय चमत्कार त्या बाळाने एकदम व्यवस्थित दुध घोटले...हे पाहुन सगळ्याना आनंद झाला..
आज माझ बाळ पाच वर्षाचे आणि एकदम ठणठणीत आहे...कधीतरी त्या दवाखान्यात जाण होत माझ्या बाळाला पाहुन....डॉक्टरांनी त्या वेळेस केलेल्या दुर्लक्षाचे ते आज मीरीकल अस सांगुन समर्थन करतात....
(सदर घटना सत्य कथेवर आधारीत आहे. त्यामुळे नावे व स्थळ याचा जाणीवपूर्वक उल्लेख नाही.)

लेखन: चंद्रकांत घाटाळ
7350131480