Jan 28, 2022
प्रेरणादायक

व.पु.एक आदर्श व्यक्तिमत्त्व

Read Later
व.पु.एक आदर्श व्यक्तिमत्त्व
वसंत पुरुषोत्तम काळे म्हणजेचं व.पु.काळे ,वपु!

मला वाचनाची आवड आहे,चांगले साहित्य वाचायला आवडते ,तसे जवळपास अनेक साहित्यिक आवडतात पण काही असतात जे आपले मन ओढून घेतात त्यातील एक व्यक्तिमत्त्व म्हणजे वपु !

मी लहान होते तेव्हा आमच्या घरात tape recorder वर वपुंचे कथाकथन ऐकायला मिळत असे.लहान असल्याने जास्त खोलवर काही समजत नसे.पण  कानांना आवाज गोड वाटायचा .इतर सर्व हसायचे म्हणून मी पण हसत असे,समजले नाही तरी .आपण काहीतरी छान ऐकत आहोत असे वाटायचे.

पुढे वाचन सुरु झाले आणि ग्रंथालयात वपु नाव दिसले पुस्तकांवर .हळूहळू वपुंची पुस्तके वाचायला सुरुवात झाली. वाचतांना वाटायचे की,हे सर्व तर आपल्या सर्वांच्या आयुष्यात आजुबाजुला घडत असते.आपण आपले जीवन वपुंच्या शब्दांत वाचत आहोत,ऐकत आहोत.

\"दोस्त\",\"पार्टनर\",\"वर्पूझा\" अशी त्यांची अनेक पुस्तके मी वाचली आणि आज ही पुन्हा पुन्हा वाचते.प्रत्येक वेळी मला तेवढाचं आनंद मिळतो.प्रत्येक वेळी एक वेगळा अनुभव अनुभवत असते.त्यांचे कथाकथन ऐकत असते.प्रत्येक व्यक्तीचे केलेले निरीक्षण ,प्रत्येक व्यक्तीचे  विचार,स्वभाव खुप छान शब्दांत सांगितले आहे.छोट्या छोट्या गोष्टींतून जीवनातील अनेक सत्ये समर्पक शब्दांत मांडली आहेत.योग्य ठिकाणी विनोदाचा वापर करून रसिकांना, वाचकांना हसवले आहे.

आकर्षक व्यक्तीमत्व, व्यवसायाने वास्तुविशारद आणि आदर्श, उत्तम लेखक,रसिकांना पोट धरून हसवणारे,जीवनाचे मर्म सांगणारे,गोड,मधुर आवाजाचे कथाकथनकार म्हणजे वपुचं!

आज वपु आपल्यात नसले तरी ,त्यांच्या लेखनातून, कथाकथनातून ते आपल्या सर्वांच्या मनात आहेत.त्यांचे विचार वाचतांना वाटते की,ते आपल्याला चं समजावून सांगत आहे आणि आपल्याला आयुष्यात तसा प्रत्यय ही येत असतो.आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा खचायला होत तेव्हा जर वपुंचे विचार वाचलेत ,कथाकथन ऐकले तर मनामध्ये पुन्हा एक नवी उमेद आणि आशा निर्माण होते.आयुष्याला एक नवी प्रेरणा मिळते.

"संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहिला त्याने दिवस जिंकला "

"आपण किती पैसा मिळवला यापेक्षा ,तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले,हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो."

"गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले"


असे उत्साह देणारे ,जीवनात टवटवीतपणा देणारे वपुंचे quotes वाचले तर जीवनावर भरभरून प्रेम करावेसे वाटते.

रसिक मनांची वाचनाची भूक भागविणाऱ्या ,रसिकांच्या मनामनात असणाऱ्या वपुंना माझे विनम्र अभिवादन.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now