उत्तर दे अनुज...

Uttar de Anuj.... Mi vichar karat hoto ki," Anjali chya office madhe join kel he eakalya nantar tu kay reat karshil..."

#कथा 
#लघुकथा...

✍ऋतुजा वैरागडकर 

मी  विचार करत होतो की, "अजंली च्या ऑफिस मध्ये जॉईन केलं हे ऐकल्यानंतर तु काय रिअॅक्ट करशील..."
चहाचा कप हातातून ठेवुन जोरात अंगडाई घेतली, जसा तो स्वताला तनावरहित करण्याचा प्रयत्न करत होता....

"का? तु मला एवढंच ओळखलंयस....?

कप, ग्लास, केटली ट्रे मध्ये ठेवत आरतीनी अनुज कडे डोळे फिरवत मिश्किलपणे हसली....
अस,  नाही ग आरती.... तुला ओळखलं नसतं तर तुला बोललो नसतो.... 
थोडं थांबून अनुज उत्तरला...

असंच मनात विचार आला म्हणुन बोललो कारणं तुला तर माहीत आहे कॉलेज मध्ये असताना अजंली आणि माझे संबध कसें होते... 
 तसही लग्ना आधी मी तुला सगळं सांगितलं होतं कारण लग्न हे नातं विश्वासावर टिकतं... आपल्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम  यायला नको... आपलं वैवाहिक जीवन छान व्हावं.... 
 म्हणुन हा सगळा खटाटोप...
पण हेही तितकंच खरं आहे की अजंली माझा भुतकाळ होती आणि तु माझा वर्तमान काळ आहेस..

"तुझी जागा कुणीही घेऊ शकत नाही  आरती.."
अनुज नी आरती ला जवळ घेतलं, तिला मिठी मारली आणि भावुक होऊन बोलला..

"आज पर्यंत ,मी तुझ्यावर अविश्वास दाखवला ?"..
मोठे मोठे डोळे करत आरतीनी अनुज पाहीले....
जणू तिला काही जाणुन घ्यायच होत... आजचं हा "विश्वास प्रदर्शन "कशासाठी? 
आणि आजचं हे "आश्वासन" कशाला? 

केवळ यासाठी, कारण ती त्याची प्रेमीका होती आणि आज बारा वर्षानंतर त्याच्याच  ऑफिस मध्ये ऑफिसर या पदाच्या निमीत्ताने ट्रांसफर होऊन आली आहे....

अचानक दोघांची अशा प्रकारे भेट होईल... याचा कधी अनुज ने विचारही केला नव्हता ...
जसं अजंली ला कळलं की अनुज ही त्याच ऑफिस मध्ये आहे....तिला खुप आनंद झाला...
आणि तितक्याच आनंदाने ती अनुजला भेटली....
अनुज ला पण खुप आनंद झाला , त्याच्या मनातली धडकन होती ती...

एकाच ऑफिस मध्ये असल्यामुळे, काम संपलं की दोघेही जवळच्या कॉफी शॉप मध्ये बसायचे...
मग सुरु व्हायचा "जुन्या आठवणीचा सिलसिला..."
आणि लग्नानंतरच आयुष्य....

"तु ... तूझ्याकडे बघून वाटत नाही, तुझं लग्न झालं असेल..  आणि  दोन मुलांची अम्मा असशील 
...

अजंली डोळे विस्फारून उत्तरली.. अम्मा...
 तिनीही मिश्किलपणे अनुज कडे पाहीलं...
 "तुझी ती कशी आहे रे आरती"... नाव तर खुप छान ठेवलस....

ह... छान आहे ती.... मनाने सुद्धा...आणि स्वभावाने सुद्धा...

माहीत आहे तुला... आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्री 
च मी तिला सगळं खरं सांगितलं...
तिला काहीच प्रॉब्लेम नव्हता....

"She is so great...."

"चला आनंद झाला हे ऐकून की तु खुश आहेस....
 नाहीतर आज पर्यंत मी स्वतालाच कोसत होते की मी तुझी साथ दिली नाही"....
 अजंली श्वास रोखून बोलली...
जेव्हा मला कळलं की तुझं लग्न होतंय ....
तेव्हा मी परमेश्वराला हात जोडून कोटी कोटी प्रणाम केलं.... 
आता पुढे काय?
"तुझा नवरा जतिन कधी येतोय..."
 अनुज ने गोष्ट बदलवत विचारलं....
ह.... जतिन च आधीच इथे ट्रांसफर  झालंय...म्हणुन तर मी माझं ट्रांसफर  करुन घेतलंय... तो सहा महिन्यांसाठी ऑफिशिअल टुर वर गेलाय.... तो आला की मग झालं....

तो म्हणायला "केमिकल इंजिनियर" आहे ... 
पण त्याला प्रकृति प्रेम खुप आहे....
नद्या, झरणे, पहाडी...  त्याला निसर्ग खुप आवडतो.... 
अजंली खळखळून हसली...

चल, उठ आता... किती वेळ पडून राहणार आहेस... आरती च्या आवाजाने अनुज तंद्रीतून बाहेर आला...

क्रमश...