Oct 28, 2020
मनोरंजन

उत्सव नात्यांचा 14

Read Later
उत्सव नात्यांचा 14

https://www.irablogging.com/blog/utsav-natyancha-13_2984

भाग -१३ साठी वर क्लिक करा .

प्रिया तिच्या घरी येते .लग्नाला आता काहीच दिवस शिल्लक राहिलेले असतात .प्रिया खूप खुशीत असते ..येऊन पटकन आरतीला आणि आईला मिठी मारते .

"आग, हो, हो ,किती हा आनंद ?खूप खुश आहात एकदम ..."-आई 

"आई,मी खूप खुश आहे ..सगळं कस छान आहे ..नील ने हि रजा टाकलीय आता लग्नासाठी ..सगळे कार्यक्रम  होणार ,घर गजबजणार ,किती मज्जा येईल नाही ?"-प्रिया 

"खूपच खुश आहेस तू प्रिया ..सांभाळून ..सुरवातीला सगळं छानच असत .खरे रंग नंतर कळतात .."-आरती एकदम बोलून जाते .आई आणि प्रिया तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघतात ...

प्रिया तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला मिठी मारून म्हणते ,"असं नसत आरती ....सगळं तसच नसत जस आपल्याला वाटत ..कधी कधी विश्वास आणि प्रेम ह्या दोन गोष्टींमुळे ते सगळं साध्य होत जे आपल्याला हवं असत ....."-प्रिया .

"हम्म.देव करो आणि असच होवो ..पण एक सांगते ..कधीही तुला कशाचा हि प्रॉब्लेम आला तर आम्ही आहोत हे लक्षात ठेव .....ओके."-आरती .

दोघांकडे बघून  जयश्री चे डोळ्यात पाणी येत ..लग्नाला जेमतेम ४ /५ दिवस होते ..दोन्हीकडे तयारी चालू होती .नील कडे तर बरीच काम सुरु होती ..पाहुणे कोण येणार कसे येणार कुठे राहणार सगळी व्यवस्था चालू होती ..प्रिया कडे खरेदी चालू होती अजूनही शिरीष राव म्हणावं तास वेळ देत नव्हते ...त्यांचं आपलं काम सुरूच होत ....

तेवढ्यात घरी wedding  planner  येतात ....."नमस्कार ,मी संजय आणि हि माझी टीम ...आम्हाला शिरीष रावांनी पाठवलं आहे .."-संजय 

आरती हि त्यांच्या पाठोपाठ येते ..

"बसा  ना ...काय घ्याल ?"-आई 

"आलात तुम्ही ..तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही शिवापूर ला आजच निघा आणि सगळी व्यवस्था बघा .....पापणी तुम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी करा आणि काही लागलं तर मला कळवा .."-आरती 

"हे काय आहे आरती ?काय चाललाय ?"-प्रिया 

"तुझ्या लग्नासाठी पप्पानी ह्यांना काम दिलय ..हे खूप मोठ्या मोठ्या लोकांसाठी काम करतात .."-आरती 

"हो मॅडम, हे काही design  आणले आहेत .मंडपाची ..तुम्ही एकदा बघितला तर आम्ही तिथे जाऊन काम सुरु करू .."-संजय 

प्रिया ,आई आणि आरती design   बघतात ...आरती ला एक आवडते ..

"हे छान वाटतंय नाही ..."-आरती ..आईला हि आवडते ..प्रिया मात्र काही जास्त बोलत नाही ...

"प्रिया तुला आवडलं नाही का ?"-आई 

"आई ,तस नाही .पण नील ला आवडेल का नाही माहित नाही ...त्यांच्याकडे सगळं आधीच सुरु झालाय ......ह्या सगळ्याची गरज नाही पडणार .."-प्रिया 

"हे बघ प्रिया ,ते पप्पा बघतील ......आपण जरी तिकडे लग्न लावून देत  असलो तरी आपल्या ला साजेल असे सगळं असायला हवे ,आपले हि मोठे मोठे पाहुणे येणार आहेत .."-आरती .

प्रिया गप्प बसते आणि वर जाते ....संजय पुढच्या कामासाठी निघून जातो ...आई वर प्रिया च्या खोलीत जाते ....

"आई ,मला तुला काही सांगायचं आहे ...."-प्रिया 

"काय ग ?बोल ना ....कोणत्या विचारात आहेस .."-आई 

"आई ,हे बघ तू रागावणार नाहीस वचन दे .....आणि पप्पाना हे सगळं सांगण्यात मला मदत करशील असं पण वचन दे .."-प्रिया 

"प्रिया ,असं कोड्यात बोलू नको ..काय झालं ? सांग लवकर ..तुला माहित आहे ना मला सहन नाही होत असं काही .."-आई 

"आई तू रागावणार नाही ना ....नक्की "-प्रिया 

"नाही रागावणार बाई ...सांग काय झालं ते .....तू आणि नील ..काही प्रॉब्लेम झाला का ?"-आई 

"नाही आई ,नील चा काहीच प्रॉब्लेम नाही ....मला तुला वेगळाच सांगायचं आहे ..... आई ,मी ..मी अंजापूर ला गेले होते ...काका ना भेटले "-प्रिया 

"काय ?काय सांगतेस तू हे ..?"-आई .

"हो आई ...आई तू रागावणार नाहीस ..बोलली होतीस ..-प्रिया 

"प्रिया ,आग प्रिया तुला कळतंय का ....तुझ्या पप्पानी  नाही सांगितलं होत ना तुला ...तरीपण तू...कधी गेलीस ? ..?कशी भेटलीस ...?काय सांगू तुझ्या पप्पाना  आता .?.कस सांगू ..?"--आई एकदम खाली बेड वर बसते ...

"आई,आई ..तू टेन्शन नको घेऊ ..मी सांगते सगळं .....मी आता नील च्या घरी ह्याच साठी थांबले होते ..मी ,नील आणि काका आम्ही सगळे गेलो होतो ....सुरवातीला काका ,थोडेसे नाराज झाले होते पण मग खूप मज्जा आली ....."-प्रिया ने सगळं सांगितलं 

"चला हे ठीक झालं ...पण आता तुझ्या पप्पांचं  काय ? त्यांना कस सांगायचं ?"-आई 

"काय सांगायचंय ?"-शिरीशराव तिथे आलेले असतात ..त्या दोघीना काळातच नाहीकि ते केव्हा आलेत ते ..दोघी एक मेकांकडे बघतात .....

"काय झालं ?असं काय बघतेस तू प्रिया ?काय सांगायचंय ?"-शिरीष राव .

"ते ..ते काही नाही ..असच ...."-आई 

"अरे ..असाच ...असाच काय ?अजून काही करायचं आहे का  विधी वगैरे? नील कडून तस काही आलं आहे का ?.."-शिरीष राव 

"नाही नाही ...तास काही नाही ...कंगाल तुम्ही आधी हात पाय धुवून घ्या ..बोलू आपण परत .."-आई  सावरतंच  बोलते ....

"जया ,काय झालं ?एवढा काय घाबरतेस ? काय लपवताय तुम्ही माझ्या पासून ...?'-थोडासा प्रश्नांकित  नजरेने शिरीष राव विचारतात ...

जयश्री खाली मान घालून उभी असते ..प्रियाला वाटते आता काही खार नाही पण पप्पाना आता हे कळायलाच हवं ..दोन दिवसांनी कार्यक्रमात काका एकदम भेटले तर कार्यक्रमात शोभा नको ....म्हणून ती सांगायला जाते 

"पप्पा, मला तुम्हाला काही सांगायचं आहे ....रागावू नका ...प्लिज "-प्रिया 

"काय ? रागावण्यासारखा काय केलाय तू ?"-शिरीशराव .

"पप्पा ,पप्पा ..मी ...मी ...अंजापूर ला गेले होते ...आणि सदा काकांना भेटले ....."-प्रिया एका दमात बोलून गेली ..शिरीष राव बघतच राहिले काय बोलावे काहीच सुचेना .....

"तू,,तू..."-रागातच शिरीष राव येरझाऱ्या मारू लागले परत वळून म्हणाले ,"मी म्हणालो होतो जाऊ नकोस ..तरी सुद्धा ...तू गेलीस ..काय मिळवलं ...त्यातून ....कितीही तुमच्या मनासारखा करा पण तुम्ही काही आमचं ऐकत नाही ....का केलास तू असं ?   ते नक्कीच चिडले असतील.....बराच काही बोलले असतील ........"-शिरीष राव ..त्यांना मध्येच थांबवत प्रिया "नाही पप्पा ते नाही चिडले ,ते नाराज होते थोडे पण मग काका आणि काकूंनी खूप आशीर्वाद दिले आम्हाला आणि लग्नाला यायला तयार झाले ...."-

"काय?लग्नाला यायला .............म्हणजे आता ते लग्नाला .......आणि आम्हाला ..म्हणजे कोणाला ...?कोणासोबत गेली होतीस ?"-शिरीशराव 

"नील सोबत ,आणि त्याचे काकाही होते ..."-प्रिया 

"तुला तुला काहीच नाही वाटलं आणि हे सगळं करताना .........जया ,जया हिने आपल्या घरच्या गोष्टी दुसर्यांना सांगितल्या आणि तिला काहीच वाटत नाही ह्याबद्दल .....तुझीच चूक आहे ..तू जर हे तिला सांगितलं नसत तर हे आज झालं नसत ....काय विचार करतील ते माझ्या बद्दल ..........तू एकदा तरी माझा विचार करायचा होता प्रिया ..नील ला हे सगळसांगण्याआधी .............."-शिरीष राव तिथून निघून जातात ..........

त्यांच्या मागोमाग जयश्री सुद्धा जाते . प्रिया तिथेच विचार करत बसते ..आता पुढे काय होईल?पप्पा काय म्हणतील ?लग्नात काका समोर आल्यावर काय होईल ह्या सगळ्या प्रश्नांनी प्रिया ला टेन्शन येत ............

(क्रमशः:)

Circle Image

Anuradha Pushkar Shaha

Writer ,former lecturer ,Home maker

I like reading stories ,inspirational books . i love visiting new places ....