उत्सव नात्यांचा 7

Priya and Neel decide to tell their family about their realtionship ....

https://www.irablogging.com/blog/utsav-natyancha-6

लग्नांनाच्या ठिकाणी वेगवेगळी कार्यक्रमची रंग सुरु होती .आता संगीत रजनी चा कार्क्रम होणार होता ..नील तयार होऊन येत असतो तेवढ्यात  तिकडून प्रिया हि येत असते तयार होऊन ..प्रियाने अबोली रंगाचा घागरा घातलेला असतो .कानात मोठे असे कानातले असतात .गोऱ्यापान चेहऱ्यावर  डार्क गुलाबी रंगाची लिपस्टिक लावलेली असते .केस कुरळे करून मोकळे सोडलेले असतात .डोळ्यात काजळ आणि लॅशेष ला मस्कारा लावलेला असतो एकूणच काय तर बघण्याऱ्याची नजर तिच्यावर एक्दम खिळून बसेल इतकी सुंदर ,मादक आणि मोहक दिसत होती प्रिया ...तिला बघत बघत नील येत असतो त्याला दिसत कि अजूनही काही मुलांचं लक्ष तिच्याकडे आहे ..प्रिया त्याच्याबाजूने पुढे निघून जाते .. तेवढ्यात नील तिला आवाज देतो आणि म्हणतो ,"प्रिया एक मिन .."

प्रिय बघतच असते तो तिच्या डोळ्यात डोळे घालून बघत असतो दोघांनाही आजूबाजूच्या गोष्टींचा विसर पडतो नील तिच्या डोळ्यातल  काजळ थोडस आपल्या बोटावर घेतो आणि तिच्या कानाच्या मागे लावतो .

"हे काय करतोयस तू ?"-प्रिया 

"सुंदरतेला कोणाची नजर लागू नये म्हणून .."-नील .प्रिया लाजते ,तिचे गाल अजूनच लाल होतात ..

"मला नजर लागली तरी तुला काय ?"-प्रिया ..

"पार्टनरला नजर लागली तर वाईट वाटेल च ना ..."-नील 

"पार्टनर म्हणजे .?.dance  पार्टनर ..?"-प्रिया 

" अंह ...life  पार्टनर .."-नील . असं म्हणून तो तिच्या पुढे आपला हात करतो तिचा हात हातात घेण्यासाठी ...प्रिया हि आपला हात त्याच्या हातात देते .प्रिया त्याच्याकडे बघतच राहते ...तो क्षण इतका सुंदर असतो कि त्या क्षणात दोघे हि आपल्या नजरेतून आपल्या प्रेमाची कबुली देतात .संगीत रजनी मध्ये   गाणं सुरु होत  ....ते दोघे एकमेकांचा हाथ पकडून समोर येतात आणि डान्स सुरु करतात .नील एक हाथ प्रियाच्या कमरेभोवती ठेवतो आणि एक हाथ हातात घेतो .प्रिया तिचा एक हात त्याच्या खांद्यावरती ठेवते आणि एक हातात देते .....बॅकग्राऊंडला गाणं सुरु असतं ,"

"देखा हजारो दफा आपको ,फार बेकरारी कैसी है ...

सांभाळ सांभाळता नाही ये दिल ..कूच आपने बात ऐसी है ..."...

दोघेही एक मेकांच्या नजरेत कैद होतात ...ती रात्र त्यांच्या प्रेमाची साक्ष देणारी रात्र असते ..दोघेही मनसोक्त प्रेमाच्या सागरात पोहत असतात 

............................................................................................................................................................................................

दुसऱ्यादिवशी चा दिवस हा  लग्नाचा दिवस असतो ..'वर 'म्हणजे रवी  मंडपात बसलेला असतो ..गुरुजींचे मंत्र सुरु असतात .त्या लग्नात काही बडे उद्योगपती आणि मंडळी आलेले असतात .किरणांच्या पप्पां  ची ओळख काही बड्या मंत्र्यांशी पण  असते ते पण आलेले असतात ..त्यांना परत निघण्याची  घाई असते त्यामुळ काका  गुरुजींना येऊन सांगतो ,"गुरुजी , जरा लवकर लवकर आटोप. मंत्री साहेबाना जायचं  आहे .."-

पण अजून मुहूर्ताला वेळ आहे असे गुरुजी म्हणतात ..

"पण मंत्री साहेबांजवळ वेळ नाहीये .....आज ते इथे आले  त्यामुळे आमचा  मान सन्मान अजून वाढला ..."-ते काका 

"पण मुहूर्ताशिवाय काही गोष्टी करता येत नाहीत .."-गुरुजी 

"मुहूर्ताचं काय घेऊन बसलात हो ..ते तर आपणच ठरवतो ना ..चला आवरतं घ्या ...."-काका 

आणि ते वधूला म्हणजे किरण ला बोलवायला सांगतात .हे सगळं नील ऐकत असतो आणि बघत असतो ..त्याला राहवलं जात नाही आणि तो म्हणतो ,"काका जे तुम्ही करताय ते ठीक आहे का ? एका मंत्र्यासाठी  तुम्ही मुहूर्त बदलून ठेवाल काय ..माझ्या मते ते योग्य नाही "-नील 

"तू कोण आहे बोलणारा .?तू लहान आहेस तुला कळत नाही ...तू ह्यात बोलू नको .. हे साहेब कित्ती  लांबून आले आहेत ..त्यांचा वेळ पण महत्वाचा आहे ना ..."-काका .तिथे वातावरंन  थोडे गरम होते ..सगळे बघत असतात पुढे काय होईल ...

" वेळ बदल्याणासाठी हा काय छोटा कार्यक्रम आहे का ? त्यांच्या  वेळेच महत्व इतका आहे तर तुम्ही मुहूर्त बघितलंच कशासाठी ?तसच  लग्न ठरवायचं होत ना ....तसही इथे लग्न असल्यासारखं वाटच नाहीये ..कोणी म्हणतो कि जेवण उरकून घेऊ आणि निघू ..कोणी म्हणताय कि वधू  पित्याला भेटलो झालं आता काय निघू आपण लग्न लागेलच  नंतर ...हे काय आहे काका ...लग्न म्हणजे रेशीमगाठ जी दोन घरांना जोडते ,दोनजीवना एकत्र आणते ... हि  एक शुभ वेळ असते ज्यात सगळ्या चांगल्या गोष्टी घडतात  ,सगळे ग्रह शुभ  भावात असतात ..आणि तुम्ही ज्या साहेबांची हे   म्हणताय ते सुद्धा ५ वर्ष खुर्चीवर बसण्यासाठी जेव्हा शपथ घेतात तेव्हा मुहूर्त बघतात च ना ...मग हे दोघे तर आयुष्यभरासाठी एकत्र राहणार आहे ..मग त्यानं मुहूर्ताची गरज आहेच ना ..."नील हाथ जोडून मंत्री साहेबानं म्हणतो ,"साहेब तुम्ही इतक्या दूरवर या लग्नासाठी आलात, वेळ काढून आलात ..आम्ही आभारी आहोत पण आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही अजून फक्त १० मिन नाही का थांबू शकत ?"-नील 

 मंत्री साहेबानं ते पटत आणि ते म्हणतात "ज्या मुहूर्तावर हे लग्न ठरलय  त्याच मुहूर्तावर होऊ द्या आम्ही थांबतो ...".

लग्न चान्गल्या पद्धतीने पार पडते ..सगळे जण वधू आणि वराला आशीर्वाद देतात ....आता नील आणि प्रिया ची परत आपल्या आपल्या घरी जाण्याची वेळ होते ...बॅग पॅक करून ते हि निघतात ....प्रिय जरा गप्पच असते ती कोणत्यातरी विचारात असते ...नील तिच्याकडे बघून तिला विचारतो ,"काय झाले प्रिया काय विचार करतेस ? आपण भेटू परत लवकरच ..मी घरी जाऊन आपल्या लग्नाबद्दल बोलणार आहे ...तू काळजी करू नकोस आमचे घरचे नाही म्हणणार नाहीत ..."-नील 

"मी आपल्या  लग्नाचाच विचार करत होते ... तू लग्न, त्याच्या परंपराना इतका महत्व देतोस पण आमच्याकडे असं नाही ..आमच्याकडे लग्न म्हणजे एक इव्हेंट आहे फक्त ....तुला तर माहित आहे ना कि माझ्या ताईचा डिवोर्स होणार आहे ..तुझ्या आणि तुझ्या घरच्यांच्या बाबतीत संगितल्यावर कदाचित पप्पा लग्नाला तयार होतीलही पण माहित नाही लग्न कसे होईल ? काय होईल पुढे ? तुझ्या घरच्यांची आणि माझ्या घरच्यांची सांगड बसेल का ?"-प्रिया .

"प्रिया नको एवढा विचार करुस ..होईल सगळं नीट विश्वास ठेव माझ्यावर ... मी स्वतः तुझ्या पापाची भेट घेणार आहे "-नील 

एवढा बोलून ते आप आपल्या घरी जातात ..नील त्याच्या रूम वर  जातो आणि प्रिया तिच्या घरी ...नील ला गावाला जायला अजून ३,४ दिवस असतात .

............................................................................................................................................................................................

प्रियाला घरी येऊन २ दिवस झालेले असतात .ती हा विचार करत असते कि आपण घरी कसे सांगावे ...आणि मग खूप विचार करून आधी ती आईला सांगते .तिची  आई खूप समंजस आणि प्रेमळ असते .

"नील च्या घरचे खरंच इतके चांगले आहेत का ? "-आई 

"हो आई ,त्याच्या घरचे अजूनही जॉईंट फॅमिली मध्ये राहतात ..खूप प्रेम आहे त्यांचं एकमेकांवर ....."-प्रिया 

"नाती तेव्हाच टिकतात जेव्हा त्यांच्यात प्रेम आणि विश्वास असतो ."-आई 

तेवढ्यात गाडीचा हॉर्न वाजतो आणि तिचे पप्पा घरी येतात . ते थोडेसे रागावलेले असतात .

"हॅलो पप्पा ."=प्रिया 

तिचे पप्पा पुढं जात असतात अचानक मागे वळून सांगतात "बस जरा .मला बोलायचं .."-पप्पा 

"तू नील ला ओळखतेस ?"-पप्पा 

"हो ,मला तुमच्याशीही बोलायचं होत नील च्या बाबतीत .."-प्रिया 

"काय बोलायचं होत ..हेच कि तू त्याच्या प्रेमात पडलीयेस....आज एक मुलगा अचानक ऑफिस मध्ये येतो आणि सांगतो माझं तुमच्या मुलीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं ....."-पप्पा 

"मी तुम्हाला सांगणारच होते ...तो खूप चांगला मुलगा आहे .."-प्रिया 

"तुझ्या आयुष्यात आता माझ्यापेक्षाही कोणीतरी महत्वाचं आहे आणि म्हणून  तुला हि गोष्ट मला स्वतः नाही सांगता अली तर तू दुसऱ्याची मदत घेतलीस ..एवढा दुरावा कधीपासून आला आपल्यात ..आताच तू जर माझ्यापासून सगळं लपवायला लागलीस तर मी काय समजायचं ?.."-पप्पा 

"असं नाही ए पप्पा ....तुमची जागा कोणी घेऊ शकत नाही ..."-प्रिया  तीच न ऐकत मध्येच पप्पा बोलू लागले 

"तू प्रेमात का आणि कशी पडलीस हे मी तुला नाही विचारणार ...तुझ्या आयुष्यच निर्णय तू घेऊ शकतेस तेवढी मोठ्ठी झाली आहेस तू ...मी कधीच तुम्हा दोघी बहिणीनं अडवलं नाही ...त्यामुळे तू जर त्याची निवड केली असेल तर ठीक आहे पण एका प्रश्नच उत्तर दे ..तुला लग्न का करायचंय ? प्रेम करताना सगळं छान असत पण ते निभावणं अवघड असतं .."-पप्पा 

"पप्पा ,नील च्या आयुष्यात जो कोणी आहे तो त्याच्यावर खूप मनापासून प्रेम करतो ...सगळ्यांची खूप काळजी घेतो आणि माझी   तर त्यापेक्षा जास्त  काळजी घेतो ..तुमच्या सोबत जेवढ मी सुरक्षित असते तेवढाच तो सोबत असताना मला वाटत ...तुम्ही सोबत असल्यावर जेवढा मी खुश असते तेवढेच खुश मी तो असल्यावर हि असते ...तो माझी  तशीच काळजी घेतो जशी तुम्ही घेता ..."-प्रिया .

प्रियाच्या ह्या गोष्टीवर तिचे पप्पा विचार करत असतात ... आणि त्याला बोलावून घे ,मला त्याच्याशी काही बोलायचं आहे असं म्हणतात ..

(प्रियाचे पप्पा नील शी काय बोलतील ? नील च्या घरी जेव्हा तो हेसांगेल तेव्हा काय होईल ? पाहूया पुढच्या भागात ..

🎭 Series Post

View all