उत्सव नात्यांचा 4

Neel meets Priya first time .. and their story begins..

https://irablogging.com/blog/utsav-natyancha- 

भाग -३ साठी वर क्लिक करा .

दुसऱ्या दिवशी सगळे आप-आपल्या कामाला  जातात  .नील ऑफिसला पोहचला आणि त्याला पूजा ने इंटिरियर डिझाईन  च्या लोकांच्या सोबत असलेल्या मीटिंग बद्दल सांगितले . नील ने ठरलेल्या वेळी मीटिंग हॉल मध्ये दोन्ही कडच्या लोकांनाशी बोलायचे ठरवले . पहिल्या कंपनीने  आपला प्रेसेंटेशन दिले .नील ने त्यांना काही प्रश्न विचारले, आणि त्यांनी उत्तरे हि दिली .नील ला आवडले त्यांचे काम ..नील ने  त्यांना उद्या कळवतो म्हणून सांगितले आणि दुसऱ्या कंपनीच्या लोकांना आत बोलावले . दुसऱ्या कंपनीनीचे तीन लोकं आले होते .त्यात एक मुलगी पण होती .दिसायला सुंदर होती .तिच्या चेहऱ्यावर light  make -up होता .फिक्क्या गुलाबी रंगाची लिपस्टिक होती ,डोळ्यात काजळ होते आणि केस एका hairpin  ने बांधले होते .तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता .एकंदरीतच दिसायला आकर्षक होती .त्यांच्या टीम कडून तीच प्रेसेंटेशन देत होती ,बहुतेक ती त्यांची लीडर होती .तीच नाव होत प्रिया .तिने तीच प्रेसेंटेशन संपवलं आणि नील ला ते आवडलं मग त्याने प्रश्न विचारले ,

" तुम्ही जे सांगताय त्या सारखेच इतरही लोक आहेत मग आम्ही तुम्हालाच हे काम का द्यायचं ,शिवाय तुमचा दर हि  थोडा जास्त आहे ..?"-नील 

"आम्ही आत्ताच  जे प्रेसेंटेशन दिल त्यात आम्ही तुम्हाला आम्ही कसे वेगळे आहोत हे सांगितलंय ...आणि आम्ही जे काम करतो त्या प्रत्येक कामात तुमचा एक माणूस आमच्यासोबत असणार आहे ज्यामुळे कि तुमची फसवणूक होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे .शिवाय इतर लोक थोड्या कमीअधिक पैश्यात हे काम करवून देऊ शकतील पण आम्ही आमच्या गुणवत्तेवर ठाम आहोत आम्हला माहित आहे कि आमची गुणवत्ताच आमची ताकद  आहे म्हणून आम्ही योग्य तोच दर लावला आहे . शेवटी कोणतेही काम मनापासून केले तरच ते सुंदर होते .आणि जिथे आपली आपल्या कामावर श्रद्धा असते तिथे विश्वास घात च पण  प्रश्न  येत नाही ."-प्रिया 

"समजा आम्ही तुम्हाला सांगितलं कि तुमचे दर आम्हला परवडत नाही आणि जर तुम्ही ह्यावर फेरविचार केला तर आम्ही तुम्हाला हे काम देऊ तर तुम्ही काय म्हणाल ?"-नील 

"सॉरी सर , आम्ही आमच्यागुणवत्तेवर कधीच compromise करत नाही आणि म्हणूनच आमच्या गुणवत्तेला आधारूनच आम्ही हे दर तुम्हाला पाठवलेत .आज जरी हे काम आम्हाला नाही मिळाले  तरी आम्हाला चांगल्या लोकांना भेटण्याचा आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा  चांगला अनुभव मिळेल जो कि आमच्यासाठी  खूप महत्वाचा असेल . "-प्रिया .

प्रिया च्या एक एक शब्दावर नील चे लक्ष होते .त्याला तिचे हसून बोलणे खूपच आवडत होते .

"ठीक आहे ,आम्ही कळवतो तुम्हाला  ."-नील .नील ने सगळ्यांचा निरोप घेतला .

पूजा आणि वासू नील च्या केबिन मध्ये आले म्हणाले कि "सर, आम्हाला वाटत कि आधीच्या लोकांना हे काम द्यायला हरकत नाही .त्यांचा रेट हि कमी आहे आणि ते अजून थोडं negotiate  करतील  ."-वासू 

"नाही वासू ,मला असं वाट कि, आपण हे काम दुसऱ्या कंपनीला द्यावं .त्यानं त्यांच्या कामावर विश्वास आहे आणि  म्हणून ते  दर कमी करणार नाहीत .शिवाय त्यांचे  डिझाईनस पण छान आहेत .ते आपल्या कामाच्या बाबतीत कोणतीच हयगय करणार नाही असा विश्वास वाटतो मला ..सो त्यांना उद्या कळवून टाका ,काम लवकर सुरु करायला ."-नील 

रोजचे काम आवरून घरी आल्यावर नील ला  प्रियाचा चेहरा सारखा आठवत होता . त्याला तिच्याबाबतीत काहीतरी खास आणि वेगळं वाटत होत . पण ह्या सगळ्या  घडामोडीत त्याला घरची आठवण आली आणि त्याने फोन केला काल काही झालंय का ? हे त्याला जाणून घायचा होत .

"हॅलो ,आई कशी आहेस ?"-नील 

"मी ठीक आहे .तू कसा आहेस ? "-आई 

"आई मी छान आहे .घरी सगळे ठीक आहे ना ...काल कस्तुरीशी बोललो पण ती नेहमीसारखी नाही वाटली ."-नील 

"अरे दोन तीन दिवस आधी कस्तुरी साठी एक स्थळ आलं होत पण तिने ते नाकारलं ...त्यावरून  तिच्या आई मध्ये  आणि तिच्यामध्ये थोडासा वाद झाला ..एवढंच बाकी काही नाही .."-आई 

"ओह ,अच्छा ...काय घाई आहे आई ..ती शिकते ना अजून म्हणून नाही म्हणाली असेल .."-नील 

"अरे असं नसत ,काही गोष्टी वेळेतच व्हायला हव्यात ना ...तू बोलून बघ एकदा तिच्याशी ..तुझ्याशी बोलेल ती ...का नाही म्हणते ते तर समजेल .."आई 

"ठीक आहे आई आल्यावर बोलेन .. बाकी सगळं ठीक ना ....ठेवू फोन आता .."-नील 

"अरे हो तुला शनिवारी निशाच्या लग्नाला जायचं आहे माहित आहे ना ....आणि थांब आजीला बोलायचं आहे तुझ्याशी .."-आई 

"अरे नील ,निशाच्या लग्नाला जाताना काही तरी सोन्याचं घेऊन जा हो द्यायला ..तस जाऊ नको .."-सुमन आज्जी 

"हो आजी पण अग सोन्याचं काही द्ययच काय गरज आहे ...."-नील 

"हे बघ नील ,आपण जेव्हा एखाद्याला काही देतो ते आपली त्याला आठवण राहावी म्हणून ..आपल्या आशिर्वादाचं एक स्वरूप असते ते ..   पद्धत आहे तशी आपल्याकडे ..आणि जेव्हा आपण एखाद्याला काही चांगल  देऊ शकतो तर का नाही द्यायचं ..?"-आज्जी 

"बरं ,कळलं मी घेऊन जाईन ..ठेवू आता फोन ..-नील ..सगळं फोन आटोपून नील आपल्याच विचारातच झोपी जातो .

नील एका मोठ्या कुटुंबातून आलेला असतो .त्याच्या घरी त्याचे आई बाबा ,आज्जी काका -काकू , काकांच्या दोन मुली  अस परिवार असतो .गावातच आत्या पण असते .त्यांचं घर मोठं घर असता .त्याचे चुलत दोन काका आणि त्यांची मुलंसगळे तिथेच असतात .नील हा एका मोठ्या आणि सधन परिवारातून आलेला असतो .दुसऱ्यादिवशी रोजच्याप्रमाणे नील ऑफिसला जातो .प्रिया आणि तिचे सहकारी कामाची सुरवात करण्यासाठी म्हणून आणि त्याआधी काही पूर्वतयारी म्हणून तिथे आलेले असतात . पूजा आणि वासू हे त्यांना मदत करत असतात .नील प्रिया ला बोलावतो ,

"मी आत येऊ का सर ,?"-प्रिया 

"हो हो या ना बसा.. तुम्ही लगेचच कमल सुरवात कराल असं वाटलं नव्हता ..?"-नील 

"सर,माझ काम माझी आवड आहे ..आणि म्हणून मी त्यापासून जास्त लांब नाही राहू शकत . आम्हाला चान्स दिल्याबद्दल धन्यवाद ...."-प्रिया 

"तुम्ही स्वतःला prove केलंय ,त्यामुळे हे काम तुम्हाला मिळालंय, तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज लागली किंवा काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला सांगू शकता ...शिवाय पूजाची आणि तुमची ओळख तर झालीच आहे .."-नील . सगळं बोलून झाल्यावर प्रिया निघते .

सगळं काम आटोपून नील घरी जातो आणि दुसऱ्या दिवशीच्या लग्नाची तयारी करतो .....इकडे रवी आणि किरण हि घरी आलेले  असतात ..विनय चा पण  चांगलाच जम बसलेला असतो . 

"काय रे कसली तयारी ..."-किरण 

"अग उद्या लग्न  नाही का निशाच ...तिकडेच जायचं आहे ..अरे हो मला आधी ज्वेल्लर कडे जायचं आहे .."-नील 

"अरे पण आत्ता,दुसरा काही तरी दे ना ."-रवी 

"नाही रे ,आजी ने सांगितलंय सो तेच द्यावं लागेल सो जाऊन येतो लवकर .."-असं म्हणत नील बाहेर पडतो .

ज्या दुकानात नील जातो तिथे वेगवेगळी डिझाइन्स बघत असतो पण  त्याला नेमकं काय घ्यावा ते कळत नाही ,त्याला बांगड्या खूप आवडतात ... तो विचार करत असतो तितक्यात त्याला तेथे प्रिया दिसते ....

( yoga योग ने प्रिया हि तिथेच आलेली असते ...नील प्रियाशी बोलेल का ?प्रिया त्याची मदत करेल का ? पाहूया पुढच्या भागात )

🎭 Series Post

View all