उत्सव नात्यांचा 9

priya And Neel get engaged ....

https://www.irablogging.com/blog/utsav-natyancha-8

प्रियाच्या पप्पानी नील ला लग्न आधी हे पेपर्स वर साह्य मागितल्या ..नील विचार करू लागला ,"असं कस करू शकता तुम्ही ?तुमच्या मुलीचं लग्न आहे हे ... ह्याच काय  अर्थ आहे ?"-

"हो मला माहित आहे ,आणि म्हणूनच मी हे पेपर्स आणले आहे .उद्या काही बिनसलं तर कोण बघेल ..तिने आयुष्यभर दुखी राहावं असं मला नाही वाटत ...त्यामुले जर तुला हे लग्न करायचे असेल तर सह्या  कर ..हीच माझी अटआहे ."-शिरीष राव 

प्रियाच्या पप्पानी पूर्व मॅरिटल अग्रीमेंट चे पेपर्स सह्या करण्यासाठी आणले होते ..."आजकाल बरीच लोक असं करतात .म्हणजे जर लग्नानंतर प्रिया तुझ्या  सोबत अड्जस्ट नाही करू शकली आणि तिला जर डिवोर्स हवा असेल तर ती ते घेऊ शकेल  आणि तुला हि त्यावेळी तिला डिवोर्स द्यावाच लागेल .."-शिरीष राव 

"तुम्हाला जर माझ्यावर किंवा माझ्या प्रेमावर विश्वास नाही तर तुम्ही लग्नाला होकार का दिला ?"-नील 

"विश्वास वेगळा आहे आणि खरी गोष्ट वेगळी आहे ...आजकाल कोणाचाही भरवसा नाही ..ज्याला तुम्ही प्रेम म्हणताय ते किती दिवस टिकेल ह्याची काहीच शास्वती नाही .... मी एक  यशस्वी   bussiness  मन आहे . प्रत्येक  गोष्टीत यश आणि फायदा बघण्याची सवय आहे मला .सो ,हे लग्न करायचं असेल तर हि अट मान्य करावयाची लागेल .."-शिरीष राव 

"तुम्हाला असे वाटते का कि ,आमचं लग्न यशस्वी  नाही होणार .?"-नील 

"कधीही काहीही होऊ शकता ..तू जरी तिला खुश ठेवलास तरी काहीही दुसरे प्रॉब्लेम येऊच शकतात ...मला काळजी घ्यायलाच हवी .माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ..."-शिरीष राव 

"म्हणजे तुम्हाला नात्यांपेक्षा ह्या कागदांवर जास्त भरवसा आहे ."-नील 

"ह्या जगात आता शब्दांपेक्षा कागदावर विश्वास ठेवावाच लागतो ,सगळे तेच करतात ..जर तू आणि प्रिया खुश असाल तर ह्या कागदांचा तसाही काहीच उपयोग राहणार नाही ....तुला तुझ्या प्रेमावर इतकाच विश्वास आहे तर मग सह्या करायला का घाबरतोस  ?"-शिरीष राव

"ठीक आहे मी सह्या करतो .पण मला पण एक वचन हवं आहे . मी शब्दांवर विश्वास ठेवतो त्यामुळे माझि हि  एक अट किंवा असं म्हणा कि एक वचन हवं आहे तुमच्याकडून .."-नील 

"कोणते वचन ?"-शिरीष राव 

"जेव्हा पण लग्नात मुलीच्या पित्याचे कार्य  असेल , तेव्हा तेव्हा तुम्हाला त्या त्या कार्याला हजर रहावे लागेल . जे काम तुमचे  म्हणून असेल ते सगळे तुम्हालाच करावे लागेल . जेव्हा जेव्हा वधू पित्याचे कर्तव्य किंवा परंपरेनुसार विधी असतील ते सगळे तुम्हाला करावे लागतील त्याला वेळ द्यावाच लागेल . लग्न इकडे माझ्या या घरी होईल .. लग्नात गरज  असणाऱ्या कोणत्या हि गोष्टीला  आणि विधीला तुम्ही नाही म्हणणार नाही ."नील .

"माझ्या मुलीचं  च  लग्न आहे तर मी नसेन का त्यात ? ठीक आहे तू जेव्हा जेव्हा म्हणशील आणि जिथे जिथे म्हणशील मीउपस्थित राहीन . तू  हवं ते काम सांग मी करेन आणि हो हि गोष्ट फक्त आपल्यातच राहील .."-शिरीष राव 

नील पेपर्स वर सह्या करतो आणि शिरीष राव पण वचन देतात . दोघेही बाहेर येतात ..

"काय झालं नील ?काही प्रॉब्लेम आहे का ?'- नील चे काका 

"नाही काका ,त्यानं काही गोष्टी क्लिअर हव्या होत्या त्या केल्या .."-नील 

"मग आता तर काही हरकत नाही ना ..?"-नील चे पप्पा 

"नाही ..सगळं ठीक आहे ..आपण लवकरच मुहूर्त बघून हे लग्न करू .."-शिरीष राव 

"मला एक बोलायचं होत , तुम्ही मुलीवाले आहात  जिथे तुम्ही म्हणाल तिथे आम्ही लग्नाला येऊ शकतो ,पण मला माझ्या नातवाचे लग्न माझ्या डोळ्यासमोर इथे ह्याच घरात करण्याची इच्छा आहे ..जर तुमची हरकत नसेल तर .."-आज्जी 

"हो ठीक आहे .लांब आहे आम्हाला  पण ठीक आहे चालेल मला ..नील ने  आधीच सांगितले ह्याबद्दल .."- शिरीष राव 

सगळं काही ठरलं .प्रिया आणि तिचे घरचे जेवण ते उरकून परत निघाले ...नील च्या आई ने त्यांची ओटी भरली ...सगळे खूप खुशीत होते .

नील आणि प्रिया  ची आंखो आँखो में बात चालूच होती ... सगळं आटोपून प्रिया आणि तिच परिवार घरी परतले .

दुसऱ्यादिवशी सगळे मज्जा मस्ती करत होते ..आज्जी च काम चालूच होत .इकडे कस्तुरीचा मन दुखावलं होत .पण ती ते दाखवून देत नव्हती . नील चे पप्पा बाहेरून येतात .

"काय मग काय ठरवलं लग्नाबद्दल ?कास करायचं ? ..."-आज्जी त्यांच्या मुलाला (भारत कुमार ला )

"त्यात काय ठरवायचं आई ...आजकाल सगळं होऊन जात ..आता पूर्वीसारखा नाही राहील ....एक इव्हेंट असल्यासारखा असत होऊन जात आपोआप .."-पप्पा 

"ते काही नाही ..मला तसलं नको ..लग्न हे लग्नासारखाच असाल पाहिजे ..ढोल ,ताशा ,सनई ...फुलांचे मंडप ...जेवणाच्या पंक्ती ....असं सगळं असायला  हवं  .लग्न हे एक असं कार्य आहे कि ज्यामुळे लोक जोडली जातात . लांब असणारे  नातेवाईक भेटतात ... विधिवत सगळं व्हायला हवं ..परंपरेनुसार ..."-आज्जी 

"अग  आई ,आता सगळं बदल ल  आहे ..  "-काका 

"हे बघ ,दिवस बदलले तरी परंपरा नाही बदलत ...काही कारणं असतात त्यामागे ..हेच बघा ना ,लग्नात काय तर उभं राहून जेवायचं असत प्रत्येक काउंटर च्या समोर ..हा काय आहे ?घरी काय जेवायला मिळत नाही का कि जे दुसऱ्यांसमोर हाथ पसरून  खायला मागतो ते ....आधी कशा पंक्ती बसायच्या ...आग्रहाने जेवण वाढलं जायचं ...खाणाऱ्याच आणि खाऊ घालणाऱ्याच मन तृप्त व्हायचं ...आधीची हि पद्धत चांगली होती हे मानता ना तुम्ही ...."-आज्जी 

"ठीक आहे आई ,तू म्हणशील तसच होईल हे लग्न .."-पप्पा 

............................................................................................................................................................................................इकडे  प्रियाच्या  घरी प्रिया आणि तिची बहीण लॉन  मध्ये बसलेले असतात .."मला तुला काही सांगायचं आहे तुझी हरकत नसेल तर ?"-आरती .

"बोल ना ,काय झालं ?"-प्रिया 

"तू नील शी लग्न करू नये असं मला वाटत ..तो तुझ्या योग्यतेचा नाही .. त्यांचं राहणीमान आणि आपलं राहणी मन खूप वेगळं आहे.तू तिथे अड्जस्ट नाही होऊ शकणार .."-आरती 

"जिथे प्रेम असत तिथे सगळं अड्जस्ट करता येत ...मी करेन सगळं अड्जस्ट ."-प्रिया 

इकडे शिरीष राव आणि प्रिया ची आई नाश्ता करत असतात .."मला नील चे घरचे खूप आवडले ...आज हि ते सगळे एकत्र राहतात . किती आनंदी आणि छान कुटुंब आहे .."-प्रिया  ची आई  .तेवढयात भारतकुमार फोन करतात .

"हॅलो मी भरत बोलतोय ,आमच्या पंडितजींना विचारून आम्ही एंगेजमेंट साठी एक मुहूर्त ठरवलं आहे .३ दिवसांनी चांगला दिवस आहे .पौर्णिमा आहे .."-भारत कुमार 

"असं कस ठरवू शकता तुम्ही ? माझ्या वेळेची काही किंमत आहे कि नाही ? माझं वेळापत्रक मला बघावं लागेल ..मग सांगतो फोन करून "-शिरीष राव थोडासा वैतागून म्हणाले .

थोड्यावेळाने ते भारत कुमार ला फोन करतात आणि म्हणता कि ,"ठीक आहे आपण त्या दिवशी  ४ नंतर  करू कार्यक्रम ."-शिरीष राव .

साखरपुड्याची तयारी सुरु असते ...आणि  साखर पुड्याचा दिवस उजाडतो .साखरपुड्यात  नील आणि त्याचे घरचे प्रिया च्या घरी येतात ..

गाडी तुन सगळे उतरतात .दरवाजावर प्रिया ची आई त्यांचं स्वागत करते ..

"या या ...तुमचं स्वागत आहे .."-प्रिया ची आई (जयश्री )

"हो ,पण शिरीष जी कुठे आहेत ?दिसत नाही .."-काका 

"ते येतीलच इतक्यात ,आज जरा urgent  काम आलं म्हणून त्यानं जावं लागला ..पण तुम्ही या ना .."-जयश्री .सगळ्यांना थोडं वाईट वाटतं पण ते हसून आत प्रवेश करतात ..प्रिया च घर बघून हरकून जातात . मोठा प्रशस्त हॉल असतो ....तिथे एक side  ने  जिना असतो वर जाण्या - येण्यासाठी .सगळी कडे फुलांच्या माळा नि  घर  सजवलेले असते ..एक पंडित खाली बसून पूजे ची तयारी करत असतो .मोठे मोठे झुंबर असतात ,पैंटिंग्स असतात ....सगळे बघतच असतात . प्रिया तयार होत असते .... सगळे जण बसतात .काही विधी होत असतात .प्रिया चे पप्पा येतात ..नमस्कार करतात आणि पंडितजींना म्हणतात कि, "सांगा ,काय करायचे आहे ..पण लवकर आटोप माझी एक मीटिंग आहे .."-

"हे बघा ,असं होत नाही ..सगळं काही मुहूर्तावरच होईल .साखरपुढा म्हणजे अर्ध लग्न असतं आणि तुम्हालाही त्यासाठी कपडे बदलावे लागतील ..धोतर टोपी,सदरा घालून या .."-पंडितजी 

"काय ..काही हि काय ?आज काल हे सगळं फास्ट झालाय ..आणि ह्या कपड्यात काय वाईट आहे ?"-शिरीष राव असं बोलत असतात तेवढ्यात त्यांना नील ला दिलेलं वचन आठवत ...आणि ते ठीक आहे असं म्हणून तयार होऊन येतात ..नंतर प्रिया हि तयार होऊन येते .

सोनेरी किनार असलेली साडी त्यावर कंबर पट्टा,हातात बांगड्या ,,पायात छुनछुन करणारे पैंजण ,गळ्यात मोठा हार , डोळ्यात काजळ ,माथ्यावर बिंदी ,केसात मळलेले गजरे  सगळं अगदीच शोभून दिसत होत ...तिच्यावरून नील ची नजर हटतच  नव्हती . एक दम   एखाद्या अप्सरे सारखी दिसत होती प्रिया .   नील आणि प्रिया समोर- समोर बसतात  ..गुरुजींनी विधी सुरु केले असतात  . शगूनच्या थाळीचे आदण प्रदान होते   .  दोन्ही कडच्यांची देवाण घेवान  होते   ...प्रिया ला नेकलेस ,बांगड्या अशी मौल्यवान दागिने देण्यात आले .नील आणि प्रिया दोघांनी एकमेकांना अंगठी घातली .... आणि साखरपुडा झाला .

"गुरुजी , आता एक छान स मुहूर्त सांगा लग्नासाठी .."-भारत कुमार 

"पुढच्या महिन्यात १५ तारखेला खूप चांगला मुहूर्त आहे ..त्या नंतर असा मुहूर्त परत येणार नाही ..."-गुरुजी 

"काय ,पण खूप कमी दिवस आहेत तयारीला ...१५ - २०  दिवस फक्त .."-भारत कुमार 

"मला हे ठीक आहे ...तसं हि  सगळं काही होऊन जात काही करावं लागत नाही आज काल...लग्नाच्या एक दिवस आधी जाऊ आपण ..चालेल ना जयश्री .."-शिरीष राव 

"नाही ,असं नाही चालणार ...एक दिवस आधी कस चालेल ..किती तरी पद्धती असतात ......त्यामुळे तुम्हाला थोडं लवकर यावं लागेल  "-आज्जी . 

आज्जी नि सगळ्या पद्धती सांगितल्या ..आणि शिरीष राव ना  त्या मान्यच कराव्या लागल्या ...शेवटी नील ने वचन घेतलं होत त्यांच्याकडून ...

(हि कथा काल्पनिक आहे ..ह्या कथे मध्ये नव्या गोष्टींचा विरोध नाहीये पण जुन्या काही चालीरितींचा आढावा आहे ..का आणि कश्या पद्धती असा य च्या हे लिहण्याचा प्रयत्न आहे ....काही लोकांना पैसे च सर्वस्व वाटतो पण पैस्या पेक्षाही लोकं किती महत्वाची असतात हे दाखवण्याचा प्रयत्न आहे ....तुमची प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे ...त्यामुळे कळत कि ,आपण जे लिहतोय ते वाचकांना आवडतंय कि नाही ,,त्या नुसार थोडेफार बदल कुठे मध्ये करता येतात ...तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघेन ...नक्की कळवा..आणि पुढचे भाग वाचत राहा ..धन्यवाद )