उतारवय(भाग 2)
( माघील भागात आपण पाहिले की आज तो दिवस होता ज्यादिवशी काका खुप उदास होते )
आता पुढे ..........
खुप शांत वाटत होते मला, घामाने पूर्ण अंघोळ कधी घातली याचे भान च राहिले नाही.पाय देखील खुप जड झाले होते
खुप वेळ पासून तसाच बसून होतो एका जागेवर त्यामुळे वाटत असेल असे मनाला समजावून
मनाला व शरीराला थोडे फ्रेश करावं म्हणून गाडीतून उतरून दोन पाऊले चालून जवळच असलेल्या रसाच्या दुकानावर गेलो, दुकान छान व स्वच्छ होते व ते बघूनच मी आत शिरलो
काका थोडे पाणी मिळेल का?
चेहरा धुण्यासाठी असे मी त्या रसवाल्या काका म्हणालो
ते काका हा शब्द ऐकून फक्त बघत राहिले, एकतर त्यांना अपेक्षित काही वेगळं असेल किंवा वेगळं वाटलं असेल असो पण ,
अर्थात ही आमच्या बाबा ची शिकवण कुठेही, कधीही बाहेर गेलो मग फाईव्हस्टार हॉटेल असो की चौकातील चहावाला,
ये, शुक शुक, अरे हे , हे हॅलो
असे असंस्कारी आवाज द्यायचे नाहीत.
'माणसाला माणसाप्रमाणे काका,मामा,दादा,मावशी अशी हाक मारायची.
कारण आपल्या वागण्या बोलण्यातून आपल्या आई वडिलांचे संस्कार दिसतात असे बाबा म्हणायचे.
त्यामुळे मी सवयीप्रमाणे पुन्हा हाक मारली काका पाणी देता ना ?
माझ्या कापड्याकडे व गाडीकडे त्यांनी नजर टाकली व म्हणाले
साहेब रांजनातील हाय चालेल का ?
बाटली नाय आमच्याकडे
मी हसत होकारार्थी मान हलवली
व ओरडून म्हणालो काका रांजनातील च पाणी बाटलीत ओततात फक्त तो प्लास्टिक चा असतो ,
आणि पुन्हा हसू लागलो,
काकांनी मुलाला पाणी द्यायला सांगितले.
'पाण्याचा मग दोन वेळा धून घे असे देखील बजावले.
मन सुखावून गेलं किती भाबडी असतात ओ गावाकडची मानस
माया, प्रेम, आपुलकी,जिव्हाळा कसा लावायचा यांच्या कडून शिकावं,
आज पुन्हा एकदा हृदय जिंकले होते या मातीने
चेहऱ्यावरून पाणी मारून आता मस्त वाटत होतं.
मी समोर बाकावर जाऊन बसलो.
एखाद्या आर्किटेक्ट ला ही लाजवेल असे दुकान होतं.
झाडे अशी लावली होती की बरोबर त्या पूर्ण छतावर सावली पडेल,
तो रांजण ठेवण्यासाठी बनवलेली जागा, त्या लाकडाच्या केलेल्या खुर्च्या, थंड वाटावं म्हणून जमिनीवर सतत केला जाणारा तो पाण्याचा शिडकाव आणि त्यातून सुटलेला त्या मातीचा गंध मनाला वेगळीच मोहिनी घालीत होता.
प्रत्येक वस्तू त्यांचीच व वापर ही सुरेख,
खुप छान वाटलं मनाला थंडगार रस पोटात गेला.मी प्रत्येक घोटाबरोबर ते निसर्ग सौंदर्य ही पोटात टाकत होतो नजरेच्या रूपाने आणि पुन्हा रमलो मी आठवणीत
सुरवात पुन्हा थेतूनच बाळ तू कधीच आई वडिलांना सोडून परदेशात जाऊ नकोस
त्या दिवशी काका चा वाढदिवस होता.
आम्हाला माहीत होतं म्हणून आम्ही च हट्ट केला बाबाकडे आश्रमात जाण्याचा.
आम्ही म्हणजे मी व माझी लहान बहीण अनघा.
मस्त नवीन कपडे घालून तयार होऊन आश्रमात आलो.
सजावटीसाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन आलो, वेगवेगळ्या रंगाचे फुगे, माळा, उडवायला चमकी, व खास करून प्रत्येकासाठी प्राण्यांच्या वेगवेगळ्या रंगाची व आकाराची टोपी व काकासाठी शिहांची,
टोपी बघून काका इतके खुश झाले की जंगलाचा राजा हे करा सांगतोय,
जंगलाचा राजा ते करा सांगतोय,
व कुणी कामात कुचराई केली तर त्याला कडक शासन केले जाईल.
असे खास त्यांच्या लकबीमध्ये सांगत फिरत होते.
खुप खुश होते त्या दिवशी काका अगदी लहान बाळाप्रमाणे हट्ट करताना मी त्यांना पहिल्यांदा बघितले.
पुन्हां पुन्हां येऊन मला विचारायचे केक कधी कापायचा मला खायचा आहे मी खाऊन बघू का कसा आहे
मला हात लावू द्या ना एकदा
बघून खुप हसायला यायचे,
पण काका न हसता बरोबर निशाणा साधायचे समोरच्याच्या मनाचा
व बाकीचे पण त्यांना साथ द्यायचे,
कुणी टोपी साठी भांडत होते तर कुणी केक साठी तर कुणी समोर उभे राहण्यासाठी
असे करत करत सगळे हॉल मध्ये जमा झाले जेथे वाढदिवस साजरा होणार होता .
सगळे आजी आजोबा नवीन कपडे घालून तयार झाले कुणी तर त्यांचे ठेवणीतले खास, जॅकेट, टोपी, गॉगल, टाय,तर कुणी शर्ट,
ऐकून हसू आले ना,
मग विचार करा मला बघून किती आले असेल.
त्यात राजमाने काका एक होते,
डबल एक्सल झालेल्या शरीरावर त्यांनी स्मॉल साईज चा शर्ट चढवला होता,
त्या शर्ट मधून डोकावणारी ढेरी जणू सांगत होती की काका आता बास
क्षेत्रफळ खुप झाले जरा आवरते घ्या,
न राहवून मी काका ना विचारलेच की,
काका हा शर्ट थोडा कमी पडतो तुम्हांला तर का घालता,
मी असाच याच रंगाचा नवीन शर्ट घेऊन येईल तुम्हांला पण हा काढून टाका आता च्या आता.
काका चा चेहरा पडला त्यांनी माझ्याकडे पाहिले व म्हणाले
लेकरा काही भावना असतात त्यांना शब्दाची गरज नसते, त्या फक्त जाणवतात कधी स्पर्शात, कधी स्वासात, कधी स्वप्नात, तर कधी आठवणीत,
असे बोलून डोळ्यातील पाणी पुसत मागे जाऊन उभे राहिले,
मग माझे मीच समजून घेतलं प्रेमाचे मॅटर दिसतंय,
आणि समोर टोपीवाला काका जवळ जाऊन उभे राहिलो
मनात अजूनही राजमाने काका चे शब्द पिंगा घालत होते
खरच किती निःस्वार्थी भावना असते ना प्रेम म्हणजे, जगतो आपण, स्वास आपला हृदय ही आपलेच ,
पण त्यात राहतो मात्र दुसरा,
ज्यातील काहींना जाणीव असते व काही मात्र अनभिज्ञ.
विचारात गुंतलेलो असताना मी भानावर आलो ते गाणे ऐकून
देशमुख आजोबा
मेरी प्यारी बिंदू
...............................
असे गाणे नाचून म्हणत होते व बाकीचे त्यांना जबरदस्त साथ देत होते
खुप छान वाटत होते सगळे मग्न झाले होते
तेवढ्यात टोपीवाले काका ओरडून म्हणाले जो माझ्यासाठी गाणे, कविता, डायलॉग, किंवा डान्स यातील काहीच सादर करणार नाही त्यांना मी केक देणार नाही.
एकच गर्दी पडली केक जवळ
अगोदर मी,
अगोदर मी,
नाही
तू मागाच्यावेळी पहिला होता,
आता मी
नाही
आता मी
तू पुढच्यावेळी हो पहिला
फक्त मजा च मजा होती सगळी
तेवढ्याच कुणीतरी म्हणाले एक काम करू भांडू नका.
सुरवात आजच्या अन्नदात्याकडून करू व सगळे आई बाबा कडे पाहू लागले तशी आई लाजून माघे झाली
अर्थात माझी आई खुप कालागुणी पण कधी वेळच मिळाला नाही तिला स्वतः साठी
तेवढ्यात बाबा नि सुरवात केली
जब हम जवा होगे
जाणे कहा होंगे
................
...............
वहापर याद करेंगे
मग काय आई ने पण केले चालू कारण मी कशी कमी नाही हे दाखवून देणार नाही मग ती बायको कसली,
कळेल का आज काका च्या मनातील दुःख
जाणून घेण्यासाठी सोबत राहा
क्रमशः ............
..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा