उतारवय (भाग 1)

Social

नमस्कार पुन्हा आलेय तुमच्या भेटीला एका नव्या वळणावर 


  उतारवय (भाग 1)

आज मनाची खुपच चलबिचल होत होती.
कितीही प्रयत्न केला तरी मन थाऱ्यावर येत नव्हते.
काय होतंय काहीच कळेना, 
ना कामात लक्ष ना कशात.
सैरभैर झालं होतं फक्त जणू कशाची तरी ओढ लागली होती पण कशाची ते कळत नव्हतं.
वाटलं घ्यावं एकदा मनाला स्वतःच्या कोर्टात व विचारावं 
'की बाबा रे काय झालंय तुला नेमकं ते तरी सांग ,
पण पटकन उत्तर देईल ते माझे मन कसले 
ते आपले अबोल, निरागस, नितळ व फक्त  शांत .
मग मीच ठरवलं चला आपणच पुढाकार घेऊ व आपल्या अबोल मनाला बोलत करू त्याच्या आवडीच्या ठिकाणी नेऊन.

तशी आवडीची ठिकाणे खुप आहेत, जिथे जवळची माणसे सोबत असतात ते प्रत्येक ठिकाणी आवडीचे तर असते, 
हो ना?
                          
आवडीचे ठिकाण म्हणलं नाही 
तोच आपोआप पाऊले वृद्धाश्रमाकडे वळली.
नवल वाटले ना ऐकून 'वृद्धाश्रम, 
पण ते आहेच माझ्या जवळचे ठिकाण खुप जवळचे, 
लहानापासून बाबा नि एकच शिकवले आपल्या घासातील घास दुसऱ्याला द्यायचा.
एक पोळी असेल तर अर्धी द्या,
अर्धी असेल तर चतकोर,
चतकोर असेल तर त्यातील तुकडा दे,
व तुकडा असेल तर तो देखील अर्धा करून घे, 

कारण दिल्याने वाढते 
तर संपवल्याने कमी होते 
मग ते प्रेम असो की माणुसकी, 

हीच बाबा ची शिकवण.
त्यामुळे कुठलाही कार्यक्रम असो आमचे ठरलेलं असायचं, 
कधी अनाथाश्रम , कधी वृद्धाश्रम, तर कधी मूकबधिर मुलाची शाळा.

बाबा चा आग्रह असायचा की जो काही खर्च करायचा तो या लोकांसाठी करायचे व त्यातच आनंद मानायचा.

त्यामुळे बाबा नि लावलेली ही सवय आम्ही भावंडे आजही पाळतो.
जस जसा वृद्धाश्रम जवळ येत होता.मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
तसा मी नेहमीच येतो पण सद्या परदेशात वास्तव्य असल्यामुळे पूर्ण एक वर्षानंतर येत होतो.
विचाराच्या तंद्रीत अडकलेलो असताना अचानक काही शब्द कानावर आले, म्हणजे मी मनातल्या मनात आठवले ते शब्द व अंगावर शहारे आले खुप अस्वस्थ वाटू लागले.गाडीचा वेगही मला आता कमी वाटू लागला.वाऱ्याच्या वेगाने विचार मनात येत होते व त्या शब्दांनी मला अपराधी वाटत होतं.
काय होती ती शब्द तर ,
 बाळ तू कधी आई वडिलांना सोडून परदेशात जाऊ नकोस.

कोणाची होती ती शब्द,
 मला का आठवताय?
माझा संबध काय?
 मला अपराधी का वाटतंय?
 अस काय केलय मी ?
व माझे अश्रू का वाहताय ?
असे एक ना अनेक प्रश्न मनाचा गुंता अजून वाढवत होती

मी मात्र माझ्याच विचारात गुरफटून गेलो होतो.
डोक्यात मुंग्या येऊ लागल्या काही सुचेना शेवटी गाडी रस्त्याच्या कडेला करून थोडा वेळ शांत राहवेसे वाटले.
मन घट्ट करून स्टेरिंग वर डोकं ठेऊन डोळे बंद करून पडलो तर अचानक लक्षात आले
अरे आठवले कोण बोलले होते,
 का बोलले होते,
 मनाला विलक्षण आनंद झाला. 
जसे की जग जिंकले होते,पण पुढच्या क्षणी मन पुन्हां हिरमुसले

कारण घडलेली घटना आठवली आणि डोळ्यासमोर त्यांचे शब्द नाचू लागले. कानात आवाज घुमू लागला ,
हृदयात पिळवटून टाकणारा तो स्वर मनाला खिंडार पाडून आत शिरत होता.
हो रघुनाथ देसाई त्यांचे नाव.
टोप्याची भारी आवड त्यांना त्यामुळे ते टोपीवाले काका म्हणूनच ओळखले जायचे.
 जे त्यांना ओळखतात ते सांगायचे काका जेव्हा आश्रमात आले होते तेव्हा फक्त टोप्याच होत्या त्यांच्या सोबत.
व त्याही खुप ,
वेगवेगल्या रंगाच्या, आकाराच्या, एखादी सशाच्या कानाची तर दुसरी विदूषकाची, एक लांब गोड्याची तर दुसरी लगेच जुन्या चित्रपटातील नायका प्रमाणे, 
काका जशी टोपी घालायचे त्यासोबतच त्या व्यक्ती च्या भूमिकेत पण शिरायचे व तेही अगदी सहज.
जर कुणाचा वाढदिवस असेल तर काका आवर्जून ती विषुशकाची ची टोपी घालून सगळ्यांना हसवायचे, 
ती लाल टोपी अजूनही आठवते जी घालून काका माझ्या वाढदिवसाला गाणे म्हणाले होते ते पण नाचून आणि सोबत सर्व आजी आजोबांना पण नाचवले, सगळे खुप हसले व नकळत मी पुटपुटूलागलो 
मेरा जुता है जपानी 
....................

सर पे लाल टोपी ....
......................

डोळ्यातून अश्रू ओघळू लागले शब्द पण फुटेना, मनाला सावरले व पुन्हां विचारात गुंतलो 
टोपीवाले काका ,
एक निवृत्त शासकीय कर्मचारी, उंच, राजबिंड शरीर, तो लांबट चेहरा, त्या चेहऱ्यावरील पिळदार मिश्या त्यांना शोभून दिसत होत्या, ते देखील त्यांना हौसेने मिरवत होते 
नेहमी हसतमुख, कुणी हिरमुसलेले दिसले की आलीच स्वारी त्यांना हसवायला सगळ्यांना हसवायचा जणू त्यांनी ठेका च  घेतला होता 
कुठेही, काहीही असो काका मुहूर्तावर असणारच त्यांच्या शिवाय जणू आश्रमाचे पान हलत नव्हते.
सर्वांच्या तोंडावर फक्त काका चे नाव 
पण सर्वाना खुश ठेवणारे काका मी कधीच हळवे झालेले पाहिले नाही 
फक्त एक दिवस सोडला तर 
हो हा तोच दिवस होता जेव्हा काका मला म्हणाले होते 
'बाळ तू कधीच आई वडिलांना सोडून  परदेशात जाऊ नकोस????

का असेल काका ना इतकी परदेशाची भीती 
असतील काका च्या काही आठवणी की मनाचे खेळ 
जाणून घेण्यासाठी सोबत राहा 
मला फॉलो करा 
आवडल्यास लाईक व कमेन्ट नक्की करा 

धन्यवाद

🎭 Series Post

View all