"ऑफकोर्स राजला जॉईन व्हायचे असेल तर तो होऊ शकतो."
पण मला नको वाटलं आणि मी म्हणालो राजला,
"मला जरा काम आहे घरी. नंतर कधीतरी." मी घरी निघून आलो आणि तुम्ही दोघं कॉफी प्यायला गेलात."
"मला अजूनही आठवत आहे, त्या दिवशी तू संध्याकाळी सात वाजले तरीही घरी आली नाही म्हणून तुझे बाबा आमच्या घरी बघायला आले.
"अरे राज तू एकटा घरी आलास आणि रोमा कुठे आहे?"
"काका ती जरा फ्रेंडसोबत बाहेर गेली. आली नाही का अजून घरी?"
ते चिडून बोलले,.."आली असती तर विचारलं असतं का?"
मग आईने सुद्धा बोलायला सुरुवात केली, "खरचं हे काय राज?.... रोमा तुझी जबाबदारी आहे ना? मग तिला सोडून का आलास तू घरी?"
मग आईने सुद्धा बोलायला सुरुवात केली, "खरचं हे काय राज?.... रोमा तुझी जबाबदारी आहे ना? मग तिला सोडून का आलास तू घरी?"
मी म्हणालो,... "अग पण.... आई!"
काका घरी जायला निघाले आणि मी तरीही काकांना म्हणालो...
काका घरी जायला निघाले आणि मी तरीही काकांना म्हणालो...
"काका, रोमा आली की पाठवा इकडे."
"हो नक्की"...म्हणून काका निघून गेले.
"हो राज मी घरी आले. हातातली बॅग फेकत बाबांना बोलले,..."बाबा, मी खूपच थकले आज, तुम्हाला सांगते एक मुलगा आहे रोहित माझा न्यू फ्रेंड. खूप चांगला आहे तो."
त्यावर टिपिकल वडीलांसारखे तेही म्हणाले,..." हे बघ तू त्याला जरा लांबच ठेव. आजकालची मुलं काही चांगली नाहीत."त्यावर मी क्षणाचा विलंब न करता बोलले,...
"बाबा! लगेच नका सुरू होऊ तुम्ही."
"बाबा! लगेच नका सुरू होऊ तुम्ही."
माझं बोलणं पूर्ण होत नाही तोच...बाबा म्हणाले,..."चल जेवून घे आणि राजकडे जा त्याला काहीतरी काम आहे."
मी म्हणाले,...."नको उद्या भेटते मी त्याला. आता अभ्यास पण करायचा आहे. परीक्षा जवळ आली आहे."
दुसऱ्या दिवशी सकाळी तू दरवाजा वाजवला...
"रोमा,अगं ए रोमा! आज सुटी घेणार आहेस का?"
"रोमा,अगं ए रोमा! आज सुटी घेणार आहेस का?"
मी म्हणाली,"नाही रे..किती मोठ्याने ओरडतो आहेस. कान फाटले माझे, ये घरात. मी आवरते प्लिज तेवढा टिफीन भरतोस का जरा?"
मी म्हणलो ,...बापरे! एवढा मोठा टिफीन?
तर तू म्हणाली, "अरे रोहित साठी नेत आहे."
मी तुझी काळजी म्हणून बोललो,.."एक सांगू का रोमा, तू ना जरा लांबच रहा त्याच्यापासून. मला फारसा चांगला नाही वाटला तो मुलगा. तू त्यावर लगेच रिॲक्ट झालीस....राज,काही पण काय बोलतोस बिचारा अनाथ आहे तो."
"मी तुला समजावत होतो, अगं तस नाही पण....
तू मला बोलली, "अरे खरं सांगू का आपण चांगले असलो ना की आपल्याला सगळे चांगलेच दिसते."
तू मला बोलली, "अरे खरं सांगू का आपण चांगले असलो ना की आपल्याला सगळे चांगलेच दिसते."
तेव्हा मी बोललो,"रोमा टोमणे मारू नकोस हं!"
"नाही अरे.टोमणे नाहीत चुकीचं नको समजू मला.
आणि आपण कॉलेजला निघून गेलो."
आणि आपण कॉलेजला निघून गेलो."
"कॉलेजमध्ये रोहित तुझी वाट बघत उभा दिसला. तेव्हा मी लगेच म्हणालो," हे काय रोहित गेटजवळ उभा आहेस आज?"
रोहितचा मित्र म्हणाला,...हो अरे....रोमाची वाट बघतोय."
"अरे राज, माझा मित्र आणि मी जरा फिल्म बघायला जाणार आहोत. म्हणून म्हटलं रोमाला विचारावं. मी त्यावर काहीच बोललो नाही आणि मला लेक्चर अटेंड करायचे म्हणून मी निघून गेलो. रोहित ने मला थांबवायचा प्रयत्न केला पण मी नाही थांबलो."
रोमाला सगळं आठवत होतं,...
" तू गेल्यावर मी सुध्दा त्याला नकारच दिला. पण त्यानेही जायचे रद्द केले आणि चेहरा लटकवला. मग मला मात्र गिल्टी फील व्हायला लागले. मी त्याला सॉरी बोलून तू माझ्यासाठी नको रद्द करू असे बोलले पण त्याने माझे एक नाही एकले. शेवटी मला नाईलाजास्तव त्याच्या सोबत जायला लागले."
" तू गेल्यावर मी सुध्दा त्याला नकारच दिला. पण त्यानेही जायचे रद्द केले आणि चेहरा लटकवला. मग मला मात्र गिल्टी फील व्हायला लागले. मी त्याला सॉरी बोलून तू माझ्यासाठी नको रद्द करू असे बोलले पण त्याने माझे एक नाही एकले. शेवटी मला नाईलाजास्तव त्याच्या सोबत जायला लागले."
" हो... मला कळून चुकले की तुला रोहित आवडायला लागला होता. आणि रोहितला तू. मलाच काय पण सगळ्या कॉलेजला माहीत झालं."
"तुझी आणि रोहितची जवळीक वाढली. कॉलेजची शेवटची परीक्षा झाली. मी उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जायचं ठरवलं. तेव्हा मी तुला म्हणालो,..."रोमा अगं आता आपली भेट दोन वर्षांनंतर होईल."
"हो अरे खूप सवय झाली आहे तुझी ,मला तर आता करमणार नाही तुझ्यावाचून."
"अरे वा! मला सोडून म्हणे, तुझा तो आहे की रोहित."
"अरे वा! मला सोडून म्हणे, तुझा तो आहे की रोहित."
"राज अरे रोहित त्याच्या जागी आहे आणि तू तुझ्या जागी."
मी म्हटलं "बरं जाऊ दे आता आपण लहान नाही राहिलो भांडायला. पण रोमा तू एक गोष्ट नक्की लक्षात ठेव. काकांनी तुझ्यासाठी खूप केलंय. तू ते नेहमी लक्षात ठेव, त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देवू नको. तू मला म्हणाली...तू राज बद्दल बोलत आहेस ना? मी हो म्हटलं पण तुला ते काही आवडलं नाही.आणि तू मला त्याच स्पष्टीकरण देत राहिली की, तो तू समजतोस तसा नाही. तुला का राग आहे त्याच्या बद्दल. मी तुला बऱ्याच वेळी समजावलं की माझा राग नाही पण तू समजुन घे जरा."
"मी नेक्स्ट संडे जाणार होतो परदेशात. तू मला बेस्ट लक सुद्धा दिलं.मी तुला जेव्हा बोललो काळजी घे आणि जरा जपून. तेव्हा तू मला सागितलं की मी बाहेर गावी घेतली एडमिशन आणि तुझ्या सोबत रोहित असणार...म्हणजे तो नोकरी करणार मात्र बाहेरून परीक्षा देईल."
" राज... आठ दिवसांनी तू निघून गेलास. इकडे मी आणि रोहितने सुद्धा एडमिशन घेतली. दोघांच्या मध्ये प्रेमाचे वारे जोरात वाहायला सुरुवात झाली. दोघांनाही एकमेकांशिवाय करमेना झालं.एक दिवस मी
रोहितला बोलले,...
रोहितला बोलले,...
अरे असं आपण चोरून चोरून किती दिवस भेटायचं. बाबांना कधी माहीत झालं तर.त्यावर तो सहजच बोलून गेला की, होऊ देना माहीत, कळू दे की त्यांना. आपण कुठे पळून चाललोय. कॉलेज झाले की लग्न करू. पण माझ्या मनात काही दुसरचं चालू होतं...मला बाबांना सांगायचं होतं. कारण त्यांनी नकार दिला तर? तसा त्यांना माझ्या आनंदात आनंद होता. तेव्हा मला तुझी प्रकर्षाने उणीव भासली.कारण तू असता तर माझं एका चुटकित काम झालं असतं.माझं हे बोलणं त्याला खटकलं आणि तो म्हणाला मला,
" बहोत गहरा रिश्ता लगता है!...काय नाव आहे गं ह्या तुमच्या नात्याचं?"
" बहोत गहरा रिश्ता लगता है!...काय नाव आहे गं ह्या तुमच्या नात्याचं?"
" मला त्याचं बोलणं अजिबात आवडलं नाही. तू माझा खूप जवळचा एक चांगला मित्र आहे असं सागितलं तर लगेच बोलला अगं गंमत केली. एवढं कसला राग आलाय तुला. मग रोहित मला सॉरी बोलला आणि त्याने मला जवळ ओढले आणि....माझ्या ओठांचे चुंबन घेणार तोच मी त्याला ढकलून दिलं आणि हे सगळं लग्नानंतर असं बोलून मी उठले..
दोघं घरी जायला निघालो आणि तासाभरात मी घरी पोहचले."
"पण माझ्या डोक्यातून ते जातचं नव्हतं. क्षणभर वाटलं खरचं तो माझ्यासाठी योग्य आहे का? पण तेवढ्यात बाबांनी मला विचारलं एवढा उशीर कसा झाला त्यावर मी पहिल्यांदा खोटं बोलले बाबांशी.... माझा एक्स्ट्रा क्लास होता म्हणून उशीर झाला. मग बाबांनी आणि मी जेवण केलं. मी राहिलेला अभ्यास करत बसले आणि बाबा शतपावली करायला घराबाहेर पडले.....बारा वाजले, मला झोप यायला लागली पण बाबा अजून कसे आले नाही म्हणून मी बाबांना फोन केला. एकदा... दोनदा...तीनदा... त्यांना फोन केला. मोबाईलची रिंग गेली मात्र फोन उचलत नाही त्यामुळे मला थोडी काळजी वाटली आणि भीतीही."
मी धावतच तुझ्या घरी गेली. मी सगळं तुझ्या वडिलांना सागितलं आणि काका लगेच पायात चप्पल घालून घाईघाईत निघून गेले बाबांना शोधायला. काकूने मला आता बोलावले. पण मी नाही गेले मला घरी जायचे होते कारण बाबा जर घरी आले तर.
काका घरापासून थोड्याच अंतरावर गेले तिकडे त्यांना बरीच गर्दी झालेली दिसली. काका धावतच तिकडे गेले.आणि खाली पडलेला माणूस, त्याचा मित्रच आहे हे बघून काकांना जरा भोवळ आली पण त्यांनी स्वतःला सावरलं आणि त्या लोकांना बाजूला केलं. त्यांच्या जवळ गेले बेशुद्धावस्थेत पडलेला आपला मित्र बघून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. काही लोकांनी आधीच रुग्णवाहिकेला फोन केला होता. काही मिनिटातच रुग्णवाहिका आली बाबांना उचलून गाडीत टाकले. रुग्णवाहिकेत बसल्यावर काकांनी काकूंना फोन केला.
त्या एवढ्या रात्री धावतच माझ्या घरी आल्या. दोन मिनिटांचा अंतर पण त्या घामेघूम झाल्या होत्या. त्यांना बघून मी विचारलं त्यांना पण त्यांनी काहीही न बोलता आपल्याला संजीवनी हॉस्पिटल मध्ये जायचंय म्हणून माझा हात धरला.मी दाराची कडी लावली. थोडं अंतर चालत ऑटो स्टॉप जवळ गेलो मात्र आजही ऑटो नव्हती. रात्रीचा काळोख आणि रात किड्यांच्या आवाजाची मला भीती वाटली नाही.मात्र मनात वाईट विचारांची गर्दी झाली.काय झाले असेल बाबांना? चक्कर आली असेल ? की कुणी गाडीने उडविले असेल ? तेवढ्यात ऑटो आली आणि आम्ही दोघी ऑटो मध्ये बसून हॉस्पिटल गेलो."
क्रमशः...
©®कल्पना सावळे, पुणे
क्रमशः...
©®कल्पना सावळे, पुणे