Jan 19, 2022
नारीवादी

ऊसना मोठेपणा भाग -2

Read Later
ऊसना मोठेपणा भाग -2

तिला खूप भरून आले होते संकेत जवळ बसून त्याचा खांद्यावर डोके टेकवून तिने तिच्या अश्रूंना वाट मोकळी केली,मग तिने त्याला सांगायला सुरुवात केली कि आज ऑफिस मध्ये काम होतेच नेहमी सारखे, पण माझी मैत्रीण दक्षता जी माझ्या सोबत गेली आठ वर्षे आहे,तिचा स्वभाव कसा खूप मोजून- मापून बोलणारी, काम असेल तर खूप गोड बोलणारी अशी थोडी स्वार्थी पण आणि चांगली पण. तुला तर माहीत आहे ती कशी आहे ते!!!! ज्यावेळेला तिला कामात ज्ञान नव्हते तेव्हा मी तिला सगळे शिकवले, प्रत्येक वेळेला तिला खूप मदत केली, तिला समजून आणि सांभाळून घेतले, चुका सुधारल्या,अजून किती रे हिला मी समजून घ्यायचे ????

इतके चांगले तिच्या सोबत मी वागत आले, जिवाभावाची मैत्रीण समजत आले, आज तीच मुलगी माझ्या विषयी मनात इतका राग धरून आहे हे मला माहित नव्हते, तिने माझ्या सगळ्यांशी बोलण्याचा स्वभावाचा चुकीचा अर्थ काढला, दुसरे म्हणजे सगळ्यात आधी मैत्रीत विश्वासघात केला. माझी चूक मला न दाखवता इतरांना दाखवून माझा कमीपणा आणि स्वतःचा मोठेपणा दाखवला, बॉस तिला नाही कायम मलाच रागावतात, असे खोटे भासवले, आमच्याच मित्र-मैत्रिणी मध्ये माझ्या विषयी मनात विष कालवले, माझ्यासाठी मनात राग, इतके कपट ठेऊन प्रत्येक वेळी खोटी तारीफ चेहऱ्यावर आणि मनात द्वेष कसे रे असे??????? जसे सगळा दोष माझा आणि हि जशी सर्वगुण संपन्न.????
हे सगळं इथवर करून नाही ती थांबली, तिने चांगुलपणा चा आव आणून बॉसला पण माझ्या विषयी खोटे नाटे सांगितले, फक्त मला कमीपणा दाखवायला,माझी किंमत त्यांच्या नजरेतून उतरवायला आणि हे सारे कश्यासाठी तर फक्त प्रमोशनसाठी??????????????

माणसाने आपली पातळी खाली जाईल असे का बरे वागावे, स्वतःच्या मित्र -मैत्रिणींवर द्वेष धरावा, मैत्री अशी असते का रे संकेत?????

संकेत सगळे मन लावून ऐकत होता, निशा बोलताना खूप हळवी झाली, त्या दिवशीचा प्रसंग आठवून कारण दक्षताने निशाची खास मैत्रीण प्रिया हिला पण तिच्या विषयी नकोते सांगून भडकवले, प्रिया ही निशाची खूपच घनिष्ट मैत्रीण होती, तिने हीचा खोटेपणाचा चेहरा निशाला दाखवला,तिचा खरतर विश्वास बसला नाही ,कि दक्षता अस काही वाईट वागेल, तिने निशाचे सगळे गुपित, काही प्रॉब्लेम अगदी निशाची पर्सनल लाईफ सुद्धा चव्हाट्यावर आणली, लोक ऑफिसमध्ये गॉसिपिंग करू लागले, कधी काय तर तिचे नाव सुद्धा इतर सरकारी मित्रांशी जोडले जाऊ लागले तर कधी तिच्या बिनधास्तपणे वागण्याचा चुकीचा अर्थ निघू लागला या सगळ्या गोष्टीचा निशाला थोडा मानसिक धक्का बसला. ती खूप रडली मनातून पूर्णपणे हादरून गेली.???????????????? नशीब प्रियाने तिला वेळीच सावध केले आणि मानसिक आधार दिला.

म्हणतात ना खोटेपणाचे सोंग घेता येत पण ते फार काळ नाही टिकत,खोटेपणा लपत नाही सत्य एक ना एक दिवस समोर येतच, तसेच दक्षताच सत्य तिला प्रिया आणि तिच्या इतर सहकारी मित्रानं कडून समजले.

अस असत ना प्रत्येक माणूस वेगळा तस त्यांचा स्वभाव, निशा खूप बोलकी आणि साफ मनाची होती म्हणून तिला तिच्या बेस्ट फ्रेंडनेच समजावले, आपण जर कधी कुणाचे वाईट नाही करत मग आपले तरी कसे वाईट होईल आणि हि दक्षता जी खोट वागून, चांगलेपणाचा ऊसना आव आणून सगळ्यांशी वागतेय आज हवेत असेल पण उद्या जमिनीवर नक्कीच धपकन पडेल आणि सोबत मदतीचा हात द्यायला नक्कीच तेव्हा कोणी नसेल.........

संकेत ने निशाचे सगळे म्हणणे ऐकले तिला त्याने एकच पण खूप महत्वाची गोष्ट सांगितली,ती म्हणजे कस असत ना ऑफिस असो वा आपली फॅमिली.........या सगळ्यात सुद्धा एक दक्षता सारखी माणसे असतात ज्यांना आपल्या माणसाचे चांगले झालेले पाहवत नाही, आपल्या मराठीत एक म्हण आहे निंदकाचे घर असावे शेजारी.........तसेच काहीसे!!!! प्रत्येक घरात एक तरी सडका आंबा असतोच.

निशा मी खूप लकी आहे कि तू वेळीच सावध झालीस,प्रियाने तुला समजावले, तू जर हताश झाली असतीस आणि स्वतःच्या जीवाच काही केल असत तर मी काय केलं असत ग?? माझं काय झालं असत ग??? बापरे नुसते कल्पना करून भीती वाटते.????????
अश्या घटना खरतर आपल्या समाजात घडत असतात, लोक उगीच ऊसनेपणाचा आव आणून वागतात, कारण या लोकांमध्ये एक न्यूनगंड असतो तो म्हणजे असा जसे विहिरीतील बेडकासारखे कारण विहीर हेच जग समजणारे, पण जेव्हा दुसरा समुदात जातोय हे पाहून त्याला मागे खेचणे, अश्या विकृत बुद्धीचे लोक या समाजात प्रत्येक ठिकाणी असतात, खरतर अश्या लोकांची किंमत चिल्लर मध्ये होते कारण चिल्लर फक्त खणखणते आणि नोट ती मात्र आवाज न करता आपले काम चोख करते... कारण तिची व्हॅल्यू चिल्लर पेक्षा जास्त असते, तशीच तू माझी नोट आहेस, अश्या चिल्लर लोकांना दुर्लक्षित करणे योग्य तो उपाय आहे निशा.....आपले कौतुक संकेत कडून ऐकून डोळे पुसून हसू लागली???????? निशाच्या मनात दक्षता विषयी राग होता तो जाऊन तिला तिची आणि तिच्या अश्या बुरसट विचारांची कीव येऊ लागली????????

खरच निशा सारख्या किती मुली ज्या आज या समाजात असतील त्यांना कधी ना कधी अश्या परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल, ज्या डिप्रेशनमध्ये काही स्वतःच्या जीवाचे काही बरे वाईट करून घेत असतील?????फॅमिली आणि समजूतदार मित्र वर्ग असेल तर मार्ग नक्कीच मिळेल!!!!!
पण आज हि कुत्साहित आणि विकृत बुद्धीच्या लोकांना थांबवायला हवे हो ना??????? एक सुशिक्षित माणूस म्हणून तरी असले घाणेरडे प्रकार कोणी कोणासाठी करू नये, माणसाने निदान माणुसकी तरी जपायला हवी!!!!!

आपल्या समाजात अश्या किती तरी दक्षता असतील ज्या खोटेपणाचा आव आणून ऊसना मोठेपणा मिरवत असतील!!! एक गोष्ट परत सांगावीशी वाटते ती म्हणजे चिल्लर म्हणजे नाणी खूप आवाज करतात पण नोट असतेना ती विना आवाज करत आपले काम चोख बजावते......????
म्हणून आपल्या समाज्यात वावरताना असा ऊसना मोठेपणा काय कामाचा जो स्वार्थ जपतो, नाती, मैत्री नाही........जो भावनाशून्य आहे आणि स्वार्थी☹️☹️

लेख आवडल्यास नक्की रिप्लाय द्या..
श्रावणी देशपांडे????

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Hemant Deshpande

Service

मी श्रावणी, मला कविता, लेखन करायला खूप आवडतात, गोष्टी मनातल्या♥️मनापर्यंत पोचवायला आवडतात!!