Jan 23, 2021
नारीवादी

ऊसना मोठेपणा

Read Later
ऊसना मोठेपणा

संध्याकाळी जरा गडबडीत निशा ट्रेन मधून घरी आली, संकेत आज जरा ऑफिस मधून तिच्या आधीच आला होता,त्याने तिचा मूड खराब आहे हे त्याने ओळखले. म्हणून त्याने त्या दोघांसाठी मस्त आलं घालून चहा बनवला आणि गरम गरम कांदा भजी त्याने येताना कोपऱ्यावरच्या दुकानातून जोशी काकूंकडून आणली होती कारण तिथली भजी निशाच्या आवडीची होती, चहा ☕+ भजी + पाऊस????️ = मूड मस्त????????
निशा मस्त फ्रेश होऊन आली, मग दोघांनी एकत्र बसून चहा घेतला, अहहहहा........... चहा घेऊन तिचा मूड थोडा बदलला. गरम चहा आणि भजी...सोबत पाऊस????️वातावरण खूप छान होत,निशाला  पाऊस खूप आवडतो हे संकेतला माहीत होतं, पण ती आज फारच उदास होती, संकेत ने हळूच तिचा मूड बदलण्यासाठी मस्त रोमँटिक गाणी लावली,
जेहनसीब......जेहनसीब, तुझे चाहू बेतहाशा जेहनसीब.....तेरे संग जो ना बिते.......❤️❤️❤️❤️????
निशाचा मूड हळूहळू ठीक झाला, इतकावेळ गप्प झोपळ्यावर बसलेली ती गाणे गुणगुनू लागली, घरातील बाल्कनी आणि त्यात असलेला झोपाळा हि तिची फेवरेट जागा होती. ती तिथे मस्त गाणी ऐकत किंवा पुस्तके वाचत बसायची, तिथे तिला एक वेगळीच पॉसिटीव्ह फीलिंग मिळायची. संकेत मग आणि विचारले काय मॅडम आज अचानक असे काय झाले ग? कशाने तू उदास झालीस?
संकेत तिला म्हणाला माझी सतत बडबड करणारी आणि कधी न गप्प बसणारी बायको का बर आज शांत आहे?? तुझ्या गप्प बसण्यामुळे घर निर्जीव वाटत आहे, काय झाल माझ्या राणीला???
निशा ने संकेतला सांगायला सुरुवात केली, तस ती आणि संकेत नवरा- बायको होतेच पण एकमेकांचे खूप छान मित्र आणि मैत्रीण होते,छोट्यात छोटी गोष्ट पण ते एकमेकांना सांगायचे, तिचा स्वभाव खूपच बोलका आणि सगळयांशी मिळून मिसळून वागणे, सतत सगळ्यांना मदत करणे, एकदम फ्रेंडली वागणे, बिनधास्तपणे बोलणे, त्याला तिचा हाच स्वभाव खूप आवडतं होता आणि तो हे सगळं जाणून पण होता. संकेत तिच्या अगदी उलट,खूप कमी बोलणारा.पण त्या दोघांचे नात घट्ट मैत्रीचे होते.
निशाचे मन मोकळे आणि साफ होते, तसेच ती बेधडक बोलायची, उगीच मागून एक आणि तोंडावर एक अशी ती मुळीच नव्हती, तिच्या याच बोलक्या स्वभावामुळे तिला काही फायदे होत तर कधी नुकसान होत असे. फायदे असे कि तिच्या खूप नवनवीन मैत्रिणी होत,ओळखी वाढत. आणि नुकसान असे कि तिला कधी कधी या स्वभावामुळे डोळ्यात पाणी आणि मानसिक त्रास होत असे.

आता या पुढे काय लवकर जाणून घेऊ!!
 

Circle Image

Shravani Hemant Deshpande

Service

मी श्रावणी, मला कविता, लेखन करायला खूप आवडतात, गोष्टी मनातल्या♥️मनापर्यंत पोचवायला आवडतात!!