ऊस गोड लागला म्हणून भाग 4 अंतिम

एखाद्या चांगल्या व्यक्तीचा अति फायदा घेवू नये
ऊस गोड लागला म्हणून भाग 4 अंतिम

©️®️शिल्पा सुतार
.......

वेगळा संसार म्हणजे रोजचा खर्चा साठी पैसे लागतो. घरात धुणे भांडे स्वयंपाक पासून सगळे काम करावे लागत होते. त्यात मनीषाला काही विशेष स्वयंपाक येत नव्हता. झालेल्या पदार्थांना अजिबात चव नव्हती. त्यामुळे रवी पण थोडा चिडचिड करत होता.

त्यात दिवसभर सचिनला सांभाळायचं घरचे सगळे काम जड जात होतं. तिकडे होतो तेच बरे होतं. राधाताई जेवायला चार पदार्थ करत होत्या. बोलून बघू का यांच्याशी. तिकडे जावु वापस.

थोड्या दिवसांनी अजून नको त्या राधा ताई आल्या नसतील. त्यांचा हात फ्रॅक्चर आहे उगाच आपण तिथे जायचं आपल्यालाच काम पडायचं. त्यापेक्षा थोडी दिवस इथेच राहू.

राधा घरी वापस आली. तिच्याकडून आता जास्त काम होत नव्हतं. धूण भांड्याला बाई लावली. स्वयंपाक इतर काम ती करत होती. सासू-सासरे आणि त्या चौघांच काम होतं. नेहमी कामाची सवय असल्यामुळे तिच पटकन आवरत होत.

सासूबाई पण आता शांत होत्या त्यांना जरा तरी समजलं होतं मनीषाच्या वागणुकीमुळे. त्या पुढच्या खोलीत शांत बसून असायच्या.

एका दिवशी त्या बाजारात गेल्या होत्या तेव्हा रवी भेटला आईला बघून तो अगदीच हळवा झाला होता. घरात कसा त्रास आहे. काही जेवायला नसतं. मनीषा काही करत नाही. सगळं तो सांगत होता. चार दिवस झाले खिचडी खातो आहोत.

सासूबाईंना खूप वाईट वाटलं. "कशाला राहतो तिकडे. सगळं सामान घेऊन इकडे ये."

" दादा ऐकेल का पण?"

" न ऐकायला काय झालं घर अजून आमच्याच नावावर आहे."

" ठीक आहे मग आम्ही येतो."

रविवारच्या दिवशी ते सगळं सामान घेऊन हजर झाले. मोहनने प्रचंड विरोध केला. "अजिबात जमणार नाही. हे लोक इथे राहत असतील तर आम्ही घर सोडून चाललो जाऊ. या पुढे एक तर ते इथे राहतील नाहीतर आम्ही. आई तू ठरव. "

सासूबाईंना माहिती होतं राधा जेवढ काम करते सेवा करते तेवढ मनीषा काहीच काहीच करत नाही.

"पण हे घर आई बाबांच्या नावावर आहे." रवी बोलला.

" ठीक आहे तुम्ही राहू शकता इथे. चल राधा आपलं सामान बांधा आपण आत्ताचा आत्ता निघत आहोत."

हे दोघे जर घराच्या बाहेर गेले तर पैसे कुठून आणणार? घर कसं चालेल? घर कामाचं काय होईल? राधाच्या व्यवस्थित कामाची आणि रुचकर स्वयंपाकाची सगळ्यांना सवय झाली होती.

"नाही तुम्ही नका जाऊ. "सासुबाई बोलल्या.

" आम्ही इथे थांबू पण काही अटी आहेत. एक वेळचं सगळं काम मनीषाने करायचं. तुमच धूण भांडे वेगळे. ते काम तुमच तुम्ही करायच. घरात अर्धे पैसे खर्चायला द्यायचे. माझी बायको सगळं काम करणार नाही. आणि आई तू पण सदोदित राधाला बोलायच नाही. मला ऐकु आल तर बघा."

" दोघांनी पंधरा पंधरा हजार रुपये घरात खर्चायला द्या. " सासुबाई बोलल्या.

"चालेल." मोहन तयार होता.

" आम्हाला जमणार नाही पैसे द्यायला. आम्ही पाच हजार रुपये देऊ. " रवी अजून ही त्यांच त्याच बघत होता.

"मग इथे राहायचं नाही." मोहनने दोघांना घराबाहेर काढून दिल.

आता यावेळी सासुबाई सासरे पण काहीच बोलले नाही. राधा ही मुलांना घेऊन आत मध्ये गेली .

सामानाच्या टेम्पो सकट रवी आणि मनीषा त्यांच्या घरी वापस गेले.

जर एखाद्याला काही करायची इच्छाच नाही तर किती दिवस घरचे पण सहन करतील. अशा लोकांना त्यांच्या हालवर सोडायला पाहिजे. त्यांचं किती केलं तरी त्यांना काही त्या गोष्टीचा उपकार नसतात. ते कधीच सुधारणार नाही.

🎭 Series Post

View all