ऊस गोड लागला म्हणून भाग 3

एखाद्या चांगल्या व्यक्तीचा अति गैरफायदा घेऊ नये

ऊस गोड लागला म्हणून भाग 3

©️®️शिल्पा सुतार
.......

"मोहन उद्या बँकेतुन येतांना जरा दहा हजार रुपये घेऊन ये." सासुबाई बोलल्या.

"कश्या साठी लागताय? माझ्याकडे या महिन्यात काही शिल्लक नाहीत. सगळे पैसे घरात खर्च झाले."

"'असे कसे खर्च झाले? माझ्या हिशोबप्रमाणे तुझी शिल्लक हवी."

"हो मी ते पैसे मुलांच्या नावाने बाजूला टाकले आहेत."

" लहान आहेत मुलं. ते सेव्हिंग होईल नंतर. आता तू पैसे घेवुन ये. मला आवश्यकता आहे पैशांची. " सासुबाई रागात होत्या. मी मागितले आणि हा कस काय ऐकत नाही. त्यांच्या इगो दुखावला.

" रवीला सांग यावेळी. यापुढे मी मुलांच्या नावावर पैसे टाकणारा. आणि आम्ही फक्त एक थोडीच रक्कम घरात देवू. सगळ्यांनी करायच. "

" चांगलं शिकवते आहे तुला राधाने. "

"तूला काय सारखी राधा दिसते का बोलायला. आई राधा ला काही माहिती नाही यातलं आणि आम्हाला आमच बघू दे आता. "

दोन-तीन दिवस सासूबाई चिडलेल्या होत्या. त्यांनी सगळा राग राधा वर काढला. उठता बसता त्या तिला बोलत होत्या.

आता हल्ली मोहन ऐकत नाही. त्यांनी रवीला पैसे मागून बघितले. त्यांनी नेहमीप्रमाणे दिले नाहीत

काही विशेष काम नव्हतं एका नातेवाईकाला पैसे लागत होते. दुसर्‍यां साठी त्या घरातल्यांना त्रास देत होत्या.

मुलांची परीक्षा झाली राधा गावाला जाणार होती.

"दर वर्षी काय काम असत तुझ माहेरी. कधी वापस येणार आहेस." सासुबाई डाफरल्या.

"येते आठ दिवसात." राधाने नेहमी प्रमाणे हळूच सांगितल.

" लवकर ये इथे कामा खोळंबतात."

" आई तू आहेस. मनीषा आहे जाऊ दे तिला थोडे दिवस." मोहन बोलले.

" मनीषाच काम सुरूच असतं." सासूबाई परत तिची बाजू घेत होत्या.

राधा आता मोहन कडे बघत होती. एक आवडती सुन असते आणि एक नावडती असते. इथे ना ती गोष्ट बरोबर जुळते आहे. लकी आहे मनीषा. दोघं हसत होते.

" यांचं किती करा कमीच आहे म्हणून मी पहिल्यापासून तुला म्हणतो आहे की अति करू नकोस. " मोहन बोलले.

" मी जर केलं नाही तर काहीच काम होणार नाही."

राधा मुलांना घेऊन माहेरी गेली. दोन-चार दिवस कसेतरी गेले. सासूबाईंनी लगेच मोहनच्या मागे त्रास द्यायला सुरुवात केली. तिला बोलवुन घे. मनीष वर सगळी जबाबदारी पडते. तिचा मुलगा रडतो.

दरवेळी त्या अशाच करायच्या आठ दिवसाच्या वरती राधाला माहेरी राहता यायचं नाही. तेव्हा मोहन आईच ऐकून राधाला लगेच घ्यायला जायचे. पण या वेळी त्यांनी दुर्लक्ष केल.

इकडे सगळ्यांचे खूप हाल होत होते. यावेळी मोहनने ठरवलं होतं राधा येणार नाही. तिला जरा बदल हवा आहे. राहू दे आरामात.

सकाळी फोन वाजत होता. राधा पाय घसरून पडली. तिचा हात फॅक्चर झाला होता. मोहन लगेच गावाला गेले. राधाला आराम करायला सांगितला होता. मुलांनाही भरपूर सुट्ट्या होत्या. त्यामुळे तिने तिकडेच राहायचं ठरवलं.

मोहन सात आठ दिवस तिकडेच होते.

इकडे घरात करायला कोणी नव्हतं. घर अतिशय घाण झालं होतं. मनीषा सचिन पुरती खिचडी करत होती. बाकीचे बाहेरून आणून खात होते. आता सासुबाई जवळचे पैसे संपले होते. कोणी पैसे देत नव्हते. घरात किराणा भरपूर होता कोण करेल येवढ सहा लोकांच्या वीस पंचवीस पोळ्या भाजी भात. मनीषा ने हात वरती केले.

मोहन सकाळी उठून आला. "आई काय सुरू आहे हे? नाश्ताला काही नाही. स्वयंपाक झालेला नाही. अस राधाने केल असत तर किती बोलली असतो तू तिला ."

मनीषा.. मनीषा.. सासुबाईंनी आवाज दिला. फ्लॉवरची भाजी पोळी कर. आटोप थोडे पोहे कर. चहा ठेव.

ती आत निघून गेली. जरा वेळाने रवीला घेवून बाहेर आली. "आई तू आता बोलली का मनीषाला? "

" हो घरचे काम तसेच पडले. "

" माझी बायको इतक काम करणार नाही. " रवी बोलला.

" माझी बायको करते इतके वर्ष झाले सगळ्यांच करते तेव्हा लाज नाही वाटली का आयत खायला. आज पासून काम ही अर्ध खर्च ही अर्ध." मोहन चिडले होते.

"आम्हाला हे मान्य नाही. आम्ही तुमचे काम करणार नाही. आम्ही वेगळ रहातो."

मनीषाला वाटल वेगळ घर म्हणजे काही काम नसेल. तीन लोकांच तर करायच. ती तिच्या लग्नात मिळालेल सामान घेवून निघून गेली. बाजूचा गल्लीत घर होत त्यांच घर.

🎭 Series Post

View all