Login

ऊस गोड लागला म्हणून भाग 2

चांगल वागण्यार्या व्यक्तीचा अति फायदा घेवू नये
ऊस गोड लागला म्हणून भाग 2

©️®️शिल्पा सुतार
.......

राधा नेहमी तिघ मुलांना जेवायला द्यायची. पण मनीष फक्त तिच्या मुलाच ताट करायची. एकदाही तिने या दोघ मुलांना प्रेमाने जवळ घेतल नाही.

मोहन, राधाच लग्न दहा वर्षापुर्वी झाल. लहान दीर
रवी, मनीषा यांच्या लग्नाला पाच वर्ष झाले होते. ते दोघ स्वतःला खूप लहान समजत होते. कुठली जबाबदारी घ्यायला तयार नव्हते. मोहन पहिल्यापासून अभ्यासात हुशार होते. त्यामुळे नोकरीही चांगली मिळाली. भरपूर पगार येत होता. राधा ही खूप समजूतदार होती.

रवीला आईने नेहमी पाठीशी घातलं त्यामुळे तो बिघडला. अजून ही सासुबाई तेच करत होत्या. मनीषा पण तशीच काम चुकार निघाली. रवीचा पगार थोडा होता. ते घरात पैसे देत नव्हते. नेहमी बाजूला टाकत होते. पाच रुपयेही खर्च नव्हता त्यांना .

घरातलं सगळं मोहन आणि राधानेच करायचं. ते दोघ हॉटेलमध्ये राहिल्यासारखे राहत होते. सासूबाईंना त्यांच्यात काहीच दोष दिसत नव्हता. काहीही चुकलं तर राधाच चुकलं असं होतं.

काय करावे या गोष्टीला इलाज नव्हता. काहीही आणायचं असलं तर ते मोहनला सांगत होते. रवी सुद्धा काही सांगितलं की दादा घेऊन येईल असं करत होता. सारखा आम्हाला काही तुमच्यासारखा पगार आहे का अस करून सगळे पैसे साठवले होते.

मोहन आणि राधाला समजत होतं पण काय बोलणार. आपण घरातले मोठे आहोत. करावंच लागणार. बाकीच्यांनी या गोष्टीचा अधिक फायदा घेतला होता.

जेवण झालं आवरून झालं. राधा मुलांचा अभ्यास घेत बसली होती.

"राधा पाणी आण." सासूबाईंचा आवाज आला. राधा उठत होती.

"बस तू." मोहन गेले पाणी घेऊन.

"राधा कुठे गेली?"

"मुलांचा अभ्यास सुरू आहे. त्यांची परीक्षा आहे. सारखं तू राधाला डिस्टर्ब करत जाऊ नको."

"आज तुम्ही दोघं भाजीला गेले होते तेव्हा राधाने तुला काही सांगितलं का? तू कधीच चिडचिडच करतो आहेस." सासुबाई बोलल्या.

"ती कशाला मला काही सांगेल. मलाही दिसत ना घरात काय सुरू आहे ते. आई तू सारखी राधाचा राग राग का करतेस. मनीषाला सुद्धा एकदा सांगून बघ थोडं काम. " मोहन बोलला.

"तिच्या मागे लहान लेकरू आहे. "

" आमचे मुलं कधीच लहान नव्हते का? आई हा तुझा भेदभाव बरा नव्हे. " घरच्या वातावरणाला राजकारणाला मोहनही कंटाळला होता.

आधी मोहन पण घरच्या लोकांमधे सामील होता. त्याला वाटायच राधाने सगळे काम कराव. आईला आराम द्यावा. थोडा जरी उशीर झाला जेवायला तर मोहन खूप ओरडायचा राधा वर. तीच गर्भारपण, मुल लहान आहेत याचा कोणी विचार केला नाही.

राधाने कधी चूक केली नाही. होईल तेवढ काम ती नेहमी निमुटपणे काम करत असायची. यातच ती भित्री झाली.

पण आता हीच सक्ती आई मनीषा बाबतीत करत नाही. दुजाभाव होतो. मनीषा नेहमी आराम करत असते. राधा काम उपसत रहाते. हे जेव्हा मोहनच्या लक्ष्यात आल तेव्हा तो राधाची बाजू घ्यायला लागला.


🎭 Series Post

View all