ऊस गोड लागला म्हणून भाग 1

एखादा चांगल्या व्यक्तिचा अति फायदा घेवू नये

ऊस गोड लागला म्हणून भाग 1

©️®️शिल्पा सुतार
.......

भाजी घेवून झाली तशी साधी भोळी राधा पटकन कार जवळ जावून उभी राहिली. मोहन मागून आले. "चल मसाले डोसा खाते का?"

"नको घरी जायला उशीर होईल."

"काय घाई असते ग तुला नेहमी. आई आहे, मनीषा आहे घरी. सगळ्या कामाला तूच हवी का?" ते चिडले.

राधा काही म्हटली नाही. मोहन कार मध्ये बसले. ते निघाले.

यांना काय माहिती घरी काय परिस्थिती आहे ते. मला कराव लागत सगळं काम. परत काही बोलायची चोरी. थोडा जरी स्वयंपाकाला उशीर झाला तर त्यांची आई किती बोलते मला. त्या दोघी कुठे काय काम करतात.

सासुबाई नुसत्या सूचना करतात. आपण जे ठरवल ते बदलतात. मनीषाने लग्न झाल्या पासून कोणतीच जबाबदारी अंगावर घेतली नाही. नावाला लहान जावू आहे. तिचा मुलगा माझे मुल तिघांच मला बघाव लागत. त्यांचा अभ्यास. बाहेरचे काम. स्वयंपाक. आले गेलेले. जरा म्हणून विश्रांती नाही. नेहमी घाबरत काम करायच. यांना सगळं दिसत तरी नेहमी मलाच बोलतात. माझ नशीब अस आहे. ती नाराज होती.

"राधा तू आता काम थोड कमी कर. मनीषाला थोडी जबाबदारी घेवू दे. तुझी खूप धावपळ होते. एक वेळ स्वयंपाक पाणी ती करेल एक वेळ तू अस ठरवून घे ." मोहन परत बोलले.

"मी नको म्हणते का? पण ती काही करतच नाही. नुसती बसलेली असते. काम नाही झाल की आई मला ओरडतात. ते मला आवडत नाही म्हणून मी करते काम."

" तिला आरामात रहायची सवय झाली आहे. आणि तुला अति काम करायची." मोहन चिडले होते.

" आता तुम्ही तरी माझ्या वर चिडू नका. तुमच्या कडून प्रेमाची आधाराची अपेक्षा आहे मला." राधाचा गळा भरून आला होता .

" बर सॉरी. म्हणून म्हणत होतो मसाले डोसा खाते का. छान गेलो असतो हॉटेल मधे हातात हात घेवून बसलो असतो. पण नाही तुझा नेहमी प्रमाणे नकार. " ते हसत होते.

राधा लाजली. जायला हव होत. यांच मन ही जपायला हव.

ते घरी आले. मोहन कार लावत होते.

सासुबाई ओरडल्या." इतका वेळ लागतो का भाजीला? तुझ्या अण्णांना सातला जेवायला लागत."

" मग आम्ही काय किचन सोबत नेल होत का? करायच ना तुम्ही. आणि बाहेरच्या कामाला वेळ होतोच. आता ना आई तू अस राधाला सारख बोलत जावू नकोस. जो करतो ना त्याला सगळे बोलतात आणि न करण्याला काही बोलत नाही ." मोहन एकदम बोलला.

"अहो नको." राधाने खुणावल. ती पटकन किचन मधे गेली. भांडण नको वाटत. काम करायच आहे ना. मी काही झिजणार नाही. आवरते पटापट.

तिने कुकर लावला." मनीषा तू कणीक भिजवून पोळ्या कर. "

" हो ताई. "

" आटोप भूक लागली घरातल्यांना. दिवा बत्ती झाली नाही अजून." तिने तिच्या लेकीला सायलीला ते काम दिल.

एकी कडे भाजी फोडणीला टाकली. कोशिंबीर केली.
वरण गरम केल. दोन तीन पोळ्या झाल्या लगेच अण्णांना सासुबाईना वाढून दिल.

"राधा ताई तुम्ही करता का पोळ्या. मी सचिनला खाऊ घालते. त्याला भूक लागली. " मनीषा बोलली.

हो.. परत सगळ काम राधा वर आल. तिने सायली श्लोकच ताट केल. तिच्या मुलांना जेवायला दिल .


🎭 Series Post

View all