उपवासाची भेळ

माझी आवड माझ्या रेसिपी

नमस्कार मैत्रिणींनो,

उपवासाच्या दिवशी साबुदाणा भगर यासारखे पदार्थ सारखे सारखे खाऊन कंटाळा येतो म्हणूनच आजची ही नवीन रेसिपी जी लहान मोठे सगळेच अगदी आवडीने खातील चला तर मग पाहूया आजची रेसिपी उपवासाची भेळ

साहित्य:-

काकडी,दही, अननस, डाळिंबाचे दाणे,बटाटा वेफर्स, जिरेपूड, मीठ ,पिठीसाखर ,साबुदाण्याची खिचडी, चिरलेली कोथिंबीर, साबुदाण्याचा चिवडा.

कृती:-

काकडी स्वच्छ धुऊन घ्यावी.काकडीची साल काढून त्याचे बारीक काप करावे.अननसाचेही काप करून घ्यावे. काकडी, अननस, डाळिंबाचे दाणे एकत्र करून त्यामध्ये जिरेपूड, मीठ व साखर आवडीप्रमाणे घालून मिसळून घ्यावे. दही घुसळून ठेवावे. सर्व्ह करताना प्लेटमध्ये आधी खिचडी घालावी. त्यावर दही घालावे. काकडी,अननस, डाळिंबाचे दाणे यांचे सलाड घालावे. त्यानंतर वेफर्स कुस्करून घालावे. साबुदाण्याचा चिवडा घालावा. कोथिंबीर घालून सजवावे.

टीप:- काही भागांमध्ये उपवासाच्या दिवशी जीर, कोथिंबीर यांचा वापर करत नाहीत म्हणून जिरं आणि कोथिंबीर स्किप केले तरी चालेल.