महाशिवरात्री स्पेशल- उपवासाचा पदार्थ - दशमी

Mahashivratri Special, Dashmi Made With Amaranth Flour And Jaggry


दोन दिवसांनी महाशिवरात्री आहे. बहुतेककरून सगळेचजण महाशिवरात्री ला उपवास धरतात . हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडतात . त्यामुळे दिवसभर खिचडी, साबुदाणा वडा हे खाल्ले कि रात्री काय करायचे हा प्रश्न पडतो; त्यासाठी हि उपवास स्पेशल रेसेपी....
राजगिऱ्याची दशमी
साहित्य -

1- 2 वाटी राजगिऱ्याचे पीठ
2- 1 वाटी चिरलेला गुळ
3- पाव चमचा मीठ
4 - 5/6 चमचे साजूक तूप

कृती -

1- पाव वाटी पाणी घेऊन त्यामध्ये 1 वाटी गुळ विरघळून घ्यायचा.
2- राजगिऱ्याचे पीठ चाळून घेऊन त्यामध्ये मीठ घालायचे.
3- हे पीठ तयार केलेले गुळाचे पाणी थोडे - थोडे टाकून पीठ घट्ट मळायचे . ( पाणी एकदम सगळे टाकले तर पातळ होईल म्हणून जेवढे लागेल तेवढेच पाणी थोडे - थोडे करून पीठ मळायचे .)
4 -थोडेसे तूप लावून पीठ परत व्यवस्थित मळायचे.
5- या पिठाचे पोळी करतो तेवढे आकाराचे गोळे करून दशमी पोळपाटावर लाटायची. ( लाटताना पोळपाटाला पीठ चिटकू नये म्हणून कोरडे राजगिऱ्याचे पीठ टाकून त्यावर दशमी लाटायची.हाताला पण पीठ चिटकू नाय म्हणून थोडेसे तूप लावायचे. )
6 - लाटून झालेली दशमी तव्यावर दोन्ही साईडने मध्यम आचेवर भाजायची. भाजताना दोन्ही साईडला तूप लावायचे . अशा पद्धतीने दशमी तयार .
या महाशिवरात्रीला करून बघा .
( टीप - दशमी बटाट्याची भाजी अथवा शेंगदाण्याची चटणीबरोबर खाऊ शकतो .ही दशमी 2/3 दिवस टिकते . गरम असतानाच व्यवस्तीत झाकून ठेवल्यास मऊ राहते . प्रवासात नेण्यासाठीही उत्तम पर्याय . )