May 15, 2021
प्रेम

चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेमकथा)पार्ट 55

Read Later
चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेमकथा)पार्ट 55

पार्ट 55

करूणा आणि सुवर्णा घरी येतात.......करुणाचे बाबा आधीच घरी पाहुणे येणार आहे म्हणुन आलेले असतात.....घरी आल्या आल्या सुवर्णा ऑफिसमध्ये काय काय घडलं ते सगळ सांगते.......

सुवर्णा : काही म्हणा काका.....हे लग्न जगातलं एक नंबर लग्न असणारे........एवढी मानस येणारे म्हणजे बापरे......बापरे.....मी तर वेडीच होईल.....

मंदा (काकी) : आणि मी हरवली तर त्या माणसाच्या घोळक्यात तर(काळजीत)

सगळे जण हसतात.......

सुवर्णा : अग आई त्यांचे बॉडीगार्ड असणार आपल्या सोबत.....आता आपण vip मानस झालो

मंदा : म्हणजे.....आता हा काय नवीन प्रकारे.....?????

सुवर्णा : अग त्याला अंगरक्षक म्हणतात.....आता आपल्या घरची मुलगी एवढ्या मोठ्या घरची सुन होणारे तर आपण पण इम्पोरटंट मानस झालो ना म्हणुन ते सगळे आपल्या बरोबर बॉडीगार्ड देणार...... आपले सौरक्षण करायला......

मंदा : ते tv मध्ये दाखवतात तस....ते मोठे मोठे लोक असतातना........ते नेते ते हिरोईन...... ह्यांच्या बरोबर.........तस ना....


सुवर्णा : हो तसच.......

मंदा : बापरे......मधु ......खरच नशीब काढलं आपल्या मुलीने......मला तर खुप मज्जा येईल खरच.......हो ना भावोजी.....(मंदा ला दत्तात्रय काळजीत दिसतात.....)
भावोजी काय झालं........कसला विचार करतायत एवढा.....????

दत्तात्रय : काही नाही ओ वहिनी .....हे लग्न किती परेनंतर पडेन ह्याचा विचार करतोय मी.....म्हणजे आपल्याला पण तेवढं जमलं पाहिजे ना.....

करूणा : बाबा अजितच्या घरच्यांनी आधीच ठरवलं आहे........लग्नाचा आणि रिसेप्शन चा सगळा खर्च ते लोक करणारे.....कारण त्यांचे vip गेस्ट पण भरपुर आहे .....तर त्या हिशोबाने त्यांची राहण्याची सोय वगैरे सगळं ते लोकच बघणारे.....आपल्याला काहीच नाही करायचाय......आणिआमच्या लग्नाचे कपडे पण तेच लोक डीसाईड करणारे......एकंदरीत......आपल्याला जास्त काही धावपळ नाही कारायचिये.........

दत्तात्रय : अरे बापरे.......चांगलीच गोष्ट आहे.....पण तरीपण आपण आपल्याला जेवढं जमेन तेवढं करू.....नाहीतरी हळद आपल्याच दारात आहे आणि त्यांची त्यांच्या दारात.......खरं बघायला गेलं तर खुप नशीबवान आहोत आपण सगळे......कारण करूणा मुळे आपल्याला अशी एवढी चांगली माणस मिळाली......(आनंदात बोलतात) बर ते जाऊद्या आवरा लवकर सीमाने सांगितल्याप्रमाणे ती माणस येतीलच थोड्यावेळात......वहिनी निशा आणि अश्विनी कधी येतील......?????

अश्विनी : आम्ही दारातच आहोत काका.......

दत्तात्रय : अरे आलात.....जा जाऊन फ्रेश व्हा.....मधु ज बर पाहुण्यांसाठी नाश्त्याच बघा......

निशा : काका आम्ही येताना सामोसे आणि कोल्ड्रिंक्स आणलेत.....हेच द्या त्यांना.....

मधु : अरे वा .....बर झालं.....नाहीतरी काहीतरी वेगळं अस करायचा विचार होता माझा......नशीब तुम्ही आणलं......चला तुम्ही सगळे जा आणि फ्रेश व्हा.....

(सगळ्या मुली फ्रेश होऊन हॉल मध्ये बसतात....तेवढ्यात सीमाचा फोन मधुला येतो.....)

मधु : हा बोलना सीमा....?????

सीमा : ताई दाजींचा फोन लागत नाये .....ती पाहुणे सगळे बाहेर उभेत वाटत ......मेन गेट ला......

मधु :हा हा .....थांब मी सांगते ह्याना.....(आवो बाहेर जा.....में गेट ला सगळे पाहुणे आहेत........उभे......तुमचा फोन पण मध्येच बंद असतो......)

दत्तात्रय :माझा फोन बंद आहे......(खिशातुन फोन काढत.....आयच्या मारी....ह्याला पण आताच बंद व्हायचा होता......हे घे  चार्जिंगला लाव.....मी आलोच त्यांना घेउन.....)

दत्तात्रय लगेच पाहुण्यांना घ्यायला निघतात......

(पाहुण्यांना घेऊन आल्यावर......)

दत्तात्रय :या या आत या.......माफ करा माझा फोन मधीच बंद पडला......चार्जिंग संपली ना म्हणुन सगळा गोंधळ झाला.......

पाहुणे : काही हरकत नाही.......आम्ही नुकतेच पोहोचले होतो..... नवीन जागा ना म्हणुन थोडा आमचा पण गोंधळ उडाला.....म्हणून सीमा ताईंना कॉल केला.....

दत्तात्रय : (हसत) बसा  बसा......मधु पाणी आन.......विहिनी बाहेर या......पाहुणे आले.....

मधु आणि मंदा वहिनी पाहुण्यांसाठी पाणी आणतात.....एकंदरीत चार जण असतात......

पाहुणे : सर्वात आधी मी माझी ओळख करून देतो........मी दिलीप देशमुख........ही माझी बायको......लता देशमुख......हा माझा मोठा मुलगा आनंद............आणि ही माझी मुलगी.......राणी........हीच लग्न झालेलं आहे.....हिला आम्ही नगर साईडला दिलीये......

सगळेच एकमेकांना नमस्कार करतात......

(बेडरूम मध्ये)

अश्विनी : ये चला बाहेर........पाहुणे आले......काकी बोलावते......(तसे सगळे किचन मधुन उभे राहुन पाहुण्यांना बघतात.....

सुवर्णा : ए ताई ......तो बघ ह्यांचा मुलगाय...... भारी दिसतोना..... अगदी रिटीक रोशन.....

तसे सगळे तिला खुन्नस देत बघतात......

सुवर्णाच : (तोंड वाकड करत) सॉरी......नक्की काकांना मोठी साड्यांची ऑर्डर द्यायला आले असणार.....नक्की ह्याच लग्न ठरलं असेंन...... नाहीतरी कोण ह्याला नाय बोलेल.......मी जर अस्तिना..... तर नक्कीच(पुढे काही बोलणार तेच अश्विनी बोलते)

अश्विनी : तु जरा गप्प बशील का........उगाच पुढचा विचार करतेस........बाहेर मोठी माणसं आहेत ना.....एक काम कर तु जा हॉल मध्ये.........जा ना जा जा.....

सुवर्णा :नको नको.....(तसे सगळ्या बहिणी सुवर्णा ला हसतात........)

निशा : शांत बसा......नाहीतर आपला आवाज जाईल......

दत्तात्रय : बोलाना.......सीमा बोली की तुमचं काही काम होत आमच्या कडे.....

दिलीप देशमुख : हो .....आम्ही तुमच्या लहान मुलीच्या साखरपुड्याला आलेलो......माझी बायको लता.....आणि तुमची सीमा ह्या बेस्ट फ्रेंड आहेत....म्हणजे लता च माहेर हे सीमा च सासर आहे.....सुट्टीत लता माहेरी जायची तेव्हा त्यांची ओळख झाली.....आणि नाहीतरी बाजुबाजु ची घर ह्यांची....... ह्या दोघी खुप जवळचा मैत्रिणी.....म्हणुन साखरपुड्याला सीमाने आम्हाला सुद्धा बोलावलं......तस बघायला गेलं तर तिने आम्हाला बोलावुन खुप मोठ काम केलं.......

दत्तात्रय : म्हणजे.....मी काही समजलो नाही.........

दिलीप देशमुख : हा आमचा मुलगा आनंद......इंजिनिअर आहे.......ह्याच्या साठी आम्ही गेल्या वर्षांपासून मुलगी शोधत होतो......सीमाला ही गोष्ट माहीत होती.....म्हणुन तिने मुद्दामून आम्हाला ह्या साखरपुड्याला बोलावलं.....पण हा कामानिमित्त बाहेर असल्यामुळे आम्ही दोघेच आलो......
.........तेव्हा तिकडे आम्हाला तुमची मोठी मुलगी......निशा पसंत आली.......आम्ही तिचा हात मागण्यासाठी तुमच्याकडे आलोत......(एवढं बोलुन सगळे जण एकमेकांना बघतात.....मंदा तर आता रडायची च बाकी होती)

किचन मध्ये उभ्या असलेल्या मुली निशाकडे बघतात.....तिच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले

दिलीप देशमुख : काय झालं आमचं काही चुकलं का......?????

दत्तात्रय :आवो नाही नाही......उलटा आम्हाला  तुम्ही सरप्राईज दिल......पण कदाचित तुम्हाला हे माहीत नसेन की निशा ही आमच्या मोठया भावाची मुलगी आहे ते

दिलीप देशमुख : हो आम्हाला सगळं माहिते......सीमा ने आम्हाला इकडे यायच्या आधीच सगळी कल्पना दिली होतो.....पण एक सांगु..... शेवटी ती तुमचीच मुलगी झाली ना.....तुमच्या मोठ्या भावाची काय आणि तुमची काय.......शेवटी एकाच रक्ताचे तुम्ही सगळे......आम्हाला तुमच्यासारखी माणस मिळाली तर ते तर आमचं नशीबच.....

दत्तात्रय : मला तर आता काहीच कळत नाहीये.....तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला मागणी घातली मला तर खरच खुप आवडलं........वहिनी तुम्ही काय बोलतायत ह्याच्यावर........

मंदा : मी काय बोलु ......भावोजी......मला तुम्ही जो निर्णय घ्याल तोच कबुल आहे........

लता : तुम्ही मुलीला एकदा बोलावाल का.....म्हणजे आनंद पण बघुन घेईल.....तसा त्याने फोटो बघितलाचे......पण तरीपण एकदा सामोरा समोर बघितलं तर बरं होईल

मधु : आलेच मी .....बोलावते निशा ला.....(एवढं बोलुन ती किचन मध्ये जाते......निशा किचन मध्येच उभी असते.......तिला हसतच बाहेर ज म्हणुन सांगते.....हे मुलींनो न्हया तिला.....थांब तिला त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन जायला सांगते)

निशा नाश्ता घेऊनच तिच्या बाहिणींबरोबर बाहेर येते........ती जशी बाहेर येते तशी आनंद आणि निशाची नजरा नजर होते......

मंदा : ठेव इथे........सगळ्यांना दे प्लेट मधुन.....
(निशासाठीही पहिल्यांदाच वेळ होती त्यामुळे तिचे हात थर थरत होते)

दत्तात्रय : ही माझ्या भावाची मोठी मुलगी......निशा .....xxx ह्या कंपनीत कामाला आहे.....(दत्तात्रय सगळ्या मुलींची ओळख करून देतात......) बस इथे निशा......

दत्तात्रय : निशा बेटा......तु तर आता सगळं ऐकल च असेल......तु मुलाला सुद्धा पाहिलस.......मग तुझा काय निर्णय आहे.....?????

निशा : काका मी काय बोलु ......तुम्हीच तुमचा निर्णय घ्या.....पण तुमच्या सगळ्यांची काही हरकत नसेन तर मला आनंद बरोबर बोलायच होत थोडं.......

लता (आनंदची आई) : हो नक्की बेटा.......तुम्हाला सगळ्याना चालेल ना.....?????

मधु :  हो हो काही हरकत नाही......करूणा सुवर्णा ह्या दोघांना आपल्या टेरेसवर घेऊन जा........(मधुच्या सांगण्यावरून दोघी त्या दोघांना टेरेस वर सोडुन येतात.......)

दत्तात्रय : दिलीपराव...... एक विनंती आहे.......ह्या दोघांचा निर्णय तर आपल्याला थोड्या वेळात कळेलच....... पण जर का हे नातं जुळलं..... तर मग तुम्हाला थोडं थांबावं लागेन......कारण आताच माझ्या एका मुलीचं लग्न........एका महिनीवर येऊन थांबलय....... थोडा आम्हाला वेळ लागेन ........म्हणजे आम्ही नाही नाय म्हणते.....पण सगळी अरेंजमेन्ट करायला थोडा वेळ द्यावा लागेल.......

दिलीप : काळजी नका करू.......मला समजतंय सगळं........म्हणुन आधी ह्या दोघांचा निर्णय आपण एकुया मग ठरवु बाकीच सगळं काही......

सगळे आनंदाने मान हलवतात.....

दत्तात्रय : आता तुम्ही सगळे एवढ्या लांब आलाच आहेत तर मग जेऊनच जावा......नाय नका म्हणु .....प्लिज......विनंती करतो.....

दत्तात्रय : आवो अस नका म्हणु....... तुम्ही एवढा आग्रह करतातच आहे तर नक्की जेवुन जाऊ.........

दत्तात्रय : (आनंदाने) मधु वहिनी मुलींना हात खाली घेऊन जेवणाचं बघा.......

लता : मी  पण येते.....नाहीतर मला बसुन बसुन कंटाळा येईल....

मंदा :आवो नका नका ताई.....तुम्ही  पाहुणे आहात आमचे.....तुम्ही कशाला त्रास करून घेतताय त.......

लता : आवो त्रास कसला त्यात.....उलट मला तेवढीच तुमच्या सगळ्यांची अजुन माहिती मिळेल......ओळख वाढेल .......आणि वेळ पण निघुन जाईल.....

मधु : अच्छा ठिके... .पण फक्त गप्पा मारायच्या बर का.....तेव्हाच किचन मध्ये एंट्री मिळेल......(तसे सगळे हसतात आणि किचन मध्ये जातात)

@@@@@@@@@@@@@@@@@@@

(टेरेस वर)

आनंद : माझ्या मते तु आता बोलु शकतेस....कारण आपल्याला येऊन पंधरा मिनिटे झालीयेत(हसत) निशा सुद्धा हस्ते.....

निशा : मला माहिते.....तुम्हाला माझ्या विषयी सगळं काही माहिते.....आमची परिस्थिती पण.......आम्ही जेव्हापासून ह्या घरी आलोय तेव्हा पासुन आमच्या काकांनी आम्हाला त्यांच्या मुलींप्रमाणेच संभाळय.........आमचं हवं नको ते सगळंच काका बघतायत........काकी ने सुद्धा आम्हाला आई प्रमाणे प्रेम दिल......कधीच आम्हाला चुलत हा शब्द जाणुन दिला नाही.......आणि आज पण त्यांच्या डोळ्यात मला तोच आनंद दिसला.....खर तर आनंद आम्ही खुप बिकट परिस्थिती तुन स्वतःला सावरलं आहे.....म्हणुन मला माझ्या लग्नचा बोझ कुणावरच लादायच नाहीये.....मला माहिते काका.....माझं लग्न हौसेनं करतील......खुप थाटामाटात करतील.....,पण मला अस वाटत की त्यांनी ऑलरेडी आमच्यावर खुप उपकार केलेत.....आता अजुन एक उपकार नको.......हे उपकारच ओझं मला नाही झेपणार......

आनंद शांत पणे सगळं ऐकत असतो........

आनंद : तुझं बोलुन झालं असेंन तर मी बोलु

निशा नजरेनेच हो बोलते........

आनंद : कसय ना निशा मी जेव्हा तुझा फोटो पहिला ना मला तेव्हाच तु आवडली होती........म्हणुन मी इथं परेनंतर आलो......मला ह्या आधी पण मुली दाखवल्या पण त्या मुलींना फक्त माझा पैसा महत्त्वाचा वाटला.........आणि तस बघायला गेलो तर मला सुद्धा काही खास त्या मुलींमध्ये आवडलं नाही......तुला पाहिलं आणि मी तुझ्या प्रेमातच पडलो .....का माहीत का......पण मन मात्र तुझ्या कडेच ओढल्या गेलं......आणि राहिली गोष्ट लग्नाची......जर आपण एक मेकांना होकार दिला तर मग आपण कोर्टात लग्न करू...... मग तर चालेना.....????

निशा एकदम चकमकुन आनंदला बघते......

आनंद : काय झालं.......नाही आवडली का....... माझी आयडिया............

निशा : हम्म......म्हणजे मी तुम्हाला पसंत आहे..........?????

आनंद : आता मगासपासून काय बोलत होतो मी.......ऑफ कोर्स तु मला पसंत आहे म्हणुन तर एवढ्या लांबुन म्हणजे पुण्यावरून तुला बघायला आलो...........

निशा लाजुन मान खाली घालते......

आनंद :मग तुझं उत्तर काये......????????

निशा : निशा ऐकटक आनंद ला बघत राहते......(ती मान हलवुनच होकार देते.....आणि चटकन खाली पळत येते.....तसा आनंद सुद्धा पळत खाली येतो.......

घरात सगळे गप्पा मारत असतात.......त्या दोघांना एकमेकांच्या मागुन येताना.......अश्विनी बघते......

दिलीप देशमुख : आलात मुलांनो......(दिलीपरावांच्या बोलण्याने सगळे स्वयंपाक घरातुन बाहेर येतात....

लता : काय झालं आनंद.........(काळजीने विचारते)

आनंद : आई माझा आणि निशाचा निर्णय झालाय........आम्हाला दोघांना हे नातं मंजूर आहे

तसे सगळे आनंदाने एकमेकांना मिठी मारतात......मंदा ताई चटकन देवापुढे साखर ठेवायला जातात

सगळ्या बहिणी मिळुन निशाला चिडवतात.......

आनंद : पण एक आमच्या दोघांची अट आहे.......?????

दत्तात्रय : कोणती अट (काळजीने विचारतात)

आनंद : आम्ही दोघांनी ठरव आहे की आम्ही कोर्टात लग्न करणार......

सगळे एकमेकांना बघतात.....

दत्तात्रय : आवो अस कसं...... लग्न थाटामाटात करून देतो ना आम्ही.....

निशा :काका .....आता परेनंतर तुम्ही आमच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या मग प्लिज ही  पण एक लास्ट गोष्ट समजुन घ्या.....आमच्या दोघांना पण जास्त तामझाम लग्न नकोय.......आम्ही वाटलं तर आमच्या लग्नाचे पैसे कुणा गरजु लोकांना मदत म्हणुन देऊ......

दिलीप : ठिके.....तुम्ही जर मनापासुन ठरवलच असेन तर आम्हाला काही हरकत नाही.....दत्तात्रय राव मुले आता मोठी झालीयेत..... त्यांना त्यांचा सगळा निर्णय घेण्याचा अधिकार आहे.....मग आपण पण त्यांच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे......हो ना.....त्यांनी एकमेकांना पसंत केलं तीच खुप मोठी गोष्ट आहे.......

मधु : हो ना......ताई तुमचं काय म्हण आहे ह्यावर.....

मंदा : माझी काही हरकत नाही.......जे हे मुलं ठरवतील तेच मला पण मान्य आहे.....

दत्तात्रय : अरे मग असे बघत काय बसलायत......जा सगळ्यांच तोंड गोड करा......

मधु : आवो पेढे नाहीयेत घरात.....चॉकलेट चालेल का.....

लता : हो चालेल काय.....(सगळे एकत्र बोलतात.....दोडेल)

सगळे एकमेकांना चॉकलेट भरवतात.....  

दत्तात्रय : दिलीपराव लग्न कधी करायचं मग......?????म्हणजे  एक महिन्यावर करुणाच लग्न आहे.....मग ह्यांच लग्न.......?????

दिलीप देशमुख : नाहीतरी ह्या मुलांनी कोर्टात लग्न करायचं ठरवलंय मग तुम्हाला काही हरकत नसेन तर आपण येत्या पंधरा दिवसात ह्यांच लग्न आधी लावलं तर चालेल का.......

दत्तात्रय मधु कडे बघतात

मधु : आम्हाला काही हरतकत नाही .....उलटा आमच्या मोठ्या मुलीचं लग्न आधी होतंय तेच खुप चांगलं झालं आमच्यासाठी....... निशा चालेल ना तुला......

निशा मानेने हो बोलते.....

लता : मधु ताई ...आम्ही आजच पुण्याला रिटर्न जाणारे.....मग हिला साडी घ्यायला आम्ही आजच पैसे देऊन जातो.....आंनद पुण्यावरून त्याची शॉपिंग करेल......तुम्ही इकडुनच करा शॉपिंग.....आणि ज्या दिवशी ह्यांच लग्न असें त्या दिवशी आम्ही ह्यांच्या बहिणीकडे येऊन थांबु.....

दिलीप : हो माझी बहिण इथे मुंबई ला दिलीये ठाण्या ला.........तिच्या कडे आम्ही राहु.....

सगळे एकमेकांना हो बोलतात........

दत्तात्रय : चला मग आता जेवणाचं बघा.......नाहीतरी आता दोन दोन आनंदाच्या बातम्या आहे आपल्याकडे....... भुक तर कुठच्या कुठे पळुन गेली माझी......(हसत)

सगळे एकत्र आनंदाने जेवण करतात.....लता ताई निशाला साडी आणि ज्वेलरी घेण्यासाठी पैसे देतात.....आणि सगळे एकमेकांचा निरोप घेऊन निघतात....

(काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा कंमेंट द्वारे)

Circle Image

Sonali Pankaj Shejale

House wife

House Wife