Login

चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा)पार्ट 54

Untold love story (part 54)

पार्ट 54

वेडींग प्लॅनर हात मिळवुन अजित आणि करूणा हॅलो बोलतात.... एकुण पाच जण असतात......अजित त्या सगळ्यांनसाठी ज्युस आणि काही स्नॅक्स मागवतो....

अजित : तुम्ही तुमचा प्लॅन सांगु शकतात......मला आधीच मॅनेजर ने तुमची डिटेल दिलीये मला.......तुमची नंबर वन वर वेडींग प्लॅन ची अरेंजमेन्ट असते.....सो प्लिज आमच्या साठी पण काही खास असेंच तुमच्याकडे.....(हसतच)

वेडींग प्लॅनर नंबर 1 : हो सर नक्की.....आम्ही आमच्या पण काही आयडियाज आणले आहे......पण आम्हाला आधी तुमच्या आयडिया ऐकायला आवडेन...... म्हणजे तुम्ही पण काहीतरी डीसाईड केलंच असेना.....?????

अजित  : वेल मला तर अशी काहीच आयडिया नाहीये.....तुम्ही वाटलं तर मॅडमला विचारा.......त्यांनी काही ठरवलं असेंन तर आपण त्याच्यावर पण फोकस करू

करूणा : मी काय सांगु आता.....मला तर जास्त काहीच नॉलेज नाहीये या बाबतीत......(गोंधळुन)

वेडींग प्लॅनर नंबर 2 : काही हरकत नाही मॅडम......आम्ही सांगतो.......(तेवढ्यात ते सगळे जण त्यांचा अल्बम काढतात) हे काही अलबम्स आहे....आज परेनंतर आम्ही ज्या ज्या लोकांचे लग्न प्लॅन केले आहेत.....त्यांच्या ह्या ह्या सगळ्या थीम आहेत........ह्या मध्ये हळद.....संगीत.....मेहेंदी.......बॅचलर पार्टी....... हे सगळं आम्ही एकत्र प्लॅन करतो.....तुम्ही हे सगळं बघा......आणि त्या मध्ये जर समजा तुम्हाला डान्स करायचा असें तर तो पण आम्ही बसवतो........ओवर ऑल तुम्ही अस समजु शकता की आम्ही पूर्ण लग्नच करून देतो(हसत)

सुवर्णा : अरे वा.....खुप छान आयडिया आहे.....म्हणजे आम्हला कोणाला टेन्शनच नाही......सगळी लग्नाची जेम्मेदारी तुम्ही घेतली तर....

वेडींग प्लॅनर नंबर 3 : हो......तसच काहीसं......हे बघा आता मागच्या महिन्यातच जयपुरला आम्ही हा वेडींग प्लॅन केलेला....आणि पुल साइड ला त्यांची बॅचलर पार्टी अरेंज केलेली......इव्हन ओल्ड एज लोकांसाठी पण आम्ही पार्टी अरेंज केलेली......हे एक शाही लग्न होत......तुम्हाला फोटो मधुन अंदाजा आलाच असें.......

करूणा : हो ना(काळजीने)

वेडिंग प्लॅनर नंबर 4 : तसच आम्ही जेवणाचा मेनु म्हणजे कॅटरेस पण प्रोव्हाइड करतो......त्यामध्ये तुम्ही सिलेकट केलेल्या डिश मध्ये आम्ही थोडा ट्विस्ट आणतो......म्हणजे.....पनीर डिश असें तर त्याची आम्ही एक वेगळीच डिश बनवतो.....जी आज परेनंतर कोणी टेस्ट केलेली नसते......समजा गुलाबजाम असें तर त्याचा केक बनवतो.....आईस्क्रीम बनवतो.....असे बरेच नामवंत शेफ आहेत आमच्या कडे ज्यांची सिग्नेचर डिश सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते...........आणि ज्या हिशोबाने तुमची वेडींग थीम असेंन त्याला मॅच होईल असेच कपडे नवरा आणि नवरीला दिले जातात....सेम तसेच त्यांच्या घरच्यांना पण दिले जातात.........

अजित : वाव thats great....... मला आवडेन अस लग्न करायला........

वेडींग प्लॅनर नंबर 1 : सर अजुन एक......रिसेप्शन ला तुम्हाला एक खास एंट्री दिली जाते.......ज्यात आम्ही तुम्हाला एका हार्ट मधुन किंवा एका पिंजऱ्या मधुन तुमची एंट्री करू शकतो....त्या मध्ये सुद्धा बरेच ऑप्शन आहेत.....

करूणा : खर सांगु..... माझं तर आता डोकच काम करत नाही....कारण हे सगळं पहिल्यांदा आहे ना माझ्यासाठी..... सो तुम्हीच सांगाणा.... काय आणि कस करायचं.....

वेडींग प्लॅनर नंबर 5 : डोन्ट वरी मॅम..... सगळं व्यवस्थित होईल......फक्त मला हे सांगा तुमचे एकुण गेस्ट किती असतील.....???

करूणा : माझ्याकडुन कमीत कमी 200 असतील.......

अजित .....: माझ्याकडुन कमीत कमी ...........2000 च्या आसपास असतील.......

करूणा : व्हॉट......??????(सुवर्णा सुद्धा तोंडात बोट घालते)

अजित : हो त्यात फॉरेन कलाइन्ट सुद्धा असतील......सेलिब्रिटी असतील......मीडिया वाले असणार......मी तर 2000 नुसते सांगितले..... त्याच्याहून जास्त पण होतील........

करूणा : अजित(काळजीत)

अजित : आणि हो फॉरेन कलाइन्ट साठी रहाण्याची सोय पण करावी लागेन......

वेडींग प्लॅनर नंबर 1 :नक्की सर....तुमचं लग्नाचं डेस्टिनेशन हे मुंबई असणार ना ?????

अजित : हो हो.....???आमचे सगळे फंक्शन मुंबई मध्येच असणार.....

वेडींग प्लॅनर नंबर 2 : मॅम तुम्हाला ह्या मधलं काही आवडलं का.......?????

करूणा : मला तर अजुन काही समजत नाहीये.....तुम्ही च ठरवा.......काय ते......

वेडींग प्लॅनर नंबर 2 : ओके नो प्रॉब्लेम...... इफ यु डोन्ट माइंड मी एक सजेस्ट करू का......

करूणा : हो नक्की.....

वेडींग प्लॅनर नंबर 2 : तुम्ही दोघे मराठी कपल आहात..... सो आपण ह्याची थीम लग्नामध्ये मराठमोळा ठेवूया.....म्हणजे जस तुम्हाला नऊवारी नेसवुया आणि सरांना......धोती कुरता..... त्यावर मॅडम ला छान असे गजरे आणि बरेच असे सुट होईल असे ओरनामेंट्स दिले जातील.....सेम मॅडम ला सुट होईल असच सरांना पण काही मोत्यांचे हार दिले जातील......त्यावर स्टोल पण दिला जाईल....,आणि एक फेटा दिला जाईल....तुमच्या दोघांना मॅच केलं जाईल

करूणा  : मस्त आयडिया...... मला आवडेन नऊवारी.......(खुश होत)

वेडींग प्लॅनर नंबर 1 : आणि वाटलं तर रिसेप्शन ला आपण काही वेगळं ठेवु..... म्हणजे लॉंग शाही गाऊन ब्राइड साठी आणि ग्रुम साठी सुद्धा त्याला मॅच होईल अशी हेवी एम्ब्रॉयडरी वाली शेरवानी  देऊ.....आणि जमलंच तर रिसेप्शन ची थीम......आपण लाईट कलर मध्ये ठेवुया.....

अजित : हो चालेना .....बीकॉज..... रिसेप्शन हे दुसऱ्या दिवशी असें........संध्याकाळी सात वाजता.....    

करूणा तर एक एक गोष्ट एकुण जरा शांत होते.......

वेडींग प्लॅनर नंबर 5 : मॅडम.....सर.....तुमचा आता स्वतःचा फॅशन हाउस आहे.....सो तुम्ही प्लिज आम्हाला कळवा....की तुम्हाला कोणत्या रंगाचे कपडे लग्ना मध्ये फेऱ्यांसाठी आवडेन.....

करूणा : मला तर हिरवी किंवा पिवळी साडी आवडेन........आणि त्यालाच मॅच होईल असे अजितला  कपडे बनवायचे.... 

वेडींग प्लॅनर नंबर चार : ठिके....आम्हाला दोन दिवस दया..... आम्ही सगळी डिटेल्स कलेक्ट करून तुम्हाला देतो.......सर प्लिज आम्हाला तुम्ही तुमच्या हॉटेलची डिटेल पाठवा.....  जिकडे तुमचं लग्न होणारे.....आणि राहिला प्रश्न लग्न पत्रिकेचा.....मी आमचे दोन मानस तुमच्या घरी पाठवतो.....ते तुम्हाला लग्न पत्रिकेचे काही डिझाईन्स दाखवतील......तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही आम्हाला कळवा........

अजित : हो नक्की कारण लग्नाची पत्रिका माझ्या आईलाच सिलेक्ट कारायचिये.....तुम्ही बाहेर जाताना.....उद्याची अपाईनमेंट घ्या तुम्हाला आमची रिसेप्शनिस्ट आमचा शेड्युल बघुन टाईम सांगेन....

वेडींग प्लॅनर नंबर चार......ok सर......तुम्हाला अजुन काही शंका......

करूणा शांत बसुनच मानेने नाय बोलते.....करुणाची शांतता अजित हेरतो........

वेडींग प्लॅनर नंबर 1 : ठिके आम्ही आता निघतो....... दोन दिवसात सगळी डिटेल देतो.......

(सगळे निघुन जातात.....तरी पण करूणा शांतच असते)

अजित :वेल कशा वाटल्या तुम्हाला .......त्यांच्या आयडिया.....

सुवर्णा :काहीही म्हण...... अजित ......खुपच मस्त आणि धमाकेदार लग्न होणारे हे........(खुश होतच)

अजित : हो हो......मला पण आवडेन माझ्याच लग्नात धमाल करायला......हो ना करूणा ........

करूणा च अजितच्या बोलण्याकडे लक्षच नसत......

अजित : करूणा......करुणा.....

करूणा : अ...... सॉरी माझं लक्ष नव्हतं......बोलना.....

सुवर्णा : (मुद्दामून)मी काय बोलते अजित......मलाना.......तुझं पूर्ण ऑफिस बघायचंय.....तर तुम्ही दोघे बसुन गप्पा मारा.........मी आलेच

करूणा : अग पण अस अचानक

सुवर्णा : अचानक काय......मी आधिच ठरवलेलं मी आज अजितच ऑफीस पूर्ण बघूनच येणार.....तुला चालेना अजित......

अजित : हो हो चालेन काय दोडेन.....(हसत)

सुवर्णा निघुन गेली तरी करुणाच लक्ष नव्हतं......अजित त्याच्या केबिनचा दरवाजा लॉक करतो......आणि हळुच येऊन करुणाला मागुन मिठी मारतो......तशी करूणा तंद्रीतुन बाहेर येते......

अजित : ये वेडा बाई.....काय झालं.......आज एवढी शांत का.....

करूणा : (लपवत)नाही रे अस काही नाही........ते सहज......डोकं दुखतंय ना म्हणुन.......(अजित तिची चेर त्याच्या समोर फिरवतो......आणि तिच्या डोळ्यात बघतो.....करूणा तिची नजर चोरत असते)

अजित : माझ्याकडे बघ.....(करुणाचा हात हातात घेऊन.......)काय झालं.....खर खर सांग......

करूणा : अजित तुला राग नसेन येणार तर सांगते.......

अजित : आता राग कशाला येईल.....तु बोलुन तर बघ......तुझं मन हलकं होईल

करूणा : अजित मला मान्य आहे.....तुझी खुप इच्छा असेंन ह्या लग्ना बाबतीत....... तुझी पण काही अपेक्षा असतील....... लग्न म्हंटलं तर सगळ्यांनाच काहींना काही अपेक्षा असतात.......म्हणजे माझ्या पण अपेक्षा आहेत....पण ना तु ज्या पद्धतीने हे लग्न करतोय त्याचा खर्च समजतोय ना तुला.....?????

अजित : हो का नाही...... समजणार.....

करूणा : अरे पण एवढा खर्च....... म्हणजे हा खर्च लाखात नाही तर किती तरी करोड मध्ये होणार(काळजीत)

अजित :हो माहिते मला......आणि तुला काय म्हणायचं आहे ते पण मला माहिते(अजित हळुच करुणाच्या पायापाशी बसतो)हे बघ ज्या दिवशी माझे आई आणि डॅड तुला भेटायला आलेले तेव्हाच घरी आल्या आल्या डॅड ने दिसाइड केलेलं....की लग्नाचा सगळा खर्च आमच्या कडुन होणारे........आणि त्यांची स्वतःची इच्छा आहे....की त्यांच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न रॉयल व्हावं.......मग त्यांची ही अपेक्षा आपण कशी काय मोडायची........आणि आपण आधीच क्लीयर केलं आहे मग का आपण जास्त विचार करायचा.....ह्या विषयावर......खर सांगु जशी माझ्या डॅड ची इच्छा आहे तशीच माझी सुद्धा इच्छा आहे.......मला।सुध्दा माझ्या नवरीला थाटामाटात मिसेस मोहिते बनवुन अनायचंय.....मग तेवढे तरी स्वप्न मी बघुच शकतो ना......माझा पण तुझ्यावर हक्क आहेच.....ना.....तु नको काळजी करुस.  .......तु जेवढा तुझ्या आई वडिलांचा विचार करतेस.....ना तेवढाच मी सुद्धा करतो.....कारण ते माझे पण आई वडील आहेत...... हो ना करूणा

करुणाचे डोळे भरून येतात

करूणा :अजित ( रडतच त्याला मिठी मारते)

अजित : तुला सांगु मी खुप आधीच ह्या गोष्टींचा विचार केलेला......पण तु जास्त वाईट नको वाटुन घेऊस........मला सुद्धा सगळ्या गोष्टींची कल्पना आहे.....आणि मी वाटलं तर डॅड ला तुझ्या वडिलांबरोबर बोलायला सांगेन.....काळजी नको करुस........

करूणा : अजित सॉरी........मी असा विचार नव्हता करायला पाहिजे.......

अजित :आता अस बोलुन तु मला लाजवतेस......आता हा टॉपिक बंद कर.......आणि एक छान किस दे(हसत)

करूणा : झालास सुरू.......परत.....(लाजत)

अजित :  आता त्यात काय झालं.....माझी होणारी बायको आहेस.....मग त्यात काय झालं......

करूणा : नो अजित.......प्लिज नो.......

अजित : नो काय नो.....(अजित एक एक पाऊल करुणाच्या पुढे चालतो.......करूणा सुद्धा अजितला रोकत एक एक पाऊल मागे जाते.....तशी ती दरवाजाला धडकते....)

करूणा :अजित तु विसरलास कदाचित....... हे ऑफिस आहे.......(डोळे बंद करून बोलते)

अजित :मला माहीत आहे हे माझं ऑफिस आहे आणि माझंच केबिन आहे.......म्हणुन तर मी एक किस मागतोय.......

करूणा : अजित नो.......प्लिज प्लिज प्लिज.....

तेवढ्यात अजित हसतो.........काय रे देवा किती घाबरतेस......चल आज सोडतो.....पण हो लग्ना नंतर नाही सोडणार कळलं

करूणा लाजतच मान खाली घालते ......तेवढ्यात सुवर्णा........डोर वर नॉक करते.......

अजित : एस कमिन.......

सुवर्णा : अजित मी आहे.....करूणा आता निघुया.......घरी परत आज कोणी पाहुणे पण येणारेना.....

करूणा : हो चालेना..... खुप उशिर होईल.......अजित निघु का आम्ही.......

अजित : हो हो .....चालेल.....मी ड्रायव्हर ला सांगतो तुम्हाला सोडायला.......

करूणा : नको नको  आम्ही रिक्षाने जातो........

अजित : ठिके तु ज रिक्षाने मी सुवर्णा ला सांगतो सोडायला.......तुला चालेना सुवर्णा.......

करूणा : अच्छा ठिके चालेल मला पण( तोंड वाकड करत)
तसे दोघे हसतात.......आणि एकमेकांना  बाय करत निघुन जातात

(काय मग  कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा......तुमच्या कामेंटद्वारे........ वाचकाहो...... भाग पोस्ट करण्यात थोडा उशीर होत आहे .....कारण दिवाळी आहे........त्यामुळे थोडं बीझी आहे........मी तरी पण ट्राय करेन लवकरात लवकर भाग पोस्ट करण्यासाठी)




🎭 Series Post

View all