Login

चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा)पार्ट 53

Untold love story (part 53)

पार्ट 53

सगळे जण घरी आल्यावर दमुन झोपुन जातात.......

दुसऱ्या दिवशी...... सकाळी सकाळी सगळे मधुची बहीण आणि तिचा भाऊ सगळ्यांचा निरोप घेऊन निघुन जातात(करुणाच्या घरी नाश्ता करताना.....)

दत्तात्रय : मधु .....एक  काम कर.....लग्नाच्या पत्रिकेचा मजकुर लिहुन ठेव......आणि मोहितेंच्या घरी फोन लावुन त्यांना.....अजितची सगळी डिटेल विचार.....म्हणजे.....त्यांचं नाव गाव....त्याची डिग्री....

मधु : आता डिग्री कशाला हाविये..........?????

दत्तात्रय : अग ते आता फॅशन आहे.....मुली मुलं....... ना त्यांच्या नावापुढे त्यांचं शिक्षण लिहितात......आणि सुवर्णा कडुन सगळा मजकुर लिहुन घे......आजच.....मला उद्या दे....मी येताना..... पत्रिकेच्या दुकानात  जाऊन काही डिझाइन आणतो....त्यातली तुम्ही सगळे मिळुन एखादी डीसाईड करा.....जर नाहीच आवडली तर दुसऱ्या दुकानात जाऊन बघु..... आणि हो.....सगळ्यांची मत घे......

मधु : ठिके......(हसत)

मंदा(वहिनी) : काही म्हणा भावोजी....कालचा कार्यक्रम खुप छान पार पडला......देव करो....पुढचे कार्य पण असेच निर्विघ्न पार पडो......(हात जोडत देवाला बोलते)

दत्तात्रय : हो वहिनी......असच होईल.....पण आपल्याला......जरा लवकरच आवराव लागेन.....एकच महिना आहे....त्यात सगळ्यांचे.......कपडे घायचेत....ह्यांच्या हळदीचे....लग्नाचे.....रिसेप्शन चे....आणि त्यात ते सगळ्या लेडीजला ब्लाउज पण शिवुन भेटला पाहिजे ना.....

मधु : हो ना ....मला तर टेन्शन आलय......कस होईल एवढं सगळं.......(काळजीत)

मंदा : नको ग काही काळजी करू....होईल सगळं व्यवस्थित.......

दत्तात्रय : ते मुली काय करतायत.......

मधु : झोपल्यात अजुन.... फक्त निशा गेलीये कामाला..... काल सगळ्याच खुप दमल्या ना

दत्तात्रय :वहिनी सुवर्णा चा काही इंटरव्ह्यू कॉल आला का....शाळेतुन.....????

वहिनी : नाही अजुन.......येईल बोली दोन चार दिवसात......

दत्तात्रय :ठिके.....निशा आणि अश्विनी तर आहेच चांगल्या पदावर कामाला..... सुवर्णा पण लागली तर मग आपली काळजी मिटली.....

मधु : हो ना.....होईल तस......तीच.....कष्टाळू आहेत आपल्या सगळ्या पोरी .....

तेवढ्यात दत्तात्रय ला सीमाचा (मधुच्या बहिणीचा कॉल येतो)

दत्तात्रय : हा बोल ना सीमा....काय झालं......?????

सीमा : दाजी .....काळजी नका करू .......सगळं व्यवस्थित आहे.....मी ह्या साठी कॉल केला.....काल साखरपुड्यात ज्या माणसाने तुमचा फोन नंबर घेतला ना....ते माझ्या सासरच्या साईट चे माणस आहेत....म्हणजे ते मुंबईत च रहातात......तर त्यांनी मला कॉल केला.....त्यांना जरा तुमच्या बरोबर बोलायच होत......तर ते बोले की आज तुम्ही संध्याकाळी त्यांना भेटाल का.....????

दत्तात्रय : हो हो .....भेटेना.....त्यांना सांग मला भेटायला.....


सीमा : पण हो सगळे घरात असतीलना.......म्हणजे जे काय  बोलायचं असेंन ते सगळ्यान समोर बोलता येईल......

दत्तात्रय : हो हो असतील ना.......तु त्यांना संध्याकाळी सहा ला बोलावं....

सीमा : हो चालेन

दत्तात्रय : आणि हो घरी पोहोचल्यावर फोन कर ...नाहीतर तुझी बहीण माझं डोकं खाईल(हसत)

सीमा : हो नक्की.......(फोन ठेवतात)

मधु : काय झालं ओ.......(काळजीत)

दत्तात्रय फोन वर बोलेल सगळं संभाषण सांगतात......

मधु : काय असु शकत काम.......

दत्तात्रय : अग असेंन एखाद्या साड्यांची ऑर्डर वगैरे.... म्हणुन येत असतील.....चल मी निघतो......आता......  उगाच उशीर होईल.....आणि करुणाला जर आज यायचं नसेन दुकानावर तर नको येऊदे.......

मधु :ठिके......

@@@@@@@@@@@@@@@@@

मोहितेंच्या ऑफिस मध्ये मीटिंग सुरू असते....

अजित कॉन्फरन्स हॉल मध्ये जसा येतो तसे सगळे फुलांचा गुच्छा घेऊन त्याला कॉंग्रेचुलेशन बोलतात.......तो सुद्धा सगळ्याना हसत थॅंक्यु बोलतो........

थोड्याच वेळात मीटिंग सुरू होते........

अजित : तुम्ही सगळे......आज इथे मला शुभेच्छा दिल्या त्या बद्दल थॅंक्यु......तुम्हाला सगळ्याना माहीतच असें की लवकरच मी थोड्या दिवसाच्या सुट्टीवर जाणारे.....सो तुम्हाला सगळ्यांना आपल्याला जी us वरून नवीन कलेक्शन ची ऑर्डर आली आहे ती आपल्याला लवकरात लवकर कम्प्लिट करावी लागेन......मला माहित आहे हे खुप कठीण आहे.....पण त्या साठी तुम्हाला जर वाटलंच तर मॅन पावर आपण अजुन वाढवुया...... पण हे काम लवकरात लवकर कम्प्लिट करायचं......कोणाला काही ऑब्जेकक्षण..... किंवा काही शंका......

एम्प्लॉई नंबर 1 : सर......मॅन पावर जरी आपण वाढवली....तरी फायनान्शियली सुद्धा आपल्याला तयार रहावं लागेन। .........जर समजा आपण हे काम दोन विभागात वाटलं तर मला वाटतं हे लवकर कम्प्लिट करू.....

अजित : म्हणजे.......

एम्प्लॉई 1 : सर आपण आपल्या दिल्ली मधल्या ऑफिस स्टाफ थोड्या दिवस इथे बोलावु किंवा त्यांना हे काम देऊ....कारण नाहीतरी तिकडच्या ऑर्डर ला अजुन बरेच महिने बाकी आहे....आणि कोणत्याच कलाइन्ट ला एवढी घाई नाहीये..........मग हे काम आपण तिकडे दिल्ली ला अर्ध देऊ......वाटलंच तर आपण एखादी ऑनलाइन मीटिंग घेऊ.....त्यांना आयडिया येईल की कस काम करायचं आहे ते.......

अजित: not bad आयडिया......

एम्प्लॉई  नंबर 2 : पण ते जर एक्सट्रा वर्कींग आर्स मध्ये काम करत असें तर आपल्याला त्यांना एक्सट्रा पगार द्यावा लागेन.....

अजित : चालेना.... त्यात काय एवढं....त्यांची मेहनत त्यांना मिळालीच पाहिजे.....आणि जे कोणी जास्त चांगले डिझाइनस  बनवतील.....त्यांना आपण गिफ्टस देऊ.....म्हणजे त्यांना पण छान वाटेनं

सगळे खुश होतात......

अजित : आणि हो......(मॅनेजर ला) आपण जमलं तर त्यांना दिल्ली त बसुन हे काम सांगुया म्हणजे त्यांचा ट्रॅव्हलिंग वाचेन......तिकडे सुद्धा हे काम होऊ शकत.....वाटलंच तर मी आणि डॅड तिकडे एक चक्कर मारू.......सगळ्याना सांगा ह्या महिन्यात जरा जास्त काम असें.....कारण ह्यामुळे आपल्याच कंपनीला फायदा होणारे....... जर हे काम आपण वेळेत कम्प्लिट केलं तर पुढचे ऑर्डर सुद्धा आपल्यालाच मिळतील.......ठिके.....मग लागा सगळे कामाला...... ऋषी(मॅनेजर)तु मला सगळी डिटेल दे.....आता परेनंतर काम कुठं परेनंतर आलं आहे....ते मला एकदा बघुदे......

अजित जसा जसा सगळ्याना गाईड करत होता.....तस तसे माहिते मनातुन खुश होत होते.....आता त्यांना त्यांचा निर्णय एक दम परफेक्ट होता ह्याचा आनंद होतो.......

मीटिंग संपल्यावर सगळे आपापल्या डेस्क वर जातात.....

अजित आणि त्याचे डॅड फक्त कॉन्फरन्स रूम मध्ये असतात.......अजित एक काम होत तुझ्याकडे.....

अजित : हा बोलाना डॅड......??????

डॅड : मला तुला आणि करुणाला सेम कॉस्च्युम बनवायचे आहे.....सो जमलंच तर लवकरात लवकर करुणाला आपल्या ऑफिस मध्ये बोलावं.....आणि मी तुझ्या लग्नाची सगळी अरेंजमेन्ट ची जीमेदारी xxx ह्या वेडींग प्लॅनर ला दिली  आहे ते दुपारी दोन वाजेपर्यंत येतील.......जमलं तर तु आजच बघ करुणाला टाईम आहे का....म्हणजे आपल्याला सगळं लवकर डीसाईड करता येईल.......

अजित : ठिके डॅड मी कॉल करून विचारतो तिला......

अजित त्याच्या केबिन मध्ये जातो.....आणि करुणाला कॉल लावतो......

अजित : हॅलो करूणा.....कुठेस.....

करूणा : अजुन बेडवर च आहे......(आळस देत)

अजित : अरे टाईम बघ आकरा वाजलेत ........

करूणा : हम्मम थोडी थकलेले म्हणुन जास्त झोप लागली....तु कुठेस....

अजित : अजुन कुठे ऑफिस ......आज इम्पोरटंट मीटिंग होती......म्हणुन लवकर आलो.....अच्छा ते सोड....तु आज फ्रि आहेस का......

करूणा : हो का रे.....काय झालं.....???..

अजित : तु आज ऑफीस ला येशील.....????

करूणा : हो येईल........ना काही काम होत का.....????₹

अजित : हो....ते डॅड ने वेडींग प्लॅनर ला आपल्या लग्नाचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे....तर ते येणारे.....आज दुपारी दोन वाजता.........ते आपल्याला त्यांच्या काही आयडिया देणारे.....प्लस आपल्याला आपला वेडिंग कॉस्च्युम पण बनवायचाय......

करूणा : अजित वेडींग प्लॅनर ......कॉस्च्युम....ते सगळं ठिके....पण .....(थोडं थांबतच बोलते.......)

अजित : मला माहिते तु काय विचार करतेस.....हाच ना हा खुप मोठा खर्च आहे ते.... करूणा एक लक्षात ठेव तु अजित मोहितेंचि होणारी बायको आहेस ...  आणि हे सगळं डॅड ने ठरवलं आहे.....कारण आमच्या घरच पण हे शेवटचं लग्न आहे.....सो त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या ते पुर्ण करतायत thats सीट......सो हा सगळा खर्च अमच्याकडून आहे......तु जास्त टेन्शन नको घेऊस.....

करूणा : हम्मम......

अजित : हे त्या दिवशी आई आणि डॅड ला सांगितलेलं .....सो जास्त विचार करू नकोस.....वेळेवर ये.......ठिके.....

करूणा : ठिके......

अजित : चल बाय......लव्ह यु........

करूणा : लव्ह यु टु

दोघांचं पण बोलणं झाल्यावर करूणा तिच्या वडिलांना सगळ्या गोष्टी सांगते.......ते सुद्धा तिला सांभाळुन जा म्हणुन सांगतात.......

अजितच्या सांगण्यावरून करूणा सुवर्णा ला घेऊन त्याच्या ऑफिस मध्ये जाते......सुवर्णा अजितच ऑफिस न्हयाळत असते.....करूणा आता मोहितेंचि सुन आहे हे सगळ्याना माहीत असत....म्हणुन तिचा आदर सत्कार करत सगळा स्टाफ तिची विचारपुस करत......

सुवर्णा : बापरे.....करूणा केवढं मोठं ऑफिस आहे हे......आणि ते बघ त्या पुतळ्याला घातलेला ड्रेस किती मस्त आहे......थांब मी त्याची किंमत बघुन येते.......(करूणा तिला अडवणार तोपर्यंतर ती त्या पुतळ्या जवळ पोहोचते.......त्याच्यवरची किंमत बघुन तर तिच्या कपाळावर आठया पडतात....आणि ती चुपचाप परत करूणा जवळ येऊन उभी राहते.....करूणा हसतच तिची करतुत बघते)

करूणा : काय झालं.....(हसत)किती किंमत होती......

सुवर्णा : अग एक लाख वीस हजार.......(काळजीत)

करूणा : एवढी...... अग हो असणारच सगळे मोठे मोठे लोक घालतात ना त्याला......आणि ह्यांचे सगळे ड्रेस हॅन्ड मेड असतात.....सगळे करींगर त्यांच्या हाताने.....त्यांच्या कष्टाने बनवतात....त्यांचा ड्रेस मटेरिअल पण इम्पोरटंट असतो........म्हणुन आणि त्यात सगळे......मोठे मोठे सेलिब्रिटी पण ह्याला घालतात .....म्हणुन हे महाग असतात.....

सुवर्णा : हो ते पण बरोबर आहे......(तेवढ्यात अजितचा मॅनेजर त्या दोघीना बोलवायला येतो.......

मॅनेजर : मॅडम सरांनी आत बोलावलंय ........तुम्हाला(तशा दोघी आत जातात........)

करूणा नॉक करून आत जाते.....तशी सुवर्णा चालु होते.....

सुवर्णा : अजित किती सुंदर आणि मोठं ऑफिस आहे रे तुझं.....आणि किती सारे कपडे......सॉरी किती ते डिझायनर लेहेंगे ....सारी .......वाव.....खुप मस्त.....मला तर सगळंच आवडलं......

अजित तिचा आनंद बघुन हसतो........करूणा सुवर्णा तुम्हाला इकडे येताना काही त्रास नाही झाला ना............

करूणा काही बोलणार तेवढ्यात पार्ट सुवर्णा बोलते....नाही नाही अजिबात नाही.......उलट खुप एक्साईटमेंट वाटत होती......एवढ्या मोठ्या डिझायनर च्या ऑफिस ला जातोय म्हणजे .....अमेझींग फ़िलिंग.........(खुश होत)तेवढ्यात करूणा हळुच सुवर्णा च्या हातावर हात ठेवते.....

करूणा : बस बस.......किती बोलशील.......(हसत)

सुवर्णा : ओ सॉरी......खुप जास्तच बोली.....(हसत)

अजित : (जोरात हसत) अग नाही नाही......उलट छान वाटलं...


तुला हसताना पाहुन....... तुझा आनंद पाहून.......

अजित कॉल करून त्याच्या सेक्रेटरी ला ज्युस पाठवायला सांगतो......

अजित : करूणा थोड्याच वेळात वेडींग प्लॅनर वाले येतील तेव्हा......आपण त्यांना सांगु आपल्या काही चॉईस असतील ते.....आणि ते आपल्याला त्यांचा पण आयडिया सांगतील......बघु आपण.....

सुवर्णा : अजित तुझं केबिन पण मस्त आहे.....हे सगळ्या मॉडेल्स चे फोटो जे आहे त्यानी तुम्ही बनवलेला ड्रेस घातलाय का.....

अजित : हो हो.....आमचे shows होतात....तेव्हा फक्त आमचंच कलेक्शन असत......हे सगळे टॉप मॉडेल आहे.......

सुवर्णा : हो हो....पाहिलय मी ह्या सगळ्याना....... टीव्ही मध्ये.....खुप छान वाटलं इकडे येऊन.....

तेवढ्यात त्यांचा ज्युस येतो.......सुवर्णा असल्यामुळे अजित आणि करुणाला जास्त काही बोलता येत नाही......ते दोघे इश्चर्यानेच एकमेकांना खुनवत असतात.....तेवढ्यात अजितला मॅनेजर वेडींग प्लॅनर वाले आले आहे हा निरोप देतो.....

अजित : हा ठिके दे त्यांना आत पाठवुन...... आणि नंतर मी सांगेन तेव्हा मनीषा ला पाठव करुणाच माप घ्यायला.....

अजितच्या सांगण्यावरून वेडींग प्लॅनर वाले आत येतात.....


(काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा कामेंटद्वारे...... वाचकाहो दिवाळी मुले बरीच काम असल्यामुळे जसा वेळ मिळतो तशी मी कथा लिहते..... जर कथा येण्यात वेळ झाला तर नाराज होऊ नका.... मी नक्की प्रयत्न करेन लवकर कम्प्लिट करायचा) धन्यवाद.....…










🎭 Series Post

View all