Login

चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा) पार्ट 51

Untold love story (part 51)

पार्ट 51

अजित करुणाला संध्याकाळचा कॉल करतो.......

करूणा : हा बोलना अजित ......काय झालं.....अग डॅड ने banquet बुक केलं आहे ....त्याची डिटेल मी पाठवतो तुला आता......

करूणा : ठिके पाठव मला.......काय करतोयस.....????

अजित : काही नाही ग .....आता जस्ट ब्रेक झाला....म्हणुन तुला आधी कॉल केला.....आणी तु इंविटेशन कोणा कोणाला दिल...

करूणा : ते सगळं आई आणि बाबा बघतायत......मी फक्त आपल्या फ्रेंड्स ला दिल..........

अजित : ठिके....मग झाली सगळी तयारी.....?????

करूणा : हो झाली.....उद्या मेहेंदी वाली येणारे...... संध्याकाळी......सो मी बीझी असणार.....तुझी झाली तयारी

अजित : मला जास्त वेळ नसतो....सो सगळं आई बघते.....तीच सगळ्यांना इंविटेशन देते.....मी जेव्हा जातो घरी तेव्हा दमलेलोच असतो....त्यामुळे थोडा पण वेळ नाही मिळत आई बरोबर बोलायला..... आता बघतोय उद्या पण सुट्टी भेटते का.....म्हणजे मी पण आईला मदत करेन.......

करूणा : हम्मम ......बरोबर आहे.....मी आता थोड्या वेळाने निघते तुझ्या साठी अंगठी आणायला......

अजित : हो ......मग कशी करणार......

करूणा : आता ते तिकडे गेल्यावरच कळेल मला......पण तुझी काही चॉईस आहे का.....

अजित : माझी चॉईस तर तु आहेस... आता तू बोलतेस तर बघतो अजुन कोणी भेटतय का.....(मुदामून चिडवत)

करूणा : हो का....आणुन तरी दाखव मग बघते......

अजित : हहहह......येडा बाई......लगेच राग येतो......

करूणा : तु बोलतोच तसा......राग येण्यासारख

अजित : (हसत) चल आता एक काम कर.....मला छान पैकी एक किस दे.....

करूणा : हो का.....ऑफिस मध्ये हे सगळं  नाहीं करत....

अजित :ये आता बस हा....चल लवकर दे.....

करूणा लाजतच त्याला मोबाईल वरून फ्लाईंग किस पाठवते.....

अजित पण तिला लव्ह यु बोलुन कॉल ठेवतो

भर भर दिवस निघुन जातात..... करुणाच्या हाताला अजितच्या नावाची मेहेंदी लागते......

मोहितेंच घर जसा शाही राजवाडा चमकतोय असा चमकत होता.....चमकणारच.... त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा साखरपुडा जो आहे......

करुणाच्या घरी सगळे मस्त पैकी आपआपल्या हातावर मेहेंदी काढुन घेत होते..... तेवढ्यात तिच्या मैत्रिणी संगिता आणि ध्रुवी तिकडे येतात......

संगिता : आम्ही पण येऊ का......मेहेंदी काढायला.....

करूणा तिच्या मैत्रिणींना बघुन खुश होते.....आणि जोरात पळुन त्यांना मिठी मारते .....किती छान सरप्राईज दिल यार.....तुम्ही दोघांनी.....

ध्रुवी :अरे अस कस....आमच्या बेस्टी चा साखरपुडा आहे....मग आम्ही न येऊन कस चालणार.....

करूणा : खरच खुप छान वाटलं.....या मी तुम्हाला माझ्या बहिणी आणि मोठ्या आईला भेटवते.......

करूणा : मोठी आई इकडे ये....ही माझी मोठी आई.....(संगिता आणि ध्रुवी त्यांना नमस्कार करतात)

आणि ह्या सगळ्या माझ्या बहिणी..........
सगळ्या एकमेकांना हॅलो करतात........

करूणा :ये यांना तुम्ही पण ह्यांच्या नंतर मेहेंदी काढुन घ्या......करूणा तिच्या पार्लर वालीला सांगुन त्यांना पण मेहेंदी काढायला सांगते......

संगिता : करूणा तुझी दाखव मेहेंदी......(करूणा तिचा हात पुढे करते......

ध्रुवी :मस्त.......खुप छान काढली ना.....संगिता....तु फोटो काढ सगळ्यांचे......(संगिता प्रत्येकाचे तिच्या मोबाईल ने फोटो काढते.....सगळे जण मस्त मस्त एक एक एक्शन करून फोटोचा आनंद घेत होते.......)

मंदा काकी आणि मधु सगळ्याना स्नॅक्स आणि ज्युस आणतात..........

मधु : संगिता .....ध्रुवी.....उद्या आई बाबाना आवर्जुन घेऊन या.....

ध्रुवी : हो काकु .....आमचे घरचे पण मस्त  तयारीत आहे.....दोन दिवस झाले माझी आई तर मस्त शॉपिंग करून आली....(हसत)आणि हो काकु उद्या आम्ही सगळे लवकर येतो....तेवढीच तुम्हाला मदत होईल......

मधु : बापरे मदत....मला नाही.....तुमच्या ह्या मैत्रिणी ला करा.....उद्या बघाच किती राबवते ती तुम्हाला

संगिता : जाऊद्या ओ काकु ......आताच करून घेऊद्या लाड.....उद्या सासरी गेली तर कोण करणार.....असा हट्ट......

संगीताच्या बोलण्याने....मधुच्या डोळ्यात पाणी येत......आणि ती चटकन किचन मध्ये जाते....मंदा ते बघते.....आणि ती पण तिच्या मागे जाते.....

मंदा हळुच मधुच्या खांद्यावर हात ठेवते.......मधु मंदाच्या गळ्यात पडुन रडते......

मंदा : अग अस काय करते तु मधु.....मुलगी आहे ती....एक ना एक दिवस सासरी जाणारच.....हे तर परक घर आहे तीच.......आता तर ती स्वतःच्या हक्काच्या घरी जाणार......
मधु :समजतंय ओ सगळं मला.....पण काय करणार.....आई आहे ना......आईच मनच अस असता.....ताई .....एवढीशी होती ती.....तिला जेव्हा मी माझ्या हातात घेतली ना तेव्हा....खरच अस वाटलं नाही की ही माझी नाही तुमची मुलगी आहे .....ती आमच्या घरात आली....आणि आमच्या घराला घरपण आलं........ती पहिल्यांदा जेव्हा चालायला लागली तेव्हा तिच्या पायातले पैंजण अख्या घरात आवाज करायचे......ती आजारी पडायची तर तिचे बाबा रात्रभर तिच्यासाठी जागायचे.....त्यांचा तर जीव नुसता धाकधुक व्हायचा.....ती पहिल्यांदा मला आई बोली.....तर तिचा बाबा रुसून बसायचा.....मला तर खूप हसु यायचं त्यांच्यावर..... पण जेव्हा ती बाबा बोलायला शिकली.....तेव्हा त्यांनी तिला आखी सोसायटी फिरवली......हे तर तिला खांद्यावर बसुन सगळ्यांच्या घरात जाऊन सांगत होते.......करूणा मला बाबा बोली.....करूणा मला बाबा .....बोली.....तिच्या एका शब्दा साठी किती वेडे झालेले ते......जस जशी ती मोठी होत गेली..... तस तशी त्यांना पण त्यांची चिमणी आता भुर्रकन उडुन जाण्याची भीती वाटू लागली.....ते नेहमी बोलायचे। ....करूणा लहानच बरी वाटते......मला माहितीये ते असे का बोलतायत.....त्यांना नेहमी हीच भीती वाटायची......ही मोठी झाली की तिला एक राजा घ्यायला येणार.... आणि आमची राजकुमारीला घेऊन जाणार.....आणि आता तर  खरच ती जाणार.....वहिनी.....मी तरी स्ट्रॉंग आहे पण हे..... हे तर खुप हळवे आहेत.......आपल्याला वरच्या वर दाखवतायत ...की ते आनंदी आहेत पण खरंच ते खुप आतल्याआत रडतात.....करूणा जेव्हा हे घर सोडुन जाईल तेव्हा तर हे घर खायला उठेन आम्हाला.....

मंदा :अग अस काय करतेस...आपण नाही का आपल्या घरच्यांना सोडुन आलो......आपल्याला पण तर त्रास झाला.....एक लक्षात ठेव.....मुली पराया धन असतात....एक ना एक दिवस त्यांना त्यांच्या हक्काच्या घरी जावंच लागत.....आणि तु जर अस वागलं तर भाऊजीना कोणी सांभाळायचं.......आता बस कर.....चल बाहेर चल....अजुन बरीच तयारी करायचीये......

थोड्या वेळात दोघी बाहेर येतात......असेच सगळे हसी मजाक करत......एन्जॉय करत असतात......साखरपुड्याची गाणी लावुन सगळे नाचत होते.....तेवढ्यात करुणाचे बाबा येतात ....करुणाला आनंदाने नाचताना पाहुन त्यांना भरून येत.....ते त्यांचे अश्रु लपवून आत येतात.......

मधु : काय ओ किती वेळ......

दत्तात्रय : अरे आता माझी काय चुकी त्यात....तुच सामान आणायला पाठवलं ना.....आलो मग घेऊन....

मधु : ते सोडा जाऊद्या .....उद्याच्या एक वेळच्या जेवणाची सोय झाली का.......त्यांना सांगितलं का मस्त झालर लावुन टेबल सजवायला.......पाणी ....आईस्क्रीम...... गुलाबजाम

दत्तात्रय : हो हो.....अग जरा थांब.....श्वास तर घे.....उद्याची  सगळी तयारी झालीये.......आताच कॅटरेस वाल्याला पैसे देऊन आलोय.....आणि हो उद्या घर डेकोरेशन वाल्याला पण बोलावलंय.....ते पण सकाळी येतील.....दहा वाजता......आणि हो तुझा भाऊ आणि बहीण कधी येणारे......

मधु : सीमा...आता थोड्यावेळात पोहोचेल तिच्या परिवारा सोबत......आणि दादा उद्या सकाळी लवकर येईल बोला.....वहिनी आणि पोरांना घेऊन......आणि बाकीचे डायरेक्ट हॉलवर पोहोचतील......आणि तुमच्या दुकानाच काय....???

दत्तात्रय : मी उद्या नाही जाणारे.....दुकानावरची मानस सगळी येणारे.....साखरपुड्याला.... त्या लोकांना सांगितलं मी.....अर्ध्या दिवस दुकान उघड ठेवुन सहपरिवार सोबत यायचं.....सगळे येतील बघ कसे आनंदाने.....

तेवढ्यात अश्विनीला बाहेर कुणाचातरी कॉल येतो आणि ती बाहेर जाते......थोड्याच वेळात ती बाहेरून काहीतरी पार्सल आणुन तिच्या आईच्या हातात देते.....

दत्तात्रय : वहिनी......काय मागवलं...... ही पिशवी तर सोनाराच्या दुकानाचिये.....अरे हो हे तर नाक्यावरच दुकान......

मंदा : हो भावोजी.....ते मी करूणा साठी काहीतरी आणलंय.......(मधु आणि दत्तात्रय दोघे एकमेकांकडे बघतात......)

मंदा : करूणा ......इकडे ये.....आत चल जरा बेडरूम मध्ये....भावोजी मंदा तुम्ही दोघे पण या.......मुलींनो तुम्ही ऑन चला......

सगळे एकमेकांना बघत बेडरूम मध्ये जातात.....

मंदा करुणाच्या डोळ्यात एकटक बघते....आणि तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवते.... हे घे तुझ्यासाठी.....माझ्या कडुन......

करूणा : काये हे मोठी आई......?????

मंदा : खोलुन तर बघ......

करूणा तिच्या बाबांकडे बघते......ते तिला इशाऱ्याने हातातलं गिफ्ट खोलायला लावतात.....

करूणा तिच्या बहिणींच्या मदतीने पार्सल खोलते..... त्यात......सोन्याचा नक्षीदार हार आणि त्यावर मॅचिंग असे झुमके असतात......करूणा काही न बोलताच तिच्या मोठ्या आईकडे बघते.....

मंदा : काय झालं.....आवडला नाही का.....
??????

करूणा : मोठी आई हे काये.......??????हा हार....हा हार तर सोन्याचा आहे.....

मंदा : हो ....मला माहिते.....तुझ्यासाठी माझ्याकडुन आणि तुझ्या बहिणीनं कडुन छोटीशी भेट

मधु :आवो पण ताई ....ह्याची काय गरज होती.....

मंदा : का बरं.....गरज नव्हती....मी हा हार माझ्या सह खुशीने बनवलाय करूणा साठी.....

दत्तात्रय : वहिनी आवो....हा हार किती महाग असें.....तुम्ही कस केलं मॅनेज.....(काळजीत)

मंदा : भावोजी काळजी नका करू....माझ्या कडे जे साठवलेले पैसे होते त्यातुन मी हा हार बनवला आणि थोडं अश्विनी ने पण मला मदत केली......आता नाय नको बोलुस

दत्तात्रय : आवो वहिनी.....खरच ह्याची गरज होती का......कशाला केलं अस

मंदा : भावोजी.....खर तर मी तुमची आभारी आहे.....एवढ्या कठीण परिस्थितीत तुम्ही मला आणि माझ्या मुलींना आधार दिला...खरच .......माझ्या सारखी वेळ कुणावर च येऊ नये......पण कदाचित....देवाने आमच्या नशिबात हेच लिहिलं असावं......तुम्ही आणि मधुने ज्या प्रमाणे आम्हाला सांभाळुन घेतलं....आणि आजही घेताते....ते खरच खुप आहे.....मग मी कशाला मागे पडु.... भावोजी माझ्याकडे नसत...तर मी खरच हा हार बनवला नसता....पण माझी करूणा उद्या सासरी जाईल तर तिच्याकडे माझी  पण काहीतरी आठवण हवी ना......मी तिच्यासाठी काहीच केलं नाही....ते तर माझ्या नशिबात नव्हतंच....पण आता आहे....मला भरभरून प्रेम करुदया तिच्यावर..... माझी हीच इच्छा अधुरी होती....ती  ऑन देवाने पुर्ण केली.....

मोठ्या आईच बोलणं एकुण करुणाच्या डोळ्यात पाणी येत....ती तिच्या मोठ्या आईच्या गळ्यात पडुन जोरजोरात रडते.....

मंदा : (करुणाच्या डोक्यावर थोपटत)अग वेडी झालीस का.....रडतेस काय.....उलट मीच नशीबवान आहे जे माझ्या करुणाला भावोजी आणि मधु सारखे आई वडील भेटले.....आज मी धन्य झाले.....(रडतच मंदा मधु आणि दत्तात्रय ला हात जोडते......ती सुद्धा आज तिच्या अश्रुना वाट मोकळी सोडते)

सगळ्या मुली घोळका  करून रडतात.....

मधु : आता रडु नका......ताई ....तुमची तबेत खराब होईल नाही तर.....चला आता बाहेर जाऊया......सगळे बाहेर बसलेत ना

मंदा : हो हो(डोळे पुसत) आणि हो.... हा हार उद्या तुझ्या साडीवर घाल....बघ त्याला शोभेल अशीच डिझाइन दिलीये ना तुझ्या ताईने......

करूणा गोड हसत अश्विनीला थॅंक्यु बोलते

(काय मग वाचकांनो....कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कामेंटद्वारे)






🎭 Series Post

View all