चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा)पार्ट 50

Untold love story(part 50)

पार्ट 50

करुणाचे घरचे सगळे जण चांगल्या साड्यांचा दुकानात जातात.....तिकडे ते......काकी आणि करुणाच्या आईला चांगली काठा पदराची साडी काढतात.......नंतर सगळ्या मुली एका डिझायनर शॉप मध्ये जातात.....तिकडे सगळ्या मिळुन त्यांना हव्या तशा साड्या घेतात.....

करूणा : किती छान साड्या मिळाल्याना आपल्याला(खुश होत)

सुवर्णा : हो मला तर माझी साडी खुप आवडली

अश्विनी : हो ना नशीब आमचं.....नाहीतर अजुन जरावेळ बसलो असतो ना तर आम्ही सगळे वेडे झालो असतो(सगळे हसतात)

सुवर्णा : मग काय झालं.....आपल्या लहान बहिणीच लग्न आहे.....मग हवी तशी शॉपिंग करायची.......नाही तरी काकांनी सांगितलं आहे.....जे लागेन ते घ्या.......(हसत)

मंदा काकी: हात जोडले बाई तुझ्यापुढे.......आता जेवायचं बघा जरा.....

सुवर्णा : मी सांगु कुठे जेवायचं ते......

अश्विनी : नको.....आम्ही बघु..... तु तोपर्यंतर अजुन डीसाईड कर तुला अजुन काही घ्यायचंय का ते.......

मधु : म्हणजे अजुन शॉपिंग बाकीये.....(आश्चर्य होत)

करूणा : हो आई......अजुन ज्वेलरी बाकीये घ्यायची.....आणि सॅंडल पण बाकीये

मंदा : एक काम करा आपण आधी सगळे जेवु.... आणि मग तुम्ही सगळे मिळुन जा बाकीची शॉपिंग करायला....आम्ही दोघी जातो घरी...... आम्हाला नाय जमणार एवढं चालायला......

करूणा : काय मोठी आई.....थकलीस पण एवढ्या लवकर......अजुन बरच काम आहे तुला....

मंदा : हो ग माझ्या बाळा मी सगळं करेन....पण आता ना पाय जास्त साथ नाय देत.......आणि हे ऊन तर विचारूच नकोस.....आता हे घ्या पैसे.....आणि घ्या हवं ते....आधी चला जेवायला

अश्विनी : मला चांगलं हॉटेल माहिते तिकडे जाऊया.....(सगळे एकत्र अश्विनी च्या सांगण्यावरून तिला माहीत असलेल्या हॉटेल मध्ये जातात.....आणि जेवुन परत त्यांच्या त्यांच्या शॉपिंग ला जातात....फक्त मंदा काकी आणि मधु घरी येतात)


संध्याकाळी सात च्या सुमारास.......सगळ्या मुली शॉपिंग करून थकुन घरी येतात.......

मधु : थकल्या ना.....जा आधी हात पाय धुवून घ्या....मी सगळ्यांना थंड पेय देते.......

सगळ्या मुली हात पाय धुवून हॉल मध्ये बसतात.....आणि जी जी शॉपिंग केली ती एकत्र पसरवुन ठेवतात...... कारण त्यांच्या घरच्यांना दाखवायला

मधु : काय काय घेतलं......बघु.......(थंड पेय देतच बोलते)

सगळ्या मुली आनंदाने एक एक सामान दाखवतात......मंदा काकी तिच्या मुलींच्या चेहऱ्यावर चा आनंद बघुन खुश होते......

करूणा : आई हे तुला आणि मोठी आईला.....

मंदा काकी : हे काये.....हे तर नकली गजरे(अरे वा)

करूणा : हो।तुम्ही दोघी अंबाडा बांधाल ना तेव्हा हे घाला.....छान दिसेल

अश्विनी : आई हे घे.....उरलेले पैसे.......(तिच्या आईच्या हातात पैसे देत बोलते)

मधु : अग करूणा ते पार्लर वाली च झालं का काम

करूणा : हो माझीच मैत्रीण आहे......ती मेहेंदी आणि आपल्या सगळ्यांचा मेकअप करेन

आम्हला काय करायचा मेकअप..... तुम्ही सगळ्या करा.......आणि ते शोभल पण पाहिजे......नको बाबा मी नाय करणार....मेकअप...

ताई तुम्हाला करायचाय का.....

मंदा : काय तु पण.....मला कधी पहिलस का....तु मेकअप करताना.......मला पण नको.......उगाच जोकर दिसायचो...

(सगळे हसतात)

अश्विनी : काही पण.....आई तुझं.....अग सगळ्या शिकलेले असतात......उगच जोकर बनवतील का तुला आणि काकीला.......(हसत)त्या सगळ्या प्रोफेशनल असतात.......

मंदा : तरी पण नकोच....आम्ही दोघी आहे तश्याच बऱ्या आहोत....तुम्ही करा ते काय मेकअप.... वगैरे

करूणा : अच्छा ठिके......आता नका करू....पण माझ्या लग्नात नक्की करा.... कळलं..... मी आता एक पण गोष्ट ऐकणार नाही तुमच्या दोघांची

मधु : ठिके ......बघु

करूणा : बघु बिघु नाय करायचाच

मधु : ठिके......

अश्विनी : ये आई उद्यापासून मी ऑफिसला जाणारे.... आधीच तीन दिवस सुट्या झाल्यात ह्या गोंधळा मुळे.......परत साखरपुड्याला पण सुट्टी घ्यायचीये......सुवर्णा तुला पण सोडते मी उद्या इंटरव्ह्यू ला......

मंदा : कुठे ग इंटरव्ह्यू.....???

सुवर्णा : चव्हाण हायस्कुल मध्ये......(गव्हर्नमेंट शाळा आहे)

मंदा : अच्छा........

मधु :काही म्हणा ताई......तुम्ही मुलींना छान शिक्षण दिल......किती मेहनती आहेत सगळ्या(मुलीचं कौतुक करत)

मंदा : काही विचारु नकोस तु.... कस केलं ते माझ्या जीवाला माहिते.......किती मारझोड..... किती त्या शिव्या.....आणि सासुबाईनच तर वेगळच......लग्न करूनदे ह्यांच लग्न करुन दे ह्यांच......काय करणारे शिकुन..... दुसऱ्याच्या घराची भर करणार.....काय कामाच्या ह्या सगळ्या.....नको नको ते बोलायच्या माझ्या मुलींना......देवालाच काळजी म्हणुन त्या मुली शिकल्या आणि आपापल्या पायावर उभ्या रहायल्या......एवढ्या दिवस तर मी ह्या दोघींच्या पगारावर घर चालवलं..... नाही तर ते दोन घास पण नशिबात नव्हते.......

मधु : ताई तुम्ही एवढ सगळं सहन केल.....निदान एक दिवस तरी कॉल करून सांगायचं होत....भावोजी अशे वागतात ते......

मंदा : तुला काय वाटत.....मी केला नसेन प्रयत्न..... पण ह्यांनी मला त्यावरून पण लय मारलं.......आणि फोन पण काढुन घेतला..... जाऊदे सोड.....विषय..... चांगलं चालुये ना आता.....आणि घरात आनंदाचं वातावरण पण आहे....उगच टेन्शन नको
सगळ्या मुली एकमेकांना बघुन थोड्यावेळ शांत बसतात


@@@@@@@@@@@@@@@@@@@@

मोहिते विला......(कल्पना गेस्ट लिस्ट बनवत असते तेवढ्यात अजित आणि मोहिते घरी येतात ...कल्पना सर्व्हेन्ट ला सांगुन त्यांच्यासाठी पाणी आणते)

कलपना : काय झालं .....दोघे खुप थकलेले दिसतायत

मोहिते : अग मी कुठे.....सगळं काम आता हाच करतो.....खुप कष्ट घेतो हा.....मला जास्त बघायला नाही लागत आता.....

कल्पना जरा खुशच होते......

मोहिते : तु काय करतेस.....????

कल्पना : गेस्ट लिस्ट बनवत होते.......जे जवळचे आहे त्यांनाच बोलवुया......

मोहिते : हम्मम.....लग्ना नंतर एक मोठी पार्टी देऊया आपल्या तर्फे......जेंव्हा माझी सुनबाई घरात येईल तेव्हा.....

अजित गालातच हसतो......

अजित : काय डॅड तुम्ही पण......(लाजतच)

कल्पना : अरे हो.....माझी पण तीच इच्छा आहे......सुनबाईच जोरदार वेलकम व्हायला पाहिजे.....हो की नाय ओ.....आता बघ ना आपल्या घरातलं पाहिलं आणि शेवटचं कार्य हे.....म्हणुन आम्ही आमची हाउस पुर्ण करून घेतो

मोहिते : अग शेवटचं कसलं बोलतेस.....अजुन नातवंड बघायची आहेत की नाही......

अजित तर आता लाजुन निघुन जातो.......

कल्पना : बघितलं लाजला कसा.......

मोहिते : हो.....कल्पना जरा जेवणाचं बघ....खुप भुक लागलीये......तोपर्यंतर मी आलोच......फ्रेश होऊन

कल्पना पण तीच काम बाजुला ठेवुन किचन मध्ये जाते......

इकडे अजित त्याच्या मित्राना ग्रुप विडिओ कॉल करतो.....

अभिषेक :काय मित्रा आज आठवण आली.....

अजित : तस नाही रे....आज काल  काम जास्त वाढलं आहे.......तुम्ही दोघे ड्युटी वर आहेत का.....????

नंदु : हो रे .....आता निघु थोड्या वेळात.....घरी.....

मयुरेश : हम्मम.....मी पण निघेल.....थोड्यावेळात.....


ध्रुवी : काम जमत ना.....तुमच्या दोघांना.........?????

मयुरेश : हो जमत.....थोडं थोडं......बंदोबस्त असला ना.....मग जरा कंटाळा येतो.....कारण पुर्ण बारा तास काम करावं लागतं

अभिषेक : बापरे.....बारा तास......

नंदु : हम्मम्म..... काय नाय रे जातो तसा वेळ निघुन.... कधी कधी समजत पण नाय

मयुरेश : हम्मम.......

अजित : ये तुम्ही सगळ्यानी सुट्टी टाकली ना.......

अभिषेक : मी डायरेक कामावरून येणार....संध्याकाळचा प्रोग्राम आहे ना.......

करूणा : तरी पण वेळेवर या......

संगिता : आम्ही तर येऊच ग वेळेवर.....पण तु अजितला सांग.....नाहीतर कळल अजितच त्याच्या एनगजमेंट ला लेट झाला.....(हसतच)

करूणा : हहहहहहह......

अजित .....मी येईल टायमावर......(हसत)

मयुरेश : अरे वा अजित....खुप घाई दिसते लग्नाची....(हसत)

अजित : आता तु पण चालु झालास....

नंदु : का रे आधी कोण चिडवत होते.......तुला??????

अजित : आई आणि डॅड.... अजुन कोण....ते दोघे तर नातवंडांचा पण विचार करायला लागलेत(हसत)

संगिता : आईशपथ....एवढे फास्ट.....

करूणा : अजित ........तु पण ना काय कुठे बोलायचं हे कळतच नाय(हलक्या रागात)

अजित : आता त्यात काय.....ते जे बोलत होते ते सांगत होतो

करूणा : तु जरा शांत बस अजित(लाजत)

सगळे  एकत्र हसतात

करूणा : सगळ्यानी लवकर या.... ok..... आणि मला जस जमेन तस मी तुम्हाला कॉल करत जाईल.....

संगिता : हो हो.....समजु शकतो आम्ही........तु काळजी नको करुस

अभिषेक : आणि हो काही लागलच तर कळव आम्हाला.....आम्ही आमच्याकडून जेवढी मदत होईल तेवढी करू.......

अजित : नक्की नक्की मित्रा.....तु हे बोलास तीच खुप मोठी गोष्ट झाली.......चला मग लवकरच भेटु आमच्या साखरपुडयाला

सगळे एकमेकांना बाय करून कॉल ठेवतात.....तेवढ्यात अश्विनी करुणाला बोलवायला येते.......

अश्विनी : काकांनी बोलावलं आहे तुला......

करूणा  : हा आलेच तु चल पुढे......(करूणा हॉल मध्ये येते) काय झालं बाबा......

बाबा : हे बघ अजितचे आणि त्यांच्या घरच्याचनचे कपडे.....
तुला आवडतायत का बघ......(सगळे एकत्र बघतात)

सुवर्णा : wow काका तुमची चॉईस तर एकदम झक्कास आहे.....

बाबा : (हसतात) मधु ही बघ अजितच्या आईची साडी आणि त्यांच्या बाबांचे कपडे......आणि हे होणाऱ्या जावईबापुनचे कपडे.....

सगळ्याना कपडे आवडतात.....आणि हो करूणा उद्या अजितला त्याच्या आंगठीच माप विचार म्हणजे आपल्याला उद्या जाऊन त्यांना अंगठी आणायला.....नाहीतर त्यांना विचार त्यांची काही चॉइस आहे का.....कशी डिझाइन हवीये वगैरे.....

करूणा : ठिके.....

बाबा : एक काम कर मला फोन लावुन दे.....मीच बोलतो......करूणा तिच्या बाबाना अजितला कॉल लावुन देते

अजित : हा बोल करूणा.....

करूणा : बाबाना बोलायच आहे तुझ्याबरोबर.... तु फ्री आहेस का......????

अजित : हो।दे ना.....

बाबा :अजित बेटा..... कसा आहेस.....?????

अजित : मी मस्त बाबा .....तुम्ही कसे आहात.......?????

बाबा : मी पण मस्त....एक काम होत......मला तुझ्या आंगठीच माप दे उद्या पाठवुन..... दोनच दिवस बाकीयेत आता.....बनुन पण व्हायला हवी ना......

अजित : हो चालेल.... मी उद्या ऑफिस ला जाण्या आधी घरी येऊन जातो.....आणि माप देऊन जातो......

बाबा :आणि हो....तुला कशी डिझाइन हवीय ते पण सांग मला....ते आजकालच्या मुलांना कस नवीन स्टाईल च आवडत ना.....म्हणून विचारलं.....(हसत)

अजित : नाही नाही बाबा(हसत)माझी काही चॉईस नाहीये.....तुम्ही करुणाला विचारा तिला महितेत माझ्या चॉईस.....

बाबा :अच्छा ठिके......घरी कसे सगळे...... सगळं ठीक ना.....????

अजित : हो एकदम मस्त..... तयारी जोरदार सुरू आहे......

बाबा : वा मस्त....आणि काही लागलं तर कळवा आम्हाला.....ठिके......

अजित : हो बाबा.....

(दोघेही बोलुन फोन ठेवुन देतात)

बाबा : मधु उद्या अजित येईल.....घरी......तो माप देऊन जाईल.... आणि करूणा उद्याच्या उद्या....जाऊन तुला हवी ती डिझाइन दे सोनाराला...

करूणा : हो बाबा.....

रात्री सगळे हॉल मध्ये गप्पा मारत असतात......मंदा अश्विनी ला इशारा करून रूम मध्ये बोलावते

अश्विनी : काय झालं तु मला अस आत का बोलवलं.....

मंदा : जरा बोलायच होत......?????

अश्विनी : हा बोलना......

मंदा : तुझ्याकडे काही पैसे आहेत का.....

अश्विनी : हो।आहेत ना ....पण काय झालं.....काही सिरियस नाही ना आई.....

मंदा : नाही नाही....तस काही नाही.... ते मी विचार करत होते....करुणाला एखादा हार बनऊया.....

अश्विनी : हम्मम ....हा चालेना.... माझ्या काही सेविंगस आहेत.....त्यातुन तुला देते....

मंदा : माझ्या कडे पण साठवलेले आहेत थोडे पैसे ते पण देते मी......मला जस जमेन तस मी तुला परत तुझे पैसे देईल

अश्विनी तिच्या आईचा हात हातात घेते.......आई काय ग.....काय बोलतेस तु.....मी मागेन का तुझ्या कडुन पारत पैसे.....अशी का बोलतेस....

मंदा : तु चुकीचं नको समजुस...... मी ते सहज बोले.... आज परेनंतर तु तुझ्या बाहिणींसाठी खुप कष्ट घेतलेस.... कधीच तु स्वतःचा विचार नाही केलास......म्हणुन तुझी काळजी वाटते ग......बाकी काही नाही.....मला माहित होतं तु मला नाही नाय बोलणार.....पण तरी पण......

अश्विनी :काळजी नको करुस.... मी मला जमेन तस बनवते ...पण तु काकीला आणि काकाला कळवु देऊ नकोस नाहीतर ते आपल्याला काहीच बनवुन देणार नाही.....

मंदा : ठिके.....(हसत)दोघी पण हसत हसत बाहेर येतात

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

दुसऱ्या दिवशी अजित सकाळी दहाच्या सुमारास येतो......

अजित : येऊ का आत......?????

करुणाचे बाबा : हा ये ना........(हसत अजितच स्वागत करतात.....)मधु वहिनी बाहेर या.....अजित आला आहे.....

मधु आणि मंदा वहिनी दोघी जणी किचन मधुन येतात......

अजित उठुन सगळ्यांना वाकुन नमस्कार करतो......

करुणाचे बाबा : ह्या आमच्या मोठ्या वहिनी

अजित : हो माहिते मला .....करूणा बोली मला......खुप छान वाटलं तुम्हाला भेटुन......

मंदा : मला सुद्धा......कसे आहात तुम्ही.....

अजित : मी मस्त....आणी प्लिज मला अजित बोला आणि अरे तुरे नका घालु..... मी मुलगाच आहे तुमचा.....(हसत)

मंदा खुश होऊन मधुला बघते........आणि नजरेनेच  करुणाची चॉईस चांगलिये.....…अस खुनावते..... मधुला  सुद्धा बर वाटत........

बाबा : मधु चहा आणि नाश्त्याच बघ जरा.....

अजित : नाही ....नको बाबा ....मला ऑरेडी उशीर होतोय.....सध्या खुप साऱ्या कलेक्शन च काम बाकीये....ते मला कम्प्लिट करायचंय......आणि मिटिंगस सुद्धा आहे....परत कधी तरी येईन.....

बाबा : ठिके काही हरकत नाही......मी आता अडवत नाही......

अजित : बाबा ही माझी अंगठी आहे....सेम माप असेंन ती बनवा......

बाबा ती अंगठी हातात घेऊन मधुला ठेऊन द्यायला सांगतात

बाबा : तुला करुणाची अंगठी देतो थांब.......

अजित : नको बाबा ....आईने कालच चॉईस करून ठेवलीय....कालच काही ज्वेलर्स घरी येऊन आईला डिझायन दाखवुन गेले.....त्यातली तिने पसंत केलीये.......मी बझी असतो म्हणुन हे काम आईने केलं....आता तिला पण करुणाची चॉईस माहिती झालीये......(हसत)निघु आता मी....खरच खुप घाई आहे आज.....परत भेटु नक्की.....

अजित सगळ्यांचा निरोप घेऊन निघतो......

मंदा : भावोजी ....मुलगा अगदी देखणा आहे....आपली करूणा खुप नशीबवान आहे.....

बाबा : हो वहिनी.....खरच बोलतायत तुम्ही.........एवढा समजुतदार आहे ना तो.....की आपल्याला आता करुणाची चिंता नाय......

मंदा : हो .....ना .....
(काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कामेंटद्वारे)















🎭 Series Post

View all