पार्ट 48
करुणाच्या काकांच्या घरी(मधुकर काका आणि मंदा काकी)
काकी : काय झालं......झालं का तुमच्या मना सारख(चिडचिड करत)
काका : तुला बोलायचं काये......
काकी : तेच बोलायचंय जे एवढ्या वर्ष शांत बसुन सहन करत होते ते.....(रागातच)
करुणाची आजी : तोंड खुप चालायला लागलंय हीच......ये मधुकर असा बघत काय उभा रहायलास.......दे ठेऊन दोन तीन तिच्या कानाखाली
निशा (करुणाची मोठी चुलत बहीण) : हात तर लावुन दाखवा माझया आईला.......
काका : आईने बरच काही शिकवलेलं दिसतंय(रागातच)
अश्विनी (मधली मुलगी) : तिने कशाला शिकवायला पाहिजे.....आम्हला दिसतंयना आमच्या डोळ्याने.......आता लहान नाही ऱ्हायलो आम्ही.......
आजी : ये तोंड संभाळून बोल.........विसरलीस कोणाशी बोलतेस ते.....(रागातच)
सुवर्णा (तीन नंबर मुलगी) : नाही आजी..... बिल्कुल नाही विसरलो आम्ही ......पण कदाचित तुम्ही दोघे माणुसकी विसरलात(रागातच)
आई : मुलींनो तुम्ही नका मधी पडु.... मी करेन सगळं हँडल.....
निशा : काय हँडल करणारे........ कस हँडल करणारेस......गेले.....तीस वर्ष बघते मी......नुसती शिवीगाळ..... मारहाण.....एवढंच सहन करते तु......एवढ्या दिवस तोंड बंद करून बसली नसतीस ना तर ही वेळ आली नसती तुझ्यावर.....
(आई मान खाली घालुन रडते)
काका : विसरलात वाटत .....तुम्ही माझ्या घरात राहुन बोलतायत ते.......
अश्विनी : नाही बाबा .....कस विसरेन.....आम्ही सगळे......पण तुम्ही विसारलायत.....ज्या घरात आपण राहतोय ते काकाची देणं आहे......आणि काय ओ तुमचं घर तुमचं घर.....बोलतायत.....इकडे फुकट तुकडे नाही तोडत आम्ही......आम्ही कमावतो पण आणि देतो पण......तुम्ही स्वता काय करतायत
(मधुकर मुलींवर रागात हात उचलायला येतात......त्यांची आई त्यांचा हात पकडते)
काकी : आता नाही.....ही चुक आता नाही करायची..........जे मी सहन केलं ते माझ्या मुली सहन नाही करणार.......तुमच्या मुळे आज माझी करूणा माझ्या सोबत नाहीये.......तुमच्या आणि तुमच्या आई मुळे......ते तर भावजींची कृपा.....त्यांनी माझ्या मुलीला दत्तक घेतली ।......नाही तर तुम्ही तर तिला.....आश्रमात सोडायला चाला होता......
आजी : तेव्हाच मारली असती तर बरं झालं असत.......एवढा तमाशा तर झाला नसता.......आणि काय ग......मी काय वाईट बोलते.....मी फक्त एकच गोष्ट मागितली......ह्या घरासाठी वंशाचा दिवा मागितला.....तर का बिघडलं.....ते तर तुला देता न्हाय आलं.....आणि वर तोंड वर करून फडा फडा बोलतेस माझ्या पोराला
काकी : वंशाचा दिवा सोडा ओ आई.....निदान तुम्ही तुमच्या मुलाला चांगले संस्कार लावले आस्तेना तर आज माझ्या ह्या चार मुली मुलाहून पुढे आहे....हे तुम्हाला कळलं असत....
पण काय करणार डोळ्यावर वंशाचा दिव्याची पट्टी जी आहे......पण आई आता नाही.....आता माझी ताकद संपली.....आता मी सहन नाही करणार......ना माझ्या मुली सहन करणार
काका : ठिके मग निघ माझ्या घरातुन....... आताच्या आता
काकी : आवो .....एवढ्या रात्री.....
काका : हो हो ......तुला शांत नाही बसायचं ना.....मग मला पण आता शांत नाही बसायचं.....बॅग भर आणि ह्या तुझ्या पोरी घेऊन निघ
काकी: मी उद्या जाते....पण आता एवढ्या रात्री आम्हला बाहेर नका काढु .....(समजावुन सांगत होती)
काका : नाही निघ चल आता ......(रागातच)
निशा : आई चल......आपण निघु....नाहीतरी ह्या घरात आपल्याला आधीपन किंमत नव्हती.....मव नंतर काय मिळणार......
काकी : अग पण एवढ्या रात्री जायचं कुठे......
सुवर्णा : ते ठरवु आपण.....आधी निघुया इथुन.......
आजी : जा जा......जिकड जायचंय तिकडं जा....."परत फिरून फिरून घराकडच याल......पण लक्षात ठेव मधुकर.....ह्याना परत आत न्हाय घ्यायचं.....(रागातच)
निशा : नाही येणार.....काळजी नको करुस.....आता तू आणि तुझा लेक रहा सुखान........ चल आई.....ये चलाग सगळे.........
रात्रीच्या दहा च्या सुमारास मंदा तिच्या तिन्ही मुली घेऊन बस्सटोप जवळ बसते......
सुवर्णा : निशा ताई......एवढ्या रात्री कुठे जायचं(काळजीत).....आणि मानस बघ कसे बघतायत आपल्याला......
निशा : काळजी नका करू.....मी बघते कुठे तरी राहण्याची सोय होते का........(निशा बोली खरी पण तिच्याही मनात धाकधुक होतच होती).......
अश्विनी : आई भुक पण लागलीये......हे बोलतच ती तिची आई उभी आलेल्या ठिकाणी बघते......तेव्हा त्यांच्या मागुन कोणीतरी अनोळखी माणुस त्यांच्या जवळ येत असताना दिसतो.......तिकडे थोडा अंधार असल्याने त्या माणसाचा चेहरा दिसत नाही......सगळेच त्या दिशेने बघतात......
आई : मला तर आता खुप भीती वाटते......(घाबरतच)
अश्विनी : आई घाबरू नकोस.......आम्ही आहोत सगळे......( आईला त्या तिघी मुली त्यांच्या पाठीशी घालतात)
अंधारातुन वाट काढत तो माणुस त्यांच्या जवळ येतो.....तश्या त्या मुली आणि त्यांची आई जरा निसचिंत होतात....कारण तो दुसरा तिसरा कोणी नसुन करुणाचे बाबा असतात
करुणाचे बाबा :वहिनी......तुम्ही......एवढ्या रात्री.......इथे बस स्टॉप वर काय करतायत(ते सगळीकडे नजर फिरवतात)एवढ्या रात्री मुली घेऊन कुठे निघालात(काळजीने) आणि ह्या बॅगा......??????
मंदा काकी : भावोजी तुम्ही इकडे कसे काय.....????
करुणाचे बाबा : ते दुकान बंद करून घरी चालेलो..... तेव्हा मला तुम्ही सगळे दिसलात.....पण हे सगळं काये......?????
मंदा काकी : (रडतच घडलेला सगळा प्रकार सांगते)
करुणाचे बाबा : (किती समजावलं तरी सुधरत कसा नाही हा दादा......)रागातच
निशा : काका रोज रोजच्या भांडनाना कंटाळलो आम्ही......नेहमी आई ला आजीच्या सांगण्यावरून मारतात .....शिव्या देतात.......कोण सहन करेन सारख सारख......आता तर ते करुणाला सुद्धा त्यांच्या तावडीत करण्यासाठी तिचा पिछा करत होते......बाबांना वाटलं जर करुणाला कळाल की ती तुमची मुलगी नाही तर आमची बहीण आहे तर ती तुम्हाला सोडुन येईल.....आणि परत बाबा काहींना काही मागणी करणार तुमच्याकडून..... हा सगळा आजीचा डाव आहे.....आज पण आजी आईला आणि आम्हाला सुनवुन दाखवते.....सगळ्या मुलीचे घरात .....एक पण मुलगा नाय घरात.....आता तुम्हीच सांगा ह्यात आमची काय चुक..... आणि आईची तरी काय चुक......
एवढ्या दिवस आई करुणासाठी सगळं सहन करत होती.......कारण बाबा नेहमी आईला धमकी दयायचे..... जर तु माझं ऐकलं नाही तर मी करुणाला सगळं खरं खरं सांगेन......आईला एकाच गोष्टीची भीती वाटत होती.......करूणा तुम्हाला सोडुन गेली तर......किंवा ती काय विचार करेन आमच्या बद्दल ती एवढा विचार करायची म्हणून तिने सगळं सहन केलं........ आम्हाला माहिते काका बाबांनी करुणाला सगळं सांगितल आहे.....कारण ह्याच्या मागे पण आजीचं आहे.......तिनेच सांगितलं बाबांना..... आणि आता हे बघा.....आम्हाला घराच्या बाहेर हाकल(सगळी गोष्ट रडतच सांगते)
करुणाच्या वडिलांच्या डोळ्यात पण पाणी येत.......ते सरळ तिथे असलेली एक एक बॅग उचलतात
मंदा : आवो भावोजी काय करतायत तुम्ही.......
करुणाचे बाबा : तेच करतोय जे मी आधी करायला पाहिजे होत.......आणि आता तर खुपच उशीर झालाय.......जाऊद्या सोडा सगळं.....आणि चला माझ्या बरोबर
मंदा : पण भावोजी आपण चालोय कुठे........?????
करुणाचे बाबा : तिथेच जिथे तुम्हाला खुप आधी आणायला पाहिजे होत......
(मंदा प्रश्नार्थक चेहऱ्याने बघते)
करुणाचे बाबा : माझ्या घरी चालोय आपण.....निशा..... अश्विनी...... सुवर्णा .....तुम्ही पण सगळ्या बॅगा उचलायला मला मदत करा.....आपण निघुया.....खुप रात्र झालीये.......इकडे रस्त्यावर मानस पण बघतायत आपल्याला..........
सगळे जण एकमेकांना बघतात.....
करुणाचे बाबा : अरे बघतायत काय एकमेकांना.....चला लवकर.....आधीच खुप उशीर झालाय........
(करुणाचे बाबा टॅक्सी बोलावुन सगळ्यांना त्यांच्या घरी घेऊन जातात)
@@@@@@@@@@@@@@@@@@@
करुणाच्या घरी
करुणाचे बाबा : मधु..... अग मधु बाहेर ये.....बघ कोण आलंय ते......
मधु (करुणाची आई) : किचन मधुन बाहेर येते.......आवो ह्या बॅगा कोणाच्यात.....बाहेर तर बघ कोणे ते.......
मधु बाहेर जाते.....समोर त्यांच्या मोठ्या जावेला आणि त्यांच्या मुलींना बघुन त्यांना आनंद होतो......
ताई तुम्ही......तुम्ही सगळे.....बाहेर का उभ्या आहेत.....आत या ना......(करूणा बाहेर ये)
सगळे जण आत येतात......मंदा आत आल्या आल्या.....करुणाच्या आईच्या गळ्यात पडते.....आणि जोरजोरात रडते......मधु नजरेनेच मुलींना खुनवुन विचारते (काय झालं.......काळजीत)
मधु :ताई .....आवो आता आल्या तुम्ही ......आणि आता रडतायत..... काय झालं......तुम्ही बसा आधी.....या बसा........करूणा......अग लवकर ये ना....बाहेर आणि येताना चार ग्लास पाणी आन (मधु तिच्या जावेला बाजुला घेऊन बसते.....करुणाचे बाबा हात पाय धुवायला जातात.......मुली सुद्धा सोफ्यावर बसतात.....)
तेवढ्यात करूणा बाहेर कोण आलंय ते बघायला बेडरूम मधुन बाहेर येते.....तिला तर आधी कोण आहे हे कळतच नाही.......कारण कित्येक वर्षे तिने तिच्या काकीला पाहिलं नसतं.......करूणा बाहेर आल्यावर मंदा जागेवरून उभी राहते आणि हळूहळू तिच्या जवळ जाते.....भरल्या डोळ्यांनी मंदा करुणाच्या तोंडावरून हात फिरवते..... तिच्या कपाळावर चुंबन घेते.........आणि करुणाच्या गळ्यात पडुन जोरजोरात रडते......तिथे उपस्थित असलेले सगळे जण रडतात..... आज खऱ्या आईचा आणि तिच्या मुलीचा मिलनाचा दिवस असतो........
मंदा : (रडत)हात जोडुन ......माफ कर मला करूणा......माफ कर......तु माझी लेक असुन तुला मी माझ्या पासुन आणि तुझ्या बहिणीनं पासुन लांब ठेवलं.......काय करणार मी.....सांगना तुच....... तुझे वडील तर तुला सोडायला निघाले होते.....ह्यांनी जर तुला अपणावल नसत तर आज तु मला दिसली नसती(हुंदके देत बोलते)माफ कर ग बेटा मला......माझ्या जीवाचा तुकडा.....माझं काळीज मी लांब ठेवलं......कारण मला तुला सुखरूप पाहायचं होत......नाहीतर त्या लोकांनी तर तुला मारूनच टाकली असती.....पण देवाच्या मनात तर काहीतरी वेगळंच होत......म्हणुन तु आज माझ्या समोर आहेस......मधु..... भावोजी......तुमचे लय उपकार आहेत माझ्यावर......आणि आज परत मला इकडे सुखरूप आणुन अजुन माझ्यावर उपकार केले
मधु : ताई अस नका बोलु.....हे पण तुमचंच घर आहे.......पण मला सांगा झालं काय.....सगळं ठिकेना
निशा :नाही काकी काहीच ठीक नाहीये......(निशा घडलेला सगळा प्रकार सांगते)मधुला तिच्या जावेने आणि त्याच्या पोरीने एवढ्या वर्षे एवढा त्रास सहन केला ह्याच खुप दुःख होत......
मधु : काही झालं......तरी भावजीनी आईच्या सांगण्यावरून तुम्हाला घराच्या बाहेर काढायला नव्हतं पाहिजे.....हे चुकीचे आहे......किती वर्षे झाले.....अजुन कसे भावोजी सुधरले नाही.......(काळजीने बोलते)
मंदा : कितीतरी वेळा मी समजावलं.... मुलींनी समजावलं.....पण ते दोघे सुधारायच नाव घेत नाहीये......(रडत)
करूणा : तुम्ही सगळे बसा मी आले....पाणी घेऊन.....(करूणा सगळ्याना पाणी घेऊन येते.......)करूणा तिच्या बहिणींना भेटते......त्यांच्या गळ्यात पडुन रडते.....
अश्विनी : तु अगदी आई सारखी दिसतेस........
करूणा हसतच तिला मिठी मारते.....
करुणाचे बाबा : मधु करूणा तुम्ही जेवणाचं काय ते बघा.......मी सगळ्या बॅगा आत ठेवुन येतो....वहिनी तुम्ही सगळे फ्रेश होऊन घ्या.....आधी.....आणि हो ऐकलं का हे पण तुमच्या सगळ्यांच घर आहे.......निसंकोच पणे रहायच.... ..... तुम्ही सगळे आता माझी जबाबदारी आहे.....
निशा : काका ......थोड्या दिवसाने मी आमची सगळ्यांची सोय करेनच.....मला फक्त थोडे दिवस द्या.....आम्हाला अस जास्त दिवस नाही रहायला जमणार.......
करुणाचे बाबा : निशा तु खरच मोठी झालीस.....पण माझ्या पेक्षा मोठी नाहीस.....माझा निर्णय झाला आहे.....तुम्ही सगळे इथेच राहणार.... कायमचे.....
मधु : हो हो.....कोणी कुठेच जाणार नाही....आपण सगळे आनंदाने रहाऊ.....आता आपल्या ........करुणाच लग्न ठरलंय...... मग मला मदत कोण करणार
मंदा भरल्या डोळ्यांनी करुणाला बघते.....सगळ्या बहिणी वाव बोलुन करुणाला शुभेच्छा देतात......
करुणाचे बाबा : चला जेवणाच्या तयारीला लागा..... मी आलोच.....
सुवर्णा : काकी थांबा आम्ही आलोच....फ्रेश होऊन.....आपण सगळे मिळुन आज जेवण बनऊया(हसत)
करूणा : हो मला आवडेल ताई तुझया हातच जेवायला......(खुश होत)
सगळे गुण्यागोविंदाने हसत खेळत जेवण बनवायला किचन मध्ये जातात.....किचन मध्ये काम करताना....करूणा ला सारखी मंदा चोरून चोरून बघायची.....कारण कित्येक वर्षाने ती तिच्या मुलीला बघत होती.....शेवटी आईच काळीज होत
थोड्याच वेळात जेवण तयार होत.......
बाबा : काय मग आजचा काय मेनु.......आहे......(हसतच)
करूणा : बाबा आज काकी ने पाटवड्यांचा रस्सा बनवलाय......तुम्हाला आवडतो म्हणुन..... काकी सांगत होती.....खुप साऱ्या गमती जमती......
बाबा :हो।हो...वहिनीला माझी आवड अजुन सुद्धा माहिते......(भावुक होऊन)
मंदा(वहिनी) : भावोजी ......तुम्ही लांब जरी गेले होते तरी मनात मात्र होतेच......तुमच्या सगळ्यांच्या आवडी निवडी मला माहिते......आणि आता मी आले ना तर मी नेहमी सगळ्याना माझ्या हाताने नवीन नवीन पदार्थ बनवुन देत जाईल.......मधु तु बोलत होतीस ब्राम्हणाला करुणाच्या साखरपुड्याची तारीख विचारायचिये म्हणून....... कधी विचारणारेस.......
मधु: ताई.....उद्या विचारते.........ते ब्राम्हण दुसऱ्या गावाला गेलेले म्हणुन बोलता नाही आलं....आज येणारे बोले.....तर उद्या बोलुन घेईल मी
मंदा : ठिके.....करूणा कालवण घेणा अजुन.....
करूणा : नको काकी.....माझं पोट भरलं..... आता.......खुप छान झालेल कालवण.......(करुणाच्या तोंडातुन काकी हा शब्द ऐकून मंदा थोडी नाराज होते....पण ती लगेच चेहऱ्यावर चे हाव भाव बदलते....आणि हे मधु बघते........
मधु : करूणा तु ताईला मोठी आई बोलीस तरी चालेन...... मधूच्या बोलण्याने मंदा ला गहिवरून येत
करूणा : ठिके.......आई .....(हसत)
सगळे मन जेवण आटोपून झोपायची तयारी करतात.....
करूणा : आई आम्ही सगळ्या बहिणी माझ्या बेडरूम मध्ये झोपतो.....आज मस्त गप्पा गोष्टी करू.....
मंदा काकी : हो हो..... पण जास्त वेळ जागे रहाऊ नका......नाहीतर झोपायला उशीर होईल......
करुणाचे बाबा :तुम्ही दोघी आत आमच्या खोलीत झोपा मी इथे बाहेर हॉल मध्ये झोपतो..... आणि उद्या मी वरच्या रूम ला स्वच्छ करून घेतो.....म्हणजे आपल्याला कोणालाच अडचण होणार नाही.......(हसत)
सगळे झोपायला जातात......करूणा आज ती बीझी आहे असा मॅसेज अजितला करून ती तिच्या बाहिणींबरोबर गप्पा मारते
(काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कामेंटद्वारे)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा