Aug 05, 2021
प्रेम

चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा)पार्ट 39

Read Later
चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा)पार्ट 39
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

पार्ट 39

बाबांचं बोलुन झाल्यावर मधु आणि दत्तात्रय हॉल मध्ये येऊन बसतात....

मधु (आई ) : (रागाने):तुम्ही का केलं अस

बाबा : म्हणजे.....

आई : तुम्ही चक्क त्याला भेटायला बोलावलं.....आवो कुठे तो कुठे आपण

बाबा :हे बघ .......बस इथे ....बसणा...... मला सांग तुला आपल्या मुलीवर विश्वास नाही का......

आई : अस कस...... पुर्ण विश्वास आहे माझा तिच्यावर

बाबा:मग तु कशाला काळजी करते.....तिने आज परेनंतर आपल्याला दुखवुन एक पण काम केलं नाही.....मग आपण तिच्या ह्या चॉईस वर का अविश्वास दाखवायचा

आई : पण .....तिला तिच्या बद्दल पण अजुन काहीच माहीत नाही

बाबा : तु परत त्या विषयावर आलीस.....

आई : तस नाही .....तुम्ही रागावू नका माझ्यावर...... पण तिला आपणच सांगायला पाहिजे....उद्या बाहेरून कळालं तर तिला त्या गोष्टीचं जास्त वाईट वाटेनं

बाबा :नाही वाटणार काही तिला....आणि आता मला तो आणि हा विषय परत नकोय.....उद्या माहितेन काये ते.....

आई : हो विसरून कस चालेन.......

बाबा : जा उद्याची तयारी कर......उद्या आपली मुलगी पंचवीस वर्षाची होणार......काही तरी स्पेशल कर तिच्यासाठी

आई :हम्म....तुम्ही पण चला मला मदत करायला.......मिळुन करू

बाबा :हा हा चल.....

(दोघे मिळुन उद्याच्या तयारीला जातात)

@@@@@@@@@@@@@@@@@@

इकडे नंदु आणि मयुरेश दोघे मिळुन रात्री घरी पोहोचतात..... त्यांना लेट झाल्यामुळे ते लवकर झोपतात.....

(रात्री दहा वाजता)

करुणाला अजित मॅसेज करतो

अजित : काय मग मॅडम काय करतायत....????

करूणा :काही नाही.....पण आज मी जाम खुश आहे

अजित : ओ हो .....काय झालं.......काही स्पेशल

करूणा :हो तसच समज.......काहीतरी स्पेशल झालं आज घरात

अजित :मला पण सांगना......

करूणा :नाही आता नाही

अजित :अच्छा ठिके नको सांगुस.......

करूणा :रागावलास का....???

अजित:नाही ......तर रागावू कशाला.....मला फोर्स करायला नाही आवडत.....

करूणा : सॉरी....पण तू पण समजुन घेणा......मी वेळ आली की नक्की सांगेन

अजित : अरे हो ना.....मला माहिते तु मला नक्की सांगशील म्हणुन मी।तुला जास्त काही विचारत नाही

करूणा : थँक्स समजुन घेण्यासाठी....

अजित :तुला नाही समजून घेणार तर मग कोणाला घेणार

करुणा: लव्ह यु अजित(खुश होतच)

अजित : लव्ह यु टु डिअर....तु आज झोपली नाहीस

करूणा  : नाही ....आज झोप नाही येते

अजित : मी येऊका तिकडे......

करूणा : काय ....(शॉक होतच) काही पण.... नको ते करूनकोस

अजित : आता तुला झोप येत नाही म्हणुन विचारलं

करूणा : चूप रे....काही पण तुझं......

अजित : चल मग मी झोपु

करूणा : तुला झोप येते....(चिंतेत विचारते)

अजित :हा .....वेळ बघ किती झाला....

करूणा : तुला खरच झोप आली

अजित :आज खरच खूप थकलोय ग....काम जास्त होत....म्हणुन(मुद्दाम चिडवत)

करूणा : अच्छा ठिके नो प्रॉब्लेम.... झोप तु

अजित :अरे हो तुला सांगायचं रहाऊनच गेल....उद्या मी .....सकाळी बाहेर चालोय डॅड सोबत....एक मीटिंग आहे....सो मी तुला रिप्लाय नाही देऊ शकणार.....सो प्लिज एक दिवस ऍडजस्ट कर

करूणा :तुला उद्याचाच दिवस मिळाला का.(रडक्या स्वरात)

अजित :का ....अस का बोलते....उद्या काये( मुदाम चिडवत)

करूणा :नाही काही नाही(रागातच)

अजित :ठिके मग मी ठेऊ....खरच खुप झोप आलीये

करूणा :अच्छा ठिके गुड नाईट

अजित : गुड नाईट

करूणा विचार करते.....ह्याला खरच उद्या माझा वाढदिवस आहे हे माहीतच नाही....कसाय यार हा....असा कसा विसरू शकतो हा....(आणि रागातच  झोपून जाते)

@@@@@@@@@@@@@@@@@

करूणा बरोबर बोलुन झाल्यावर अजित ध्रुवीला पर्सनल मेसेज करतो

अजित :ध्रुवी जागिएस का ....थोडं बोलायचं होत....

(पाच मिनिटांनंतर मॅसेज येतो)

ध्रुवी :काय झालं अजित ....काही सिरियस.....

अजित  : कॉल करू का

ध्रुवी :हा करणा

अजित ध्रुवी ला कॉल करतो.....

अजित : सॉरी तुला लेट कॉल केल्याबद्दल

ध्रुवी :इट्स ओके अजित....मला काही प्रॉब्लेम नाही

अजित : एक काम होत.... करशील

ध्रुवी :हा बोलना.....

अजित :उद्या करुणाचा बर्थडे आहे....तुझ्या आधी मी तिच्याबरोबर चाट करत होतो....तेव्हा ती माझ्या मनातुन काढायचं बघत होती....की मला माहित आहे की नाही उद्या तिचा बर्थडे आहे ते.....तस मी तिला दाखवला की मला माहित नाही ते....आणि मी उद्या दिवसभर माझ्या डॅड बरोबर बाहेर आहे ते मीटिंग साठी...

तिच्या आवाजावरून कळाल मला.....ती नाराज झाली ते.....पण ऐक माझं....मी उद्या ऑफीस मधुन सुट्टी घेतलीये.....माझं  अस मत आहे की उद्या तिला सरप्राईज द्यावं..... पण तिचे घरचे तिला जास्त वेळ बाहेर नाही पाठवणार....मग जर तुला प्रॉब्लेम नसेन तर तुझ्या घरी आपण सेलेब्रेट करूया का

ध्रुवी : मला काही हरकत नाही.....मी माझ्या घरच्यांना सांगते....तस.....ते मला नाही म्हणणार नाही......पण करायचं काय.....

अजित : मी ना तिला wish नाही करणार....तुम्ही सगळे करा......आणि तु तिला काहीपण सांगुन तुझ्या घरी बोलावं....आपण सगळे मिळुन तिचा बर्थडे सेलिब्रेट करू.....आणि आता नंदु आणि मयुरेश पण आलेत सो त्यांना पण भेटता येईल।आपल्याला तुला जमेन का??????

ध्रुवी :हो हो छान आहे प्लॅन.....मी सगळ्याना पर्सनल मॅसेज करते.... आणि आपला प्लॅन सांगते....म्हणजे सगळे आपल्याला मदत करतील....

अजित : थॅंक्यु.... बट प्लिज काही करून तिला तु कन्व्हेयन्स कर आणि तुझ्या घरी बोलावुन घे रात्री .....तरी पण सात वाजता  मी तिला सरप्राईज देईल

ध्रुवी : ओके......चालेन

आजित : थॅंक्यु..... हेल्प केल्याबद्दल

ध्रुवी :काय तु पण .....थँक्स कशाला बोलतोस.... मी करेन सगळं अरेंज

अजित : ओके ...चल बाय

ध्रुवी : बाय

(अजितच्या सांगण्यानुसार ध्रुवी करुणाला सोडुन सगळ्याना पर्सनल मॅसेज करते ....आणि करुणाच्या बर्थडे पार्टी ची प्लॅनिंग सांगते)

सकाळ परेनंतर सगळे तिला त्याचा होकारार्थी रिप्लाय देतात....आणि रात्रीच बाराच्या नंतर सगळे करुणाला पर्सनल मॅसेज वर बर्थडे विश करतात

करूणा सगळ्याना थॅंक्यु म्हणुन त्यांचे आभार मानते....पण करूणा मात्र अजितच्या फोन ची वाट बघत असते.....तिची मनाची चलबिचल होते.....ती मानातच बोलते.....(अजित कसाकाय माझा बर्थडे विसरू शकतो....कॉल नाही तर निदान मॅसेज तर करू शकतो ना......तिला अक्षरशः रडू येत.....पण काय करणार.....त्याचा पण नाईलाज आहे....ती रडतच झोपुन जाते

@@@@@@@@@@@@@@@@

सकाळी आठ वाजता करुणाची आई आणि बाबा तिला  वाढदिवसाच्या शुभेच्या द्यायला तिच्या रूम मध्ये येतात

बाबा :हॅपी बर्थडे टु यु .....:हॅपी बर्थडे टु यु ..:हॅपी बर्थडे  डिअर करूणा ......:हॅपी बर्थडे टु यु ..(आनंदातच)

करूणा : थॅंक्यु बाबा थॅंक्यु आई .....बाबा हे काय सकाळी सकाळीच केक कापायचा.....

बाबा : हो मग काय......मी कालच मागवला....फक्त तुझ्यापासुन लपवलेला(हसतच)

आई : काळ पासुन किती गोंधळ तुझ्या बाबांचा......

करूणा :म्हणजे आता काय केलं.....बाबांनी

आई : काय नाही केलं ते बोल.....सकाळ पासुन किचन मध्ये गोंधळ केलाय.......नुसता......हे बनव ते बनव....करुणाला हे आवडत....करुणाला ते आवडत....अजून पण किचन मध्ये गोंधळ आहेच.....येऊन बघ.....हवं तर

करूणा : बाबा काय ओ.....किती काम वाढवलं.....तुम्ही.....

बाबा : अग एक दिवस तर मिळतो.......तयारीला ......

आई : हो बरोबर बोलात .....पूर्ण वर्षभरात एकच दिवस तुम्ही किचन मध्ये येतात.....त्यात पण काम कमी आणि पसारा जास्त करतात......ते पण तुमच्या  मुलीच्या वाढदिवसाला.....कधीतरी माझ्या वाढदिवसाला पण किचन मध्ये येत जा(हसतच)

बाबा : नक्की हा नक्की......पुढच्या वेळेस.....नाही नाही....एक काम करतो आज पासुन तु दुकानावर जा.....मी  किचन मध्ये जातो......(मस्करी करतच)

करूणा : काय बाबा तुम्ही पण.... मग तर आई घराची काया पलटच होईल.....(हसत)

बाबा : बेटा .....चल तु आधी.....केक काप.....

करूणा हसत हसत केक कापते आणि तो ती तिच्या आई बाबांना भरवते......

आई : काय झालं....आज चेहरा उतरलेला का दिसतोय.....

करूणा : काही नाही ग आई...... ते रात्री जरा उशिरा झोपले ना म्हणुन......(तेवढ्यात तिला ध्रुवी चा फोन येतो) करूणा फोन वर बीझी होऊन जाते म्हणुन आई बाबा निघुन जातात तिच्या रूम मधुन

करूणा : हा बोलना डिअर

ध्रुवी : हॅप्पी बर्थडे टु यु......हॅप्पी बर्थडे टु यु.........हॅप्पी बर्थडे डिअर करूणा ......हॅप्पी बर्थडे टु यु

करूणा : थॅंक्यु .....थॅंक्यु सो मच.......

ध्रुवी : मग आज काय स्पेशल......

करूणा : काही नाही ग........स्पेशल .....आज बाबांनी माझ्या साठी खास जेवण बनवलंय

ध्रुवी : बाबांनी....???(आश्चर्य चकित होत विचारते)

करूणा :  हो ग ....म्हणजे जेवण कमी पसारा जास्त बनवलाय......(हसत)

ध्रुवी : कमाले बाबा......(हसतच) काय मग कोणाचा स्पेशल फोन आला की नाही(मुदामून विचारते)

करुणा: कसला काय......(नाराजगीतच)

ध्रुवी : काय बोलतेस....का ग काय झालं

करूणा : अजित मला कालच बोला......तो आज त्याच्या डॅड बरोबर मिटींगला बाहेर कुठे तरी जातोय...

ध्रुवी :  ओ नो....शीट यार ....त्याच्या डॅड ला पण आजच मीटिंग अरेंज करायची होती का

करूणा : जाऊदे सोड....परत विषय नको ....मला

ध्रुवी: अच्छा ठिके.....नाराज नको होऊस....ऐक ना मी ना आज विचार केला कि तुझा रात्री बर्थडे सेलिब्रेशन करूया ते पण माझ्या घरी........माझे घरचे नाहीतरी गावी गेलेत......तर आज आपण सगळे भेटुन एन्जॉय करूया

करूणा : नको ग ....तसा पण माझा मुड नाहीये.....

ध्रुवी : अशी काय करतेस तु.....अजित ने तुला विश नाही केलं म्हणुन तु आम्हाला सगळ्याना नाराज करणार का

करूणा : म्हणजे तुम्ही सगळ्यानी आधीच ठरवलंय.....?????

ध्रुवी : नाही नाही तस नाही....हा प्लॅन माझ्या आता डोक्यात आला....म्हणुन सर्वात आधी तुला कॉल केला....आता तरी नाही नको बोलुस

करूणा : तुला खरं सांगु माझं खरच काहीच मन नाहीये...

ध्रुवी : तु आता अस करणार आमच्या बरोबर...एक तर मयुरेश आणि नंदु पण आलेत.....त्यांना पण भेटता येईन आपल्याला.... तो तर विचार कर.....तु आमच्या मित्राचं मन नको मोडुस ग.....

करूणा : अच्छा ठिके......मी ट्राय करते

ध्रुवी :  ट्राय नाही.....यायचंय तु.......आणि हो वाटलं तर मी तुझ्या आई सोबत बोलते

करूणा : नको .....मी बोलते.....

ध्रुवी: आणि हो काकूंना हे पण सांग कि तु आज माझ्या घरी रहाणारेस....कारण माझे घरचे नाहीयेत गावी गेलेत.....ठिके

करूणा : आता रहायचं पण

ध्रुवी: तु ऐकत जा ना यार....ही माझी ऑर्डर आहे कळाल

करूणा : आज माझा बर्थडे आहे आणि तु मला ओरडतेस

ध्रुवी : कमाले यार तुझी...... आधी प्रेमाने सांगितलं तर ते कळत नव्हतं....आणि आता....अच्छा ठिके....

सॉरी....पण ये आठवणीने....सगळे येणारेत...आपण छान पैकी एन्जोय करूया रात्रभर.(आनंदातच बोलते)

करूणा : ठिके.....

(दोघींचं बोलुन झाल्यावर करूणा तिच्या आई बाबांची परमिशन घेऊन संध्याकाळच्या तयारीला लागते......पण तीच मन अजितला खुप मिस करत असत....)पण तसं ती दाखवत नाही


(काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कंमेंट द्वारे)ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sonali Pankaj Shejale

House wife

House Wife