Jan 22, 2021
प्रेम

चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा)पार्ट 35

Read Later
चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा)पार्ट 35

पार्ट 35

मोहिते विला (रात्री 1 वाजता)

मिस्टर मोहिते झोपताना सारखे एका कुशी वरून दुसऱ्या कुशीवर होत होते.....न जाणे त्यांची झोप उडाली होती....त्यांचा अस्वस्थ पणा त्यांच्या वागणुकीतुन दिसत होता.....कल्पना (बायको)हे सगळं पहात होती......शेवटी मोहिते उठुन बाहेर हॉल मध्ये गेले.....आणि त्यानी ड्रिंक करायला घेतली.....मोहिते बाहेर गेले म्हणुन कल्पना सुद्धा त्यांच्या मागे मागे आली

कल्पना : काय झालं....एवढ्या रात्री ड्रिंक....कसलं टेन्शन आलं आहे का....?????

मोहिते : (चिडचिड करतच)टेन्शन.... आणि मला .....हम्म.....मला कसलं टेन्शन असणार....आणि तु इकडे काय करतेस...जा झोप जाऊन .......मी येईलच झोपायला.....थोड्या वेळाने.....

कल्पना : केव्हाची बघते.....साधं नीट झोपायला सुध्दा येत नाही आज तुम्हाला

मोहिते: मग काय झाल..... होत कधी कधी अस.....म्हणुन ह्याचा अर्थ असा नाही की मला कुठंच टेन्शन आलं आहे......


कल्पना: हम्म दिसतचे

मोहिते: मी काय बोलतो....अजित आला का घरी....

कल्पना : हो कधीच आला .....का काही काम होत का त्याच्याकडे.....

मोहिते :नाही काही खास नाही........सहज विचारलं

कल्पना : सहज.....विचारलं.......?????

मोहिते : तुला म्हणायचं काये....???(रागातच)

कल्पना : काही नाही....गुड नाईट......

मोहिते त्यांचा ड्रिंकचा ग्लास तसाच बाजूला ठेवत हॉलच्या सोफ्यावर झोपुन जातात

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

असेच काही दिवस निघुन जातात ......नंदु आणि मयुरेशच मेडिकल सुद्धा व्यवस्थित पार पडत....... करूणा आणि अजितच प्रेम बहरत चालेल असत.......दिवस जसे भर भर पुढे सरकत असतात तसेच नंदु आणि मयुरेशला ट्रेनिंग लेटर येत.....नंदूला नाशिक आणि मयुरेश ला नागपुरला बोलवतात.......

पंटर गॅंग मेसेज वर

नंदु : कसे आहेत सगळे माझे मित्र ......

सगळे एकत्र मस्त ......

मयुरेश : आम्हाला आज ट्रेनिंग लेटर आलं आहे....

सगळे मित्र स्याड इमोजी पाठवतात

नंदु :अरे सगळे नाराज का होतायत..... फक्त सहा महिन्यांचा च प्रश्न आहे ....समजणार पण नाही कसे दिवस निघुन जातील ते

अजित : हो रे पण आपल्या सगळ्याना एकमेकांची एवढी सवयी लागलीये ना.... बिना भेटता कस रहायचं.....

संगिता : आता मला कोण चिडवणार.....कमी खा म्हणुन...

नंदु : हहहहहह ....काळजी करू नकोस ....मी मेसेज नाहीतर कॉल करून चिडवणारच.....त्या शिवाय करमणार कस मला......

संगिता : म्हणजे माझी पाठ सोडायचीच नाही हे ठरवलं आहेस वाटत

ध्रुवी : सगळे मिस करतील यार तुमच्या दोघांना...मला तर आताच रडायला येतंय

मयुरेश : तुम्ही लोक असे वागायला लागले तर कस होईल आमचं....आमचं मन तरी लागेन का......

अभिषेक : कधी निघणारे तुम्ही दोघे......??????

नंदु : पुढच्या सोमवारी......दोघांना पण सेम जॉयनिंग डेट आहे

करूणा : ओके..... काळजी घ्या ....आणि नेहमी कॉल करत जा आम्हाला.....…

अजित : मेडिकल वगैरे सगळं नीट झालं ना

मयुरेश : हो ते झालं ना म्हणुन लेटर आलं

ध्रुवी: छान ट्रेनिंग करा.....इकडे आम्ही तुमच्या घरी जात जाऊ.....इकडची काळजी करू नका

नंदु :तुम्ही लोक हायत म्हणुन तर एवढं पुढे आलो आम्ही....नाहीतर एवढं शक्य नव्हतंच माझ्यानेतर

अभिषेक : अरे अस नको बोलुस ....तुमची मेहनत पण आहेच ना ......आणी आम्ही सगळे आहोतच तुमच्या दोघांच्या सोबत.....आईकना जाताना काही न्हेणारेस का....म्हणजे काही शॉपिंग असेना करायची तर सांग मला मी येतो.....

नंदु : तुला सुट्टी मिळेल का.....????

अभिषेक : एकच दिवसाचा प्रश्न आहे.....देतील आरामात

मयुरेश : ठिके मी पण येतो....मला पण शॉपिंग करायची आहे

अभिषेक :मला एक दिवस आधी कळव मग मी टाकतो सुट्टी

नंदु आणि मयुरेश : हम्म

@@@@@@@@@@@@@@@@@@@

असेच दोन तीन दिवस निघून जातात मिस्टर रॉबिन मोहितेना कॉल करतात

मोहिते : बोलाना रॉबिन

रॉबिन : कुछ बात हुई अजितसे......?????

मोहिते : नही अभि नही .....में थोडा बीझी था.....तो बात नही कर पाया........

रॉबिन : ऐसे केसे चलेगा मोहिते ......आज नही तो कल बात करणी ही पडेगी......वरना देर हो जायेगी......एक काम करता हु ....में खुद बात करू उससे.....?????

मोहिते : नही नही .......में खुदही बात करूंगा....बस मुझे थोडा वक्त दो.......ओर वेसे भी अजितजी ट्रेनिंग खतम होणे आई हे....अब उसिको ये फॅशन हाउस संभालना हे......इसलीये थोडा वक्त मांग रहा हु....... एक बार में उसे सबके सामने इन्ट्रोडुज करदू तो मेरा काम आसान हो जायेगा

रॉबिन : ठिके.....जेसे तुम्हे ठीक लगे......वो तुम करो.....रखता हु......

मोहिते पुन्हा अस्वस्थ होतात....काय करू नि काही नाही....काहीच समजत नाही त्यांना.....(मोहिते मनातच .....आता काही तरी करून लवकर डीसीजन घ्यावा लागेल नाही तर बरबाद होऊ आपण......)

@@@@@@@@@@@@@@@@@@

शनिवारी नंदु आणि मयुरेश सुट्टी टाकायला सांगतात.....त्या प्रमाणे अभिषेक सुट्टी टाकुन त्या दोघाण बरोबर  शॉपिंग करतो....नंदु आणि मयुरेश ला जे जे हवं आहे ते ते सगळं सामान ते घेतात...... आणि रात्री मयुरेशच्या घरून जेवुन आप आपल्या घरी निघतात......असेच दिवस निघून जातात .....सोमवार येतो.....दोन्ही घरं मध्ये आज खुपच गडबड असते......असणारच ना......आज एका आईचे मूल देशसेवेच्या ट्रेनिंग साठी निघालेत........

सोमवारी सकाळी.....(पंटर गॅंग मेसेज)

संगिता : झाली का सगळी तयारी तुमच्या दोघांची........?????

नंदु : हो चालू आहे .....काकी आणि आई लाडू बनवतायत....(हसतच)

मयुरेश : माझ्या घरी पण तेच चालु आहे....त्यांचा लाडूचा टोप बघून वाटतंय सहा महिने नाही तर एक वर्षाचे लाडू देतायत.....

(सगळे एकत्र स्माईली ईमोजी टाकतात)

करूणा : सगळं एकदा चेक करा.....काही समान वगैरे भरायचं बाकी असेंन

नंदु : हम

अजित : किती ची बस आहे तुमच्या दोघांची

नंदु : माझी सात वाजताय आणि मयुरेश ची नऊ वाजताय

अभिषेक : दोघे वेगवेगळे टाईम कसे काय

ध्रुवी : दोघे वेगवेगळे चालेत ना.....नाशिक आणि नागपुर म्हणुन

अभिषेक : ओ सॉरी विसरलो.....

ध्रुवी : अभिषेक तु दररोज  बदाम खात रहा....म्हणजे स्मरण शक्ति वाढेन तुझी......(हसतच)

अभिषेक : हो ग माझी आई

अजित : तुम्ही प्लिज सगळे बोला .....मला एक मेल करायचाय तो मी करून येतो......आणि हो नंदु आणि मयुरेश..... तुमच्या दोघांना ऑल द बेस्ट .....नीट पोहोचा.....कोणाशी भांडु नका.....आणि पोहोचल्यावर मेसेज करा

नंदु आणि मयुरेश : नक्की

मयुरेश : चला बाय मी पण ठेवतो मला काम आहे.....

सगळे मित्र एकमेकांना निरोप देतात

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

संध्याकाळी साडेपाच वाजता नंदु त्याच्या घरातून निघतो....निघताना भरल्या डोळयांनी त्याच्या बाबांच्या फोटोला नमस्कार करतो......नंदूची आई आणि काकी तर दोन दिवसापासूनच रडत होत्या......आज काकांना सुद्धा त्यांच्या भावाची कमतरता जाणवत होती...... नंदुने पूर्ण घर भरल्या डोळ्यांनी पाहुन घेतल आणि निघाला त्याच्या प्रवासाला

नंदु आणि त्याचा पूर्ण परिवार st स्टँड वर पोहोचतो......सगळे जण त्याच्या गाडीचीच वाट बघत असतात....तेवढ्यात नंदूला मागुन कोणीतरी आवाज देत

नंदु.........

नंदु मागे वळुन बघतो आख्खी पंटर गॅंग आणि मयुरेशची फॅमिली येते त्याला सोडवायला.....सगळ्यांना बघुन नंदु तर शॉकच होतो......

नंदु : तुम्ही सगळे इकडे काय करतायत....

अभिषेक : आमचे दोन जिगरी यार सहा महिन्यासाठी पोलीस ट्रेनिंग ला चालेत मग आमचं घरात मन कस लागेन

नंदु एक एक करून सगळ्यांना मिठी मारतो

नंदु : मयुरेश तु आताच सगळं समान घेऊन आलास....

मयुरेश : अरे ह्या सगळ्यानी सगळं गुपचुप ठरवलेलं......की किती वाजता भेटायचं किती नाही.....तुला आणि मला सरप्राईज द्यायचं होत ह्याना सगळ्यांना...... म्हणून हे सगळे चार वाजता माझ्या घरी आले मला न सांगता.....आणि मला सामान भरायला मदत केली....नंतर मला बोले की आपण सगळे एकत्र निघु....म्हणजे नंदूला पण भेटु आणि माझ्या बरोबर टाईम पण स्पेनड करतील....आता जो परेनंतर माझी बस येत नाही तो परेनंतर हे सगळे माझ्या बरोबर असणारे.....

नंदु : वा यार....लय भारी केलं..... खुप बर वाटल तुम्हाला सगळ्याना बघुन

मयुरेश ची आई :  नंदु हा घे डबा......तुला काहीतरी स्पेशल आणलं आहे मी

नंदु डबा उघडुन बघतो......(मोदक)वा काकी.....खूप छान सुगंध येतोय ......अजुन गरम पण आहेत

मयुरेशची आई : आमच्या मयुरेश ला पण आवडतात ना.....म्हणुन तुला पण बनवले....मला मयु बोलला तुला माझ्या हातचे मोदक आवडतात म्हणुन..... आता गाडीत बसुन खा.....

नंदु तर आता फक्त रडायचा बाकी रहायला होता......

नंदुची आई : माझ्या लेकरावर किती प्रेम करतात तुम्ही सगळे......मला आता टेन्शन नाही माझ्या नंदूच

करूणा : आवो काकी तो आहेच एवढा भारी.....कोणी कस रागवेल त्याच्यावर

अजित : नंदु आणि मयुरेश..... तुम्ही सगळं सामान घेतल ना बरोबर

नंदु : हो हो सगळं घेतलं..... किती वाजले आता.....हे बघा अजून दहा मिनिटं आहेत.....आईकना अभि तिकडे जाऊन चौकशी कर जरा बस टाइमावर आहे का म्हणुन

अभिषेक : असेल रे .....किती घाई तुला.....

नंदु : तस नाही रे सहज विचारलं......

संगिता :  तुम्ही दोघे तिकडे गेल्यावर विसरू नका आम्हाला.....

नंदु : मी तर तुला नाही विसारणार कधीच....खास करून जेवताना....लय आठवण येईल बघ तुझी.....

संगिता : बघितलं काकु ....निघताना पण मला बोलल्याशिवाय जमलं नाही त्याला(मुद्दाम रागातच)

नंदूची आई : काय रे नंदु....आता तरी गप बस

नंदु : सॉरी ....पण तरी पण एक सांगतो बघ वडापाव कमी खा.....जरा......अजून सुटली तर अगडबंब दिसायची

एवढं बोलण्यावर संगिता मुदाम त्याला मारते

अजित : तुझी बस आली नंदु

आता तर नंदु पूर्ण रडवेला आला.....त्याचे मित्र त्याला सामान गाडीत ठेवायला मदत करतात.....एक एक जन त्याचा निरोप घ्यायला त्याच्या जवळ येतात.....नंदूची आई नंदूला मिठीत घेऊन खूप रडते ......आज सगळेच खूप रडतात.....

नंदूची आई : नीट जा .....फोन कर....कुणाशी भांडु नकोस......मी आहे इकडे व्यवस्थित....... इकडली काळजी नको करुस......

नंदु :तु पण तुझी काळजी घे आणि माझ्या गोड बहिणींची सुद्धा

नंदूचे काका : नंदु हे घे थोडे पैसे......तिकडे काही लागलं तर खर्च कर.......आणि कधी पण पैशाची गरज लागली तर मला कळव ....मनात काही ठेऊ नकोस .....आणि इकडची तर बिलकुल काळजी नको करूस......

नंदु : काका माझ्या कडे आहे पैसे....काल आईने पण दिले मला....तिने साठवलेले थोडे.....तेच दिले मला

काका : असुदेणा मग काय झालं......हे पण रहाऊ दे....आणि हे माझं ATM कार्ड ....हे पण ठेव जवळ....पिन मी मेसेज करतो तुला ह्यातून काढत जा......लागेन तसे

नंदु  रडतच काकांना मिठी मारतो.....काका पण खूप रडतात.....

नंतर एक एक मित्रांना नंदु मिठी मारून रडतो.......

अजित : नीट प्रवास कर.....आणि हो हे घे आपल्या सगळ्या पंटर गॅंग कडुन तुला आणि मयुरेशला ही छोटीशी भेट

नंदु :आता हे कशाला....आधीच काही कमी केलाय का तुम्ही लोकांनी.....

ध्रुवी :आधी खोलून तर बघ काये ते....

नंदु त्याच आणि मयुरेश त्याच गिफ्ट खोलून बघतो .....त्या दोघांना पण एक मोठी अशी कॉलाज केलेली फोटो फ्रेम देतात ज्यात सगळ्या मित्रांनी मिळुन केलेली धमाल मस्ती चे छोटे छोटे फोटो असतात......नंदु आणि मयुरेश त्या फोटोला आपल्या छातीला कवटाळून खुप रडतात......सगळेच एक मेकांच्या गळ्यात पडुन रडतात.....शेवटी नंदु निघतो.... सगळे मित्र त्याला खांद्यावर उचलुन बस मध्ये बसवतात.....

शेवट परेनंतर प्रत्येक जण डोळ्यातून अश्रू वघळवत असतात......

अभिषेक :ये यार आत जरा हसा यार .....नाही तर त्याच मन नाही लागणार

करूणा : हो हो

संगिता : नंदु (मोठ्याने ओरडुन)all the best....... we miss you यार.....काळजी घे ....

नेहमी फोन कर.....

एवढं बोलुन नंदु सगळ्यांचा निरोप घेतो.....सगळे हात हलवुन त्याला बाय बाय करतात

(काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा कंमेंट द्वारे)