
चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेमकथा) पार्ट 28
पार्ट 28
अजित आणि करूणा दोघे पुढे बसतात..आज अजित ड्राईव्ह करत असतो......अजित त्याच्या कार मधला रेडिओ ऑन करतो ...आज गाणं पण छान लागलेला असतं....
चाँद छुपा बादल में
शरमा के मेरी जाना
सीने से लग जा तू
बलखा के मेरी जाना
चाँद छुपा बादल में
शरमा के मेरी जाना
सीने से लग जा तू
बलखा के मेरी जाना
गुमसुम सा है, गुपचुप सा है
मदहोश है, खामोश है
ये समा, हाँ ये समा, कुछ और है
हो हो, चाँद छुपा बादल में
शरमा के मेरी जाना
सीने से लग जा तू
बलखा के मेरी जाना
(गाण्याच्या मधी मधी दोघे पण एकमेकांन कडे बघत होते....करूणा तर लाजुन लाजुन कावरी बावरी होत होती....)
नज़दीकियाँ बढ़ जाने दे
अरे नहीं बाबा
नहीं अभी नहीं नहीं नहीं
ये दूरियाँ मिट जाने दे
अरे नहीं बाबा
नहीं अभी नहीं नहीं नहीं
दूर से ही तुम, जी भर के देखो
तुम ही कहो कैसे दूर से देखूँ
चाँद को जैसे देखता चकोर है
गुमसुम सा है, गुपचुप सा है
मदहोश है, खामोश है
ये समा, हाँ ये समा, कुछ और है
ओ हो हो, चाँद छुपा बादल में
शरमा के मेरी जाना
सीने से लग जा तू
बलखा के मेरी जाना
अजित हळुच इशाऱ्याने करुणाला गाण्याचे बोल खुनवत होता....करूणा सुद्धा त्याला साथ देत होती....अजित हळूच तिच्या हातावर हात ठेवतो......करूणा सुद्धा शहारते.... करूणा पटकन तिचा हात काढुन मागे आपले फ्रेंड्स आहे ह्याची इशाऱ्याने जाणीव करून देते....तसा अजितचा चेहरा पडतो....करुणाला त्याचा चेहरा बघुन हसायला येत.....
संगिता : आज कुणाचं काही खरं नाही बाबा....मोसम मस्ताना ....रस्ता अंजना....सगळ काही गुपचुप गुपचुप सुरू आहे...(मुद्दाम चिडवत)
तसे सगळे हसतात
अजित : संगिता तु जेव्हा कुणाच्या खऱ्या प्रेमात पदशीलना तेव्हा तुला हा रस्ता अंजाना नाही वाटणार
नंदु : प्रेमात पडण्यासाठी तीच लक्ष खाण्यावरून आधी हेटु दे
संगिता : तु परत बोलास..
नंदु : अग तसं नाही.....ते तु आज जास्त गुलाबजाम खालेस ना म्हणून सहज बोलो
ध्रुवी :तुझं बर सारख लक्ष असत तिच्या ताटात
नंदु : मैत्रीण आहे ती माझी.....काळजी वाटते म्हणुन बोलतो(ध्रुवीला डोळा मारतच)
संगिता :तु नको काळजी करुस माझी....मी बघेन माझं मी....
करूणा :तुम्ही दोघे परत चालु झालात....कधी तरी शांत बसत जा....
संगिता :ह्याला सांगना....बघाव तेव्हा माझ्या मागे लागलेला असतो
नंदु :सॉरी आतां नाय चिडवणार
संगिता :इट्स ओके
अजित ने संगिता आणि ध्रुवीला त्यांच्या त्यांच्या घरी सोडलं....नंदुला गाडी मध्ये बसुन तो स्वतः करुणाला सोडायला गाडीतून उतरला....दोघे तर आज जास्तच एकमेकांना बघुन लाजत होते....प्रसंग घडलाच होता तसा....
अजित : निघालीस....?
करूणा : हम्म....तु पण निघ आता....आई काळजी करतील....
अजित : हम्म....तुझं मन करतय का ....घरी जाण्यासाठी..... मला तू थांब बोलीस तर मी पुर्ण रात्र इथं उभा राहील....(हसतच)
करूणा :काही पण.... प्लिज निघ आता....
अजित : ओके...... निघ.... पण निघताना एखादं गिफ्ट तर देऊन जा मला....
करूणा :गिफ्ट .....मला नाही माहीत कसलं गिफ्ट.....(विचार करताच )
अजित : ते तुला मी थोड्यावेळा आधी दिलेलं.....
करुणाला मगासचा प्रसंग आठवतो....आणि ती गालातल्या गालातच हस्ते.....चूप बस काही पण.....
अजित : अरे आता त्यात काय झालं......मी फक्त रिटर्न गिफ्ट मागतोय(हसतच)
करूना : ये प्लिज ना....बस ना आता नको चिडवुस..... घरी ज आता....रिटर्न गिफ्ट तुला स्पेशल डे ला देईन...पण प्लिज आता निघ.....
अजित : अच्छा ठिके....गुड नाईट.... लव्ह यु.... टेक केर
करूणा : हम्म....लव्ह यु टु ....काळजी घे.....(आणि त्याला ती एक फ्लाईंग किस देते)
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
करूणा इकडे घरी येते..... बाबा तर तिची वाटच बघत असतात.....
दत्तात्रय (कारुणाचे बाबा) :करूणा किती वेळ बेटा......
करूणा : सॉरी बाबा....परत अस नाही होणार
बाबा : बेटा मी रागावलो नाही....काळजी वाटते ना महणून विचारलं
करूणा : नेक्स्ट टाईम अस नाही होणार बाबा..
मधु (करुणाची आई) : काही हरकत नाही....कधी कधी उशीर होत असेन तर कॉल करून सांगत जा....काळजी नाही वाटणार म्हणुन
करूणा : नक्की आई
बाबा : मग काय काय धमाल केलीस
करूणा एक एक करून सगली मज्जा मस्ती तिच्या आई वडिलांना सांगत असते .....तिच्या आईला तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत असतो
इकडे अजित सुद्धा सगळ्यांना घरी सोडुन त्याच्या घरी येतो
....अजित त्याच्या रूम मध्ये येतो.....आणि समोर बघतो तर काय....चक्क त्याची आई त्याची वाट बघत असते......
अजित : आई तु अजुन झोपली नाही.....
कल्पना (अजितची आई) : नाही ....तुझीच वाट बघत होती.....काय मग सोडलं सगळयांना....
अजित : हो आई (खुप थकलो आज)पण खरंच सांगु आजचा दिवस खूप मस्त वाटला मला.....(अजित आईच्या मांडीवर डोकं ठेवतच बोलतो)
आई : खुश तर असणारच ना सगळी तुझ्या आवडीची मानस होती ना.....स्पेशली..... ती करूणा.....
आईच्या तोंडातुन करुणाचा नाव ऐकल्यावर अजित चटकन उठुन बसतो....आणि एक टक त्याच्या आईकडे बघतो
आई : असा काय बघतोस माझ्याकडे.....तुला काय वाटलं मला कळणार नाही काही
अजित : तु समजतेस तस काही नाही.....आई....we are just frends...........
आई : मी कुठे काही बोलते.....तुच मला बोलतोयस....we are just friends.....मी तर काहीच बोली नाही.....मग एक्सप्लेनेशन कशाला देतोस......
अजित : ते मी .....ते(गोंधळतच)
आई :तु मला काही नाही सांगितलं तरी चालेन....तुला वाटेनं तेव्हा सांग.....(कल्पना झोपायला निघते)
अजित : आई ....आई आईकना ....तस काही नाही..... तु ...तु बस आधी.... इकडे....मी तुला सगळं सांगतो
कल्पना हसतच.....बसते
अजित : आई ....ते मला ती आवडते....आणि तिला पण मी आवडतो....पण आम्ही कधीच एकमेकांना सांगितलं नाही....
आई : म्हणजे अजुन तुंम्ही एकमेकांना प्रपोज नाही केलं.....??
अजित : केलं ना....मीच केला....ते आम्ही खंडाळ्याला गेलेलो ना ....तिकडे केला....आणि तिने पण तिच्या प्रेमाची कबुली दिली....
आई :अरे वा....फायनली तुम्ही दोघे आता love birds आहात....(हसतच)
अजित : मान खाली घालुन हो बोलतो
आई : अरे लाजतोयस काय....(अजितच्या खांद्यावर हात मारतच बोलते)....मग मला सांगशील तिचा बद्दल
अजित : जास्त काही नाही ग....सिम्पल आहे....तिच्या वडिलांचं साड्यांचा दुकान आहे ते तर तिने आधीच सांगितलं तुला....तिची आई हाउस वाईफ आहे....आणि ही त्यांची एकुलती एक मुलगी.....खुप निरागस आहे ती....कशाचाच मोह ....घमंड नाही तिला.....
आई : वा ....बराच ओळ्खतोस तिला(हसतच)
अजित : काय आई तु पण....
आई : मग पुढे काय करायचं ठरवलं
अजित : तिला अजुन शिक्षण पुर्ण करायचं आहे....मी आणि ती जो परेनंतर व्यवस्थित सेटल होत नाही तो परेनंतर पुढचं काही बोलू शकत नाही
आई : तु व्यवस्थित विचार केलास ना....म्हणजे पूर्ण आयुष्याचा सवाल आहे.....
अजित : हो आई....तु अस का बोलतेस.....तुला नाही आवडलीका...???
आई : मला तर करूणा खुप आवडली....माझी चॉईस पण तशीच होती.....
अजित : थॅंक्यु आई .....(अस बोलतच अजित काही तरी विचार करतो)
आई : काय झालं....कसला विचार करतोस.....
अजित : आई ते डॅड ....डॅड मानतील का....???
आई : तु त्यांचा विचार सोड.....त्यांना मी हँडल करेन
अजित : थॅंक्यु आई.....लव्ह यु सो मच
आई : love यु टु बेटा
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
असेच काही दिवस निघून जातात.....रिझल्ट नंतर सगळ्यानी आप आपली फिल्ड निवडली.....करुणाने ऑनलाइन फॉर्म भरलेलाच.....(द सीझर)ह्या फॅशन डिझाईनर च्या कोर्स साठी.....तिचे पुढच्याच आठवड्यात कलासेस चालु होणार होते.....अजित ने सुद्धा त्याच्या डॅड च्या सांगण्यानुसार ऑफिस मध्ये येऊन जाऊन....फॅशन डिझायणारच्या काही बेसिक गोष्टी शिकत होता......नंदु थोड्या दिवस आपल्या गावी (कोल्हापूर ला )जाऊन त्याच्या आई वडिलांबरोबर आणि बहिणी बरोबर मजा मस्ती करून आला... कारण त्याने पण पोलीस भरती चा फॉर्म भरलेला....त्याचा ही अभ्यास जोरात चालला....
संगिता ने नंतर टीचर फिल्ड मध्ये जायचं ठरवलं
आणि ध्रुवी एका प्रायव्हेट कंपनी मध्ये जॉबला होती.....तिने तिच्या परिस्थिती नुसार जॉब करणं स्वीकारलं....अभिषेकला त्याच्या वाडीलांच्याच कंपनी मध्ये जॉब मिळाला.....मयुरेश ने सुद्धा त्याच स्वप्न साकारण्यासाठी पोलिसभर्ती चा फॉर्म भरला
[email protected]@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
एक दिवस सहजच गावावरून(कोल्हापूरवरून)नंदूला फोन येतो....त्याच्या वडिलांचं हृदयविकाराणे निधन होत.....नंदुच्या तर पाया खालून जमीनच सरकते....
नंदूचे काका: काय झालं तु असा स्तब्ध का उभा आहेस....ते गावावरून फोन आला....बाबाना हृदयविकाराचा झटका आलं आणि ते जागीच गेले......
काका :काय .....(काका सुद्धा डोक्याला हात लावून बसतात) तेवढ्यात काकी पाणी घेऊन येते काकांसाठी....पुर्ण घर शांत असत
नंदु :काका आपल्याला निघायला हवं....
काका : तुम्ही सगळे बॅग भरा मी एखादी प्रायव्हेट गाडी बघतो
थोड्याच वेळात काका ,काकी त्यांची मुले आणि नंदु कोल्हापूरला निघतात.....
थोड्याच वेळात नंदूला आठवत त्याने ही बातमी त्याच्या मित्रांना नाही सांगितली.... तो गाडीतूनच पंटर गॅंग ग्रुप वर मेसेज टाकतो....मेसेज वाचुन सर्वात आधी अजित त्याला कॉल करतो....
अजित : नंदु.....काय झालं.....हे असं अचानक.....(काळजीच्या स्वरात)
नंदु :( रडतच) हो रे आज्या....सकाळीच मित्रा मला कॉल आला गावावरून बाबा गेले म्हणुन....
अजित : आता कुठेस तु ....मी येतो तिकडे
नंदु ...: मी निघालोय आता कोल्हापूरला
अजित : कसा निघालास.... म्हणजे गाडी की लक्झरी...???
नंदु : काकाने प्रायव्हेट गाडी केलीये....आम्ही सगळे आहोत आता गाडी मध्ये.........चार पाच तासात पोहोचु
अजित : तु मला फोन करायचना ना....मी आलो असतो माझी गाडी घेऊन तुझ्या बरोबर कोल्हापूरला
नंदु : तु हे बोलास तीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी..... पण सगळं एवढा घाई गडबडीत झालं ना....तुला कॉल करायचाच राहवुन गेला
अजित : काही हरकत नाही....तु काळजी घे स्वतःची.....काही लागल तर नक्की कळव.... मी आहे इकडे...
नंदु : थँक्स मित्रा
अजित : हम्म....
(सगळे मित्र एक एक करून फोन करून नंदूला शांत करत होते....त्याला धीर देत होते)
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
इकडे चार पाच तासाच्या प्रवासानंतर नंदु आणि त्याच्या काकांचा परिवार नंदुच्या घरी पोहोचतात
नंदूला दारातून बघूनच त्याची आई जोरात हंबरडा फोडते....त्याच्या बहिणी धावत येऊन त्याला बिलागतात
नंदूचे काका त्याच्या भावाजवळ बसुन जोर जोरात रडतात....
जावा जावा एकमेकांच्या कुशीत शिरून रडत असतात.....
खुप उशीर होऊ नये म्हणुन रात्रीच 12 च्या आत सगळ्या विधी आटोपून घेतात
असेच काही दिवस सरून जातात....नंदु आणि त्याचा परिवार बऱ्यापैकी दुःखातून स्वतःला सावरतात
आता नंदूला एकच गोष्ट खटकते आता आपल्या आई आणि बहिणीला सोडून कसं निघायचं
नंदूचे काका सगळ्याना रात्री जेवण झाल्यावर एकत्र बोलवतात
काका : वहिनी.... दादाच जे झालं ते खुप वाईट झालं .....(दबक्या अवजातच)मी माझा भाऊ गमावला....तुम्ही तुमचा नवरा....आणि मुलांनी त्यांचे वडील.....
दादाला मी किती सांगितलं चल मुंबईला पण त्याला त्याच गावच प्यार....असो....जे झालं ते झालं.....देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होत.....पण आता प्रश राहिला ह्या मुलींचा आणि तुमचा....मी असा निर्णर्य घेतला आहे....की तुम्ही सगळ्यानी आमच्या सोबत कायमच मुंबईला यावं
नंदूची आई : नको नको भावोजी.....आम्ही जमेंने तस करू...रहायला प्रश्न मुलींचा त्या पण शिक्षण करतातच आहे....
नंदूचे काका:मला मान्य आहे वहिनी तुम्हाला पटणार नाही....पण निदान नंदुचा तरी विचार करा....तुम्हाला काय वाटतं तुम्हाला सोडुन गेल्यावर त्याच मन लागेन का तिकडे ...त्याच पूर्ण करियर पडलंय विहिनी.... थोड्या दिवसाने तो पण त्याच्या पायावर उभा राहील.....निदान त्याला एकदा सेटल तर होऊद्या
नंदूची काकी : हे बरोबर बोलतायत ताई.....अँसिग्या साठी नाही तर निदान नंदुसाठी तरी चला....तुम्ही आमच्या साठी परक्या आहात का.....आपण जावा कमी बहिणी जास्त आहोत.....तुम्ही चला आमच्या बरोबर....म्हणजे आम्हाला पण तुमची काळजी लागणार नाही आणि तुम्हला पण..... सगळे एकत्र रहाऊ....प्लिज
नंदूची आई तोंडाला पदर लावुन रडते....तशी नंदूची काकी त्यांच्या गळ्यात पडून दोघी रडतात
थोड्याच दिवसात नंदु त्याच्या आई आणि बहिणींना घेऊन मुंबईला येतो.....
सगळं कस सुरळीत चालु असत....त्यातच नंदुच्या घरी त्याचे मित्र त्याला भेटायला येतात......
(काय मग कसा वाटलं आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कंमेंट द्वारे)