Jan 22, 2021
प्रेम

चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेमकथा)पार्ट 27

Read Later
चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेमकथा)पार्ट 27

 

पार्ट 27

अजित आणि करूणा किती तरी वेळ एकमेकांच्या ओठांमध्ये कैद असतात.... नंतर स्वतःहुन करूणा लाजुन अजितकडे पाठ फिरवते...आणि तिचा चेहरा तिच्या हाताने लपवते..... अजित अलगद तिला त्याच्या पाशी फिरवतो

अजित: आता असंच लाजत रहाणारेस की जायचं आपण....सगळे वाट बघत असतील आपली

करूणा मानेनेच हा बोलते

दोघे पण बाहेर येतात जिकडे सगळी जण वाट बघत असतात त्यांची

ध्रुवी  : झाला का ग स्वच्छ तुझा ड्रेस....????

करूणा : हो झाला...

अजित : स्नॅक्स खाना तुम्ही सगळे(काका अजून आणा स्नॅक्स)

सगळे जण छान स्नॅक्स चा आस्वाद घेत होते ...तेवढ्यात तिकडे अजितची आई येते

कल्पना (आई ): काय मग मुलांनो....तुम्ही सगळे कम्फर्टेबल आहात ना इकडे....

(सगळे एकत्र हो बोलतात)

कल्पना(आई) : करूणा ....कॉलेज मध्ये तु टॉप केलंस ना...???

करूणा : हम्म (हो )मीच केला.....

कल्पना : congratulations बेटा..... पुढे काय करणारेस....???

करूणा : फॅशन डिझायनर चा कोर्स करणारे ....त्यासाठी ऑलरेडी एका ठिकाणी ऍडमिशन घेतलं आहे

कल्पना (आई): गुड....तुला आधी पासूनच आवड आहे का...

करूणा : हो ...म्हणजे माझ्या बाबांचं साड्यांचा दुकान आहे....म्हणुन म्हंटलं.... ह्या फिल्ड मधेच करियर केलं तर त्यानासुद्धा मदत करता येईल

कल्पना : खूप छान विचार आहे तुझे....all the best

करूणा :थॅंक्यु आई

अजितची आई अजितला मधुन मधुन बघत होती...कारण ती जशी जशी करूणा ला प्रश्न विचारत होती तस तसा अजित खुश होत होता.....

कल्पना(आजितची आई ) : मुलांनो तुम्ही सगळे मिळुन गप्पागोष्टी करा मी आलेच....अजितची आई निघुन गेल्यावर
तेवढ्यात रिचा बोलते

रिचा : A J आवो ना एक पीक लेते हे

अजितचा नाईलाज असतो म्हणुन तो तिच्या बरोबर फोटो काढायला जातो

रिचा : थोडा ओर क्लोज आवो ना....इस फोटो में तुम दिखाई नही दे रहे हो

आता तर अजितची पंचायत झाली....तिकडे करूणा आणि इकडे रिचा...तेवढ्यात अजितची आई येते

कल्पना : अजित बेटा सगळ्याना जेवायला बोलावं....परत त्यांना त्यांच्या घरी पण जायचं आहे ना.....

अजित : आई थोडया वेळाने न्हेऊ का....मला त्यांना आपला स्विमिंग पूल पण दाखवायचा आहे

कल्पना (आई )अरे आधी जेवुन घे...नंतर तुम्ही तिकडे बसा....आरामात....गरम गरम जेवण आहे रे

अजित : ठिके आई ....तुम्हाला सगळ्याना चालेना

संगिता : मला तर पहिलं चालेन ....किती छान सुगंध येतोय जेवणाचा....वा....

नंदु : संगिता तु इथे पण सुरु झाली....

संगिता : तुला काय प्रॉब्लेम झाला परत

कल्पना (अजितची आई)अरे रे रे ....असे भांडु नका....नंदु बेटा कशाला तिच्या मागे लागतोस.....खाऊ दे तिला जे हवं आहे ते....तु काळजी नको करुस आज मी जेवायला वाढणार आहे....तो नाही तुला अडवणार

संगिता आणि नंदु दोघे एकमेकांना चिडवत जेवायला उठतात

अजित : या बसा इकडे....अजित सगळ्यांना जेवायला बसायला सांगुन तो करुणाच्या बाजूला बसतो....अजितचे नखरे त्याची आई लांबुनच बघत असते

कल्पना : काका आना बघु एक एक डिश....

अजितच्या आईने जशी ऑर्डर दिली तसे सगळे सेर्व्हेन्ट एक एक पदार्थ घेऊन येतात....आजचा बेत तर लाजवाब

पनीर टीका मसाला,वेज कोल्हापुरी....खास नंदुसाठी ,भेंडी फ्राय, दाल तडका,जिरा राईस.. ,पराठे आणि गुलाबजाम....

सगळ्याच डिश सगळ्यांच्याच आवडीच्या होत्या.... अजितची आई सगळ्याना स्वतःहुन वाढत होती.....प्रत्येक जण जेवणाचा आनंदाने आस्वाद घेत होते

अभिषेक : संगिता जरा कमी जेवण कर ....नाही तर उठायचे वांदे होतील(सगळे हसतात)

संगिता: (मुदाम रागवतच)बघितलं काकु.... कसा बोलतो हा....

कल्पना( अजितची आई) : ये शु....अस नको बोलुस तिला...आज ती आमच्या घरी आली आहे ....तिला हवं ते खाऊदे.... तु लक्ष नको देऊस....तु खा बेटा.... मी आहे इकडे......

रिचा बेटा आपको कुछ चाहीए

रिचा : नो थँक्स आंटी..... आज तो मेरा डाएट भी नही होगा

अभिषेक : होगा होगा ....ये हे ना सलाड....ये लो....

रिचा रागाने बघते

अजितची आई करुणाला : करूणा बेटा तुझं ताट एवढं रिकामं का ग.....थांब मी तुला वाढते

करूणा : नको नको....बस झालं....आधीच भरपूर जेवले मी आज

कल्पना (आई) : अस कसं.... तु काहीच नाही खालस.....थांब.....मी आलेच....काका पनीरची भाजी द्या बघु मला

करुणाला आता काय बोलू नि काय नको काहीच समजत नव्हतं....पण अजित मात्र मनातुन खुप खुश होत होता...

सगळे जण आनंदाने सगळं जेवण संपवतात

करूणा : आई ....तुमच्या हाताला खुप छान चव आहे..(करूणा प्रेमाच्या भरात बोलुन जाते....पण तिला समजतच नाही....की तीने अशी अचानक  आई म्हणुन कशी हाक मारली)अजित सुद्धा थोडा गोंधळतो

करूणा : (घाबरतच)सॉरी चुकुन तोंडातुन आई हा उच्चार निघाला

कल्पना : (त्यात सॉरी काय....मला आवडलं तु मला असं आई म्हणुन हाक मारलेली) हो ना अजित (मुद्दाम चिडवत)

अजित : (गोंधळून) आई मी ना सगळ्यांना घेऊन पूल साईडला जातो तु काकांकडे आईस्क्रीम पाठव...प्लिज....(एवढं बोलुन तो त्याचा पळता पाय काढतो)

अजितची आई सुद्धा गालातच हस्ते

अजित सगळ्याना घेऊन पुल साईडला येतो

नंदु : काही पण बोल मित्रा आज लय भारी वाटलं बघ.....तुझं घर....तुझी माणसं... आणि आई बी लय भारी हाय....जेवण तर व्वा.... साक्षात अन्नपूर्णा माता हाय बघ त्यांच्या हातात....

अजित : थांक्यु नंदु.....

ध्रुवी : तुम्ही एवढ्या मोठ्या घरची माणसं पण काकु एवढ्या साध्या.....म्हणजे किती निरागस राहणीमान आहे काकुंच

अजित : तिचा स्वभावच आहे तसा....तिला दिखावा नाही आवडत.... डॅड आणि ती टोटल अपोजिट आहेत.....

संगिता : अगदी बरोबर बोलास तु ....पैसा काय आज आहे उद्या नाही....माणुसकी जपायला हवी....नाही तर काही लोक तर उगाचच उडया मारतात नको त्या पैशांचा घमंड दाखवत(मुद्दाम रीच्याला टोमणा मारते)

रिचा : तुमने मुझे कुछ बोला क्या....???

संगिता : नही तो....अब मेंने तुम्हारा नाम लिया क्या....खाली फुकट अपने उपर ले रही हे

करूणा : (मधीच अडवत)चला आपण बसुया ह्या गवता मध्ये.......तसे सगळे निघतात( करूणा हळूच संगीताच्या कानात बोलते...."कशाला तिच्या मागे लागतेस)

संगिता : मी कुठे लागते तिच्या मागे....तीच माझ्या डोक्यात शिरते..... मगाशी पण मुद्दाम तुझ्या अंगावर ज्युस सांडवला(तोंड वाकड करतच)

करूणा :संपला तो टॉपिक तेव्हाच....आता चूप बस ओके

सगळेच एक एक करून बसतात तेवढ्यात रीच्याला कॉल येतो आणि ती साईडला उठुन जाते

अभिषेक : मगाशी कुणाला तरी बाथरूम मधुन यायला उशीर झाला वाटत

(अभिषेक च्या बोलण्यानंतर अजित आणि करूणा दोघे एकमेकांकडे बघुन हसतात)

ध्रुवी : नाही ....तस काही सांगायचं नसेन तर  चालेन आम्हाला...पण कशाला मनात ठेवायचं ....सांगुन टाका..... आम्हाला

करूणा : तुला जेवण जरा जास्तच झालेलं दिसतंय.....जरा शांत नाही बसु शकत का(हाताचा कोपरा मारताच बोलते)

अभिषेक : ये देखो.... भलाई का जमाना ही नही रहा..... अरे आम्हाला वाटलं आत मध्ये अजुन काही सांडलं का काय तुझ्या अंगावर....एक तर उशीर पण झालाना यायला म्हणुन विचारला

अजित : तु आता गप्प बसतोस का....नाहीतर देऊ एक एक.....पंच

अभिषेक :  अच्छा ठिके आज सोडतो रोज रोज नाही सोडणार....(सगळे एकत्र हसतात)

तेवढ्यात अजितचे सेर्व्हेन्ट येऊन सगळ्याना आईस्क्रीम देतात.....

सगळे आनंदाने आईस्क्रीम ची मजा घेतात....रिचा सुद्धा तिचा कॉल संपून त्यांना जॉईन होते

सगळ्यांनी आईस्क्रीम चा मस्त पैकी अस्वाद
घेतला.....सगळे जन परत घरामध्ये येतात....आता वेळ आली निरोप देण्याची

करूणा : आता तर almost 11 वाजत आले....आपण निघुया का....म्हणजे घरी अजुन लेट नको जायला

ध्रुवी :हो मी पण तेच बोलते

तेवढ्यात तिकडे अजितची आई येते

कल्पना : काय मग झाला का एन्जॉय करून...काही त्रास नाहीना झाला...????

नंदु : नाय नाय....लय भारी होत राव....जेवण तर अप्रतिम....

कल्पना :बस बस अजुन किती तारीफ करशील माझी

संगिता : काकु आता निघतो आम्ही....परत उशीर नको व्हायला.....अजुन.... घरचे पण वाट बघत असतील

कल्पना : हो हो ....काही हरकत नाही....अजित तु सगळ्याना सोडुन ये.....मुलींना एकटं नको सोडायला....

अजित : हो चालेन

सगळे एक एक करून अजितच्या आईचा निरोप घेतात....करूणा अजितच्या आईच्या जवळ येते....आणि त्यांना वाकुन नमस्कार करते....त्यांना सुद्धा तिची सादगी आवडते.....अजितला सुद्धा बर वाटत

करूणा : निघते मी....

कल्पना (अजितची आई): निघते नाही ....येते म्हण.... परत येणार ना आमच्या घरी.....

करूणा अजित कडे बघत मानेने होकार देते

अजित सगळ्या मुलींना आणि नंदु ला घेऊन त्याच्या कार ने निघतो....रिचा तिच्या कार ने निघते अभिषेक आणि मयुरेश बाईक ने जातात

(काय मग कसा वाटला आजचा भाग....नक्की कळवा तुमच्या कंमेंट द्वारे)