चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा)पार्ट 24

Untold love story (part 24)

 पार्ट 24

पंटर गॅंग पार्टी करून आप आपल्या घरी जातात

नंदु : काका .....काकी.....कुठेत तुम्ही सगळे (नंदुच्या आवाजाने सगळे एकत्र बाहेर येतात....काका तर सरळ हातात पेढ्याचा बॉक्स घेऊन येतात)

नंदु : काका आहो हे काय .....तुम्ही तर चक्क पिढ्यांचा बॉक्स घेऊन आलात...

काकी : नंदु तुझ्या काकांना आधीच माहीत होतं .....की तू नक्की चांगले मार्क्स आणार..... म्हणुन त्यांनी आधीच सगळी तयारी केली होती...

नंदु आनंदाने त्याच्या काकांकडे बघत असतो....त्याच्या डोळ्यातुन आनंदाश्रू वघळून आले....

काका : आता फ़क्त रडतच बसणार की काही सांगणार पण आम्हाला....किती टक्के पडले तुला.....???

नंदु :काका हे बघा ....... 83 %पडले मला(आनंदाने सांगतो)

काका : काय बोलतोस ...खरच.....(आता तर काकांच्या सुद्धा डोळ्यातुन आनंदाश्रू वाहू लागले)

काकी : नंदु इकडे ये माझ्या जवळ(नंदु काकी जवळ जातो) आम्हाला तुझ्या वर पूर्ण भरोसा आहे....आणि राहणारच....आजच्या तुझ्या यशाने....तु आमची इज्जत ठेवलीस....तुझ्या या यशामधून तु आम्हाला किती आपला माणतोस हे दाखवुन दिलंस....बोल तुला आता काय गिफ्ट हवं

नंदु : काही नको काकी...तुम्ही दोघे जे माझ्या साठी करतायत तेच खुप आहे...ह्या पुढे पण अशीच साथ द्या ...म्हणजे मला जे आयुष्यात साध्य करायचे आहे तिकडे पोहोचेल मी

काका : नक्की नक्की... बेटा.... मग आज आपण सगळे मिळुन रात्री बाहेर जाऊया जेवायला

नंदु : चालेन मला....(घरात पुर्ण आनंदाचं वातावरण होत)

@@@@@@@@@@@@@@

करुणाच्या घरी

करूणा : आई .....आई

मधु : काय मग टॉप केलास पुन्हा एकदा

करूणा पळतच तिच्या आईला मिठी मारते

करूणा :बाबा कुठेत.....???

मधु : ते दुकानावर.......तु त्यांना आधी फोन कर... सकाळ पासुन 100 वेळा कॉल आला त्यांचा(तेवढ्यात फोनची रिंग वाजते)

दत्तात्रय : मधु किती वेळ फोन उचलायला.....आली का करूणा ....घरी ....तिचा फोन पण लागत नाये....आली का नाही .....अजुन... तु बोलत का नाहीस

करूणा : बाबा तुम्ही मला बोलुन द्याल तर ना(हसतच)

बाबा : तु घरी आलीस.....तुझा फोन कुठे....किती वेळ झाला लावतोय ....लागत नाहीये .....ते सोड ....आधी सांग तुझा निकाल काय लागलाय.... सगळं ठीक ना.....

करूणा :बाबा .....बाबा ...शुशुशु....किती काळजी घेता.... अहो माझा नंबर टॉप लिस्ट मध्ये लागला आहे......मला 97 % मिळाले.......(आनंदाने सांगते)

बाबा : काय .....काय बोलतेस तु.....वा बेटा वा....मला खात्री होतीच....तूच पहिली येणार....असाच पुढचा पण अभ्यास कर.....मी आणि तूझी आई सदैव तुझ्या पाठीशी आहे..…

करूणा : थॅंक्यु बाबा....पण आज तुम्ही लवकर या घरी....आणि आठवत ना....आज तुम्ही मला माझ्या आवडीची मिठाई आणार

बाबा : हो हो का नाही......मला माहित आहे....तुझी फेव्हरेट मिठाई गुलाबजाम
...आता सर्वात आधी मी ही बातमी माझ्या सहकर्यांना देतो....सकाळ पासुन वाट बघतायत ते

(एवढं बोलुन दोघे पण फोन ठेवतात)

@@@@@@@@@@@@@@

अजितच्या घरी.....(मोहिते वीला)

अजित :आई आई....

चंदु (नोकर ): साहेब मॅडम बाहेर गेल्या आहेत....

अजित : कुठे गेली आई....??

चंदू : सांगुन नाही गेल्या.....पण एक दोन तासात येतील म्हणुन सांगुन गेल्या

अजित : अच्छा ठिके...(तेवढ्यात अजितचे डॅड समोरून येतात....अजित आनंदाने त्याच्या वडिलांकडे जातो)

अजित : डॅड ....डॅड मी पास झालो......

मिस्टर मोहिते : व्हाट ....ग्रेट न्युज..... माय सन.... तु आज मला खुश केलंस....i am proud of u my son.......

अजित : थँक्स डॅड......

मिस्टर मोहिते : मग पुढे काय करायचं ठरवलं आहे......

अजित : अजून तरी ठरवलं नाही.....बघु

डॅड : एक काम कर तुला काही प्रॉब्लेम नसेन तर तू ऑफिस जॉईन कर....नाही तरी हे सगळं तुझंच आहे....मग कशाला जास्त वेळ वाया घलवतोस

अजित : डॅड तुम्ही बोलतायत ते बरोबर आहे....पण मला स्वतःचं सुद्धा काही तरी करावंसं वाटत....सो बघू

डॅड : ते तु ऑफिस मध्ये बसुन सुद्धा करू शकतोस

अजित : म्हणजे ....???

डॅड : हे बघ बेटा.... तुला एक्स्ट्रा काही कोर्सेस करायचे असतील तर ते तु करू शकतोस.... इव्हन तु ऑफिस मध्ये आलास तर तुला तिकडे पण नॉलेज घेता येईल..... सगळ्याच गोष्टी शिक्षणातून मिळतात असं नाही..त्यासाठी तुला स्वतःहुन सुद्धा पाहावं लागेन.....

अजित ला डॅड च म्हणणं पटतं.... ठिके डॅड मला थोडा वेळ द्या मी कळवतो तुम्हाला......

डॅड : तुला जेवढा वेळ हवा तेवढा घे ....पण नक्की विचार कर...कारण तुला ऑफिस मधुन जेवढया लवकर होईल तेवढ्या लवकर शिकता येईल ...कळल

अजित :ओके डॅड....

तेवढ्यात तिकडे अजितिची आई येते

कल्पना : काय मग....आज पार्टी ना...

अजित धावतच आईला मिठी मारतो
.....तुला सगळं कसं कळत माझं.....

कल्पना :आई आहे मी तुझी....मला नाही कळणार तर कोणाला कळणार

अजित :हा घे रिझल्ट.....95%

कल्पना हातात रिझल्ट घेऊन त्याला न्हयाळत बसते....तसेच तिच्या डोळ्यातुन आनंदाश्रू वाहतात

अजित :आता ह्यात राडण्यासारखं काय
होत

कल्पना : (हसतच)तुला नाही कळणार.....जेव्हा एका आईचा मुलगा मोठा होतोना तेव्हा ती काय अनुभवते ते तुला नाही कळणार

कल्पना मागे वळुन बेडरूममध्ये जाण्यासाठी निघते

अजित :आई ऐकना.....मी काय विचार करतो....मी ना उद्या माझ्या कॉलेज फ्रेंडस ला घरी डिनर ला बोलावू का...??

कल्पना (अजितची आई): "हा हा बोलावना....सगळयांना विचार आधी ...कारण रात्री बोलवतो आहेस...तुझ्या काही मैत्रिणी पण आहेतना.... त्यांच्या घरी काही प्रॉब्लेम नको

अजित : तु म्हणशील तस आई...मी आधी सगळ्यांची परमिशन घेतो आणि तुला कळवतो....

कल्पना : ठीके....

@@@@@@@@@@@@@@

रात्री अजित सगळ्याना उद्या डिनर साठी त्याच्या घरी यायला सांगतो तसे सगळे पटापट आप आपली होकारार्थी संमती दर्शवतात

अजित करुणाला पर्सनल मॅसेज करतो
अजित : काय मग ...मॅडम घरात सगळे खुश ना....

करूणा : हो मग काय .....टॉप केला मी

अजित : व्हेरी गुड ....मग उद्या तु तुझ्या सासुरवाडीत येणार(करूणा लाजुन लाजुन लाल होते)

करुना : अजित मला अजुन मिसेस अजित मोहिते व्हायला वेळ आहे....आताच स्वपन नको बघुस

अजित :स्वप्न पाहणे काही चुकीच नाहीये.....ती आज ना उद्या होणारच आहे पूर्ण

करुणा : (लाजताच)अजित तु पण ना....

अजित : चल आता मला एक गोड किस दे

करूणा : काय (किस)

अजित : हा अग चाट मधुन ईमोजी असतोन तो वाला दे...रियल तर तू देणार नाहीस माहीत आहे मला

करूणा : लाजताच .....खूप झाला चावट पणा अजित आता जाऊन झोप...मला उद्याची तयारी करायची आहे

अजित : अच्छा ठिके... नको देऊस(मुदामून रागातच)

करूणा : राग आला

अजित : राग नाही नाही....मला कशाला राग येईल....मी कोण आहे तुझा

करूणा : अस नको बोलुस अजित ..सॉरी....

अजित : अग वेडा बाई ...चिडवत होतो तुला ...आता झोप खुप रात्र झाली आहे.....

करूणा : हम्म...गुड नाईट...लव्ह यु

अजित : गुड नाईट... लव्ह यु टु...c u tomorrow

@@@@@@@@@@@@

(काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कंमेंट द्वारे)













🎭 Series Post

View all