Jan 27, 2021
प्रेम

चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा)पार्ट 22

Read Later
चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा)पार्ट 22


पार्ट 22

हॉटेल संगम

ठरल्या प्रमाणे सगळे टाइमावर पोहोचले .....सगळेच जण छान तयार होऊन आलेले असतात....फक्त करूणा यायची बाकी होती....

नंदु : करुणा का नाही आली अजुन

ध्रुवी: घरातुन तर वेळेवर निघालेली... मी कॉल केलेला तिला....

अजित : आता परेनंतर पोहोचायला पाहिजे ना तिने...(काळजीच्या स्वरात)

नंदु : काळजी नको करुस येईल ती...ती बघ आली

करूणा ज्या दिशेने येते त्या दिशेने करूनाला बघुन अजित तर घायाळच झाला....

करूणा ने ग्रे कलर चा लॉंग वनपीस घातलेला असतो...त्या वर डायमंड चे कानातले...केस मोकळे सोडुन त्याला वन साइड पिनअप केलेलं....आणि हलकी ब्राऊन चमकती लिपस्टिक....ज्याने तिचे कळीसारखे ओठ पानेरी दिसत होते...अजित तर तिच्या ओठांमध्ये गुंतून गेलेला

संगीता : कुठे होतीस ...लेट का झाला तुला....

करूणा : सॉरी ते रस्त्यात कुणाचं तरी अकॅसिडेंट झालेला त्यामुळे ट्राफिक लागला..सॉरी

रिचा : तुम्हे कुछ नही हुआ ना....(हसतच)

अजित एक रागाचा कटाक्ष रिचा वर टाकतो

रिचा : अरे उसकि फिकर हो रही थी इसलीये पुछा...तुम क्यु गुस्से में देख रहे हो...???


अजित : शयाद तुमने ठिकसे सुना नही किसीं ओर का अकॅसिडेंट हुआ था इअलीये उसे लेट हुआ....(तेवढ्यात मधेच करूणा अजितला तोडत बोलते...इट्स ओके अजित...मी पोहोचले ना...चला आता...उशीर नको करायला)

सगळे जण रिचाला इग्नोर करत निघतात....

अभिषेक ने ऑलरेडी टेबल बुक केलेला असतो ....सगळे जण आनंदाने बसतात करूणा अजितच्या बाजुला बसते... आणि रिचा सुद्धा...नाही तरी तिला तेव्हढाच चान्स हवा असतो

मयुरेश ....मग काय ऑर्डर करायचं.....
सगळे जण एक एक मेनु कार्ड हातात घेऊन आप आपली पसंती सांगत होते

रिचा :ओ गॉड यहा पे इटालियन फुड नही हे

नंदु : ये इंडियन रेस्टॉरंट हे...वेज ओर नॉन वेज दोनो अच्छा मिलता हे....

रिचा : पर मुझे इटालियन फूड खाना हे

अभिषेक : तो तु दुसरे हॉटेल चली जा

रिचा : ये सही रहेगा...AJ चलो हम दोनो किसीं ओर रेस्टॉरंट में जाते हे

आजित : नही नही मुझे इंडियन फुड पसंद हे...तुम कुछ ओर देख लो ना(अजितचा बोलण्याने रीच्याला राग तर येतोच पण काय करणार नाईलाज आहे तिचा...)

सगळे जण परत मेनु बघतात आणि आपआपली पसंतीचे ऑर्डर देतात....सगळेच जन इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करण्यात बिझी असतात....त्याचीच संधी साधुन अजित हळुच करुणाचा टेबल खालुन हात पकडतो.... अजितच्या अशा प्रकारे हात पकडल्याने करुणा गोंधळुन जाते...कीती तरी वेळ ती तिचा हात त्याचा हातातुन सोडवायचा प्रयत्न करते... पण अजित सोडेल तर ना.....तो अजुन त्याच्या हाताची पकड जोरात करतो....आणि मधीच तिला डोळा मारतो....करूणाकडे तर शांत बसल्याशिवाय काहीच उपाय नव्हता....

.....गप्पा गोष्टी करतच जेवण सुद्धा आल...सगळे जण जेवणाचा मस्त आस्वाद घेत असतात....

रिचा : ये भी कोई टेस्ट हे....इसमें तो नमक ही नही हे

मयुरेश : नमक हे ...रिचा ....शयाद आज तुम्हारी ताबियत ठीक नही होगी.... क्युकी जबसे तुम आई हो तब से कुछ कुछ कमी निकाल रही हो....इसका यही मतलब हे की तुम्हारी ताबियत खराब हे....तुम चाहो तो खिचडी ऑर्डर कर सकती हो

रिचा : नो ways.....इतना भी बुरा नही हे...ill manage(नाक उडवतच बोलते)

जेवण संपवत संपवत सगळे गप्पा मारत होते... आणि अजित करूणा चा हात सोडण्याची एक पण संधी सोडत नव्हता...

जेवण झालं डेझर्ट झाला....जेमतेम 10 वाजले सगळ्याना आवरायला...तेवढ्यात रीच्याला कोणाचा तरी कॉल आला आणि तीने सगळ्यांचा निरोप घेतला...

संगीता : बर झालं गेली....

नंदु : तु परत चालु झाली....सोड ना तीला

संगीता : तुझ्या काय पोटात दुखतं रे...प्रेमात बिमात पडलास की काय तिचा

नंदु : प्रेमात आणि तीच्या ....तुझं डोकं आहे ना ठिकाणावर.... ती कुठं मी कुठं...

करूणा : ऐकना.... नका ना वाद घालु....आपण सगळे फेरफटका मारायला बाहेर जाऊया....म्हणजे खालेलं जिरेल तेवढंच
सगळ्यांना करुणाच म्हणणं पटतं... सगळे आप आपले कॉन्ट्रीबुशन देऊन निघतात....

जवळच्याच पार्क मध्ये सगळे फेरफटका मारतात... सगळे जण बिझी आहे हे बघुन अजित हळूच करुणाला दुसरी कडे घेऊन जातो... त्याची ही करामत ध्रुवीने बघितलेली असते

करूणा : अजित अरे काय आहे हे....सगळे तिकडे आणि आपण दोघे इथे...

अजित : तु आल्यापासुन मला टाइम कुठे दिलास...आणि आता तर एक्साम पण संपल्या ...भेटायचा चान्स पण संपला... आजचा हा दिवसच आहे बघ आपल्या दोघांकडे...ह्याच्या पुढे कधी भेटणार माहीत नाही

करुणा : ते पण बरोबर आहे...चल चालत चालतं गप्पा मारुया

अजित : हम्म...काय मग बाबांबरोबर बोलीस का ऍडमिशन बद्दल...???

करूणा : हो कालच बोलणं झालं....आणि ते तयार पण झाले.... उद्याच मी ऑनलाईन अडमिश घेणारे

अजित : गुड ...यार

करूणा : अजित तु काय ठरवल आहे ...i mean पुढे काय करणारेस

अजित : मी तर माझ्या डॅड चा बिझनेस बघणारे...मला जास्त काही करायची गरज नाहीये....ऑलरेडी आमच्या कडे काही सीनिअर आहेत जे मला ट्रेन कारणारेत... सो जास्तीत जास्त 1 year काफी आहे मला फॅशन डिझाईन शिकण्यासाठी... आणि नाहीच पटलं तर स्वतःच करेन पूढे काही तरी...

करूणा : किती छान ना....तुला जास्त स्ट्रगल करायची गरज नाहीये....

अजित : तस नाहीये...शिकावं तर लागणारच आहे ना मला....करूणा आमच्या घरात एक कॉन्फरन्स हॉल आहे... तिकडेच जास्त मिटिंगस होतात... त्या मिटिंगस मी सुद्धा कधी कधी अटेंड केल्या आहेत... त्यामुळे बेसिक नॉलेज आहे मला

करूणा : अजित मला वाटत आता खुप उशीर होतोय आपल्याला... मग निघुया आपण

अजित थोडा नाराज होतच(ठिके जशी तुझी मर्जी)

करूणा जशी निघायला निघते तसा अजित तिचा मागुण हात पकडतो

अजित : अशीच निघणार...काही बोलणार किंवा देणार नाहीस

करूणा : अजितचे शब्द कानावर पडताच तिच्या हृदयाची स्पीड वाढते...तिला काय करावं काय नाय काहीच सुचत नाही....

अजित तसाच तिला मागे वळवुन तिचा चेहरा त्याच्या हाताने वर करतो

अजित जस जसा तिच्या जवळ येत होता तस तशी करूणा मागे जात होती....

करूणा : अजित काय करतोयस(घाबरुनच)

अजित : काही नाही....(हसतच)

करूणा : अजित प्लिज मला जाऊदेणा... खूप उशीर होतोय....

अजित : जा ना मी कुठे अडवलं आहे तुला....(हसतच)

करुणा : अजित तु...तु(करुणाच्या तोंडातुन आवाज सुद्धा थरथरत होता)जस जशी ती मागे सरकत होती तशीच ती एका झाडाला आदळते....आता तर तिला कुठून पळू नि कुठून नाय काहीच समजत नव्हतं....

अजित प्लिज सोड...एवढं बोलतच ती पळणार तेवढ्यात अजित तिच्या कंबरे भोवती हाताच कंपाउंड घालतो...आता तर ती अजुनच फसली...

अजित हळूहळू तिच्या जवळ जातो ....तसे ती तिचे डोळे बंद करते...तिच्या हृदयाची धडधड तर आता अजितला सुद्धा ऐकु येउ लागली....करूणा पूर्ण थंड गार झाली होती ....अजित हळूच करुणाच्या कानात बोलतो .....
आता निघुया घरी...नाहीतर उशीर होईल तुला...आणि हलकेच त्याचे ओठ तिच्या गालावर टेकवतो.. आणि लांब जातो....


करूणा हळुच डोळे उघडते आणि अजित कडे बघते....अजित तर तिला लांबुनच हसत असतो... करूणा सुद्धा लाजुन त्याला मिठी मारते....तो सुद्धा संकोच न करता तिला त्याच्या जवळ त्याचा मिठीत घेतो ....काही वेळ तर ते दोघे स्वतःच्या विश्वात हरवले असतात.....

करूणा : अजित .....आजची रात्र संपूच नये असं वाटतं....

अजित : मला सुद्धा ...पण आता तुला उशीर होईल ....आणि सगळे आपली वाट बघत असतील...मग निघुया आपण

करूणा : हम्म

दोघेही एकमेकांच्या कुशीतून नाराज होऊनच वेगळे होतात....आणि घरी जाण्यासाठी निघतात....

मयुरेश : तुम्ही दोघे होता कुठे...???

अजित : इथेच बाजुला ....walk करत हितो

मयुरेश : आम्ही पण तेच करत होतो...का तुमचा walk काही वेगळा होता का...(मुद्दाम चिडवत)


अजित : तु शांत बसायचं काय घेणार... आणि आता चला निघुया मुलींना घरी लेट होईल(टॉपिक चेंज करतच)

सगळे एकमेकांना बाय बोलुन आपापल्या घरी जातात

(काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कंमेंट द्वारे)