
पार्ट 16
अजितने सर्वात आधी स्विमिंग पुल मध्ये उडी मारली त्यामुळे तो पुर्ण उजळुन दिसत होता... त्याच्या चिंब भिजन्याने तो अजुनच स्मार्ट दिसत होता... त्यात त्याची ती जिम केलेली बॉडी... त्याने त्याच्या हाताने त्याचे डोळ्यांवरआलेले केस मागे केले ...त्याची ती स्माईल...वा...करुणा तर त्याला एकटक न्हयाळत होती
अजित : करुणा... करुणा
करुणा:हा...हा आले....अजित मला अजुन पण भीतीच वाटतेरे
अजित : तु काळजी करूनकोस मी तुला अलगद पाण्यामध्ये आणेन
करुणा जशी पुलाच्या जवळ जाते तशी ती खाली बसते...तिला पाण्यात उतरवण्यासाठी अजित ला तिला पकडावे लागेन म्हणुन आईही त्याने तिची परमिशन घेतली
अजित :हे बघ करुणा तुला पाण्यात उतरवायच आहे सो त्या साठी मला तुला पकडावे लागेन ....(थोडा चाचरतच)सो तुला चालेना....???
अजित च्या ह्या बोलण्यावर करुणाला काय रेऍक्ट करावे तेच कळत नव्हतं...
अजित : तु कम्फर्टेबल नसशील तर काही हरकत नाही...
करुणा : नाही तस नाही...माझा विश्वास आहे तुझ्यावर...आणि हळूच ती अजितला तिचा हात देते
अजित सुद्धा तिचा हात हातात घेऊन तिला अलगद पाण्यात उतरवतो...करुणा जशी पाण्यात उतरते तसा तिचा तोल जातो... तेवढ्यात अजित तिच्या कंबरेला पकडुन तिला सावरतो...
अजितच्या स्पर्शाने करुणा शहारते... तिचे डोळे आपोआप बंद होतात... तिच्या हृदयाची धडधड अजितला स्पष्ट ऐकु येत असते...कारुणाचे गाल अगदी चेरी सारखे लालभडक झालेले असतात....करुणा अजितच्या एवढ्या जवळ असते की ती तिचे डोळे सुद्धा उघडुन बघु शकत नाही
अजित : करुणा रिलॅक्स... मी आहे....
आधी डोळे उघड बघु
करुणाला लाजून डोळे उघडायची सुद्धा लाज वाटत होती...त्यात त्याचा हात अजुनही तिच्या कंबरेभोवती विखळा घालुन असतो
अजित : करुणा प्लिज डोळे उघड ....नाही तर मी तुला कसं हँडल करू
करुणा हळुच तिचे डोळे खोलते... ती सुद्धा अर्धी भिजलेली असते... अजितला एवढ्या जवळ स्पर्श करताना तिचे हार्ट बिट्स वेगाने धावत होते
अजित :रिलॅक्स...रिलॅक्स करुणा...
अजितचा श्वास अजुन तिला घायाळ करत होता
अजित:ऐक माझं ...तुझा हात फक्त माझ्या हातात दे... तु ह्या पाण्यामध्ये ऑटोमॅटिक लिफ्ट होशील... मी तुला अलगद तरंगत संभाळून घेईल
करुणा मानेनेच हा बोलते
अजित जसजसा हात ढिला सोडत होता तस तशी करुणा पाण्यामध्ये लिफ्ट होत होती.... तिची सुद्धा आता भिती कमी होत होती
अजित सुद्धा तिला अस खुश पाहुन खुश होत होता
मधीच कारुणाचा पाय हलका घसरलयामुळे अजितने तिला कंबरेला धरून जवळ खेचलं... मग काय तिला सुद्धा त्याचा स्पर्श हवा हवासा वाटू लागला परंतु आपले मित्र सोबत आहे ह्याच भान ठेऊन ते दोघे पुन्हा नॉर्मल झाले
इकडे रिचा तिच्या एन्जोयमेंट मध्ये बिझी होती...
सगळ्याच मित्रांनी भरपुर पाण्याचा आनंद लुटला ...जवळ जवळ 1 वाजे परेनंतर सगळे खेळुन थकले... तसे सगळे फ्रेश होण्यासाठी रूम वर गेले...आणि दुपारच्या जेवणासाठी खाली आले कारण त्यांना परत संध्याकाळी परतीच्या प्रवासाला निघायचे होते
@@@@@@@@@@@@@@
दुपारचे जेवण मस्त आनंदात जेवुन सगळे जण परत आप आपल्या रूम वर आराम करून जवळ जवळ 5 वाजता घरी जाण्यास निघाले
मयुरेश : सगळ्यानी व्यवस्थित आपापले बॅग्स घेतले का...???
सगळ्यानी एकत्र होकारार्थी मान हलवली
तेवढ्यात मॅनेजर येतात (सागर)
सागर :आय होप तुम्ही सगळ्यानी खुप एन्जॉय केला असाल
संगीता : खूप नाही ....खुप खुप खुप केला(आनंदात) तुमचं रिसॉर्ट खुपच मस्त आहे ....आणि जेवण तर अप्रतिम
नंदु :हळुच अजितच्या कानात बोलतो(बघित घुमुन फिरून जेवणावरच येते(दोघे गालातल्या गालात हसतात)
संगीता रागानेच नंदु कडे बघुन बोलते:तु काही बोलास का परत...????
नंदु :मी कुठे काय ...काही नाही
सागर : मिस्टर अभिषेक तुम्ही एकदा चेक आउट कराच्या आधी टोटल बिल बघा आणि ही त्याची रिसिप
अभिषेक :हो नक्की सर
अभिषेक सगळ्यांकडून पैसे घेऊन बिल पे करतो आणि सगळे जण मिळुन रीसॉर्ट च्या लोकांना बाय बाय करून निघतात
रिचा :गाईज में भी तुम लोगो के साथ चलती हु तुम्हारे कार से
ध्रुवी :अरे पर कार में जगह नही हे....कार तो ऑलमोस्ट फुल्ल हे...तुम्हारी प्रायव्हेट कार हे ना तुम उसी में आ जाना
रिचा : AJ एटलीस तुम तो मुझे कंपनी देने के लिये साथ चलो
अजित :सॉरी रिचा मे आते समय इन सबके साथ आया था... तो अगर इनके साथ नाहि जाऊ तो बुरा लागेगाना
रीच्या चा रागाचा पारा अजुन चढतो ती सगळ्यांच्या आधीच तिच्या कार मध्ये जाऊन बसते आणि निघुन जाते
इकडे सगळे जण एक मेकांना टाळी देत कार मध्ये बसायला जातात
कार मध्ये बसताना मयुरेश मुद्दामुन अजितला पुढे बसायला सांगतो
अजित आणि करूणा दोघेपण नाराज होतात.... कारण त्या दोघांना पण एकमेकांच्या बाजुला बसायचं असत
अजित बसायला जाणार तोच सगळे जोरात एकमेकांना टाळी देत हसतात
करुणा आणि अजित ब्लॅंक होऊन बघतात
संगिता : अग वेडा बाई आम्ही तुमच्या दोघांची मस्करी करत होतो मयुरेश बसेन पुढे तुम्ही दोघे मागे बसा
(संगीताच्या बोलण्याने दोघांच्या चेहऱ्यावर आनंद आला)
मयुरेश पुढच्या सीट वर बसला .....मागे संगिता ध्रुवी नंदु आणि त्यांच्या मागे अभिषेक करुणा आणि अजित
झाला एकदाचा पुन्हा प्रवास सुरू खंडाळा टु मुंबई
सगळेच जण थकले होते त्यामुळे सगळ्यांनाच बाहेरच्या थंड वाऱ्यामुळे गाढ झोप लागली...
झोपेमुळे नकळतच करुणाच डोकं अजितच्या खांद्यावर ठेवते..तिचा तो निरागस चेहरा बघुन अजित सुद्धा तिला न उठवता तसाच झोपुन जातो
(काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कंमेन्ट द्वारे)