चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेमकथा)पार्ट 57

Untold love story (part 57)

पार्ट 57

दिवस भर भर जात होते......करुणाचे आणि अजितच्या लग्नाच्या पत्रिका सुद्धा वाटप होत होत्या...........पहिली पायरी मानाने सिद्धिविनायक मंदिरात ठेवण्यात आली.......दोन्ही घरातल्यानी एकमेकांच्या घरी जाऊन पत्रिका दिली........त्यातच निशाच लग्न दोन दिवसांवर येऊन थांबलं......सगळ्यांच्या संमती नुसार घरातच हळदीचा प्रोग्राम ठेवलेला......... करुणाने अगोदर च पंटर गॅंग ला मेसेज केलेला हळदीचा.....मयुरेश आणि नंदु ह्यांनी आधीच करुणाच्या आणि अजितच्या लग्नासाठी सुट्या घेतल्यामुळे त्यांना रजा मिळणं मुश्कील होत.....म्हणुन ते निशाचा हळदीला नाही येऊ शकले.....ध्रुवी आणि संगिता हळदीला आल्या होत्या

संध्याकाळी सहा वाजता निशाला हळद लावायला घेतात........ अजितच्या घरून त्याची आई(कल्पना)आलेली असते.......

मंदा निशाला हळद लावायला वाकते.....तसे चटकन तिच्या डोळ्यातुन पाणी येत.......निशा सुद्धा भावुक होते........

तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचे डोळे आनंदाने पाणावतात........ सगळे एक एक करून आनंदाने निशाला हळद लावतात.........आज मंदा ताईला त्यांच्या नवऱ्याची खुप आठवण येते......

मंदा (मनात): आज जर हे व्यवस्थित वागले असते.....तर माझ्या सारख ह्याना पण मुलीच सुख पाहायला मिळाल असत..........ज्या मुलींची ह्यांनी चिडचिड केली.........त्या आज किती नशीब घेऊन आल्यात ह्याचा किती विसर पडलाय ह्याना.......जाऊदे.....उगाच जुन्या आठवणी काढल्या तर आपल्यालाच त्रास होतो......मंदा ताई हळुच पदराने त्यांचे डोळे पुसतात..........

मधु : ताई....मला माहीत आहे तुम्ही काय विचार करतायत ते........नका स्वतःला त्रास करून घेऊ..........जे झालं ते झालं......आत इथुन पुढे रडायचं नाही.......फक्त मुलींचा संसार आनंदात बघायचा......

मंदा ताई पण गोड स्माईल आणतात चेहऱ्यावर.....
सगळ्या बहिणी एकत्र मिळुन निशाला हळद लावतात......हळद लावताना कोणालाच त्यांचे अश्रु थांबवता आले नाही.....सगळ्या बहिणी मिळुन एकमेकींच्या मिठी मारून रडत होत्या...
अजितची आई आणि मधु सगल्या मुलींना सावरते......


संगिता : अरे असे रडतायत का सगळे.......ताई आपल्याला भेटायला येणारच आहे परत.......आता ताईचे नाय तर जिजूंचे रडण्याचे दिवस आलेत.....(संगीताच्या बोलण्याने सगळे निदान हसतात तरी.....)
व्हेरी गुड.....आता कसे हसले सगळे हसलात...... करूणा चल एक गाणं होऊन जाऊदे........

गोऱ्या गोऱ्या
गालांवरी चढली लाजंची
लाली गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी
चौघडा बोलतो दारी गं
पोरी नवरी आली
सजणी मैत्रिणी जमल्या
अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
किणकिण कांकणं रुणझुण
पैंजणं
सजली नटली नवरी आली
गोऱ्या गोऱ्या
गालांवरी चढली लाजंची
लाली गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी
चौघडा बोलतो दारी गं
पोरी नवरी आली

नवऱ्या मुलाची आली हळद
ही ओली
हळद ही ओली लावा
नवरीच्या गाली
हळदीनं नवरीचं अंग
माखवा
पिवळी करून तिला सासरी
पाठवा
सजणी मैत्रिणी जमल्या
अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
सासरच्या ओढीनं ही
हासते हळूच गाली गं
पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी
चौघडा बोलतो दारी गं
पोरी नवरी आली

आला नवरदेव वेशीला,
वेशीला गं, देव नारायण
आला गं
मंडपात गणगोत सारं
बैसलं गं म्होरं
ढोलताशा वाजि रं

(सगळे जण मिळुन घरातल्या घरात आनंदाने नाचत होते.....आज निशाच्या काकाच्या डोळ्यातुन पाणी काही थांबायचं नाव घेत नव्हतं........सगळ्या बहिणी मिळुन निशाला चिडवत नाचत होते)

सासरी मिळू दे तुला
माहेराची माया
माहेराच्या मायेसंगं
सुखाची गं छाया
भरुनीया आलं डोळं जड
जीव झाला
जड जीव झाला लेक जाय
सासरा
किणकिण कांकणं रुणझुण
पैंजणं
सजली नटली नवरी आली
आनंदाच्या सरी तुझ्या
बरसु दे घरीदारी ... ग
पोरी सुखाच्या सरी ...
सनईच्या सुरांमंदी
चौघडा बोलतो दारी गं
पोरी नवरी आली

आला नवरदेव वेशीला,
वेशीला गं, देव नारायण
आला गं
मंडपात गणगोत सारं
बैसलं गं म्होरं
ढोलताशा वाजि रं.......

(एका मागे एक असे बरेच हळदीचे गाणे लावुन हळदीचा प्रोग्राम संपन्न केला......)

अजितची आई (कल्पना ) : निशाला........निशा बेटा......खुप छान वाटलं बघ मला इथे येऊन......पण कायेणा.....मला उद्या बरीच ह्यांच्या लग्नाची तयारी बाकीये.....त्यामुळे मी उद्या लग्नाला नाही येऊ शकत........राग नको मानुस पण समजुन घे मला......आणि हो हे घे माझ्या कडुन.....म्हणजे आमच्या मोहितेंच्या फॅमिली कडुन तुला ही छोटीशी भेट.......

मंदा : आवो ताई ह्याची काय गरज होती......तिला तुम्ही भरभरून आशिर्वाद द्या ....बस

कल्पना : गरज काशी नव्हती.....उद्या मुलगी सासरी चालीये.........तिला तिच्या आईची एखादी आठवण नको का.......हे घे.....उघडुन बघ.....मला वाटत नक्की आवडेल तुला.......

निशा एक छोटासा बॉक्स उघडुन बघते.....त्यामध्ये डायमंड चे छोटेसे इअरिंग असतात.......निशाला ते खुप आवडतात.....

कल्पना : माझी आठवण म्हणुन नक्की घाल......ठिके.......(सगळ्याना हात जोडून) आता निघायची आज्ञा द्या......खुप उशीर होईल नाहीतर........

सगळे एकत्र त्यांना......निरोप देतात......करुणाच्या मैत्रिणी सुद्धा जेवण करून आपापल्या घरी जातात....

दुसऱ्या दिवशी सगळे जण लग्नाच्या गडबडीत असतात........मधु ......आणि दत्तात्रय दोघे करुणाच्या रूम  मध्ये जातात.......जिथे निशाची तयारी चालु असते......मंदा सुद्धा तिथेच बसलेली असते.....

दत्तात्रय : निशा बेटा आत येऊ का.....

निशा : हा काका ......या ना.....(तुम्ही थोड्यावेळ बाहेर बसा....पार्लर वालीला बोलते)

दत्तात्रय :  निशा बेटा हे घे.......तुला छोटीशी भेट.......आमच्या सगळ्यांकडुन......

निशा एक नजर तिच्या आईला बघते......हे काये काका........

मधु : आधी उघडुन तर बघ.........

निशा दोन्ही ज्वेलरी चे बॉक्स उघडुन बघते.........त्यात एक लांब तीन पदरी सोन्याचा आहार......त्यावर मॅचिंग असे सोन्याचे झुमके.....असतात.......

मंदा : आवो भावोजी.....हे सगळं कशाला..........म्हणजे तिला थोडे थोडे दागिने केलेले आम्ही .....

मधु : ताई ही छोटीशी आठवण आहे निशासाठी आमच्या सगळ्यांकडुन........

निशा : काका आवो खरच गरज नव्हती.......

दत्तात्रय : हे बघ निशा मी हे नाही विचारलं.........गरज आहे की नाही........आम्हाला आमच्या मुलीसाठी काहीतरी करायचं होतं.....तेच आम्ही केलं.......

निशा ला आता रडणं आवरत नव्हतं............ती तिच्या काकाला मिठी मारून रडु लागली........अग अशी काय करतेस.......आजचा दिवस रडायचा नाही तर आनंदाचा आहे......आज माझ्या मोठया मुलीच लग्न आहे........चल बघु हंस......आणि चला आता लवकर तयार व्हा......उशीर होईल नाहीतर.....

मधु : आणि हो त्या पार्लर वालीला सांग हे दागिने घालायला......छान शोभुन दिसेल तुला......

निशा मानेनेच हो बोलते.....

मधु : आणि हो बाकीच्या मुलींनो जरा आवरा लवकर.......नवरदेव कटाळायचा नाही तर.......

सुवर्णा : काकी......वाट बघुदे जरा जिजुना.........अशी सहज आमची ताई नाही मिळणार त्यांना.....(सगळे एकत्र हसतात)

मंदा : तुझ्या पुढ्यात तर बोलणंच चुकीचय...... चल ग मधु आपण निघुया पुढे.....काही न्हयायच बाकीये का बघु

सगळे जण मस्त तयारी करून कोर्टात निघतात........निशाला मस्त फुलांच्या सजलेल्या गाडीमध्ये बसवतात.........

थोड्याच वेळात सगळे कोर्टात पोहोचतात........कोर्टाच्या बाहेर आधीच नावरदेवाच्या घरचे उपस्थित असतात......सगळेच गाडीतुन उतरतात....... फक्त नवरीला गाडीमध्ये बसवुन ठेवतात.....

दत्तात्रय : नमस्ते........(सगळे एकमेकांना नमस्कार करतात).....माफ करा उशीर झाला का आम्हाला........

दिलीप (मुलाचे वडील) : नाही नाही......अगदी वेळेत आलात तुम्ही.........आम्ही पण आताच आलोय ........ही माझी बहिण.....आणि हे आमचे भावोजी.........आणि ही त्यांची मुलगी.......हे ठाण्याला राहतात......ह्यांच्याच घरी होतो आम्ही.......

मधु : (आनंदात)खुप छान वाटलं तुम्हाला सगळ्याना भेटुन......

लता : आमची सुनबाई कुठे.....

मंदा : तिला गाडी मध्ये बसवलंय....... बाहेर ऊन लागेना म्हणुन..... ....

आनंद मधी मधी सारखा नवरीच्या गाडीकडे बघत असतो.....

सुवर्णा : जिजु....... कोणाची वाट बघतायत का तुम्ही.....

आनंद : (दचकुन).....वाट .....मी .....(अडखळत)नाहीतर......मी कशाला कोणाची वाट बघू.....ते तर सहजच ......मला ऊन लागतंय म्हणुन........ थोडं इकडे तिकडे बघत होतो.......

सुवर्णा : ओ ......अच्छा अच्छा.......मला वाटलं.....आमच्या गाडीकडे बघतायत.......म्हणजे ताईला शोधतायत......(सुवर्णा च्या बोलण्या नंतर सगळे हसतात.......आनंद पण थोडा लाजतो........मध्येच मंदा हळुच सुवर्णाच्या खांद्यावर मारते.....

मंदा : चुप बस.....जरा.....माफ करा हा.....हिला ना मधी मधी मस्करी करायची सवई ये.....

लता : आवो असुद्या.....ह्या मुली मस्ती नाही करणार तर कोण करणार....... आज नाहीतरी त्यांचा दिवसच आहे......हो की नाय ओ.....

दिलीप : हो ना......(तेवढ्यात कोर्टातुन एक माणुस त्यांना आत बोलवायला येतो)

तसे सगळे आत जाण्यासाठी निघतात.......

मधु : ज ताईला आणा बाहेर........ह्याना जोडीने प्रवेश करुदे

(सगळ्या बहिणी निशाला आणायला जातात....निशा जशी गाडीतुन उतरते तसा आनंद एकटक तिच्याकडे बघतो........आज ती त्याला जणु स्वप्नातील राणी सारखी दिसु लागते......ती सुद्धा त्याला एक टक बघत राहते.......तो सुद्धा ऑफ व्हाईट कुर्ता पजामा मध्ये छान दिसत असतो.....

करूणा : आता बघतच राहणारे.....का आत पण चालणारे........

तशी निशा लाजते............

सगळे जण एकत्र आत मध्ये जातात......तिकडे एक वकील ऑलरेडी असतो.....ह्यांनी आधीच नाव रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं असत .....त्यामुळे कसलीच चिंता नसते.......दोघेही एकमेकांन समोर उभे राहतात.........एक भटजी येऊन मंत्र बोलतात.......कोर्टाच्या कायद्यानुसार त्यांची एका कोर्ट मॅरेज पेपर वर सही केली जाते.....आणि विधी नुसार दोघांचा विवाह संपन्न होतो........निघायच्या वेळेस.........दोन्ही परिवार एकमेकांन समोर उभे राहतात......निशाला आता तीच रडणं आवरत नव्हतं.......ती सर्वात आधी तिच्या आईच्या गळ्यात पडते........
निशा :(रडत) काळजी घे..........आई .......तुझ्या तब्येतीची...... जे झालं ते विसर सगळं........माझा जास्त विचार करू नकोस.........मला आता तुझी जास्त चिंता नाहीये.....कारण काका काकी सारखे अजुन दोन आई वडील आहेत मला.........त्यांच्या जीमेदारी वर तुला सोडुन जाते........काळजी घे आई.....

मंदा : तु इकडचा जास्त विचार नको करुस.........इकडे सगळे आहेत.......माझी काळजी घेणारे.....तु तुझा संसार नीट बघ........

निशा तशीच तिच्या काकी कडे वळते.....त्या दोघींपन खुप रडतात.......

मधू : हे बघ बाळा सासरच्या माणसांची मन जिंकुन रहा......इकडची जरा पण काळजी नको करुस.........आम्ही आहोत.......सगळे.......तु फक्त तुझा नवीन संसार बघ........ठिके.....

निशा : तिच्या काकांकडे वळते.......आज परेनंतर तुम्ही आम्हाला खुप साथ दिली........काका......तुमचे उपकार नाही फेडु शकत आम्ही.......तुम्ही आज परेनंतर जेवढी कर्तव्य पार पडली त्याला शब्द नाहीयेत माझ्याकडे.........काही चुकलं असेंन तर माफ करा काका.....

आता दत्तात्रय रावांचा बांध फुटतो.......ते सुद्धा खुप रडतात.......

निशा तशीच तिच्या सगळ्या बहिणींना बिलगुन रडते.........सगळे एकमेकांचा निरोप घेतात.....

सगळ्या बहिणी मिळुन निशाला आनंदच्या गाडीत बसवतात......देशमुख फॅमिली आजच डायरेक्ट पुण्याला जाणार होती........

आनंद : (मंदा ला हात जोडुन) आई आज  परेनंतर तुम्ही जेवढ्या आपुलकी ने निशाला सांभाळून घेतलं..... तसाच मी पण सांभाळायचा प्रयत्न करेन.......मला जमेन तशी मी तिची काळजी घेईल....काळजी नका करू......आम्ही आहोत सगळे तिच्या सोबत.......चला येतो आम्ही.....


आनंदच्या बोलण्याने आता कुठे मंदा च्या मनाला समाधान वाटलं......

सगळ्या बहिणींनी निघताना आनंदाने निशाला निरोप दिला.........

@@@@@@@@@@@@@@@@@@@


सगळे घरी परततात....... लग्नाच्या धावपळीने सगळे थकुन झोपुन जातात.......इकडे दत्तात्रय रात्री एक च्या सुमारास एकटे बाल्कनीत उभे असतात........खिडकी उघडल्याने चंद्राच्या प्रकाशाने .....मधुची झोप मोड होते..... पण दत्तात्रय असे.....अचानक एकटे खिडकी जवळ का उभे.....हे बघण्यासाठी ती पण उठते......

मधु : आवो......काय झालं.......... असे एकटे का खिडकीजवळ उभेत.......तुम्ही........

दत्तात्रय  काहीच उत्तर देत नाही......

मधु हळुच त्यांच्या खांद्यावर हात ठेवते.......आणि त्यांचा चेहरा स्वतःजवळ करते तर दत्तात्रय रडत असतात.......

मधु सुद्धा आता घाबरते......आवो काय झालं.......तुम्हाला.....असे एकटे का रडतायत......कोणी काही बोल का तुम्हाला.... आवो बोलाना.......

दत्तात्रय : काय सांगु तुला मधु ......कस सांगु तुला .......(अजुन जोरजोरात रडतात)

मधु : आवो आधी कोड्यात बोलणं थांबवा.......इकडे बसा आणि हे घ्या पाणी.....(पाणी पिउन झाल्यावर दत्तात्रय थोडे शांत होतात) हा आता बोला काय झालं......कोणी काही बोल का......

दत्तात्रय : मधु काल मी दादाला कॉल केलेला ......

मधु : काय ......(शॉक होत)......आवो पण कशाला केला कॉल...... आता जाऊद्या केलाना..... मग काय बोले भावोजी....

दत्तात्रय : काय बोलणार तो.....आणि कोणत्या तोंडाने बोलणार.......मधु ......त्याला मी एवढंच सांगितलं की निशाच लग्न आहे उद्या निदान आई आणि तु तिला आशिर्वाद द्यायला ये.....म्हणजे पोर खुश होईल....तर म्हणतोय काय.....कोण तु......आणि कशाला फोन केलास.......

दत्तात्रय : मी किती समजावलं त्याला.....जे झालं ते विसर......तुझ्या मोठ्या लेकीचं लग्न आहे......उद्या...... निदान तिच्या खुशीसाठी तरी ये ......तर म्हणतोय काय.....ज्या दिवशी ते लोक हे घर सोडुन गेले त्या दिवशीच ते मेले माझ्या साठी...... आता तुच सांग काय बोलु मी ह्यावर

मधु : मुळात ना तुम्ही त्यांना कॉलच नव्हता करायला पाहिजे......

दत्तात्रय : अग..... मी त्यांच्या मुलीच्या सुखासाठी कॉल केलेला......पण त्याला त्याची काही पडलीच नाही.....निदान आईला तरी कळायला हवं होतं ना......

मधु : जे गेली बत्तीसवर्ष कळल नाही ते आता काय कळणारे............सोडा जाऊद्या तुम्ही आता जास्त टेन्शन घेऊ नका......तुमचा bp वाढेल..... आजच आपली पोर नांदायला गेलीये......तुमची तबेत खराब झाली तर ती ऑन टेन्शन मध्ये येईल.....चला झोपा आता......आता करुणाच्या लग्नाला पण थोडेच दिवस बाकीये.........चला झोपा बघु.....

मधुच्या सांगण्यावरून दत्तात्रय कसे तरी झोपतात.......

@@@@@@@@@@@@@@@@@@

दुसऱ्या दिवशी मोहितेंच्या घरी

कल्पना (अजितची आई) : कोण बरोबर तरी बोलत असते......

अजित :आई लवकर ब्रेकफास्ट घे.....

कल्पना : आले आले...........(कल्पना फोन ठेवुन अजित बरोबर ब्रेकफास्ट करते.....) मग सुट्टी कधी पासुन टाकतोयस............

अजित : अजुन चार पाच दिवसाने.......बाकी सगळं स्टाफ ला समजावुन सांगितलंय.......

कल्पना : ते तुमचे आऊटफिट तयार झाले का......हम्मम.......झालेच आहेत......आज ट्रायल ला करूणा येणारे.........ऑफिस मध्ये........बघु काय ते........तुला कसली हेल्प हवी असें तर सांग.....

कल्पना : खुप लवकर विचारल.......बाळा........

अजित : सॉरी आई.......ते कामच एवढी असतात ........ना.....आणि त्यात माझ्याच लग्नात सेलिब्रिटी ना घालण्यासाठी कॉस्च्युम सुद्धा आमच्याच कडे आलेत .......सो जास्त काम आहे........तु बिलिव्ह नाही करणार......इंडिया मधील आपल्या पाच ब्रांच ह्या वर काम करतंय...... ते पण दिवस रात्र......मी विचार करतोय......माझ्या लग्नानंतर सगळ्याना एक्सट्रा पेमेंट द्यावा....

कल्पना : हो हो का नाय......डेच आवर्जुन..... किती मेहनत घेतायत ते सगळे.......

अजित : हो ते तर आहेच......(मधीच काहीतरी आठवत) आई थांब जरा मी करुणा कॉल करतो......आता आठवलं आहे म्हणुन नाहीतर परत कामाच्या गडबडीत विसरून जाईल........

करूणा : हॅलो हा बोलना अजित......

अजित :  गुडमॉर्निंग....... डिअर .....

करूणा : गुडमॉर्निंग.....आज एवढ्या सकाळी सकाळी फोन.......

अजित : हो ते मला  सांग तुझ्या घरच्यांनी सगळी शॉपिंग केली का..........

करूणा : नाही अजुन..... उद्या जातील बहुतेक सगळे शॉपिंग ला.......

अजित : नाही नको .....म्हणजे त्यांना सांग........की मनीषा आज तुझ्या घरी येईल.....कारण वेडींग प्लॅनर वाल्यांची थीम आहे......त्यासाठी ते लोक तुमचे पण कपडे डिझाईन करणारे......

करूणा : काय .....अरे पण बाबा ह्याला तयार नाही होणार.....

अजित : मला माहिते.....बाबा तयार नाही होणार.....पण त्यांना सांग.....की हे कपडे दुसरी फॅशन इंडस्ट्री वली स्पॉन्सर करतायत.....कारण त्यांचे प्रमोशन व्हावं म्हणुन...... सो आपल्याला जास्त काही पे नाही करायचंय........

करुना : मी एकदा सांगुन बघते.........काय बोलतायत ते.........

अजित : हम्म....ठिके....आणि आज टायमावर ये.........आणि कॉस्च्युम ट्राय करून बघ.....

करूणा : ठिके........

अजित करूणा बरोबर बोलुन त्याच्या आईला बाय बोलुन ऑफिस ला निघुन जातो.......


(काय मग कसा वाटला आजचा भाग......नक्की कळवा कामेंटद्वारे)















🎭 Series Post

View all