परत 56
पाहुणे गेल्यानंतर दत्तात्रयराव.......
करूणा मला जरा तुझया सासुरवाडीत फोन लावुन दे..........त्यांना पण ही गोष्ट कळवतो........
करूणा तिच्या बाबांच्या सांगण्यावरून फोन लावुन देते.......
दत्तात्रय : नमस्ते ताई....
कल्पना (अजितची आई) : नमस्ते नमस्ते......कसे आहेत भाऊ तुम्ही......
दत्तात्रय : आम्ही मजेत.....तुमचं कस चालय......
कल्पना :आमचं पण मजेत सगळं सुरू आहे....हे काय गेस्ट ची लिस्ट बनवते....... बोलाना काही खास काम......
दत्तात्रय : हो ताई.....जरा आनंदाची बातमी द्यायची होती म्हणुन कॉल केला......
कल्पना : अरे वा आनंदाची बातमी.......बोलाना.....
दत्तात्रय राव घडलेला सगळा।प्रकार सांगतात.....कल्पना सुद्धा चकित होतात.....
कल्पना : अरे वा......किती गोड बातमी आहे ही........खरच ऐकून खुप आनंद झाला......
दत्तात्रय : पण ताई येत्या पंधरा दिवसात कोर्टात लग्न करायचं ठरवलंय ह्या मुलांनी.....म्हणजे हे ह्या दोघांनीच डीसाइड केलय.....मग तुमची काही हरकत नसेन तर ......????
कल्पना :आवो आमची काय हरकत असणार....उलटा बातमी ऐकून आनंद झाला मला......त्यांचा जो निर्णय आहे तो एक दम चांगला आहे......मला तर पटला....... आणि कोर्टात आम्ही लग्ना सुद्धा येऊ.......(आनंदाने बोलतात)
दत्तात्रय : धन्यवाद ताई......आता लागतो तयारीला........दोन दोन मुलींची लग्नय माझया.....
कल्पना : हो हो ....नक्की....आणि काही गरज लागली तर आम्हाला नक्की कळवा......आम्ही नक्कीच मदत करू
दत्तात्रय : तुम्ही एवढं बोलात तेच खुप मोठ झालं......ताई......चला मग ठेवतो...... आणि हो मोहितेनापण कळवा......
कल्पना : हो नक्की. . ......
(दोघेही आपापल संभाषण करून फोन ठेवतात)
रात्री सगळ्या मुली बेडरूम मध्ये बसुन गप्पा मारतात...
....
अश्विनी : निशा ताई तुझ्या जॉब च काय करणार......
निशा : उद्या बॉस ला विचारून ट्रान्सफर करून मिळते का बघते.....नाहीतर हा जॉब सोडुन पुण्याला एखादा नवीन जॉब मिळतो का बघते.....
करूणा : तु लग्ना नंतर पण जॉब करणार.....?????
निशा : हो .....एवढी शिक्षणासाठी मेहनत घेतलीये ती व्यर्थ थोडी जाऊन देणारे मी.......
करूणा : पण ते आनंदच्या घरच्यांना मान्य आहे का.......
निशा : तस मी परमिशन घेऊनच विचारणारे......नाही बोले तरी चालेल मला......
अश्विनी : बघ कस जमतंय ते......
निशा : हम्मम.......चला मग झोपुया आपण....खुप उशीर झालाय आता.....उद्या परत आपल्याला कामाला जायचंय.....
सगळ्या एकत्र झोतात.....तेवढ्यात अजितचा मॅसेज येतो करुणाला
अजित : हाय कशीयेस बच्चा.... सॉरी आज जरा काम जास्त होत म्हणुन कॉल नाही करता आला.....मला आजच वेडींग प्लॅनर xxxx वाल्यांचा कॉल आलेला.....त्यांनी उद्याच आपल्याला बोलावलंय.....तु उद्या evening ला चार वाजता ये....तिकडुन आपण डिनर ला जाऊ.....
करूणा सुद्धा मनामध्ये खुश होत त्याला हो असा रिप्लाय देते.......
अजित : चल मग गुड नाईट....लव्ह यु उद्या भेटु......
करूणा : गुड नाईट ....लव्ह यु टु.. ...
@@@@@@@@@@@@@@@
दुसऱ्या दिवशी निशा आणि अश्विनी कामाला निघतात........
मंदा : हा घे डबा...... वेळेवर खा.....आणि तर ट्रान्सफर लेटर घेतल का.....
निशा : काय आई सकाळ पासुन दहा वेळा विचारलं असेल हाच प्रश्न........ घेतलं ग......
अश्विनी : त्यात नवीन काय ग ताई.......माहिते ना हिचा स्वभाव........
मंदा : झालं तुमचं चिडवुन......... आणि हो आनंदला पण विचार .....उगाच राग नको यायला......
निशा : आई त्यात राग कसला........आणि मला नाही वाटत ते लोक मला मना करतील........पण बघु(तेवढ्यात तिला आनंदाचा फोन येतो) हे बघ त्याचाच फोने.....
मंदा : ये जरा अहो जावो घाल......होणारा नवराय तुझा.....जा तो आधी फोन उचल.....
निशा आनंद बरोबर बोलतच बाहेर जाते....आणि थोड्याच वेळात ती खुश होत घरात येते
निशा : आई ऐकलं का....आनंद ने म्हणजे ह्यांनी मला ह्या साठी कॉल केलेला......की तु तुझ जॉब कॅन्टीनयूव्ह कर .....म्हणुन..... आणि जमलं तर ट्रान्सफर लवकरात लवकर करून घे.....त्यांना सगळ्याना मी जॉब केलेला आवडेल बोले.........
मंदा : बर झालं बाई.....देवच पावला म्हणा........आता निघा दोघी ......नाहीतर उशीर होईल.....
दोघी पण आनंदाने बाहेर पडतात.....
@@@@@@@@@@@@@@@@@@@
दत्तात्रय : मधु.....ये मधु जरा खोलीत ये.....बोलायचंय तुझ्याबरोबर....
मधु : हा बोलाना.....काय झालं......????
दत्तात्रय : मी काय बोलतो......आता येत्या पंधरा दिवसात निशा च लग्नय.........आणि त्यात ते लोक कोर्टात लग्न करणारे म्हणजे बराचसा खर्च वाचला..... तर तिला आपण थोडे दागिने बनऊया......
मधु : हो चालेना.....
दत्तात्रय : मग तु संध्याकाळी दुकानावर ये.....आपण मिळुन तिला दागिने बनऊया....... ठिके....
मधु : हम्म
करूणा : खुप इम्पोरटंट काही बोलतायत का.........मी येऊ का आत.......
मधु : हा बोलना.......
करूणा : बाबा आज मी अजितच्या ऑफिस ला जाणारे.....ते वेडींग प्लॅनर वाले येणारे......आज फायनल सगळं द्यायचय....…....
दत्तात्रय : हा जा.....ना .....आणि मधु निशाला सांग आजच काय ते साड्या घ्यायला जा.....म्हणजे त्यांना ब्लाउज वगैरे शिवुन मिळेल......
मधु : हो.....सांगते.....
@@@@@@@@@@@@@@
संध्याकाळी करूणा अजितने सांगितल्या प्रमाणे त्याच्या ऑफिस ला जाते........
अजित केबिनमध्ये तिची वाटच बघत असतो..... करूणा डोर नॉक करते....
अजित : कमिन.....
करूणा : मी ये अजित .......
अजित : आलीस ग्रेट.....वेळेवर आलीस तु......
करूणा : काय करणार आमच्या होणाऱ्या आहोंचा हुकूम होता ना म्हणुन ....
अजित : ओ अच्छा.....एवढं एकते माझं....मग एक काम कर आता आलीचेस तर मग कुछ मोठा हो जाये....
करूणा : झालास परत सुरू........विसरलास वाटत ....ऑफिस मध्ये आहोत आपण.......घरी नाही.....
अजित त्याच्या चेर वरून उठुन करुणाच्या जवळ येतो.....
अजित : मला सगळं कळत मॅडम पण तू हे विसरलीस कि हे माझं केबिन आहे सो इकडे माझ्या परमिशन शिवाय कोणीच आत येऊ नाही शकत........सो.....(अजित करुणाला तिच्या च जागेवर उभकरून तिच्या कंबरेला विखळा घालतो......आणि एक दीर्घ चुंबन घेतो......
करूणा सुद्धा त्याच्या श्वासात हरवुन जाते....तेवढ्यात रिसेप्शनिस्ट चा कॉल येतो........
रिसेप्शनिस्ट : सर वेडींग प्लॅनर वाले आलेत ....पाठवु का त्यांना आत
अजित : हो पाठव.....(फोन ठेवतो)शीट wrong टायमाला येतात लोक.....(अजितच्या अशा बोलण्याने करूणा तोंडावर हात ठेवुन हस्ते.....)
अजित सुद्धा मुदामून रागवल्याच नाटक करतो.....घे हसुन पण लग्नानंतर सोडणार नाही मी तुला......तेवढ्यात त्याच्या केबिनच्या डोर वर नॉक होतो
अजित त्याच्या जागेवर जाऊन त्या लोकांना आत येण्यास सांगतो
सगळे एकमेकांना हात मिळवुन वेलकम करतात....
अजित : प्लिज सीट.....करूणा तु इथे बस माझ्या बाजुला..... हा बोला सर.....काय काय प्लॅन केला तुम्ही......
वेडींग प्लॅनर 1 : हे बघा सर .....तुमचा आधी कॉस्च्युम कलर दाखवतो.......हा मॅम साठी......हिरवा गडद रंग.....त्यांची नऊवारी साडी असणार..... आणि ही ज्युलरी डिझाईन्स आहे.....जे आपण बनवुन घेणारे........तुमची हे सँडल असणारे........मॅम तुम्हाला साडीची डिझाइन आवडली का.....
करूणा : हो हो.....किती मस्त आहे .....,त्याच्यावर ही अशी सेम डिझाइन असणार का....
वेडिंग प्लॅनर 1 : "हो मॅम.... आणि तुमच्या दोघांचे कॉस्च्युम सरांन कडेच डिझाईन होणारे.....
करूणा चकमकुन अजितकडे बघते......अजित सुद्धा तिला एक गोड स्माईल देतो........
वेडिंग प्लॅनर 2 : आणि हा सरांचा कॉस्च्युम...... तुमच्या ग्रीन साडीला शोभेल अशी ही शेरवानी.......त्याचा पिवळा कलर आहे.......ही बघा त्याची डिझाईन्स......त्याच्यावर ही मोजडी...... हा शाही दुपट्टा.......रेड कलर मध्ये.....आहे.......तर मग कसा वाटला तुम्हाला स
अजित : नाईस..... छान वाटला......हो ना करूणा .....
करूणा : हो छान आहे.....
वेडिंग प्लॅनर 1 : हे घ्या अजुन काही साड्या आणि।शेरवाणीचे काही डिझाईन्स......तुम्हाला जर अजुन काही बदल हवा असें तर प्लिज आम्हाला नक्की सांगा.........सर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुमचे कॉस्च्युम बनवायला घ्या.....कारण त्याप्रमाणे आम्हाला सगळी अरेंजमेन्ट करावी लागेन.....कारण तुमचे कॉस्च्युम तयार होतानाचे शूटिंग सुद्धा आम्हाला काढायचेत.......
अजित : थांबा मी आताच....माझ्या डिझायनर ला बोलावतो......तुम्ही त्याला सांगा काय आणि कसं....बनवायचं ते......... तुम्ही सगळे एकमेकांना कोऑपरेट करा .....म्हणजे लवकरच सगळं तयार होईल......
अजित मनीषा ला बोलावतो..... मनीषा अजितची खास डिझायनर असते ....आज परेनंतरचे अजितचे सगळे कॉस्च्युम तिनेच डिझाईन केलेले असतात.........
मनीषा दरवाजा नॉक करते......
अजित : कमिन......मिट माय पर्सनल डिझायनर मिस मनीषा मित्तल.........आजपर्यंत सगळे माझे कॉस्च्युम हिनेच डिझाईन केलेत.......
मनीषा सगळ्याना हात मिळवुन हॅलो करते.....
करूणा : मी पाहिलंय ह्याना tv वर.....खुप छान कलेक्शन असतात......ह्यांचे.....
मनीषा : थॅंक्यु मॅडम.......आणि कॉंग्रेचुलेशन तुमच्या दोघांना पण.....
करूणा : अरे वा तुमची मराठी छान आहे.......
मनीषा : थॅंक्यु .....सरांन बरोबर राहुन राहुन शिकले मी......
अजित : मनीषा ह्यांनी काही डिझाईन्स दिलेत.....ते प्लिज एकदा चेक कर.....आणि सांग परफेक्ट आहेत का......आणि कधी परेनंतर तयार होतील ते पण सांग........
मनीषा : ok ......दाखवा मला तुमचे डिझाईन्स.....
वेडिंग प्लॅनर वाले एक एक करुन सगळी डिटेल मनीषा ला सांगत होते......
मनीषा : वेल ह्यांची सगळी डिझाईन्स एक दम छान आहेत......पण मला अस वाटत की मी सुद्धा माझे डिझाईन्स ह्याच्यात ऍड करू.....ते मी करेलच.......कलर कॉम्बिनेशन is also good....... आणि रिसेप्शन ची काय थीम आहे......??????
वेडींग प्लॅनर 4 : मॅडम रिसेप्शन ला आपण गोल्ड अँड व्हाईट कलर ची थीम ठेवलीय........म्हणजे पुर्ण गोल्ड आणि व्हाईट फ्लार्स ने आपण स्टेज डेकोरेट करायचा.....आणि त्याला शोभेल असा.....मॅडम आणि सरांना.........ऑफ व्हाईट कलरचे कॉस्च्युम द्यायचे.........म्हणजे त्या डेकोरेशन ला ते हायलाईट होतील.......
मनीषा : ठिके मी काय बोलते.......तुम्ही कॉस्च्युम च सोडुन द्या ते मी आणि माझी टीम हँडल करून घेईल......तुम्ही जास्त करून डेकोरेशन आणि फुड quality वर ध्यान द्या......
वेडिंग प्लॅनर 5 : हो मॅम.....नो प्रोब्लेम..... फुड quality साठी उद्या आमची टीम सरांच्या घरी जाणारे.....सरांची आई टेस्ट करणारे.......सो त्या जे सांगतील तेच फूड सर्व्ह केलं जाईल.........
अजित : ओके नो प्रोब्लेम.......सो मनीषा करूणा आता आलीचे तर तिच माप घेऊन टाक.....
मनिषा : ओके.........
अजित : ठिके करूणा तु ह्यामधील डेकोरेशन चुस कर.....म्हणजे आजच्या आज फायनल करता येईल......
करूणा : मला वाटत ह्यांनी जे डीसाईड केलं आहे ......आपण तेच सिलेक्ट करूया.......खुपच छान सिलेक्शन आहे ह्यांच....
अजित : (हसत) ठिके....मला पण काहीच हरकत नाहीये........(तेवढ्यात अजितला त्याच्या आईचा कॉल येतो....
कल्पना (अजितची आई) : अजित ......आज जास्त बीझी आहेस का.......?????
अजित : नाही आई ......बोलना......काय झालं......
कल्पना : ते मी वेडींग इंविटेशन कार्ड सिलेक्ट केलं आहे.....सो मी विचार केला ....जर करूणा ऑफिस मध्ये आलीच असेल तर तु तिला घेऊन घरी ये.....तिला हे माझे आवडलेले कार्ड दाखवायचेत.....मला
अजित : थांब मी तुला थोड्यावेळात तिला विचारून कॉल करतो......
कल्पना : ok .....बाय......
अजित : वेल आपलं आता सगळं डीसाईड झालचे तर मग तुम्ही बाहेर माझ्या मॅनेजर ला पेमेंट बद्दल सांगा.....किती होतायत ते.....माझे मॅनेजर तुमच्या अकाऊंट वर लगेच पाठवतील pmt
वेडींग प्लॅनर : ok सर......थॅंक्यु मॅम थॅंक्यु सर.....
अजित : मनीषा तुझ्या टीमला बोलावं हीच माप घे......
मनीषा : ठिके मी बोलावते......त्यांना......(आणि ती केबिन मधुन जाते)
अजित : करूणा तु अजुन किती वेळ फ्री आहेस.....
करूणा : मी आज घरीचे.......
अजित : मग एक काम कर......तु माझ्या घरी चल....आईने तुला बोलावलंय.... ते वेडींग कार्ड सिलेक्ट केलेत ते तिला तुला दाखवायचेत......
करूणा : ठिके........मी घरी कळवते तस.....(करूणा तिच्या घरी कळवते)आणि ते दोघे अजितच्या घरी जातात.....
@@@@@@@@@@@@@@@@@@@
(मोहीते विला....)कल्पना होलमध्ये च बसलेली असते
अजित : हाय आई.......
कल्पना : आलास तु..... ये बस .....कशीयेस बेटा......
कल्पना वाकुन नमस्कार करते........मी मस्त आई....
कल्पना सर्व्हेन्ट ला सांगुन दोघांसाठी थंडा मागवते......
कल्पना : करूणा बेटा हे बघ.....मी हे पाच कार्ड सिलेकट केलेत.......त्यातले बघ तुला कोणते आवडतात ते........
करूणा कार्ड कडे बघतच राहते........
कल्पना : काय झालं.....नाही आवडले का......
करूणा : आई हे कार्ड एवढे मोठे......म्हणजे बघाना किती मोठे मोठे आहे ना.......
कल्पना : हो बेटा......असेच असतात.....कार्ड.....ह्यामधील तु दोन डीसाईड कर.....एक आपल्या खास गेस्ट साठी......असणारे......
करूणा हळुच अजितकडे बघते.....तो डोळ्यांनीच तिला सिलेकट कर सांगतो......
करूणा दोन कार्ड सिलेक्ट करते.......एक रेड बॉक्स वाला कार्ड असतो तो ओपन केला.....तर त्यातुन चांदीचा गणपती बाहेर येतो......त्याच्या बाजुला अजित आणि करुणाच.....सोन्याच्या पाण्याने नाव कोरलेलं असणार.........
दुसरं कार्ड ओपन केलं तर त्यातुन राधाकृष्ण ची मूर्तीचे दर्शन होते.............
कल्पना : छान चॉईस आहे तुझी.....मी काय बोलते तुम्ही ह्या दोन्ही कार्ड वर सुवर्ण अक्षरांनी ह्या दोघांची नावे लिहा.....आणि गेस्ट साठी मी सांगितलेला चांदीचा करंडा......आणि परफ्युम हे पण त्या बरोबर ठेवा.....
वेडींग कार्ड मेकर.......: हो मॅम...... नक्की.......
कल्पना :मला तीन दिवसात हे सगळं तयार पाहिजे....... ठिके....
वेडींग कार्ड मेकर......: आम्ही नक्की प्रयत्न करू........
सगळे डिझाईन्स घेऊन निघुन जातात.....
कल्पना : मग बेटा कशी तयारी चालु आहे.......
करूणा : अजुन कशातच काही नाही आई .....आता आधी निशा ताईच्या लग्नाची तयारी नंतर......आमची तयारी.....तसे पण ते दोघे कोर्ट मॅरेज करणारे ........सो जास्त तयारी नसणारे........माझी पण तयारी सुरू आहे .....आजी आई बाबा पत्रिका सिलेक्ट करायला जाणारे........
करूणा : छान .....चांगली गोष्ट आहे.........आणि हो तु आता आलीचे........तर जेवुन जा.....
अजित : आई ऐक ना.....आम्ही आधीच डिनर चा प्लॅन केलेला.....सो जाऊ.....
कल्पना : हो हो.....बिनधास्त जा.......पण तिला लवकर घरी सोड.....जास्त लेट नको करुस.......
अजितच्या आईची परमिशन घेऊन दोघे जेवायला जातात....
अजित आणि करूणा दोघेपण जेवुन......आपापल्या घरी जातात.......
करूणा फ्रेश होऊन तिच्या रूम मध्ये बसते......
दत्तात्रय (बाबा ) : आत येऊ का बेटा...........
करूणा : हा या ना बाबा.........
दत्तात्रय : बोलायच होत......जरा....तु फ्री आहेस का.....
करूणा : हो बाबा तुमच्यासाठी वेळच वेळ आहे माझ्याकडे....
दत्तात्रय : ते आज मी आणि तुझया आईने निशा साठी थोडे दागिने बनवायला टाकलेत......आणि तुझी पत्रिका पण आमच्याच पसंती ने पास करून प्रिंट करायला दिलीये........तुला आधी तुझ्या पत्रिकेचा नमुना दाखवायला पाहिजे होता.....पण मधुच बोली......तिला आवडेल आपली चॉईस म्हणुन लगेच प्रिंट करायला टाकली..........आणि त्यात दिवस पण किती कमी आहेत....
करूणा : अरे वा बाबा....चांगलं केलं.....मला आवडलं.....मला नाही दाखवलं म्हणुन मी नाराज नाही होणार.....उलटा बर वाटल........आणि ताईला ज्वेलरी केली ते एकून तर अजुनच छान वाटलं.........ताई खुश असेना
दत्तात्रय : मी वहिनी आणि निशाला नाही सांगितलं.....नाहीतर त्या तयार नाही होणार.......
करूणा : हम्म ते पण बरोबरे.....बर झाल ते नाही सांगितलं ते.........बाबा जर तुम्ही नाराज होत नसाल तर एक विचारु का .....
दत्तात्रय : हो विचार ना.......
करूणा : माझ्या लग्नाचा काही ताण नाहीना....म्हणजे.....तुम्ही जास्त थकत नाही ना.....???
बाबा : अरे अस कस...........बोलतेस.........एक बाप त्याच्या मुलीसाठी कधीच थकत नाही कळलं.....आणि हो परत अस नको बोलुस.......
करूणा : सॉरी बाबा......(एवढं बोलुन ती तिच्या बाबांच्या मांडीवर डोकं ठेवते......करुणाचे बाबा तिच्या डोक्यावर हळुहळु थापड त असतात.....करुणाला थकुन कधी झोप लागते कळतच नाही......दत्तात्रय एक टक तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत असतात......तेवढ्यात हळुच मधु करुणाच्या रूम मध्ये येते आणि दत्तात्रय च्या खांद्यावर हात ठेवते
मधु : काय झालं ओ.....असे का बघतायत.....
दत्तात्रय : मधु बघ ना.......किती लहान हाती ना ही.....जेव्हा आपण हिला आणलं तेव्हा........इवलेसे हात पाय......तिचे नाजुक ओठ.........ती रडली ना मग मला पण रडायला यायचं.....कारण कळतच नव्हतं ना की का ही नेमकी रडते.....हो की नाय.....आणि आता बघ केवढी मोठी झाली ही......थोड्यादिवसात भुर्रकन उडुन जाणार तिच्या राजाच्या महालात..........जस जशी ही मोठी होत गेली ना कधी हट्ट नाही केला हिने माझ्याकडे.......मला हेच हवं मला तेच हवं......कधी कोणती कम्प्लेन नाही......तिचा आजचा जोडीदार निवडायचा हट्ट सुद्धा तिने नाही केला.......तुला सांगतो मधु आपण जर ह्या स्थळाला नाही बोलो असतो ना....."तर ह्या आपल्या पिलूने ते पण मान्य केलं असत आपल्या साठी........मग आपल्या चुकीला कोणी माफ केले असत.......खुप अबोल आहेत ग हे दोघे........तसच अबोल प्रेम आहे ह्या दोघांचं.......... खरच आज जीवनाचं सार्थक झाल्यासारख वाटत......
मधु : आहो का तुम्ही एवढा विचार करतात.....आपली मुलगी कुठे एवढ्या लांब आहे आपल्या.......तुम्हाला वाटेल तेव्हा तिला भेटता येईल........
दत्तात्रय : हम्म.....जाऊदे..... हिच्या अंगावर चादर टाक......
दोघेही करुणाच्या कपाळावर गोड पापी देऊन निघुन जातात......
(कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कामेंटद्वारे.......वाचकाहो.....ही कथा एका अबोल प्रेमावर आहे......मी माझ्या कथेचं टायटल भरपुर वेळा माझ्या कथेत वापरलं आहे.......आता लवकरच ह्या कथेचा एन्ड होईल..... जर अजुन तुम्हाला ह्या कथेत काही हवं असें म्हणजे काही प्रॉब्लेम असें तर तुम्ही नक्की मला कळवा.....धन्यवाद)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा