चुकीला माफी नाही (एक अबोल प्रेमकथा)पार्ट 52

Untold love story(part 52)

पार्ट 52

रात्री सगळे एन्जॉय करून थकुन जातात

दुसऱ्या दिवशी सकाळी......अजितच्या घरी पाहुणे यायला लागतात.....दुपारी अजितचे मित्र नंदु ,मयुरेश, अभिषेक अजितच्या मदतीला पोहोचतात......

नंदु : नमस्ते काकु.....

कल्पना (अजितची आई) : अरे आलात तुम्ही खुप बर वाटल तुम्हाला बघुन....... हा अजित ना माझं एक काम ऐकत नाही बघ ना......

मयुरेश :काय झालं काकु....काही अडचण.....?????

कल्पना :अरे किती काम पडलीयेत तरी हा अजुन झोपलाचे..... रात्री तीन वाजेपर्यंत काम करत बसला....मला म्हणतोय काय.....फॉरेन कलाइन्ट होते....काही अडचण आली त्यांना म्हणुन काम करत होतो.....आणि आता बघ ना पाहुणे घरी यायची वेळ झाली आणि हा असा झोपुन रहायलाय.....

अभिषेक :तुम्ही कशाला टेन्शन घेतायत.....आम्ही करतो तुम्हाला मदत.....काकु....त्याला झोपुदया...... परत साखरपुड्याला फ्रेश दिसला पाहिजे ना......

कल्पना :अच्छा ठिके....तुम्ही बोलतायत तर ठिके....मी नाही जात उठवायला.....पण नंतर तुम्हीच त्याला जाऊन अथवा...आता मी गेस्ट रूम मध्ये जाते ....त्यांना बघते काय हवं नको ते.....

नंदु : काकु ते पण आम्ही बघतो ....तुम्ही आराम करा......

कल्पना : अरे नको नको....माझे माहेरचे मानस आहेत....खुप दिवसांनी भेटलेत ना....म्हणुन थोडं गप्पा मारत त्यांच्या बरोबर.....तुम्ही आधी खाउन घ्या....आणि मग कामाला लागा.....

अभिषेक :मी तर जेवुन आलोय....मला भुक नाहीये.....

नंदु ....मी इकडेच जेवतो.....मयुरेश तु जेवणारेस

मयुरेश : हो मग काय....चल आपण दोघे जेवायला जाऊ....तु पण चल ना थोडस आमच्या ताटातल खा.....

कल्पना :हो निदान गुलाबजाम तरी खा......

अभिषेक : अच्छा ठिके.....येतो आम्ही काकु

@@@@@@@@@@@@@@@@@

करुणाच्या घरी

करुणाच्या आईची बहीण सीमा (सीमाचा नवरा तिची सासु.... आणि तिचे दोन मुलं....(एक मुलगा आणि एक मुलगी)ह्यांच्या बरोबर रात्रीच येते.....सकाळी मधूचा भाऊ त्याच्या बायको आणि दोन मुलांसोबत पोहचतो

करुणाचा मामा तिच्या बाबाना घर सजवायला आलेल्या माणसांबरोबर बोलत असतात.....करुणाची मामी मधुला घरात मदत करत असते.....मंदा काकी पण त्यांच्या बरोबरच असते.....घर अगदी भरून गेलेलं असत ...मुलं पण मस्त खेळत असतात.....

करुणाची मामी: काही म्हणा ताई.....करुणाने आपल्या नशीब काढलं...... नाहीतर अस स्थळ शोधुन पण भेटलं नसत......किती मोठी मानस ती.....मी तर पहिल्यांदा च भेटणारे....आणि हाय हॅलो करून फोटो ऑन काढणार.....(गम्मत करत बोलते)

मधु : वर्षा (करुणाची मामी) काही झालं तरी ती मानस खुप साधी आहेत....अजितची आई तर गाय आहे गाय.....एवढी साधी सरळ मानस आपण आज परेनंतर नाही पहिली.....त्यांच्या बोलण्याने....पण वाटणार नाही एवढ्या मोठ्या डिझायनर ची बायको आहे म्हणुन

मामी (वर्षा) :मी तर त्यांना नेहमी टीव्ही आणि न्युज पेपर मधेच बघितलंय......आता प्रत्यक्षात बघणारे....माझ्या तर डोळ्यांवर विश्वास च बसत नाहीये....(सगळे हसतात)

मंदा काकी: हो ना......अजित आलेला घरी तो पण सेम त्याच्या आईसारखा आहे.......

मधु :झाली बाबा एकदाची काम सगळी......आता की नाय....सगळे जणजेवुन घ्या....बर म्हणजे आपल्याला आवरायला.....(वर्षा एक काम कर करुणाला विचार तिची पार्लर वाली किती वाजता येणारे ते.....)

वर्षा (मामी) : हा ठिके

मधु :ताई तुम्ही चला माझ्याबरोबर आपण बाहेरची तयारी व्यवस्थित झाली का पाहुया.....सीमा तु थोडा आराम कर....आणि सासुबाई ना पण आत घेऊन जा....अराम करायला.....चला ताई आपण जाऊया बघायला....नाहीतर ही मानस काय करुन ठेवतील ह्याचा नियम नाही(हसत दोघी बाहेर जातात)

मामी :(करुणाच्या रूम मध्ये येते....सगळ्या बहिणी एकत्र तयारी करत असतात.....).... झाली का सगळी तयारी.......

करूणा :ये ना आत मामी.....आणि तयारीच तर बोलुच नकोस....सकाळपासुन तयारी करते....तरी अस वाटतय....काही राहील तर नाही ना आपलं.....

मामी : (हसत)काही खर नाही तुझं....पण ना हे तुझ्याच बाबतीत नाही घडते....हे अस सगळ्याच मुलींना वाटत....शेवटी आज महत्वाचा दिवस आहे ना.....काय रे मुलींनो.... तुम्हाला काही मदत हविये का....????

सुवर्णा :नाही मामी....आमची पण सगळी तयारी झाली.....(हसत)

मामी : खुप छान वाटलं तुम्हाला सगळ्याना भेटुन....असेच हसत रहा.....(मामी सगळ्यांच्या गालावरून हात फिरवते) तुमच्या सगळ्यांच आवरून झालं ना तर लवकर जेवुन घ्या....म्हणजे तुम्ही तयारीला मोकळे व्हाल.....

निशा : हो मामी....येतोच आम्ही थोडया वेळात.....

सगळे जण जेवण आटोपुन तयारीला लागतात.....भटजींना सात चा मुहूर्त काढलेला असतो......पार्लर वाली सुद्धा येते....ती तिच्या बरोबर चार जण अजुन आणते.....एक एक जण मेकअप करायला बसतात......सगळेच आपआपल्या तयारीत गुंततात.....

@@@@@@@@@@@@@@@@

मोहितेंच्या घरी.....

सगळे मित्र अजितच्या रूम मध्ये जातात....तिकडे अजित गाढ झोपलेला असतो.......

नंदु :हा बघ कसा झोपलाय....... कोण बोलेन का की आज ह्याचा साखरपुडा आहे ते......

अभिषेक : रे जाऊदे आता....ह्याला उठव आधी.... बघ चार वाजलेत......

नंदु :हम्म....ये बाबा उठकीर आता....अरे आज साखरपुडा आहे ना तुझा....

अजित :अरे प्लिज यार आई ....झोपुदे ना अजुन थोड्या वेळ.....

सगळे मित्र अजित नंदुला आई बोलया मुळे हसतात......नंदु ठसन देऊन मित्रांकडे बघतो

नंदु : अरे काय रे तु....मी नंदु आहे....डोळे उघड आधी....आणि अजुन अंघोळ बाकीये तुझी....अरे उठ ना.....एका तासाने निघायचंय परत....किती उशीर करशील अजुन..... चार वाजलेत....घड्याळ बघ....(नंदुच्या अशा बोलण्याने अजित खाडकन उठतो)

अजित :ओ शीट चार वाजले....

मयुरेश :मग काय.....झोपताना निदान अलार्म लावुन तरी झोपायचं ना.....ते सोड आधी अंघोळ करून घे....आणि तुझे कपडे कुठेत ते सांग.....

अजित :अभिषेक एक काम कर....इकडुन लँडलाईन वरून 101 वर कॉल कर आणि माझ्या साठी ज्युस मागव.....तो पर्यंतर मी फ्रेश होऊन येतो.... मयुरेश माझे कपडे त्या वोर्डरोब मध्ये आहे.....मी आलोच(अजित अंघोळीला निघुन जातो)

अभिषेक :काही खर नाही देवा ह्याच....देव जाणे करूणा कशी झेलेलं ह्याला.....

नंदु :हो ना तु आधी तो ज्युस मागव....आन आपल्याला पण मागव जरा(तेवढ्यात अजितची आई रूम मध्ये येते)

कल्पना : अजित कुठे....उठला का तो(काळजीने विचारते)

मयुरेश : हो काकु.....उठला आता अंघोळीला गेलाय....

कल्पना : काही खर नाही ह्या मुलाचं.....सकाळपासुन जरा मदत नाही मला ह्याची ....आणि आता बघ ना ....किती वाजले.....सगळे रागवतील ह्याच्यामुळे मला......

नंदु : काकु टेन्शन नका घेऊ....आम्ही सांभाळुन घेऊ ह्याला....तुम्ही पण जाऊन तयारी करा.....

कल्पना :हो ठिके....बर झालं देवासारखे धावुन आलात तु।ही तिघे नाहीतर ह्या मुलाने तर अक्षरशः मला वेड लावलं असत..(एवढं बोलुन निघुन जाते)

अजित : (बाथरूम मधुन आवाज देत) मयुरेश तो टॉवेल दे ना.....

नंदु : नशीब आम्ही रूम मध्ये आहोत ते.....नाही तर काय केलं असत ह्याने ह्या अवस्थेत.... साधा टॉवेल पण घेऊन जाता येत नाही कारे तुला.....

अजित : सॉरी ना यार....आज विसरलो.....

अभिषेक : खरच काही खर नाही करुणाच

अजित बाहेर येतो....सगळे मित्र त्याला तयार करतात ...सर्वेन्ट सगळ्याना ज्युस देतात....

मयुरेश : अजित काहीतरी खाऊन घेतोस का थोडं.....

अजित :नको अरे.... रात्री जरा लेट झोपलो ना म्हणुन जरा अपचन झालं मला......

अभिषेक : अशा वेळेस पोसपोन करायचं सगळं काम

अजित :नाही यार....मोठी डील होती ही.... नाही करू शकत ना.....आणि त्यात फॉरेन कलाइन्ट होते.....त्यांच्या टायमानुसार सगळं करावं लागतं.....

नंदु :जाऊदे....सोड....तो ज्युस घे पिऊन.....आणि चल आधी खाली.....थोडं बघु काही काम आहे का...बाकी....म्हणजे निघायला.....

अजित :हम्मम

@@@@@@@@@@@@@@

करुणाच्या घरी :

मधु : करूणा  हे घे हार (बोलतच तिच्या रूम मध्ये जाते)
करूणा भिंती कडे तोंड करून उभी।असते.....तिची पार्लर वाली तिची साडी नीट करत असते.....

करूणा : हा दे.....(करूणा मागे फिरते)करूणा ला एवढं छान सजलेल बघुन मधु जागेवरच थांबते....मधु एकटक तिला बघत असते...
तीला तर तिच्या डोळ्यांवर विश्वास च बसत नाही ही ती मुलगी ये....जीला आपण ती एवढीशी लहान असताना आणली.... मधु जवळ जातच

मधु : (भावुक होतच)छान दिसते....वाटतच नाही....ही आमची करूणा आहे ते

करूणा : ये आई प्लिज आता रडु नकोस.....,प्लिज नाहीतर माझा मेकअप खराब होईल.......

मधु : नाही ग बाळा नाही रडत......चला आता निघुया..... उगच उशीर होईल.......

मंदा : मधु आधी नजर  तर काढ तिची.......किती सुंदर दिसते.....बाई बाई बाई माझीच नजर लागते की काय तुला(आपल्या हाताच्या बोटाने नजर काढत बोट मोडते)

मधु थोड्याच वेळात करुणाची नजर काढुन सगळ्याना निघायला सांगते.....

सगळे एक एक करून हॉल वर पोहोचतात..... हॉल मस्त फुलांनी सजवलेला असतो.......त्यावर गुलाबी रंगांच्या लाईट्स ने हॉल अजुन उजळुन दिसत असतो.....अजितच्या घरचे ऑलरेडी तिथे पोहोचलेले असतात......अजित त्याच्या हॉल मध्ये दिलेल्या रूम मध्ये असतो....

कल्पना आणि मोहिते : या या या....तुमचीच सगळ्यांची वाट बघत होतो....

दत्तात्रय : माफ करा आम्हाला उशीर झाला का.....????

मोहिते : आवो नाही ओ.......अगदी वेळेवर आलात तुम्ही......

मधु : ताई ....ही माझी बहिण आणि तिची सासु.... आणि ही दोन मुलं हिची....आणि हा माझा भाऊ....आणि त्यांचा परिवार.....(मोहिते आणि कल्पना त्यांना नमस्कार करतात)

कल्पना : या ना आत या तुम्ही.......करूणा तुझी ही रूमची किल्ली....तु ह्या रूम मध्ये बस.....ठिके

करूणा सुद्धा हॉलवर पोहोचल्या पोहोचल्या रूम मध्ये जाते........म्हणजे त्या दोघांनी एकमेकांना बघितलेलं नसत.......सगळे पाहुणे मंडळी एकमेकां न बरोबर बोलण्यात बीझी असतात......खुप दिवसा नंतर सगळे एकमेकांना भेटत असतात.....अजितची आई....आणि करुणाची आई त्यांच्या पाहुण्यांची ओळख करून देत असते.....

थोड्याच वेळात ब्राम्हण मुलाकडच्या आणि मुलीकडच्या मामला सुपारी फोडायला बोलवतात......

दोघे मामा स्टेज वर जाऊन......सुपारी फोडतात.......ब्राम्हण नंतर अजितला बोलावुन काही विधी पूर्ण करतो.....अजित केव्हाचा करुणाला बघायला थांबलेला असतो.....

नंदु : अरे थांब की मित्रा किती ती एक्साईटमेंट...... तुझी राणी येणारचे.....

अजित : ये मी कुणाची वाट नाही बघते....ते गरम होतंय म्हणुन इकडे तिकडे बघतोय

मयुरेश : हो का.......मग ही फुल ac कोणासाठी लावलीये.......आम्हाला नाही बाबा गरम होत....(हसत)

अजित मुद्दामून तिरप्या नजरेने मयुरेश कढे बघतो......

थोड्याच वेळात ब्राम्हन मुलीला घेऊन या बोलतात........

मधु : जा ग पोरीनो करुणाला घेऊन या.....(मधुच्या सांगण्यावरून सगळ्या बहिणी आणि तिच्या मैत्रीणी करुणाला आणायला तिच्या रूम मध्ये जातात)

करूणा जशी स्टेज वर पोहोचते तसा अजित तिला एकटक बघत असतो......तो तर तिला बघताच क्षणी घायाळ होतो.......तो तिला पाहिल्यानंदा एवढी सजलेली पाहतो......

ब्राह्मण : मुली तु इथे बस.......ह्या पाटावर.......(ब्राम्हण सगक मंत्र बोलतात) पण अजित आणि करुणा मात्र एकमेकांना हळुच चोरून बघत असतात........

ब्राम्हण : मुलाकडच्या लोकांनी सुनेची ओटी भरून तिला साडी द्यावी.....

अजितची आई तिच्या साइड च्या पाच बायकांना बोलावुन करुणाची ओटी भरतात.....आणि तिला हिरवी पैठणी देतात.......करूणा ती साडी घालण्यासाठी तिच्या रूम मध्ये जाते......

अजितला सुद्धा करुणाच्या घरचे ओवाळुन त्याला घेतलेला सदरा देतात.......तो सुद्धा चेंज करायला जातो ......

थोड्याच वेळात दोघे चेंज करून येतात......फोटोग्राफर त्या दोघांचे एक एक नॅचरल फोटो घेतो......अजित नकळतच करुणाला बघतो....तिच्या अंगाकर हिरवीगार नक्षीदार काम केलेली पैठणी उठुन दिसत असते....त्यामध्ये तिचा सावळा रंग अजुनच उठुन दिसत असतो.....तिच्या हातात घातलेला हिरव्या रंगाच्या बांगड्या नकळत तीच रूप अजुन खुलवत होत.....ती आज अजितला खुपच आकर्षित करत होती.....करूणा सुद्धा अजितला त्याच्या सदरा मध्ये खुलून दिसत होता....

दोघेही स्टेज वर येतात.....ब्राह्मण आंगठीची पुजा करून.....त्या दोघांच्या हातात देतो....तसे दोघे लाजुन एकमेकांना बघतात.....

नंदु :  आता काय बघतायत एकमेकांना.... एकदा का लग्नाच्या बेडीत अडकला त ना मग नेहमी एकमेकांना च बघायचंय......नंतर तर कंटाळा येईल तुम्हाला दोघांना.....(हसत अजित त्याच्या हाताचा कोपरा नंदुच्या पोटात मारतो) तसे सगळे हसतात .....

संगिता : अजित लवकर घाल ना करूणा वाट बघत(करूणा लाजुन मान खाली घालते)

अजित हळूच तिचा हात त्याच्या हातात घेतो......तसे सगळे टाळ्या वाजवत.....तो जसा तिला अंगठी घालायला जातो .....तशा तिच्या मैत्रीनि तिचा हात मागे खेचायच्या(एक।गंमत म्हणुन).......नंतर अजित एक रोमँटिक  मुड मध्ये त्याच्या गुढग्यावर बसुन तिला सगळ्यांसमोर विल यु म्यारी मी म्हणुन प्रपोज करतो.... तसे सगळे जोरजोरात टाळ्या वाजवतात .....करूणा सुद्धा लाजुन त्याच्या हातात तिचा हात देते.....,अजित तिला प्रेमाने अंगठी घालतो.....आणि तिच्या हातावर किस करतो....करूणा सुद्धा त्याला अंगठी घालते....दोघे त्यांची अंगठी सगळ्यांना दाखवत ते दोघे आता एकमेकांचे झाले हे सांगतात.....ब्राम्हणाच्या सांगण्याने ते दोघे एकमेकांना पेढा भरवतात....…..आपल्या मुलीचा आनंद बघुन करुणाच्या आईच्या डोळ्यात पाणी येत....तशी सीमा(बहीण)तिला सावरते.....करुणाचे बाबा सुद्धा आनंदाने रडतात.....पण ते कोणाला दाखवत नाही

सगळे पाहुणे त्या दोघांना शुभेच्छा दयायला स्टेज वर येतात.....मधु आणि कल्पना एकमेकांना मिठी मारतात.... मोहिते आणि दत्तात्रय सुध्दा एकमेकांना मिठी मारतात..... पाहुण्यांच्या शुभेच्छा देऊन झाल्यावर फोटोग्राफर त्या दोघांना घेऊन बाहेर बागेत जातो ....तिकडे त्या दोघांचे मस्त असे एक एक पोज देऊन फोटो काढतात ...करूणा तर अजुन पण लाजतच असते .....अजित हळुच तिच्या कानात बोलतो......आता कशाला लाजतेस....आता तर मी तुझाच झालो ना......तशी करूणा अजुन लाजते....फोटोग्राफर तिचे लाजन बघुन त्या दोघांच्या नकळत त्यांचे फोटो घेतो..... थोड्याच वेळात सगळे आत येतात...नंतर सगळ्या फॅमिली बरोबर त्यांचे फोटो काढतात......फोटो काढुन झाल्यानंतर करुणाच्या बहिणी......सोलो फोटो काढण्यासाठी उभे असतात..... अशातच एक व्यक्ती....दत्तात्रय(करुणाच्या वडिलांजवळ येतो)आणि निशा बद्दल चौकशी करतो......

ती व्यक्ती सीमाचा गावची....म्हणजे......मधुच्या बहिणीच्या सासरच्या साईटची असतात.....ते सहजच....निशाबद्दल सगळी विचारपुस करतात...आणि दत्तात्रय चा फोन नंबर घेऊन जातात.....सगळे जण जेवुन घेतात.......

संगिता : काय मग मॅडम कस वाटतय आता.....आता तुम्ही मिसेस अजित मोहिते व्हाल....(मस्ती करत)

करूणा :हो का....मला माहीतच नव्हतं....बर झालं आठवण करून दिलीस(मुदामून चिडवत)सगळे हसतात.....

नंदु : जोक पण मारता येत नाही तुला.....(हसत)

संगिता :हो का झालं तुझं सुरू.....

अजित :एक मिनिट एक मिनिट.... आज दिवस किती चांगलाय.......तुम्ही परत दोघे सुरू नका होऊ......

सगळे एकत्र: हो ना....

ध्रुवी : हे दोघे ना....पक्के गुंडे आहेत......जिथे जावं तिकडे सुरू होत ह्यांच......जाऊदे मी घेते जेवुन

नंदु आणि संगिता दोघे एकमेकांना चिडवत जेवतात.....

जेवुन झाल्यावर सगळे पाहुणे आप आपल्या घरी निघतात......मोहिते फॅमिली..... आणि करुणाची फॅमिली.....दोघे ब्राम्हणाला लग्नाची तारीख विचारायला थांबतात......

कल्पना : गुरुजी ....तुमच्या आशीर्वादाने आणि देवाच्या कृपेने हे साखरपुड्याचा कार्यक्रम छान पार पडला.....आता लग्नाचा पण मुहूर्त तुम्हीच सांगा.....

मोहिते : हो ना आम्हाला लवकरात लवकर सुनेला घरी आणायचं....काय अजित बरोबर ना

अजित आणि करूणा दोघे एकमेकांना बघुन लाजतात

ब्राम्हण : हो नक्की.....मला दहा मिनिटे द्या....मी सांगतो तुम्हाला......

दहा मिनिटांनी ब्राम्हण : पुढच्या महिन्याची दहा तारीख चांगली आहे नंतर 12, 21, 25 ह्या चार तारखा चांगल्या आहेत.......नंतर सरळ.....चार महिन्याने मुहूर्त आहेत....म्हणजे दिवाळी नंतर......

कल्पना : मला काय वाटतं.... आपण ह्या चार तारखांमधील एक तारीख ठरवावी.....म्हणजे जास्त उशीर पण नको करायला

मधु :(काळजीत ) पण एका महिन्यात सगळी तयारी होईल का......?????

दत्तात्रय : हो ना.....?????

मोहिते : होईल सगळी तयारी....पण एक आमची अट आहे....लग्न आता आमच्या पद्धतीने होईल....आता तुम्ही एवढं सगळं केलं....निदान आम्हाला तरी थोडी आमच्या पध्दतीने तयारी करू द्या....आणि लग्नाचा सगळा खर्च आम्ही करणार

दत्तात्रय : आवो पण अस कस.....आम्हला पण थोडाफार करुद्या......

मोहिते : नाही.....आता मी तुमचं एक नाही ऐकणार..... करुणाचे बाबा .....मी तुमची घालमेल समजु शकतो.....पण आमचं पण हे घरच शेवटचं लग्न आहे.....आम्हाला आमच्या इंडस्ट्रीज मधील बरीच माणस बोलवायचियेत.....म्हणुन मला अजितच लग्न जोरदार करायचंय..... शेवटी आमच्या पण काही इच्छा आहेत

मधु : आवो ठिके....त्यांना करूद्या त्यांच्या पद्धतीने.... पण काही काम असेंन तर नक्की कळवा आम्हाला.......

कल्पना :हो हो का नाही....मग तारीख कोणती ठरवायची.....

दत्तात्रय : मला दहा में चालेन.......(म्हणजे मी करेन सगळी तयारी)

मोहिते :हो मला सुद्धा चालेन....पण करुणाचे बाबा तुम्ही जरा पण टेंशन घेऊ नका....म्हणजे सगळं व्यवस्थित होईल......

दत्तात्रय : आता तुम्ही एवढं बोलतायत.... म्हणजे मी निसचिंत झालो......

सगळे दहा तारीख ठरवुन एकमेकांना त्यांचा आनंद व्यक्त करतात......अजित सुद्धा करुणाला गोड स्माइल देऊन त्याचा आनंद व्यक्त करतो.....सगळे प्रोग्राम संपल्यावर एकमेकांना निरोप देतात......

(काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कामेंटद्वारे)





















🎭 Series Post

View all