Jan 27, 2021
प्रेम

चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा पार्ट 5)

Read Later
चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा पार्ट 5)


पार्ट 5

करुणा सकाळी सकाळी लवकर उठली आणि तिच्या आईला मी आज कॉलेज ला नाही जात आहे सांगते

करुणा : आई ऐकणं... मी आणि संगीता मिळुन आज ध्रुवी च्या घरी चालो...कारण आता फायनल पण जवळ आली आहे... आणि क्लास मध्ये पण या रिपीट शिकवतात... तर आम्ही सगळ्यांनी असा विचार केला की घरीच अभ्यास करू...तर तू माझी वाट नको बघु... मी ध्रुवीच्या घरी जेवण कारेन.... आणि डायरेक्ट संध्याकाळी घरी येईन....ओक बाय.....

मधु (करुणाची आई): नीट सांभाळून जा....पोहोचल्यावर कॉल कर...आणि मस्ती नाही करायचि....आहो ऐकलं का मी काय बोलते... मला जरा बोलायचं होतं तुमच्या बरोबर....(काळजीच्या स्वरात)

दत्तात्रय (कारुणाचे बाबा):मला माहितीये मधु तुला काय बोलायचं ते...पण मला असं वाटत ही वेळ बरोबर नाहीये सगळ सांगयची... कारुणाचे एवढी एक्साम होऊ दे मग आपण ठरवू कधी बोलायचं ते

मधु:(तुम्हाला काय वाटतं कारुणा ला कळल्यावर के होईल पुढे)

दत्तात्रय:पुढचं पूढे बघता येईल... आताच एवढ्यात विचार नको करायला

@@@@@@@@@@@@@@@

इकडे सगळ्या मैत्रिणी एकत्र येऊन परीक्षेची तयारी करत होते... आणि मधीच कालच्या झालेल्या फंक्शन बदल सुद्धा बोलत होत्या.... परंतु करुणा मात्र वेगळ्याच विचारात होती

ध्रुवी : काय ग कसला विचार करतेस...

संगीता : हो ना मी पण मागास पासून बघते मधीच हस्ते मधीच लाजते
........कुणाच्या प्रेमात वगैरे पडलीस की काय

(संगीताच्या बोलण्याने करुणा गोंधळली )

करुणा : छे छे.... काही पण काय तुझं
मी कशाला पडु नको त्या फंद्यात....तुम्ही करा स्टडी(करुणा ने परत लाजुन मान खाली घातली)

ध्रुवी : कुछ तो लोचा हे...ह्म्म

करुणा : तुम्ही स्टडी करतायत का मी निघु

संगीता : कामाले यार... उलटा चोर कोतवाल को दाटे....(सगळ्या जणी खळखळून हसायला लागल्या)
@@@@@@@@@@@@@@@

इकडे अजित अजुन अंथरूणात अजुन लोळतच होता....

कल्पना: अजित बाळा उठ बघ घड्याळात10 वाजले.. आज बाहेर जायचंय ना आपल्याला

(आईच्या अश्या बोलण्याने अजित उठुन बसला कारण त्याला काही तरी आठवलं)

अजित:आई प्लिज डॅड ला सांग ना मी नाय येत आज पार्टी ला...प्लिज

कल्पना(अजितची आई): हे बघ मला तुमच्या दोघां मध्ये नका घेऊ...तू आणी तुझा डॅड जाणे...चल आवर आता...आणि मला मंदिरात घेऊन चल... नाहीतरी आज तुझं कॉलेज नाहिये ना.....

अजित :(जरा नाराजगीतच)ठीक मी बघतो... तू जा तयार हो आई...मी आलो फ़्रेश होऊन

अजित तयार होऊन खाली आला आणि ब्रेकफास्ट करून निघाला मंदिरात

(मंदिर राधा कृष्ण मंदिर...अजितच्या आई च आवडत मंदिर...तिचा म्हणा असं की ह्या दोघांनी जेवढा निरागस प्रेम केलं ते आताच्या पिढी मध्ये कुठे... कुणाला खरा प्रेम मिळत तर कोणाला नाय...कृष्णाच्या मंदिरात प्रवेश करून ती देवा समोर उभी राहते...हे देवा जे माझ्या बरोबर घडल ते माझ्या मुलाबरोबर नका घडवून देऊ...खुप निरागस आहे तो...त्याला जे हवं ते द्या ...आयुष्यात मी काहीच मागितला नाही...पण माझ्या अजितची खुशी ज्याच्यात असेंन ते त्याला मिळवुन द्या...

.......देवाला नमस्कार करून ते दोघे मागे वळुन निघतात तेवढयात कल्पनाच म्हणजे(अजितच्या आईचा धक्का लागतो कुणाला तरी) ते म्हणजे करुणाची आई....आज त्या पण करुणाच्या काळजी पोटी मंदिरात आलेल्या असतात

कल्पना :(अजितची आई): माफ करा मला ताई....माझ्या मुळे तुमच्या टाटाच नुकसान झालं...
....मध्येच अजित बोलतो... अग आई जरा काळजी न मागे फिरायचं ना

मधु(करुणाची आई): अजितच्या बोलण्याने त्यांना हसायला आलं...अरे रहाऊदे माझं काही मोठं नुकसान नाही झालं नुसती फुले खाली पडली... काळजी नाको करुस बेटा....

अजित त्याना सगळी फुले वेचून देतो

मी कल्पना आणि तुम्ही....??
मी मधु....

कल्पना:तुम्ही नेहमी येतात का मंदिरात...??

मधु:नाही ओ..नेहमी नाही...जेव्हा मन अस्वस्थ वाटलं ना तेव्हा येते

कल्पना: माझं सुद्धा तसच काही तरी आहे ताई...काही हरकत नाही... तुम्ही घ्या पुजा करून... तुमच्याशी बोलुन खुप बरं वाटलं... नक्की भेटु आपण(हसुन म्हणाल्या)

मधु : मला सुद्धा बरं वाटल ...नांशीबात असेंन तर नक्कि भेटू
(तेवढ्यात मंदिराची घंटा वाजते)सगळे जण एकत्र देवा कडे बघतात

कल्पना: बघा देवलासुद्धा वाटतय की आपण परत भेटु

मधु:हो ना ताई नक्की

(अजित): काकु मी सोडु का तुम्हाला तुमच्या घरी..वाटलं तर आम्ही दोघे थांबतो तुमची पुजा होऊस तोपर्यंतर

मधु:तू विचारलंस हीच खुप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी...नाहीतर जगात कोण अनोळखी व्यक्तीची मदत करत...नंतर परत भेटु तेव्हा नक्की सोड(हसतच म्हणाली)

अजित : ठीक... जशी तुमची मर्जी... चल आई निघूया आपण

कल्पना : हो.. चल.. चला येते ताई...परत भेटु

मधु:हो...हो नक्की(दोघे निघाले तास मधूच्या मनात विचार आला किती गुनी मुलगा आई...आईने किती चांगले संस्कार शिकवलेत... आमच्या करुणाला पण असाच मुलगा मिळो

@@@@@@@@@@@@@@

अजित आणि त्याची आई घरी आले आणि संध्याकाळच्या तयारीला लागले.. .अजितचा मुड नव्हता... पण काय करणार त्याच्या आईसाठी तो तयार झाला

कल्पना :अजित बेटा झालिका संध्याकाळची तयारी??

अजित : हम्म(जरा नाराजगीतच)

कल्पना : इकडे बघ... मी काय बोलते इकडे बघ... काय झालं बाळा

अजित: काही नाही आई

कल्पना : मी तुझी आई आहे... माझ्या पासून लपवणार का ...कोण आहे ती...??

अजित : आईच्या अश्या बोलण्याने अजित चकमकला.. तु समजतेस तस काही नाहीये... ते सहज....(पुढे चालतच अजित बाल्कनीत गेला ... आई सुद्धा त्याच्या मागुन आली...दोघे पण थोड्या वेळ शांत होते... आई इथे तुझंच काही चालत नाही...मी तर लांबच रहायलो(थोडा नाराजगीतच)

कल्पना : अजित अरे अस का बोलतोस.... मी माझ्या मुला साठी काही पण करेन....

अजित (रागातच)मग कस बोलू ....सांगना कस बोलु ....आई सगळं तुला माहिते... इकडे डॅड चा स्वभाव सुद्धा तुला माहीत आहे...माग मााझ्या मनाला कश्याला विचारतेस... आणि तु समाजतेस तस काहीच नाहीये
......ते मला पार्टीला जायचं नाहीये म्हणुन थोडा नाराज होतो
पण इट्स ओके मी करेन म्यानेज....

कल्पना : पक्का हेच आहे ना...?

अजित :हो आई........

कल्पना : अच्छा ठिके... मी येते नंतर... तू तयार होऊन ये खाली ठिके

(आई निघताना अजित तिला आवाज देतो.....आई ......कल्पना लगेच मागे वळते...अजित धावतच तिला मिठी मरतो
).
(अजितच्या मिठीमध्ये कुठलीतर काळजी आईला जाणवत होती...)

कल्पना :चल बाय
@@@@@@@@@@@@@@@

(अजित पार्टी मध्ये गेल्यावर काय होणार...त्याला अवडेन का पार्टी... हे बघुया पुढच्या भागात)

(वाचकांनो कसा वाटला आजचा भाग मला नक्की तुमच्या कंमेंट मधुन कळवा)