चुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा पार्ट 49)

Untold love story(part 49)

पार्ट 49

दुसऱ्या दिवशी करुणाची आई .......ब्राम्हणाला कॉल करते.....

मधु : नमस्ते गुरुजी

गुरुजी : नमस्ते.....बोलाना ताई......

मधु .....गुरुजी.....मी आमच्या यजमानांच्या हातातुन करुणाची आणि अजितची पत्रिका पाठवलीये सकाळी.....तुम्हाला भेटली का........????

गुरुजी : हो हो ....भेटली......मी तुमच्याच कॉल ची वाट बघत होतो......

मधु : का गुरुजी .....काही चिंतेची गोष्ट आहे का.....(काळजीत)

गुरुजी :नाही नाही.....उलटा करूणा ने नशीब काढलं.....

मधु : म्हणजे......

गुरुजी : खुप भाग्यवान आहे तुमची करूणा ......दोघांचे मिळुन चौतीस गुण मिळतायत...... मुलीच्या पत्रिकेत धन संपत्ती..... सुख समृद्धी......सगळं काही व्यवस्थित आहे..........

मधु : धन्यवाद गुरुजी.....पुढे काही अडचणी आहेत का......

गुरुजी :ते मी कस काय सांगु शकतो..........पण तिची पत्रिका बघुन तरी काही वाटत नाही.....आणि मुलाची पण पत्रिका चांगली आहे

मधु : मग गुरुजी एखादा चांगला मुहूर्त सांगाणा...... साखरपुढ्यासाठी......

गुरुजी : हो हो.....ते पण मी काढुन ठेवलं आहे.....पाच दिवसा नंतरचा मुहूर्त आहे.......ह्या महिन्यात हा एकच मुहूर्त आहे.....नंतर सरळ दोन महिन्याने.....मुहूर्त आहेत

मधु : अरे बापरे......ठिके मी बघते ह्याना सांगुन..... मग कळवते तुम्हाला......

गुरुजी : हा ठिके......

मधु :ठेवते गुरुजी......

गुरुजी :हम्म

@@@@@@@@@@@@@@@

मधु तिच्या मोठ्या जावेला(मंदा ला): ताई गुरुजींनी पाच दिवसा नंतरचा मुहूर्त सांगितलाय......

मंदा : अग मग चांगलय की......तु का एवढी नाराज दिसतेस.....????.?

मधु :पाच दिवसात तयारी कशी होईल(काळजीत)

मंदा : काय तु....आम्ही आहोत ना सगळे(कशाला काळजी करतेस.....तु आता भावोजी ना कॉल करून कळव....आणि मुलाकडच्या लोकांना पण

मधु मानेनेच हो बोलते.....पण मी काय बोलते ताई आधी अजितच्या आईला सांगते सगळं.....म्हणजे ते हा बोले तर आपण ह्याना सांगुया......

मंदा : हा चालेना........ तु विचार त्या सगळ्यांना

(करुणाची आई अजितच्या आईला कॉल लावते.......)

मधु (करुणाची आई ) : नमस्ते ताई .....

कल्पना (अजितची आई )  : नमस्ते.......कशा आहात तुम्ही....?????

मधु : मी मस्त .....तुमचं कस चालय.....?????

कल्पना : आमचं सगळं मजेत.......बोलाना कशी काय आज आमची आठवण काढली

मधु :ते मी आमच्या ब्राम्हणाने मला साखरपुढ्यासाठी पाच दिवसा नंतरची तारीख सांगितली.....म्हणुन म्हंटल तुम्हाला चालेल का.....?????

कल्पना :हो हो.......मला चालेन.....मी अजितच्या डॅड ला सांगुन रात्री परत तुम्हाला कॉल करते.......

मधु : ठिके.......मग तयारीला लागावं लागेन......कंबर खचुन(हसत)

कल्पना : हो हो.....मी तर तयारच आहे.......

मधु : ठिके .....मी आता करुणाच्या बाबाना कळवते.....

कल्पना : हो ठिके.......(आणि दोघी फोन ठेवतात)

@@@@@@@@@@@@@@@@@@

दत्तात्रय : हॅलो.....हा बोलना मधु.....

मधु : आवो गुरुजींनी पाच दिवसा नंतरची साखरपुड्याची तारीख संगीतलीये.......

दत्तात्रय : अरे बापरे.....एवढ्या लवकर(काळजीत)

मधु : हो.....कारण दोन महिन्या नंतर परत तारीख आहे.......

दत्तात्रय : ठिके चालेन.....पण एकदा मोहितेच्या घरीपण  कळव

मधु : आवो मी तुमच्या आधी त्यांच्याच घरी कॉल केलेला.......ते अजितच्या आई तयार आहे .....त्या बोल्या मी रात्री अजितच्या वडिलांबरोबर बोलुन कळवते तुम्हाला......

दत्तात्रय : ठिके.....चालेन....अग पण आपल्याला त्या सगळ्याना कपडे घ्यावे लागतील ना......एक काम कर......रात्री त्यांचा कॉल आला तर उद्याचं त्यांना सांग......आपण अजितसाठी  आणि त्यांच्यासाठी कपडे आणायला जाऊया म्हणुन

मधु : आवो ते लोक एवढी मोठी......त्यांना  आपण दिलेली कपडे आवडतील का ओ.....

दत्तात्रय : हो का नाय......तेवढं तरी आता आपण त्या लोकांना ओळखायला लागलोचे ....नक्की आवडतील त्यांना


मधु : अच्छा ठिके......(दोघे आपआपला कॉल संपवतात)

मंदा : काय बोले भावोजी........

मधु : ते तयारे........आणि उद्याच मुलाकडच्या लोकांना कपडे घायला जाऊया बोले

मंदा : ते चांगल झालं........म्हणजे आपल्याला पण तयारी करायला वेळ भेटेन....

@@@@@@@@@@@@@@@@@@@

अजित करुणाला ऑफिस मधुन कॉल करतो.....

अजित : हॅलो स्विटी........क्या बात हे....आज काल वेळ मिळत नाही तुला.....

करूणा : अरे अस काही नाही.....तुला सांगितलं ना माझ्या बहिणी आल्यात.....सो त्यांच्या बरोबर टाईम स्पेनड करते.....

अजित : नो प्रॉब्लेम...... पण झालं काय अचानक........हे सगळे....म्हणजे अचानक आले.....??????जर तुला सांगायचं नसेन तर नो प्रॉब्लेम....

करूणा :नाही नाही तस काही नाही.....(करूणा सगळा घडलेला प्रकार सांगते.....)

अजित : खुप वाईट घडलं.....पण प्लिज तुला जमेन तेवढा त्यांना वेळ दे......

करूणा : हो  नक्की.....

अजित :मग झाली का तयारी......मिसेस मोहिते .......

करूणा : कसली काय ....अजुन शॉपिंग बाकीये.......

अजित : तुम्हा मुलींना किती तयारी करावी लागते ना.....हे नको ते ते नको हे

करूणा :ये हॅलो.......एकच दिवस मिळतो सजायला त्यात पण तुला प्रॉब्लेम.......(मुदामून नटका राग दाखवत)

अजित : हहहह ....आला राग मॅडम ला.......मस्ती करत होतो ग.......कर कर हा मस्त तयारी कर........

करूणा पण हस्ते........

अजित :अच्छा ऐक ना....आपला साखरपुडा आहे म्हणुन मला त्या दिवशीची सगळी काम मला आधीच संपवायची आहेत.....सो मला मिळेन तसा मी तुला वेळ देईल आणि कॉल करेन.........आणि कधी कधी मला लेट पण होईल घरी यायला.....तर प्लिज समजुन घे

करूणा   : काळजी नको करुस....मी समजु शकते......(हसत) आणि हो आज मी आपल्या ग्रुप वर पण सगळ्याना इंविटेशन देते......म्हणजे सगळे सुट्टी टाकतील.......

अजित : हा चालेन....तु कर जस तुला जमतंय तस..... चल आता मी ठेवतो.....थोड्याच वेळात माझी फॉरेन कलाइन्ट बरोबर मीटिंग आहे

करुणा : अच्छा ठिके......बाय

अजित : बाय

@@@@@@@@@@@@@@@@@@@

रिचा च्या घरी (रात्री)

रॉबिन : सुनो डॉली मिस्टर मोहिते के बेटे की एनगजमेंट हे......तुम्हे पता चला....??

डॉली : हा हा ......अजित की माँ का कॉल आय था......उन्हो ने बताया मुझे......

रॉबिन : हम सब जयेंगे.......

डॉली :हम्मम.......(रिचा बाजुलाच बसुन सगळं ऐकत असते)

रिचा : उस अजित ने मेरे साथ ऐसा किया.....ओर आप सब उसके एनगजमेंट में जा रहे हो(रागात)

डॉली : रिचा बेटा.......में आज भी वही बात दोहरा रहा हु.....गलती अजित की नही..... हमारी थी......ओर वो जीस लडकीसे प्यार कर रहा हे वो उसीसे शादी करणे जा रहा हे.....तो उसमें कोणसी गलत बात हे.......

रिचा : पर डॅड

डॉली : पर वर कुछ नही........तुम्हे आणा हे तो आ सक्ती हो.....वरना मत आणा

रिचा डॅड च बोलणं ऐकून रागाने तिकडुन निघुन जाते

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

करुणाच्या घरी रात्री जेवताना

दत्तात्रय : मधु मी उद्या दुकानावर नाही जात.....आपण सगळे उद्या शॉपिंग ला जाऊया.....आणि हो सगळ्यानी मस्त मस्त साड्या घ्यायच्या......

निशा : काका आमच्याकडे आहे साड्या.....आम्ही सगळ्याजणी त्याच घालु..... उद्या वाटलं तर करुणाची शॉपिंग करू आपण सगळे

मधु : का बरं तिच्या एकटीची..........आपल्या घरातलं हे पाहिलं कार्य आहे.....मी कोणचं काहीं ऐकणार नाही.......तुम्ही सगळ्यानी तुमच्या तुमच्या आवडीची शॉपिंग करा....आणि मधु वहिनी ची आणि तुझी शॉपिंग ऑन उद्याच करून घे.....

मधु : हो हो.....

सुवर्णा तिचे अश्रु लपवत होती.....पण मधु कडून ते काही लपले नाही


मधु : काय झालं सुवर्णा .....आमचं काही चुकलं का......??????

सुवर्णा : कधी कधी वाटत आमचे बाबा काकांसारखे का नाही......बाबांनी नुसता राग रागच केला आमचा.....करूणा खुप लकी आहेस तू.......जे तुला काकांसारखे बाबा मिळाले

मधु : सुवर्णा हे पण तर तुझे बाबाचे........तु प्लिज अस काहीच मनात नको आणुस

दत्तात्रय : हो .....आणि परत अस रडायचं नाही.......मधु बोलते ते बरोबर बोलते....तुम्हाला जे काही लागेन ते हक्काने मागायचं....... जसा करुणाचा माझ्यावर आणि मधुवर जसा हक्क आहे....तसाच तुमच्या सगळ्यांचा आहे(हसत)

सगळे जण हसत हसत जेवण संपवतात.....आणि तेवढ्यात मधुला अजितच्या आईचा कॉल येतो......

मधु (करुणाची आई) : बोलाना ताई.....????

कल्पना (अजितची आई) : हा ते मी अजितच्या डॅड ला सांगितलं मुहूर्ता बद्दल ते तयारे......(आनंदात सांगते)

मधु : अरे वा खुप छान......मग लागा आता तयारीला(हसत)

कल्पना : हो हो....का नाही.....आमच्या घरातलं हे पहिलच आणि शेवटचं कार्य आहे.....त्यामुळे तयारी जोरदारच व्हायला पाहिजे......आणि हो एक रिकवेस्ट आहे....अजितचे डॅड बोले.....जशी तुम्ही सगळे साखरपुड्याची तयारी करतायत तसेच ते एक banquet शोधतायत म्हणजे लहानच शोधतायत....कारण आपल्याला मोजक्याच माणसांमध्ये साखरपुडा उरकायचाय म्हणुन

मधु : हो आम्ही पण तोच विचार करतोय.....पण आपण अर्ध्या अर्ध्या खरचात करूयाना.....

कल्पना : नाही नाही.....आता ताई तुम्ही सांगा....तुम्ही एवढं सगळं आनंदाने करतायत आम्ही अलोका मधी....मग आता आम्हाला पण एवढं छोट काम करुदया

मधु : अच्छा ठिके जशी तुमची इच्छा.....आणि हो तुमच्या जर काही वेगळ्या रितीरिवाज असतील तर नक्की सांगा म्हणजे आम्ही तस करू

कल्पना : तस तर सगळंच सेम आहे....पण काही लागलं तर नक्कीच सांगु

(दोघेही त्याचा फोन ठेवतात)

दत्तात्रय : काय झालं ....काय बोलया ताई.......??????

मधु : ताई बोलया अजितचे डॅड सुद्धा तयार आहेत....पण त्यांची एक अट आहे....banquet ते लोक डीसाईड करणार........

दत्तात्रय : मग आपण अर्धा अर्धा खर्च करू ना....?????

मधु : ते पण मी बोले ........पण ते बोले आम्ही आमच्या इच्छे नुसार करतोय.....म्हणुन मी पण हा बोले............

दत्तात्रय : अच्छा ठिके......काही हरकत नाही....तुम्ही सगळे उद्याची तयारी करा......मी कोणत्या कोणत्या पाहुण्यांना बोलवायचं त्याची लिस्ट तयार करतो

सगळे आनंदाने हो बोलतात.......आणि झोपायला निघतात......

@@@@@@@@@@@@@@@@

सगळ्या बहिणी एकत्र गप्पा मारत असतात.......

निशा : करूणा तु उद्या कोणती साडी घेणारेस.....?????

करूणा : अग ताई ......त्या लोकांनी मला ऑलरेडी साडी दिली......ये....आणि पर्वा मला त्याचा ब्लाउज  पण शिवुन भेटेन....पण हो त्याची ज्वेलरी मला उद्या घायची आहेत....मॅचिंग मॅचिंग.....पण ताई तुम्ही सगळ्या काय घालणारे  डीसाईड केलं का......

निशा : आम्ही सगळे पण साडी घालणारे......कारण तुझ्या लग्नात आम्हाला लेहेंगा घालायचाय.... म्हणुन हे ऑप्शन निवडलं

करूणा : मस्त आयडिया आहे.....उद्या आपण सगळे बाहेरच जेऊया.....

अश्विनी : तु तर सगळा टाईम आम्हाला देतेस मग अजितला कधी भेटणार.....(हसतच)

करूणा : अग ताई .....तो ऑलरेडी एवढा बीझी असतो.....तरी तो माझ्या साठी टाईम काढतो.......आणि आता एनगजमेंट पण आहे सो तो त्या दिवशीची सगळी काम आधीच करतोय

सुवर्णा : खुप छान ग......किती प्रेम करतो तो तुझ्यावर.....किती काळजी असते ना त्याला तुझी

करूणा : हो ना.......चला मग आता आपण झोपायच्या आधी उद्या काय काय घ्यायचय ह्याची लिस्ट बनऊया.....म्हणजे विसरणार नाही.....

सगळे एकत्र मज्जा मस्ती करत......लिस्ट बनवतात

@@@@@@@@@@@@@@@@@@@@

दुसऱ्या दिवशी सगळ्या जणी शॉपिंग साठी निघतात

करुणाचे बाबा : मधु ......ऐक ना.....मी काय बोलतो..... मी हे सगळे पैसे वहिनीच्या हातात देतो.....तुला माहितेना वाहिनीचा हिशोब किती पक्का आहे ते......तुम्ही जे हवं ते घ्या वहिनी पैसे द्यायचं काम करेन.......आणि त्यांना जरा भारीतली साडी काढ....आणि मुलींना पण बघ काय हवं नको ते.......आणि मला जरा साधाच सदरा काढ.... ते जास्त काही त्याच्यावर वर्क केलेलं नको

मधु : वा मस्त....मला आवडला तुमचा निर्णय.....आणि तुम्हाला चांगलाच सदरा काढेन मी काळजी नका करू(दोघे हसत हॉल मध्ये येतात)

दत्तात्रय :  वहिनी एका ना हे घ्या पैसे......सगळा कार्यक्रम उरकुसतोपरेंतर तुम्हीच सगळा हिशोब बघायचा......मुलींना आणि तुमच्या दोघींना चांगले चांगले साड्या आणि कपडे काढा(हसत)

मंदा : (एक टक करुणाच्या बाबांकडे बघते......)भावोजी पैशाचा हिशोब मधु इथे असताना मी का सांभाळु..... मला नाही जमणार हे बाबा.....तुम्ही मधु ला द्या

मधु : एवढा मोठा हिशोब मला तर बिलकुल नाही जमणार......आणि मी कधी सांभाळला पण नाही......मला नाही जमणार

मंदा : अग पण हे सगळं तेवढ्यात मुली तयार होऊन बाहेर येतात....

मंदा च्या चेहऱ्यावर चिंता बघुन निशा विचारते.....काय झालं ....तु एवढी काळजीत का दिसतेस......

मंदा घडलेला सगळा प्रकार सांगते.......

अश्विनी : अग आई त्यांनी तुझ्यावर जी जिमदारी टाकलीय ती काहीतरी विचार करूनच टाकली असेन.... आणि तु अस नाही बोलुन त्यांना नाराज नको करुस.....आधीच आपल्याला लेट होतोय...

मंदा : अग तरी पण.....

दत्तात्रय : पण बिन काही नाही....आता तुम्ही सगळे निघा.....आणि तुम्ही सगळे आज बाहेरच जेवणारेना....मग मी पण मला बाजुला असलेल्या खानावळीतुन जेवण मागवतो.....म्हणजे माझी सोय झाली(हसत)

सगळे एकत्र आनंदाने शॉपिंग ला निघतात

(काय मग कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा तुमच्या कामेंटद्वारे)

































🎭 Series Post

View all